बुक्सनामा : गोरक्षण, गोहत्या आणि गोमाता वगैरे
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
टीम अक्षरनामा
  • गायीविषयी चर्चा करणाऱ्या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Tue , 02 May 2017
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक गाईचे अर्थशास्त्र गोहत्या : एक यक्षप्रश्न Gohatya : Ek Yashprshna गाईचे मिथक हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण Hinduni kelele Gomansbhakshan

भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व देशभर पसरल्यानंतर समाजात सर्वच पातळीवर गोवंश हत्या, गोरक्षक, गोपालन वगैरे मुद्द्यांवरून वातावरण तापले आहे. गाईचे हिंदू धर्मातील महत्त्व, गोपालनातील अर्थकारण आणि एकूणच त्यामागील समाजकारण आणि राजकारणाचे विश्लेषण करणारी चार पुस्तके ‘बुक्सनामा’वर उपलब्ध झाली आहेत.

‘कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही’ अशी एक मराठीमध्ये म्हण आहे, पण गेल्या काही दिवसांत मात्र  ‘गायीच्या नावाखाली’ काही माणसांना टार्गेट केलं जात आहे. गायीच्या पोटीत ३३ कोटी देव राहतात, हे हिंदू संस्कृतीतील मिथक आता ‘गायीच्या पोटात केवळ माणसांचा मृत्यू राहतो’ या थराला पोहचले आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीच्या संदर्भातील गायीविषयीच्या पूर्वपरंपरेपासून व्यावहारिक कारणांपर्यंतच्या विविध प्रश्नांची चर्चा करणारी ही पुस्तके महत्त्वाची आहेत. या पुस्तकांच्या वाचनातून गोहत्याबंदीपासून गायीच्या उपयुक्ततेपर्यंत अनेक प्रश्नांच्या विविध बाजू समजून घ्यायला मदत होते.

१. गाईचे अर्थशास्त्र - वि. म. दांडेकर

केंद्र आणि काही राज्य सरकारांनी केलेली गो हत्याबंदी कशी चुकीची आहे, ते या पुस्तकातून सप्रमाण मांडले आहे. केंद्र सरकारने गोहत्याबंदीचा विचार केला, तेव्हा त्या पार्श्वभूमीवर प्रा. वि.म. दांडेकर यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन या पुस्तकात आहे. यात दांडेकर यांनी आर्थिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून गायीच्या प्रश्नाची चर्चा केली आहे.

सुगावा प्रकाशन, पुणे

पाने – ७५, मूल्य – ७० रुपये. सवलत - १० टक्के

ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/316

……………………………………………………………………………………………

२. गोहत्या : एक यक्ष प्रश्न – संपा. अ. भि. शहा

या संपादित पुस्तकात ‘भारतातील गोसंप्रदाय’ (मुकंदी लाल), ‘गुरांचा प्रश्न’ (वि.म.दांडेकर), ‘गायींची कत्तल : आर्थिक बाजू’ (एम.एम. शहा) आणि ‘गायींची कत्तल : कायद्याची बाजू’ (एल.पी. साठे) असे चार विचारप्रवर्तक लेख आहेत. या पुस्तकाला अ.भि. शहा यांनी विवेचक प्रस्तावना लिहिली आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद दीपक उपाध्ये व नंदकुमार पुरोहित यांनी केली आहे.

सुगावा प्रकाशन, पुणे

पाने – ९६, मूल्य – ८० रुपये. सवलत - १० टक्के

ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2688

……………………………………………………………………………………………

३. गाईचे मिथक - द्विजेंद्रनारायण झा

हा ‘मिथ ऑफ होली काऊ’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. मूळ इंग्रजी पुस्तक बहुचर्चित असून त्यावर काही काळ बंदीही घातली गेली होती. या पुस्तकात गायीच्या पवित्र्यातील फोलपणा, गायीच्या मिथकाचा ऐतिहासिक वापर आणि वास्तव यावर भाष्य केले आहे. तसेच गाईचे ‘माता’ म्हणून असलेले मिथक, त्यातून निर्माण झालेली उग्र अस्मिता व गाईच्या मांसावरून दलित, आदिवासी आणि मुस्लीम यांच्यावर झालेले हल्ले यांचा धर्मातील पितृसत्ता आणि जात वास्तवाशी कसा संबंध आहे याचीही चर्चा केली आहे.

सुगावा प्रकाशन, पुणे

पाने - १५८, मूल्य – १६० रुपये. सवलत - १० टक्के

ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2688

……………………………………………………………………………………………

४.  हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण - एस. एल. सागर

हिंदू कधीही गोमांस भक्षण करत नव्हते असा दावा केला जातो. मात्र हा या पुस्तकात लेखकांनी साधार खोडून काढला आहे. लेखकांनी वैदिक काळापासून हिंदू गोमांस भक्षण करत असल्याचे पुरावे दिले आहेत. उपनिषद काळ, रामायण काळ, महाभारत काळ, सूत्र काळ, स्मृति काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मध्य काळ आणि आधुनिक काळ या सर्व काळांत हिंदू गोमांस भक्षण करत होते, असे लेखक पुराव्यानिशी दाखवून देतात. गोरक्षा आंदोलनावरही यात चर्चा केली आहे. हिंदूंनी गोमांस खाणे का सोडले, या प्रश्नाच्या उत्तराचाही शोध घेतला आहे. गोमांस भक्षणासंबंधीच्या निरनिराळ्या कहाण्यांचाही समावेश पुस्तकात केला आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रमिला बोरकर यांनी केला आहे.

सुगावा प्रकाशन, पुणे

पाने - ९२ , मूल्य – १०० रुपये. सवलत – १० टक्के

ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2701

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......