गुरमेहेर, तू ग्रेट आहेस आणि सेहवाग, तू खुजा!
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • गुरमेहेर कौर
  • Wed , 01 March 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar गुरमेहेर कौर Gurmehar Kaur अखिल भारतीय विद्यार्थी परिषद Akhil Bharatiya Vidyarthi Parishad ABVP Virender Sehwag किरेन रिजिजू Kiren Rijiju प्रताप सिन्हा Pratap Simha

गुरमेहेर कौर हे नाव आता साऱ्या देशाला माहीत झालं आहे. तिला पोलीस संरक्षण घ्यावं लागलं. दिल्ली सोडून पंजाबात, जालंदरला जावं लागलं. जिवे मारण्यापासून ‘तुझ्यावर बलात्कार करू’ असा धमक्या तिला दिल्या गेल्या.

तिचा गुन्हा काय होता?

दिल्ली विद्यापीठातल्या रामजस कॉलेजमध्ये ‘प्रतिरोध की संस्कृती’ हा कार्यक्रम घ्यायला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. दंगा केला. मारझोड केली. कॉलेजातलं वातावरण दूषित केलं. त्यावर गुरमेहेरने हातात एक पोस्टर घेतलं. त्यावर लिहिलं – ‘मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. अभाविपला घाबरत नाही. मी काही एकटी नाही. भारतातला प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे.’

तिचा या बॅनरसहीतचा फोटो फेसबुकवर पोस्ट झाला आणि तिला ‘तुझ्यावर बलात्कार करू’, अशा धमक्या सुरू झाल्या.

त्यानंतर कोण ही गुरमेहेर याबद्दल माध्यमांनी तपास केला तर कळलं की, १९९९ साली कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅ. मानदीप सिंह यांची ही कन्या. ती दोन वर्षांची होती तेव्हा तिचे वडील शहीद झाले. अनाथपण पदरी वागवत स्वत:ला घडवलं या मुलीनं. आता २० वर्षांचं वय. सध्या दिल्ली विद्यापीठातल्या लेडी श्रीराम कॉलेजात ती शिकते. अभाविपच्या दादागिरी विरोधात ती उभी राहिली. विद्यार्थ्यांना स्वत:चं मत त्यांच्या कॉलेजात मांडायला कुणी विरोध करेल तर त्याविरोधात मी उभी राहीन, असं ठामपणे सांगणाऱ्या या बहादूर शहीद कन्येला अभाविपचे लोक देशप्रेम वगैरे शिकवू लागले. पाकिस्तान आपला शत्रू असं सांगू लागते. त्यानंतर तिचं एक पोस्टर व्हायरल झालं. ‘माझ्या वडिलांना पाकने नव्हे युद्धाने मारलं.’ त्यावर केंद्राचे गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी तर कमाल केली. ते म्हणाले, ‘या मुलीच्या डोक्यात कुणीतरी घाण भरलीय. तिला बहकवलंय. ती भरकटलीय.’ म्हैसूरचे भाजपाचे खासदार प्रताप सिन्हा यांनी तर त्यावर कडी केली. ते म्हणाले, ‘ही गुरमेहेर दाऊद इब्राहिमसारखी गद्दार, देशद्रोही, पाकिस्तानधार्जिणी आहे.’ रिजिजू, सिन्हा हे बोलूनचालून राजकीय लोक आहेत. त्यांचं बेताल बोलणं समजू शकतं. पण क्रिकेटपटू विरेंद्र सहवाग यांनी तर हद्द ओलांडली.

माझ्या वडिलांना पाकिस्तानने नव्हे युद्धाने मारलं, युद्धच झालं नसतं तर ते मरते ना, या गुरमेहेरच्या गंभीर वेदनेवर सेहवाग म्हणाला, ‘माझं तृतीय शतक मी नव्हे तर माझ्या बॅटनं मारलं!’ ट्विटरवर तो हे म्हणाला. गुरमेहेरच्या भावनेची चेष्टा करणं हा त्याचा हेतू त्यातून उघडपणे व्यक्त होतो. सेहवाग हा मोठा खेळाडू, पण एका शहीद कन्येचं दु:ख आणि त्या दु:खातून तावून सुलाखून भाजून मिळालेलं शहाणपण तो ओळखू शकला नाही. त्यामुळे सेहवाग माणूस म्हणून खुजा असल्याचं दिसून आलं.

