टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अर्थसंकल्प २०१६-१७ (चित्र - सतीश सोनवणे)
  • Thu , 02 February 2017
  • विनोदनामा टपल्या अरुण जेटली Arun Jaitley डोनाल्ड ट्रम्प Donald Trump शिवसेना Shiv Sena मनसे Maharashtra Navnirman Sena

१. निश्चलनीकरणाचा त्रास थोड्या काळासाठीच भोगावा लागणार आहे. मात्र, त्याचे फायदे अधिक आहेत. चांगल्या हेतूने केलेले काम कधीच अपयशी ठरत नाही, असं महात्मा गांधी म्हणायचे. : अरुण जेटली

संदर्भ सोडून का होईना गांधीच उद्धृत करावे लागतात, हे फार बोलकं आहे. मात्र, चांगल्या हेतूने केलेल्या घोडचुकांची भलामण करण्यासाठी गांधींनी हे वचन नक्कीच उद्गारलं नसेल. चांगल्या हेतूने अर्थव्यवस्थेच्या नरड्यावरून सुरी फिरवण्याचा उद्योग असाही अपयशी ठरलेला नाहीच- विकासदरामधली अनावश्यक घट हेच त्याचं 'यश' आहे. 

…………………………………

२. भाजपबरोबरची युती संपुष्टात आल्यानंतर काँग्रेस आणि मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल होणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून आणखी काहीजण शिवसेनेच्या वाटेवर आहेत. मात्र, या ‘आयारामां’मुळे निवडणुकीची उमेदवारी मिळवू पाहणाऱ्या शिवसैनिकांवर गंडांतर येऊ लागल्याने शिवसैनिक संतप्त होऊ लागले आहेत.

नेत्यांना कोहिनूर आणि कार्यकर्त्यांना वडापाव, हे सूत्र जर इतकी वर्षं सतरंज्या उचलून पचनी पडलं नसेल, तर मग संताप होणारच. पण, त्याला अर्थ काय? निवडणुकीत निवडून येण्याची ताकद महत्त्वाची. निष्ठेबिष्ठेचं काय लोणचं घालायचंय?

…………………………………

३. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी पुन्हा एकदा माध्यमांवर बरसले आहेत. बहुतांशी माध्यमे विपर्यस्त वृत्तांकन करणारी आणि बनावट असून अमेरिकेला खात्रीलायक वार्तांकनाची गरज आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. बहुसंख्य बातम्या बनावट असतात, बहुसंख्य माध्यमं बातम्या तयार करतात, बहुसंख्य माध्यमं विपर्यस्त वृत्तांकन करणारी आणि बनावट आहेत, असे ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं.

तात्या, ही वाहिनी बनावट नव्हती, याची खात्री करून घेतलीत ना? मग ठीक आहे. बाकी तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. माध्यमं बनावट नसती आणि त्यांनी बोगस बातम्या दिल्या नसत्या, तर तुमच्याइतका बोगस माणूस सर्वशक्तिमान अमेरिकेच्या प्रमुखपदावर विराजमान होऊ शकला असता का? तुम्हीच आहात माध्यमांच्या बोगसपणाचा धडधडीत पुरावा.

४. देशातील १०००पेक्षा अधिक गावांना मोफत वाय-फाय कनेक्शन देण्याची घोषणा सरकारने केली आहे. याआधी गुगलने मोफत वाय-फाय देण्याची घोषणा केली होती. डिजिटल इंडिया आणि रोकड विरहित व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकार ही योजना लागू करणार आहे. वाय-फाय मुळे अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना संपर्काचे साधन उपलब्ध होईल, असा विचार सरकारने केला आहे.

बरोबर आहे. आज हागणदारी योग्य मोकळी जागा कोणती आहे, गावात प्राथमिक आरोग्यसुविधा नसल्याने कोणत्या वैदूशी संपर्क साधता येईल, झाडपाल्याच्या, भोंदू भगताच्या औषधोपचारांनी माणूस दगावल्यानंतर त्याच्या मयतासाठी, विधींसाठी नातेवाईकांना कसं बोलवायचं, किती मैलावरच्या ओहोळात किंवा विहिरीत टिपूसभर पाणी आहे, अशा मौलिक माहितीच्या देवाणघेवाणीची व्यवस्था असलीच दुर्गम गावांत.

……………………………………..

५. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांसाठी केलेल्या अमेरिका प्रवेशबंदी निर्णयाचे कौतुक करताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ट्रम्प यांच्याकडून थोडी हिंमत, थोडा देशाभिमान व चिमूटभर प्रामाणिकपणा उधार मिळत असेल तर पाहा', असा उपरोधिक टोला हाणला आहे. 'अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या कणखरपणाची चुणूक दाखवली आहे… पाकड्यांच्या बाबतीत जे मोदी सरकारने करायला हवे होते ते ट्रम्प यांनी एका झटक्यात करून दाखवले…' असे टीकास्त्र त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून सोडलं आहे.

ट्रम्प यांच्या या तथाकथित देशाभिमानाने अमेरिकनांच्या पोटात कसा गोळा आला आहे, हे यांच्या गावी नाही आणि अमेरिकेचं श्रेष्ठत्वच मुळात जगभरातून तिथे गेलेल्या बुद्धिमंतांच्या कष्टांतून आकाराला आलं आहे, याचीही कल्पना नाही. आता ट्रम्पकाका भारतीय आयटी व्यावसायिकांचीही अशीच हकालपट्टी करण्याच्या बेताला आहेत, तेव्हा त्या निर्णयाच्याही गौरवासाठी तयार राहा आणि मायदेशी परतणाऱ्या बांधवांच्या भवितव्यासाठी 'आयटी वडापावा'च्या हायटेक गाड्या तयार ठेवा. शेवटी राष्ट्राभिमान महत्त्वाचा.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......