‘अनबिलीव्हेबल’ : ही मालिका व्यवस्थेमुळे निराश झालेल्या स्त्रियांच्या आशा पल्लवित करते!
अर्धेजग - कळीचे प्रश्न
अलका गाडगीळ
  • ‘अनबिलीव्हेबल’ या मालिकेचं एक पोस्टर
  • Mon , 06 December 2021
  • अर्धेजग कळीचे प्रश्न अनबिलीव्हेबल Unbelievable बलात्कार Rape लैंगिक अत्याचार Sexual Harassment पोलीस Police

‘अनबिलीव्हेबल’ या नेटफ्लिक्सवरील मालिकेतील सुरुवातीचं एक विदारक दृश्य. १६ सोळा वर्षांची मारी अॅडलर पोलिसांना सांगत असते- “मी गाढ झोपेत होते. काही कळायच्या आतच तो खिडकीची काच सरकवून खोलीत आला. त्याने तोंडावर मास्क लावलेला होता, कानटोपी घातली होती आणि हातमोजेही घातलेले होते. त्याचे फक्त डोळे दिसत होते. त्याच्याकडे दोरी होती. त्याने मला पलंगाला बांधलं. माझ्या तोंडात रुमाल कोंबला, मग माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली. आणि माझ्यावर तीनदा बलात्कार केला. ‘तू कोणाला काही सांगितलंस तर मी तुझा खून करीन’, अशी त्याने धमकी दिली. तो इथं दोन-तीन तास होता. नंतर त्याने मला दोनदा आंघोळ करायला लावली, तेव्हाच तो गेला.”

मारीची देखभाल फॉस्टर (दत्तक) पालक करत होते. म्हणजे ती वेगळी राहत असली तरी तिची जबाबदारी फॉस्टर पालकांकडे होती आणि ही घटना झाल्यावर तिची दत्तक आई तिच्यापर्यंत पोचली होती आणि तिचं ऐकून घेत होती. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यप्रणीत ‘अडचणीत असलेल्या किशोरवयीन मुलामुलींसाठी सोशल सर्विस प्रोग्राम’अंतर्गत तिला मदत मिळत होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

काही दिवसांनंतर मारीच्या घरी इन्स्पेक्टर पार्कर भेटायला आले आणि त्यांनी घटनेचे तपशील विचारले. मारी पुन्हा सगळी माहीत सांगत असते. पण लवकरच तिला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं जातं आणि घडलेलं सारं पुन्हा सांगावं लागतं. तिच्या नाजूक मानसिक आणि भावनिक स्थितीशी त्यांना देणं-घेणं नसतं. एवढं झाल्यानंतर ते तिला फैलावर घेतात. ‘पुरावा कुठे आहे?’ मारी निराश होते. पुरावा शोधण्याचं काम खरं तर पोलिसांचं. ते न करता ते तिलाच खोटं ठरवतात आणि तक्रार मागे घ्यायला लावतात.

लैंगिक अत्याचाराच्या तपासात अनेक जटील आणि विशेष प्रक्रियांचा समावेश होतो. बलात्काराचा तपास करताना पुरावे आणि माहिती प्रामुख्यानं पीडित स्त्री, गुन्ह्याचं ठिकाण आणि संशयिताकडून घेतली जाते. लैंगिक अत्याचाराचं प्रकरण हाताळताना स्त्रीवर ठपका ठेवता कामा नये आणि पीडित स्त्रीला लाज वाटू नये किंवा ती स्वत: दोषी असल्याची भावना तिच्यात निर्माण होऊ नये, या साठी प्रयत्न केले पाहिजेत.  