गुरमेहेरचं हे मत अर्धंमुर्धं मीडियासमोर आलं. हे मत मांडणारा तिचा व्हिडिओ १९ महिन्यांपूर्वीचा आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी युट्यूबवर तो पाहिला आहे. त्यात तिने भारत-पाकिस्तान या दोन देशांत युद्ध होऊ नये, शांतता निर्माण व्हावी, यासाठी कॅम्पेन केलंय. स्वत:ची व्यथा मांडलीय.

त्या व्हिडिओमध्ये गुरमेहेर म्हणते – ‘हाय, माझं नाव गुरमेहेर कौर. भारतात जालंदर इथं राहते. माझे वडील कॅ. मानदीप सिंह १९९९च्या कारगिल युद्धात मारले गेले. ते वारले तेव्हा मी दोन वर्षांची होते. माझ्याकडे त्यांच्या आठवणी फार कमी आहेत. वडील नसल्यानं काय अनाथपण वाट्याला येतं याच्या आठवणी माझ्याकडे अधिक आहेत. मला हेही आठवतं की, माझ्या वडलांना मारल्यामुळे मी पाकिस्तानी आणि पाकिस्तान यांचा किती द्वेष करायचे. मी मुसलमानांचाही द्वेष करी. कारण सारे मुसलमान पाकिस्तानी असतात असं मला वाटे. सहा वर्षांची असताना एका बुरखा घातलेल्या महिलेला चाकू मारण्याचा मी प्रयत्न केला होता. ती माझ्या वडलांच्या मृत्यूला जबाबदार आहे असं कुठल्याशी विचित्र कारणानं मला वाटायचं. माझ्या आईनं मला आवरलं आणि समजावलं की, माझ्या वडलांना पाकिस्ताननं नव्हे, युद्धानं मारलं.’

या व्हिडिओमध्ये गुरमेहेरने स्वत:ची जडणघडण आणि विचाराची दिशा समजावून सांगितली आहे. ती पुढे म्हणते – ‘हे कळायला मला जरा वेळ लागला. पण आज मी द्वेष सोडून द्यायला शिकले आहे. हे सोपं नव्हतं, पण कठीणही नाही. जर मी हे करू शकते तर तुम्हीदेखील ते करू शकता. आज मी माझ्या वडलांसारखीच एक सैनिक आहे. मी भारत-पाकिस्तानमधल्या शांतीसाठी लढते. कारण आमच्यामध्ये युद्ध झालं नसतं तर माझे वडील आज माझ्याबरोबर असते.’

बाप गमावलेली एक मुलगी हा व्हिडिओ बनवून तो सार्वजनिक करते आणि एवढ्या संवेदनशील विषयावर धाडसाने आपलं मत मांडते, हे समजून घेतलं तर गुरमेहेरच्या मोठेपणाचं मोल कळतं. ती व्हिडिओमध्ये पुढे म्हणते – ‘दोन्ही देशांनी ढोंगबाजी बंद करावी आणि ही समस्या सोडवावी. जर दोन महायुद्धानंतर फ्रान्स आणि जर्मनी युरोपात एकत्र नांदू शकतात. जपान आणि अमेरिका आपला भूतकाळ गाडून प्रगतीच्या दिशेनं झेपावू शकतात तर भारत-पाक का नाही मैत्री करू शकत? बहुसंख्य सामान्य भारतीयांना आणि पाकिस्तानी नागरिकांना शांतता हवी आहे, युद्ध नको ही त्यांची मनोमन भावना आहे.’

या व्हिडिओमध्ये गुरमेहेरने आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे. दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. दोन्ही देशांचं नेतृत्व तिसऱ्या दर्जाचं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पहिल्या दर्जाचा देश बनण्याचं स्वप्न बघू शकत नाही. कृपा करा. कंबर कसा. एकमेकांशी बोला. काम तडीस न्या, असं आग्रहीपणे ती बोलते.

गुरमेहेर पुढे सुनावते – ‘राष्ट्रपुरस्कृत दहशतवाद आता पुरे. राष्ट्रपुरस्कृत हेरगिरीही बस्स झाली. राष्ट्रपुरस्कृत द्वेषही आता थांबवा. कारण सीमेच्या दोन्ही बाजूचे भरपूर लोक मेलेत. आता पुरे म्हणजे पुरे! जिथं आपल्या वडलांना गमावलेल्या गुरमेहेर कौर नाहीत अशा जगात मला शांततेनं जगायचंय. मी एकटी नाही. खूप जणी आहेत माझ्यासारख्या!’

