टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • संदर्भ - सेना-भाजप युती (चित्र - सतीश सोनवणे)
  • Wed , 25 January 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अमोल पालेकर Amol Palekar विनय कटियार Vinay Katiyar सुब्रमण्य स्वामी Subramanian Swamy केशवप्रसाद मौर्य Keshav Prasad Maurya एकनाथ शिंदे Eknath Shinde

१. मराठी माणूस नाटकवेडा तर मग नाट्यसंस्कृतीवर हल्ला होतो, तेव्हा कलाकारांच्या पाठीशी तो का उभा राहत नाही? -अमोल पालेकर 

पालेकरसाहेब, मराठी माणूस रंगमंचावरच्या नाटकांचा नाही, नाटकी नेत्यांच्या नौटंकीचा चाहता आहे, त्या अर्थाने तो नाटक'वेडा' आहे. धादान्त खोट्यावर विश्वास ठेवायला लावणं, हे जर अभिनयाचं कौशल्य असेल, तर त्यात नेतेच अधिक सरस असतात, हे तुम्हीही मान्य कराल, नाही का?

………………………..

२. काँग्रेसमध्ये प्रियांका गांधी यांच्यापेक्षाही अनेक सुंदर महिला नेत्या आणि अभिनेत्री असताना पक्षाने त्यांना स्टार प्रचारक म्हणून का नेमले असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे नेते विनय कटियार यांनी उपस्थित केला आहे.

या विधानावरून कसलाही वादंग करण्याचं काहीच कौशल्य नाही. जो तो आपल्या अनुभवातून आणि आपल्या पक्षाच्या धोरणांच्या चौकटींतून बोलतो. ज्या पद्धतीने कटियार यांच्या पक्षात स्टार प्रचारक निवडले जातात, तीच पद्धत जगातली एकमेव पद्धत आहे, अशी त्यांची समजूत झाली असेल, तर त्यात त्यांचा दोष काय?

………………………..

३. 'टाइम्स नाऊ'चे माजी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या आगामी वृत्तवाहिनीच्या नावाला भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्य स्वामी यांनी आक्षेप घेतला आहे. गोस्वामी लवकरच ‘रिपब्लिक’ नावाची वृत्तवाहिनी सुरू करणार आहेत. मात्र, हे नाव संविधानातील कायद्याचा उल्लंघन करणारे आहे, असं स्वामी यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

अर्णबदादा कोणासाठी वाहिनी काढणार आहेत, याची स्वामींना कल्पनाच नाही की, ते असताना अर्णबची गरजच काय, अशा असूयेतून ते हे करतायत? कारण काहीही असो; अर्णबच्या अहंमन्य, उद्धट, उर्मट आणि आचरट पत्रकारितेपासून भारतीय जनमानसाचा काही काळासाठी बचाव होईल, हा फायदाच झाला ना!

………………………..

४. रामलल्लाचे मंदिर दोन महिन्यात बनणार नाही. आता निवडणुकीनंतरच राम मंदिर उभारणार आहोत. राम मंदिर आमच्या आस्थेचा विषय आहे. : भाजपचे उत्तर प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य

या विधानानंतर उत्तर प्रदेशात थंडीच्या लाटेवर मात करणारी हास्याची लाट उसळली असेल. रामलल्ला हा आस्थेबिस्थेचा नाही, भाजपच्या मत-गल्ल्याचा विषय आहे, हे उत्तर प्रदेशातल्याच नव्हे तर देशभरातल्या सगळ्याच रामभक्तांना समजून गेलं आहे. आता दुसरं काही फोडता आलं तर पाहा, म्हणजे पुढची पंचवीस वर्षं नवं दुकान थाटता येईल.

…………………………………………….

५. मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षारक्षकाने टोल कर्मचाऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. शिंदे यांना व्हीआयपी एन्ट्री न दिल्याने या रक्षकाने ही राडेबाजी केली. मात्र, आपल्या सुरक्षारक्षकाने फक्त काचेवर हात ठेवला होता; योगायोगाने ती काच फुटली, असा दावा शिंदे यांनी केला आहे.

शिंदेसाहेब, लोकांना सांगून उपयोग नाही हो! आई जगदंबेच्या आशीर्वादाने आणि माननीय साहेबांच्या प्रेरणेने आपण कुठेही हात न ठेवता किती काचांचा भुगा होतो, याची कल्पना ज्याची फुटली त्यालाच येणार- बाकीच्यांना या दैवी शक्तीचा महिमा काय कळणार?

editor@aksharnama.com

Post Comment

Vidyadhar Pokharkar

Wed , 25 January 2017

टिक्कोजीरावांच्या एकापेक्षा एक सरस टपल्या खाऊन तरी संबंधित व्यक्ती सुधारतील अशी आशा बाळगू या!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......