टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, राम मंदिर, दादर, के. सी. चक्रवर्ती, बंगळुरू आणि उद्धव ठाकरे
  • Fri , 20 January 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम World Economic Forum राम मंदिर Ram Mandir दादर Dadar के. सी. चक्रवर्ती K. C. Chakrabarty बंगळुरू Bengaluru उद्धव ठाकरे Uddhav Thackeray

१. भारतातली ५८ टक्के संपत्ती अवघ्या एक टक्का श्रीमंतांच्या खिशांत एकवटली असून आर्थिक विषमतावाढीचे हे द्योतक आहे. जगातली अर्धी संपत्तीही केवळ एक टक्का धनिकांच्या हाती एकवटली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीआधी ऑक्सफॅमने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतात ५७ अब्जाधीशांच्या हातात २१६ अब्ज डॉलर एवढी संपत्ती असून ही देशातल्या ७० टक्के लोकसंख्येच्या संपत्तीएवढी आहे.

म्हणून तर सरकारने नोटाबंदीचा धाडसी उपाय योजला आहे. आता एकदा सगळा देश कॅशलेस झाला की, सगळ्यांच्या जनधन खात्यांमध्ये ज्याचा त्याचा वाटा येतो की नाही पाहा आपोआप. उगाच नाही दोन हजाराच्या नोटांमध्ये चिप बसवलेली.

…………………………..…………………………..

२. ओशिवरा रेल्वे स्टेशनचं राम मंदिर असं नामकरण केल्यानंतर आता दादर स्टेशनला विठ्ठल मंदिर असं नाव देण्याची मागणी. या स्टेशनला चैत्यभूमी असं नाव देण्याची मागणी याआधीच झालेली आहे.

काही दिवसांनी लोकलमध्ये असा संवाद ऐकू येणार… 'अरे, राम मंदिर से विठ्ठल मंदिर जा रहा था, भाई का फोन आया, तो साई मंदिर उतरना पडा.' 'मी बोल्लो होतो भावड्याला की गणेश मंदिरला उतर, तो गेला अग्यारीला; म्हटलं आता गुरुद्वाराला ट्रेन चेंज करून जैन मंदिरला ये.'

…………………………..…………………………..

३. भारतातला काळा पैसा हा केवळ पाच ते सहा टक्केच रोख रकमेच्या स्वरूपात असल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेचा नेहमीच नोटाबंदीला विरोध राहिला आहे, असं विधान आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी केलं आहे.

तुमच्यासारख्या कचखाऊ अधिकाऱ्यांमुळेच देश विकासापासून, स्वच्छ अर्थव्यवस्थेपासून वंचित राहिला होता. नशीब तुम्ही नव्हतात गेल्या वर्षी. अर्थात असतात तरी तुम्हाला विचारलं कोणी असतं म्हणा! आम्ही तर गव्हर्नरलाही हिंग लावून पुसत नाही.

…………………………..…………………………..

४. शांघाय, सिलिकॉन व्हॅली यांना मागे टाकत बंगळुरू शहराने प्रगतीशील शहरांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. जागतिक आर्थिक मंचाने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) प्रगतीशील शहरांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीत हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे. ३० प्रगतीशील शहरांत दिल्ली, मुंबई आणि चेन्नईलाही स्थान देण्यात आले आहे.

या कामगिरीबद्दल कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार वगैरे मानले आहेत. प्रचंड वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, प्रदूषित तलाव आणि नुकत्याच घडलेल्या विनयभंगाच्या घटना यामुळे चर्चेत असलेले बंगळुरू पाणी आणि विजेच्या समस्येने ग्रासलेलं आहे. उद्योगस्नेही शहरांच्या यादीत केंद्राने बंगळुरूला तळाचे स्थान दिले आहे. असं असताना हा गौरव कसा झाला असेल? मुळात ही यादी प्रगतीशील शहरांची आहे. त्यात जगातल्या प्रमुख शहरांचा समावेश नाही कारण ती आधीच प्रगत झाली आहेत. आपली शहरं दशकानुदशकं 'प्रगतीशील'च आहेत, प्रगत काही होत नाहीत, ही अभिमानाची गोष्ट आहे का?

…………………………..…………………………..

५. मुंबईत जसे काव काव करणारे कावळे भरपूर आहेत, तसे मुंबई महापालिकेच्या कामकाजावर बोलणारे बरेच जण आहेत. पण देशभरात सर्वात जास्त स्वच्छ आणि पारदर्शक कारभार मुंबई महापालिकेत आहे. : शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे

हे वाक्य ठाकरे यांनी सेना-भाजप युतीचे दिवंगत शिल्पकार गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीला अर्पण केलं असणार, यात शंकाच नाही. 'खोटं बोलावं, पण रेटून बोलावं' ही थोर शिकवण माननीय मुंडे साहेबांनीच दिली होती ना महाराष्ट्राला.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......