कॉलेजात शिकणारी मुलगी दोन्ही देशांना केवढं शहाणपण शिकवते आहे आणि रिजिजू, सिन्हा, सेहवाग हे तिची चेष्टा करताहेत, टर उडवताहेत.

भारत-पाक या दोन्ही देशांमध्ये शांतता नांदावी, ही गुरमेहेरने मांडलेली भूमिका काही पहिल्यांदा मांडली गेली आहे असं अजिबात नाही. म. गांधी, खान अब्दुल गफारखान, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया यांनीही ती मांडली आहे. अगदी अलीकडे अनेक जण ही भूमिका सातत्याने मांडत आहेत. मात्र फक्त गुरमेहेरवर अभाविप आणि समविचारी लोक तुटून का पडले? रामजस कॉलेजात अभाविपने जी दादागिरी केली, त्याविरुद्ध गुरमेहेरने भूमिका घेतली म्हणून तर त्या संघटनेला राग नाही ना आला?

खरं तर गुरमेहेरने रामजस कॉलेजात जे घडलं, तेव्हा काही भूमिका नाही मांडली. त्याआधी १९ महिन्यांपासून ती ही कॅम्पेन करते आहे. रामजस प्रकरणाअगोदरपासून तिची ही भूमिका युट्यूबवर उपलब्ध आहे. लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे. मग तोपर्यंत अभाविपचं लक्ष गेलं नव्हतं का? तेव्हा रिजिजू, सिन्हा, सेहवाग आणि आता बलात्काराची धमकी देणारे कुठे होते?

यातली खरी ग्यानबाची मेख ही आहे की, रामजस प्रकरणात गुरमेहेरने अभाविपविरुद्ध भूमिका घेतली आणि तिला कात्रीत पकडण्यासाठी अभाविपने तिची भारत-पाक शांततेसंबंधीची भूमिका वादग्रस्त ठरवली, हे आता स्पष्ट झालं आहे. अभाविप जिनं देशासाठी आपले वडील गमावलेत त्या मुलीला देशभक्ती शिकवावी?

आता गुरमेहेर दिल्ली सोडून गेलीय. तिने जाहीर केलं आहे की, ‘मी आता या प्रकरणातून माझी सुटका करून घेते. मला एकटीला जगू द्या.’

वादातून तात्पुरती ही धाडशी मुलगी स्वत:हून बाजूला गेली असली तरी तिच्या मोठेपणाचं सोशल मीडियावर कौतुक केलं गेलं. ‘आम्ही तुझ्यासोबत आहोत’ अशी देशातली तरुणाई तिला सांगत आहे. अभाविप स्वत:च्या भूमिकेला चिकटून बसली असली तरी नवी पिढी ‘जुने जाऊ द्या मरणालागूनी जाळून किंवा पुरून टाका, सावध ऐका पुढल्या हाका,’ असं म्हणताना या निमित्ताने दिसली हे आशादायक आहे.

 

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

Post Comment

ADITYA KORDE

Thu , 23 March 2017

@Ghansham Gedekar Ji माझी आई आणि मामा दोघेही भारतीय वायुसेनेत होते. आईने १९६२,६५ आणि ७१ च्या युद्धात काम केले होते. ( ती civilian services मध्ये होती . १९६२ च्या पराभवानंतर त्यांच्या युनिटला तांत्रिक शिक्षण देऊन 9BRD, Lohagaon, pune base मध्ये घेतले गेले. आई लढाऊ विमानाच्या बिनतारी संदेशवहन यंत्रणांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करीत असे, पुढे तिथेच Supervisorझाली.) तिला ७१ युद्धात काम केल्याबद्दल सेवा मेडल मिळाले होते.(म्हणून मलाही गुरुमेहेर प्रमाणे बोलायचा अधिकार प्राप्त होतो असे मला म्हणायचे नाहीतर मी जे सांगतो आहे त्याची विश्वासार्हता ठसवायची आहे. हि पुढे सांगितलेली घटना काल्पनिक घटना नाही.) तर ती ६५च्या वेळची गोष्ट सांगायची . त्यांच्या युनिटचे C.O. कोणीतरी खन्ना म्हणून होते.त्यांचा जावई भूदलात कॅप्टन होता आणि तो युद्धात युद्धबंदी झाला होता , त्याचा अतोनात छळ झाला आणि त्याला अर्धमेल्या अवस्थेत भारतीय हद्दीत टाकून दिले पाकड्यांनी. त्याच्या हातापायाची आणि काही बरगड्यांची हाड मुद्दाम तोडली होती (किंवा मारहाणीत मोडली असावीत) पण त्याहून अमानुष म्हणजे त्याला पूर्ण नग्न करून टाकला होता, पाठीवर सिगारेट ने चटके देत ठिपक्या ठिपक्या ने Gift to India असे लिहिले होते. तो अर्थात पुढे वाचला नाही. त्याचे सासरे जोपर्यंत माझ्या आईच्या युनिट मध्ये होते तोपर्यंत एक ही दिवस असा जात नसे कि त्याची आठवण त्यांनी काढली नाही आणि संतापाने दातओठ खात पाकला शिव्यांची लाखोली वाहिली नाही. त्यांची हि प्रतिक्रिया स्वाभाविक आहे/ होती. अनैसर्गिक असेल तर ते गुरुमेहेर चे वागणे बोलणे. खन्ना साहेबांच्या जावयाला आणि अशा अनेक हाल अपेष्टा छळ सोसत शहीद झालेल्या ( मेलेल्या नाही) सैनिकांना पाकने नाही तर युद्धाने मारले असे म्हणायचे झाले तर काही खास प्रकारचे अन्न खाऊनच हि गांडूगिरी अंगात येत असावी. ( अपशब्दाबद्दल माफी मागतो पण दुसरा समर्पक शब्द सुचला नाही....काय करणार) ...


