अरविंद केजरीवाल : An Insignificant Man
कला-संस्कृती - चलत्-चित्र
टीम अक्षरनामा
  • अरविंद केजरीवाल आणि ‘An Insignificant Man’चं पोस्टर
  • Tue , 16 January 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र अॅन अनसिग्निफिकंट मॅन An Insignificant Man अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal खुशबू रांका Khushboo Ranka विनय शुक्ला Vinay Shukla

आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीवनावर आधारित ‘अ‍ॅन इनसिग्निफिकेन्ट मॅन’ हा डॉक्युड्रामा वा फीचर फिल्म खुशबू रांका आणि वनिय शुक्ला यांनी तयार केला आहे. डिसेंबर महिन्यात या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला होता. तेव्हा तो पाहून अनेकांनी या सिनेमाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्या प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आप या पक्षाचे समर्थक फारसे नव्हते, हे विशेष.

नुकताच हा १:३८:३४ एवढ्या कालावधीचा सिनेमा यूट्यूबवर उपलब्ध झाला आहे. त्याविषयी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार इंद्रजित खांबे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक वॉलवर म्हटलं होतं –

“केजरीवाल यांचा मी समर्थक नाही, तरीही ही फिल्म पाहताना अंगावर शहारे आले. ज्या दृरदृष्टीने दिग्दर्शक खुशबू रांका आणि विनय शुक्ला यांनी ही फिल्म शूट करायला सुरुवात केली, त्या दूरदृष्टीला सलाम. संपूर्ण फिल्ममध्ये अंगावर शहारे आणणारे, रडवणारे, हसवणारे कित्येक क्षण टिपलेत. सुदैवाने पूर्ण फिल्म यूट्यूबवर आलीय. चुकवू नका.”

हा सिनेमा २०१३पासून सुरू होतो. तेव्हा केजरीवाल उत्तर भारतात लँड ऑफिसर असतात. तिथपासून त्यांच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे.

तुम्ही केजरीवाल यांचे समर्थक असा किंवा नसा, एका राजकीय विषयावरील फीचर फिल्म कशी असावी हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा तुम्ही पहिल्यांदा पाहायला हवा. तसं तुम्ही केलंत की, दुसऱ्यांदा तुम्ही हा सिनेमा केजरीवाल या माणसाचा आजवरचा प्रवास समजून घेण्यासाठी पाहाल.

केजरीवाल राजकारणी, मुख्यमंत्री म्हणून किती यशस्वी आहेत किंवा नाहीत, हा वेगळा मुद्दा आहे. त्याची चर्चा जरूर करावी. ती स्पष्टपणे करावी. पण त्यासाठी हा माणूस आधी नीट समजून घ्यायला नको का? ते काम हा सिनेमा चांगल्या प्रकारे करतो. तेव्हा पहिल्यांदा हा सिनेमा पहा-

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर खोलीत शिरलेल्या हत्तीची तुम्हाला भीती वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भिडण्याची क्षमता राखता आणि जर ‘लाफ्टर थेरपी’वर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही ‘सखाराम बाईंडर’चा हा प्रयोग नक्की बघाल

माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे कधीही न मानणारे तेंडुलकर आपल्या नाटकाच्या केंद्रस्थानी मात्र नेहमी माणूसच ठेवत आले. आणि हाच माणूस, ते मानत असलेल्या दैवापुढे कसा आणि किती हतबल असतो, हेच ते आपल्या नाटकात सतत दाखवताना दिसतात. तेंडुलकर थेट विषयाला भिडतात आणि त्या विषयावर बसलेली सगळी पुटं निर्ममतेने काढून तो विषय उघडानागडा तुमच्यासमोर पेश करतात. त्यामुळे आलेला प्रेक्षक बिचकतो.......

‘अंबा’ : युद्ध थांबल्याशिवाय पुरुषांना शरीरसुख न देण्याची शपथ घेणाऱ्या बायका आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या पुरुषांची कथा

जगाला शांततेची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा स्थितीत सद्यस्थितीकडे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. अशा वातावरणात हे नाटक मंचित होणं फार महत्त्वाचं आहे. मूळ ग्रीक नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व म्हणजे काळाच्या दृष्टीनं पक्का आहे. मात्र आजच्या जगात कोठे ना कोठे युद्धं सुरू असतं, हिंसेचं थैमान सुरू असतं. अशा स्थितीत एखादा देश किंवा एखादा काळ न दाखवता या भीषण समस्येचं वैश्विक रूप समोर आणणं महत्त्वाचं ठरतं.......

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या किमयेची भुरळ पाडणाऱ्या जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’चं चित्तचक्षुचमत्कारिकाहूनही चमत्कारिक विश्व! (उत्तरार्ध)

जिब्लीचे जवळपास सर्वच चित्रपट पाहून झाले आहेत, पण त्यांच्याविषयी वाटणारं आकर्षण काही कमी होत नाही. जिब्लीपट पाहिल्यानंतर त्या आकर्षणाला उधाणच आल्यासारखं वाटतं. एकदा पाहिल्यानंतरही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि प्रत्येक वेळी पाहू तेव्हा नवीन काहीतरी पाहतो आहोत, असंच वाटतं. केवळ मनोरंजनासाठी एक उत्तम निवड ठरतेच, पण त्यात जे वैचित्र्य आणि जी अद्भुतता आहे, ती पाहताना आपल्यातली सौंदर्यदृष्टीही जागी होते.......