पोलीस  मेरीला सांगत राहतात की, तिची कथा विसंगत आणि बनावट आहे. “तू  गाढ झोपेत होतीस  तेव्हा घुसखोर आत आला आणि त्यानं तुझ्यावर  बलात्कार केला असं तू म्हणतेस, पण तू कोणताही पुरावा देऊ शकली नाहीस. तुला बलात्काराचं स्वप्न पडलं की काय? (‘Did you dream a rape?)’ पोलिसांच्या या बेताल बोलण्यामुळे मेरी हादरून जाते. तिच्यावर बलात्कार झाल्यानंतर ‘तिनं काय केलं? कोणाला बोलावलं? त्यांनाच का बोलावलं?’ पोलिसांच्या या प्रश्नांच्या माऱ्यामुळे ती अधिकच अस्वस्थ होते.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

पोलीस एवढ्यावरच थांबत नाहीत. त्यांचा वेळ खराब केला असं म्हणून तिला माफीनामा लिहून द्यायला भाग पाडलं जातं. माफीनाम्यामुळे तिला मिळत असलेली सरकारी मदत थांबण्याची शक्यता असते. तिच्या मित्रमैत्रिणींना आणि दत्तक पालकांना पोलिसांचं म्हणणं खरं वाटू लागतं आणि एका मागोमाग एक करून ते तिला सोडून जातात.

खरं तर कोणीही लैंगिक अत्याचाराच्या पीडितेला दोष का देईल, असा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. पण अनेकदा हे घडतं. मी निर्दोष आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी पीडितेवर टाकण्यात येते. खरं तर ती गुन्हेगारावर टाकायला हवी. पण अनेकदा अत्याचार झालेल्या स्त्रीलाच समाज शिक्षा करतो. या मालिकेत हे वास्तव लख्खपणे पुढे आलेलं आहे. हा लिंगपिसाट इतर काही स्त्रियांवरही अत्याचार करतो. त्यांनाही पोलीस मदत करत नाहीत आणि समाज फार चांगल्या नजरेनं त्यांच्याकडे पाहत नाही.

वास्तविक, गुन्हा सिद्ध करणं हे पोलिसांचं काम आहे. स्त्रिया बलात्काराबाबत खोटं बोलतात, हा समज खोडून काढावा लागेल. अनेक लैंगिक अत्याचार पीडितांनी स्वतःला दोषही दिला असेल. ‘मीच काहीतरी चुकीचं केलं, किंवा अत्याचार थांबवण्यास मी कमी पडले’, असं त्यांना वाटू लागतं.  जागतिक स्तरावर पोलिसांचे अत्याचार आणि महिलांनाच दोषी ठरवणारी यंत्रणा, हे आजचं वास्तव आहे. अशा कारणांमुळेच पीडितेला दोष देण्याचं कथन अस्तित्वात येतं.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

मारीवर बलात्कार झाल्यानंतर तीन वर्षांनी ग्रेस रासमुसेन आणि कॅरेन डुव्हल या कोलोरॅडोमधील दोन महिला गुप्तहेरांसमोर एकमेकांशी स्पष्ट साम्य असलेल्या गुन्ह्यांची प्रकरणं येतात. या दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हेगारानं मागे एकही पुरावा न ठेवता बलात्कार केलेला असतो, हे त्यांच्या लक्षात येतं. तपास सुरू झाल्यानंतर गुन्हेगारानं अचूकपणे गुन्हे केले आहेत, हे पाहता तो पोलीस असण्याची शक्यता आहे, असं त्यांना वाटू लागतं. इतर काही राज्यांत अशाच  केसेस झालेल्या आहेत का, याचा  शोध घेताना वॉशिंग्टनमधील मारीची केस त्यांना सापडते. तिने आपल्या जबानीत ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, तसाच तपशील कोलोरॅडोमधील दोन्ही प्रकरणांत सापडतो.