ADITYA KORDE

Sun , 12 March 2017

आम्हीही भविष्यवेत्ते – आजची भविष्य वाणी- आता लवकरच गुर मेहेर कौर आणि तिची प्रसिद्ध उक्ती “माझ्या बाबांना पाकिस्तानने नाही हो मारले, युद्धाने मारले.” विस्मृतीच्या गर्तेत जाईल... बघा हा सगळ्यात अधी मीच हे भविष्य वर्तवतोय...दिनांक १२ मार्च २०१७


ADITYA KORDE

Wed , 01 March 2017

all these largely media run campaigns of outrage have had a clear pattern since 2014. 1) An event is carefully picked and/or staged either just before or during a major election. 2) Someone, preferably a woman, plays an agent provocateur first, and then plays the victim claiming 'death threats and rape threats', but no one goes to the cops to register a complaint. 3) 'Friendly' journalists from the left-liberal ecosystem step in, propping up the claims of the 'victim'. The victim is transferred from TV studio to studio, and encouraged to give a carefully curated version of his/her story, with liberal prompts by the 'journalists' interviewing them. 4) Once enough 'hawa' is created, political parties opposed to the BJP take up the cause, almost always, AAP is the first one, followed by the Congress. 5) Any voices politely questioning the narrative, no matter how credible or accomplished they are, are immediately termed 'abusive, hateful, intolerant' and massively trolled. 6) In an amazing coincidence, the carefully orchestrated campaign reaches its crescendo around the last phase of the election campaign. 7) Once the polling is over, the campaign is quietly withdrawn, sleeper cells are told to sleep again, till it is time to activate them during the next round of elections! - Shefali Vaidya


rahul velapure

Wed , 01 March 2017

लेखात वापरला गेलेला "शहिद" हा शब्द वारंवार खटकला... आपल्याकडे "हुतात्मा" शब्द उपलब्ध असून देखील "शहिद" शब्दाच्या वारंवार केल्या गेलेल्या वापराने लेखाचं गांभीर्य कमी झालं आहे.


GHANSHAM GEDEKAR

Wed , 01 March 2017

Aditya Korde @ युद्धात वडील गमावलेल्या मुलीला तुम्ही उंटावरून शहाणपणा शिकवीत आहात, असे नाही का वाटत... जिने वडील गमावले.. जी वडिलांच्या प्रेमाला पोरकी झाली.... ती आपली भावना मांडून ही परिस्थिती दुसऱ्यावर येऊ नये... साठी काही प्रयत्न करीत आहे... तिला तुम्ही शहिदांचा अपमान केल्याचे म्हणताय... जी स्वतः एका शहिदांची मुलगी असताना.... आपण मोठं मोठे लेख लिहिता अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा उपभोग घेऊन... आणि दुसऱ्यावर बंधने घालता.... एवढेच नव्हे तर त्या मुलीला बलात्काराची धमकी देणाऱ्या विरुद्ध एक शब्द लिहीत नाही.... फक्त चुकले एवढे लिहून त्यांचेकडे दुर्लक्ष करता.... महिलेचे पावित्र्य म्हणजे शील... आणि ते शील भ्रष्ट करणार्यांना पाठीशी घालता.... तुमच्या मतानुसार जर त्या मुलीने शहिदांचा अपमान केला आहे .... तर सातत्याने भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या .. लढाया आणि वारंवार छुपे हल्ले करून शेकडो जवानांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या पाकिस्तान च्या अध्यक्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष पाकिस्तानात जाणारे "देशभक्त" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण फासावर लटकविण्याची मागणी का केली नाही....


