आज काही मोजके सुपात आहेत, तर बहुसंख्य जात्यात भरडले जात आहेत. आज नाहीतर उद्या, सुपातला जात्यात जाईल किंवा त्यांच्या पुढच्या पिढीला नक्कीच भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल

नवीन पेन्शन योजनेचे दोन पैलू आहेत. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीतून मुक्त झाले, हा पहिला महत्त्वाचा पैलू. दरमहा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या १४ टक्के रक्कम भरली की, शासनाची जबाबदारी संपली. त्यानंतर फंड मॅनेजर संस्था आणि सेवानिवृत्त गुंतवणूकदार दोघेही एकमेकांचे काय ते बघून घेतील! दुसरा महत्त्वाचा पैलू असा की, शासनाला कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे पैसे काहीही करून भांडवली बाजारात आणायचे आहेत.......

या पुस्तकात वैचारिक शिस्तीचा अभाव आहेच, त्याचबरोबर सातत्याने पुराव्याशिवायच्या शेलक्या विधानांची फवारणी केल्याने लेखकाचा अंत:स्थ हेतू वेगळा असल्याचे जाणवू लागते (उत्तरार्ध)

गांधी समजून घ्यायला कठीण का पडतात? किंवा ते आपल्याला फसवत आहेत असे का वाटते? याचे कारण गांधी नसून त्यांचे विश्लेषक आहेत. भारतातील सर्व डाव्या चळवळी म्हणजे साम्यवादी, समाजवादी, आंबेडकरवादी आणि इतर डाव्या समजणाऱ्या चळवळींची वैचारिक मांडणी ही शत्रूलक्षी मांडणी आहे. शत्रूलक्षी मांडणी ही रूढ पद्धत आहे. या मांडणीची सर्व विषयांना कवेत घेणारी एक चौकट असते आणि वादप्रतिवाद या चौकटीच्या आत राहून होतात.......

गांधींवर आणि त्यांच्या कार्यावर टीका करण्याला विरोध नाही, प्रश्न आहे- डॉ. रावसाहेब कसबे वस्तुनिष्ठ विश्लेषण करतात किंवा वैचारिक लिखाणाची शिस्त पाळतात का? (पूर्वार्ध)

‘राजकारणाचा अभ्यास नसावा.. अर्थशास्त्राची पाटी कोरी असावी’ अशा पद्धतीचे विधान हे वैचारिक शिस्तीला साजेसे वाटत नाही. त्यामुळे महाभारतातील ‘नरो वा कुंजरो वा’ या विधानाची आठवण येते. उपलब्ध माहिती न वापरता, कुठल्याही पुराव्याशिवाय सरसकट विधाने करून गौणत्व देण्याचे सातत्य डॉ. कसबे टिकवून ठेवतात. गांधी गौण होते की अजून काही, याबद्दल विरोध करण्याचे कारण नाही, आक्षेप आहे तो न पाळल्या गेलेल्या वैचारिक शिस्तीला!.......

सामान्य माणूस कल्पकतेने विचार करून एक मूलभूत मुद्दा उपस्थित करू शकतो आणि त्याची मागणी तयार करून चिकाटीने लढून जिंकू शकतो, हे दत्ता आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिलं!

दत्ता अतिशय दिलखुलास आणि मिस्कील असला तरी सगळ्याला मोहक मालवणी छटा होती. किस्से  खुलवून सांगण्यात  त्याची हातोटी होती. त्याच्या पारदर्शक प्रेमळपणातून अनेक मित्र जोडले गेले. दत्ताला व्यक्तिगत लाभाची कुठलीच अपेक्षा कधीच नसल्याने मैत्रीमध्ये अकृत्रिमपणा जोडला जाई म्हणूनच गिरणी कामगारांच्या घरांसाठी लढणारा दत्ता मॉडर्न मिल कंपाउंडमधील जुन्या सिंगल रूममध्ये राहिला. त्याच्या नजरेतून गिरणगाव पाहिला.......