‘बुक्सनामा’ बेस्टसेलर पुस्तके
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
टीम अक्षरनामा
  • ‘बुक्सनामा’ बेस्टसेलर पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Sat , 12 August 2017
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक ‌Book of the Week बुक्सनामा बेस्टसेलर ‌Booksnama Bestseller

१. लढा नर्मदेचा - नंदिनी ओझा

मूल्य – ३५० रुपये, सवलतीत - २६३ रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3746

‘नर्मदा बचाव आंदोलन’ या सशक्त जनआंदोलनानं विस्थापितांना लढण्याचं बळ दिलं. या आंदोलनातल्या आदिवासी कार्यकर्त्यांच्या भूमिकेचं आणि योगदानाचं दखल घेणारं ‘लढा नर्मदेचा...’ हे पुस्तक. केशवभाऊ वसावे आणि केवलसिंग वसावे हे या लढ्याचा कणा असलेले दोन प्रमुख आदिवासी कार्यकर्ते. नंदिनी ओझा यांनी त्यांच्याशी संवाद साधून या आंदोलनाचा मौखिक इतिहास मांडला आहे. तीन दशकांच्या झुंजीची कथा सांगणाऱ्या, तसंच आदिवासींचं विस्थापनापूर्वीचं व नंतरचं जीवन आणि संस्कृती यावर प्रकाश टाकणारं हे एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे.

या पुस्तकातील संपादित अंश वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

http://www.aksharnama.com/client/article_detail/1074

.............................................................................................................................................

२. उद्योग करावा ऐसा... - सुरेश हावरे

मूल्य – ३०० रुपये, सवलतीत - २४० रुपये

'उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा' या अत्यंत लोकप्रिय पुस्तकाचे लेखक सुरेश हावरे तरुण उद्योजकांसाठी यशस्वितेचे आणखी 'पुस्तक-मंत्र' घेऊन आले आहेत. या पुस्तकात त्यांनी २३ नामवंत उद्योजकांशी संवाद साधून त्यांची बिझनेस सिक्रेट्स उलगडून सांगितली आहेत. प्रत्येक नवउद्योजकाला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी उद्युक्त करणारं आणि उद्योग भरभराटीचा फॉर्म्युला सांगणारं पुस्तक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3736

.............................................................................................................................................

३.  पुतिन - गिरीश कुबेर

मूल्य – ३०० रुपये, सवलतीत - २४० रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3482

सोविएत संघराज्याचं विघटन झाल्यानंतर रशियात निर्माण झाली निर्नायकी. रशियाला साम्यवादाच्या जोखडापासून जास्तीत जास्त दूर नेण्याच्या नादात बोरिस येल्त्सिन यांनी अनेक प्रयोग केले. ते बहुतांशी फसले; तथापि व्लादिमिर पुतिन यांना सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयोग मात्र अपवाद ठरला. पुतिन निघाले महाबेरकी आणि तितकेच क्रूरही. यथावकाश येल्त्सिनना बाजूला सारून पुतिननी सारी सत्तासूत्रं आपल्या हातात घेतली. विरोधकांचा काटा काढताना त्यांना कसलाही विधीनिषेध बाळगला नाही. रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचा ध्यास घेऊन देशविदेशात त्यांनी जी पावलं उचलली, ती खूप वादग्रस्त ठरली. राष्ट्रवादाचा मुलामा दिलेली त्यांची व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही प्रदीर्घ काल टिकली तरी कशी, हा भल्याभल्या राजकीय निरीक्षकांची सत्त्वपरीक्षा पाहणारा एक महत्त्वाचा प्रश्न. त्या कुटप्रश्नाची एका व्यासंगी आणि गोष्टीवेल्हाळ पत्रकारानं करून दाखवलेली ही उकल... आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेता घेता एका जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची त्याच्या असंख्य भल्याबुऱ्या कंगोऱ्यांसह करून दिलेली ही ओळख...

या पुस्तकाचे परीक्षण वाचण्यासाठी क्लिक करा -

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/968

.............................................................................................................................................

४. द मराठाज् (१६००-१८१८) - डॉ. स्टुअर्ट गॉर्डन, अनु. र. कृ. कुलकर्णी

मुल्य - २९५ रुपये, सवलतीत - २३६ रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/320

डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मधून सन १९७१मध्ये पीएच.डी. मिळवली. कैक वर्षे भारतात राहून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला आणि त्यातूनच ‘द मराठाज्’ हा ग्रंथ निर्माण झाला आहे. स्वातंत्र्यानंतर मराठा राज्यव्यवस्थेशी निगडित कागदपत्रांचा प्रचंड साठा संशोधकांसाठी उपलब्ध झाला. सरदार घराण्यांकडील कागदपत्रेही उपलब्ध झाली. डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांनी चिकित्सक वृत्तीने या साधनांचा अभ्यास केला असून मराठेशाहीचे प्रमुख आधारस्तंभ असलेल्या विविध देशमुख घराण्यांच्या अनुषंगाने या इतिहासाची मांडणी केली आहे. मराठे मुळात कोण होते, त्यांनी प्रतिष्ठा कशी मिळवली, त्यांची निष्ठा कशी बदलत होती आणि कायदेशीर हक्कांविषयी ते किती सजग होते अशा विविध प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हत्यारबंद टोळ्यांपासून सुसज्ज कवायती लष्करापर्यंत मराठ्यांच्या सैन्यात झालेला बदल, मराठ्यांनी विकसित केलेली महसूल व्यवस्था आणि त्यांनी नोंदलेल्या माहितीच्या भांडाराचा इंग्रजांना झालेला उपयोग अशा महत्त्वाच्या गोष्टींचीही विस्तृत चर्चा या पुस्तकात वाचायला मिळेल. मराठा कालखंडातील सामाजिक परिवर्तनाकडेही लक्ष वेधण्यात डॉ. गॉर्डन यशस्वी झाले आहेत. इतिहासाचे अभ्यासक आणि सामान्य वाचक अशा सर्वांना भावेल अशी खात्री वाटते.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा संपादित अंश वाचण्यासाठी क्लिक करा-

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/945

.............................................................................................................................................

५. आय​ अॅम अ ट्रोल - स्वाती चतुर्वेदी, मराठी अनुवाद - मुग्धा कर्णिक

मूल्य – २०० रुपये, सवलतीत - १८८ रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3506

इंटरनेट ट्रोल्स म्हणून वावरणाऱ्या या व्यक्ती नेटवरील वातावरण कलुषित करत असतात. ते वादावादी सुरू करतात, विचित्र हिंसक शेरेबाजी करून, चित्रे टाकून लोकांना भडकवतात. ऑनलाइन जगातले गुंडच ते! भारताच्या बाबतीत, असले ऑनलाइन ट्रोल्स बहुतेक वेळा उजव्या विचारसरणीचे आणि अतिराष्ट्रवादी असतात. सरकार, भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मते असलेले राष्ट्र यांना आव्हान देणाऱ्या कुणावरही ते हल्ले करतात...

या पुस्तकाची प्रस्तावना वाचण्यासाठी क्लिक करा-

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/947

..........................................................................................................................................

६. सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संपादक – डॉ. पी. विठ्ठल, डॉ. नागोराव कुंभार

मूल्य – २५० रुपये, सवलतीत - १८७ रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3743

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य हा एक प्रेरणा देणारा जीवनदायी किरणांचा अखंड स्त्रोत आहे. या प्रेरणास्त्रोतातून मिळणारी प्रेरणा जीवनाच्या प्रत्येक अंगास स्पर्श करून उल्हासित आणि उत्साहीत करते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये निराशेचे क्षण येतात, अशावेळी निराश न होता कार्यरत राहण्याचा दिलासा बाबासाहेबांच्या जीवनातून मिळतो. बाबासाहेबांची बुद्धिमत्ता ही स्तिमित करणारी आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे हस्तीदंती मनोर्यातील नसून सर्वसामान्यांच्या उद्धाराचा ध्यास घेणारे आहेत. प्रज्ञा, शील आणि करुणा या त्रिसूत्रींचा जसा ते पुरस्कार करतात, तसेच समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या विचारांची सबळ पाठराखण ते करतात. भारत हे राष्ट्र म्हणून उदयास यावे, आणि ते चिरकाल टिकावे, यासाठी त्यांनी केलेली संविधान निर्मिती ही एक एकमेवद्वितीय अशीच आहे. शिक्षणविषयक त्यांचे विचार हे मूलगामी, परखड आणि दिशादर्शक असेच आहेत. सर्वसामान्यांचा आणि वंचित घटकांचा उद्धार हे त्यांचे ध्येय होते. वंचित घटकांचा उद्धार हे त्यातील एक प्रयोग होता. अर्थकारण, समाजकारण, राजकारण, धर्मकारण, शिक्षण, स्वातंत्र्य आणि इतर विषयात त्यांनी केलेले अध्ययन, मनन आणि चिंतन यातून हा बोध होतो. या सर्वदर्शी पैलूंचा वेध घेण्याचा प्रयत्न या ग्रंथात केला आहे. डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. जनार्दन वाघमारे, श्री. ज. वि. पवार यासारख्या लेखकांनी दिलेल्या योगदानाने हा ग्रंथ समृद्ध झाला आहे.

या पुस्तकातील एका लेखाचा संपादित अंश वाचण्यासाठी क्लिक करा-

http://www.aksharnama.com/client/article_detail/1073

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......