त्या दोन्ही प्रकरणांत मास्क घातलेल्या पुरुषानेच बलात्कार केलेला असतो. या दोन्ही स्त्रियांना स्थानिक पोलिसांनी त्रास दिलेला असतो. रासमुसेन आणि डुव्हल यांना पोलीस करत असलेल्या अत्याचाराची माहिती असते आणि गुन्हा करणारा पोलीसच असावा, याची त्यांना खात्री पटते. म्हणून  तपास करताना अवाजवी हिंसा केलेल्या तसंच घरगुती अत्याचाराचा ठपका असलेल्या पोलिसांचा डेटा त्या दोघी मिळवतात. तो तपासताना त्यांना जेम्स मॅसीचे तपशील सापडतात. अशाच गुन्ह्यासाठी त्याला निलंबित करण्यात आलेलं असतं. त्याचा पत्ता आणि तो वापरत असलेल्या कारचे तपशील त्यांना मिळतात. त्याची टोयोटा कार गुन्ह्याच्या ठिकाणी पाहिल्याचं काही जणांनी सांगितलेलं असतं.

जेम्स मॅसी या गुन्हेगार पोलिसाचा शोध घेण्याचं काम या दोन महिला पोलीस अधिकारी करतात. मॅसीच्या घरावर त्या धड टाकतात, तेव्हा त्याचा भाऊ तिथं असतो, पण जेम्स मात्र फरार असतो. अखेरीस त्याला अटक करण्यात पोलिसांना यश येतं. त्याने अत्याचार केलेल्या स्त्रियांची छायाचित्रं आणि व्हिडिओ त्याच्या घरी सापडतात. मॅसीच्या छायाचित्रांच्या संग्रहातली मारीची छायाचित्रं, व्हिडिओ आणि इतर अनेक तपशील डिटेक्टिव्ह पार्करकडे पाठवले जातात. तो कोलोरॅडोला डुव्हल आणि रासमुसेन यांना भेटतो. एका टेबलवर असंख्य फाइल्स आणि छायाचित्रं ठेवलेली असतात. त्यांचा अभ्यास करताना पार्कर खजील होतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

जेव्हा खटला सुरू होतो, तेव्हा साक्ष देताना कोलोरॅडोमधील दोन पीडित महिला न्यायालयात अक्षरक्ष: रडतात. पहिली म्हणते- “मी माझी झोप गमावली; मित्र सोडून गेले, मला मानसिक वेदना होतात. मी काम गमावलं, पैसे गमावले आहेत. माझ्या मनात हिंसक विचार येतात.”

दुसरी म्हणते- “मला भयानक स्वप्न पडतात... मला नेहमी भीती वाटते... दिवसाच्या प्रत्येक क्षणी... माझे मित्र मला मदत करण्याचा प्रयत्न करतात पण मी सर्वांवरचा विश्वास गमावला आहे...”

खटला सुरू झाल्यानंतर वॉशिंग्टन पोलिसांचं अपयश न्यायालयात उघडं पडतं. बहुतेक लोक मुळात चांगले असतात, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे असं मारी म्हणते. कोलोरॅडोमधील इतर दोन पीडित स्त्रियांपेक्षा मारी वयानं लहान असते आणि तिच्यावर आधी बलात्कारी व्यक्तीनं आणि नंतर प्रशासनानं अत्याचार केलेले असतात. ती खोटं बोलत असल्याचा आरोप ते करतात. परिणामी तिचं सर्वस्व जातं. सरकारी मदत जाते, मित्र सोडून जातात. न्याय मिळवून न देता चुकीचे आरोप तिच्यावर ठेवल्यामुळे सरकारवर खटला भरला जातो. तिला उत्तम वकील दिला जातो. परिणामी तिला न्यायव्यवस्थेचा निर्वाळा आणि आणि वॉशिंग्टन राज्याकडून भरपाईही मिळते. पण पोलिसांकडून क्षमायाचना काही मिळत नाही. अखेरीस ती त्यांना गाठते आणि क्षमा मागण्यास भाग पाडते.

‘अनबिलीव्हेबल’ ही मालिका व्यवस्थेमुळे निराश झालेल्या स्त्रियांच्या आशा पल्लवित करेल, हे नक्की.

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ युनिसेफसाठी काम करतात.

alkagadgil@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......