फुले दाम्पत्याच्या कार्यामुळे केवळ मुक्ता साळवेला ‘मुक्तीचा मार्ग’ मिळाला नाही, तो इतर सर्व स्त्रियांना मिळाला, तसाच तो तमाम पुरुषांनाही मिळावा!

गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे सारं वास्तव माहिती असतं. स्वयंघोषित गुरू, बाबा, महाराज, योगी, साधू आणि त्यांच्या संस्था, देवस्थानं, आखाडे आणि त्यांचे सत्संग, स्वाध्याय यात जनता अडकलेली आहे. हे सारे उपक्रम स्त्रियांच्या दुय्यमत्वाला, अंधश्रद्धांना, रूढी-परंपरांना आणि विशिष्ट प्रकारच्या राजकीय विचाराला खतपाणी घालणारे असतात. या विचारांची समीक्षा करून मग ते स्वीकारावे, अशी मानसिकता निर्माण होत नाही.......

बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जातिव्यवस्था निर्मूलन’ ही संकल्पना जवळपास ८५ वर्षांपूर्वी मांडली, तरी आजही जात जीवंत आहे, याचा प्रत्यय पदोपदी येतो…

तिसरीत असताना शाळेतल्या परीक्षेत ती पहिली आली आणि तिचा आनंद गगनात मावेना. साहजिकच आपलं प्रगतिपुस्तक घेऊन मित्र-मैत्रिणींमध्ये मिरवावं, असं तिला वाटू लागलं. पण तिच्या वडलांनी तिला तो आनंद मिळू दिला नाही. त्यांचं म्हणणं होतं - आपण ‘महार’ आहोत आणि आपल्या जातीचा तसा स्पष्ट उल्लेख प्रगतिपुस्तकात आहे आणि त्यामुळेच ते इतरांना दाखवायचं कारण नाही. ‘आपण आपली जात का लपवायची?’ असा त्या अजाणत्या वयातील पूजाचा प्रश्न होता.......

हेमाताईंसारख्या अंगणवाडी कार्यकर्त्यांचा विद्यापीठीय चर्चासत्रात सहभाग नसतो आणि त्या स्त्रीवादाला पुढे नेताहेत हे त्यांना कुणी सांगत नाही.    

हेमाताईंनी अनेक वर्षांपूर्वी लिंगाधारीत श्रमविभागणीला आव्हान देण्याचं काम सुरू केलं. पुरुषांच्या जबाबदाऱ्यांबद्दल लोकांशी थेट संवाद साधणाऱ्या त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पथदर्शी कामाचा धांडोळा घेणं अत्यंत जरुरीचं आहे. नेमून दिलेल्या कामाच्या पलीकडील अनेक कामांत काही अंगणवाडी कार्यकर्त्यांनी योगदान दिलं होतं आणि कठीण आव्हानं स्वीकारली होती. समाजाला नवीन विचारांची ओळख त्यांनी करून दिली होती.......