SACHIN PATIL

Wed , 01 March 2017

दुसऱ्याला खुजा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला


ADITYA KORDE

Wed , 01 March 2017

आपल्या पैकी बरेच जण पूर्वी कॉलेज मध्ये गेलेले आहेत, मी हि गेलो आहे, बहुसंख्य विद्यार्थी त्याकाळी तरी अभाविप ऐन्वा इतर विद्यार्थी संघटना पासून अलिप्त असत आजही असतील सद्यस्थिती मला माहिती नाही, आमच्या वेळी तुमच्या फीचे पैसे आम्ही भरतो तर गुमान शिका जास्तीची नाटक नकोत अशी घरून तंबी असायची तर माझ्यासारखी काही विद्यार्थी नोकरी करून शिकायचो त्यामुळे असल्या गोष्टींना वेळच नसायचा पण ठीक आहे जर भारत पाक युद्ध किंवा एकंदर समाजातील , देशातील युद्धखोरी, किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्या सारख्या गहन विषयावर भूमिका घेऊन काही चा;लवला करायची असेल तर ती भूमिका पुरेशी समंजस आणि सर्व सामान्य विद्यार्थ्यांना अपील होणारी नको?.... जयपूर लीत. फेस्त मध्ये तस्लीमा नसरीन सारख्या लेखिकेला येऊ दिले जात नाही तीच गोष्ट सलमान रश्दी सारख्या लेखकाची, ह्यावर इतक्या जागरूक विद्यार्थ्यांच्या काय भूमिका आहेत? निवडणुकांच्या काळात ह्यांना हे मुद्दे कसे सुचतात. साधे १००० पत्रक छापून वाटायचे म्हटले तर ३००० रु खर्च येतो एवढे मोठ नोठे आंदोलन चालवायला ह्या विद्यार्थी द्संघातानांकडे पैसा कुठून येतो... माझ्या वडिलांना पाकने नव्हे, तर युद्धाने मारले" ! असे म्हणण्याने तिच्या वडिलांच्या हौतात्म्याचा अपमान झालाच आहे. पण तिला नसेल तिच्या वडिलांबद्दल आदर, असे म्हणता येईल. अनेकांना नसतो आपल्या वडिलाबद्दल आदर....भारत पाक युद्ध अशी ४ च झालेली आहेत ह्यातील एकही युद्ध भारताने हल्ला केल्यामुळे झालेले नाही..पण अतिरेकी हल्ले किती झाले... पण ह्या म्हणण्याने, पाक पुढच्या वेळी पाक युद्ध खोरी करेल तेव्हा आन्ही गुरुमेहेर कोर आणि तिचे सवंगडी प्लाकार्द घेऊन सीमेवर पाकला समजावयाला जाताना बघू अशी आशा आहे...बरोबरच्या आजवरच्या सगळ्या युद्धांत, १९४७, १९६५, १९७१, कारगिल, आणि असंख्य दहशतवादी हल्ले (२६/११) ......... यांत वीरगती प्राप्त झालेल्या असंख्य जवानांच्या बलिदानाचाही घाऊक अपमान झालेला आहे, जो करण्याचा तिला काडीमात्र अधिकार नाही. तिच्या बरोबर मंचावर गेलेले कविता कृष्णन सारखे लोक जे भारतीय सैन्य काश्मिरात बलात्कार करते असे म्हणाली होती त्याबद्दल गुरुमेहारचे काय म्हणणे आहे ...कि तिला ते मान्य आहे... अभाविप जे काही करते किंवा जसे वागते ते चूक आहे म्हणजे त्यांचा मार्ग आक्रस्ताळेपणाचा आणि बे कायदेशीर आहे...पण ह्यांचा मार्ग दांभिकपणाचा आणि दुटप्पी आहे... निषेध सभ्य भाषेत करायचा झाल्यास शब्द अपुरे पडतात. आणि असभ्य भाषा मी वापरू शकत नाही . त्यामुळे इतकेच पुरे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......