‘अ बर्निंग’ : असहाय, निरपराध, गरीब, मुसलमान तरुणीची करुण, टोकदार शोकांतिका
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
जयदेव डोळे
  • ‘अ बर्निंग’चे मुखपृष्ठ आणि मेघा मुजुमदार
  • Sat , 22 August 2020
  • ग्रंथनामा दखलपात्र अ बर्निंग A Burning मेघा मुजुमदार Megha Majumdar

‘अ बर्निंग’ ही मेघा मुजुमदार यांची पहिलीवहिली कादंबरी २ जून २०२० रोजी पेंग्विन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. अमिताव घोष, या ग्यासी, टॉमी ऑरेंज या मान्यवरांनी ‘अ बर्निंग’चे कौतुक केल्यामुळे सध्या ती चर्चेत आहे. या कादंबरीविषयी...

..................................................................................................................................................................

फेसबुकचा भाजपने कसा वापर केला, त्याच्या बातमीने या कंपनीला आता आपला ‘फेस’ मास्कमध्ये लपवावा लागतोय. कितीही खुलासे केले तरी केलेले गैरकृत्य सार्थ ठरवता येईनासे झालेय. भाजपच्या नादी जो जो लागला, त्याचा कारभार आटोपलाय. कोणी खालसा झाले, तर कोणी बेइज्जत! पण फेसबुकवरची एक पोस्ट थेट फासावर नेऊन जीव घेते, ती कहाणी त्या बातमीच्या आशयाची जवळपास पुष्टी करते. म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष व संघटना फेसबुकवरच्या एका बेसावध अजाणत्या प्रतिक्रियेचा वापर करून कसा डाव साधतात, त्याची ही कहाणी आहे.

‘अ बर्निंग’ ही कादंबरी मूळची कोलकात्याची व आता अमेरिकेत राहणारी मेघा मुजुमदार हिने लिहिलेली. पहिल्याच कादंबरीत गोध्राच्या रेल्वे जळिताची पार्श्वभूमी घेऊन मेघा केवळ तीन पात्रांतून सध्या भारतात काय चाललंय ते सांगते. वाचक सारे काही जाणतोय असे गृहित धरून लेखिका पक्ष, संघटना, धर्म असे कोणालाही थेट समोर आणत नाही. पण वाचक समजतो. मुस्लीम नागरिक किती असहाय व उपेक्षित होऊन गेलाय हे मात्र लेखिका जाणीवपूर्वक ठसवते.

जीवन असे त्या तरुणीचे नाव. एका दुकानात काम करत तिने एक चांगला सेलफोन घेतलाय. फेसबुक वाचते अन तिथे लिहितेही. रेल्वे स्थानकावर बाहेरून बंद जळालेले डबे पाहते. शंभरावर लोक मेलेत. घरी आल्यावर त्या घटनेचे चित्रण पाहत बसते. मुख्यमंत्री घटनेची चौकशी करण्याची घोषणा पत्रकारांपुढे करताना कोणीतरी डोकी खाजवणाऱ्या पोलिसांच्या एका व्हिडिओशी ती जोडून टाकलीय. ती हसते. “फेसबुकवरच्या या अज्ञातांचे मला भारी कौतुक वाटते. ते त्यांना जे वाटेल ते म्हणतात. विनोद करायला भीत नाहीत ते. पोलीस असोत की मंत्री, ते सर्वांची टिंगल उडवतात. हेच स्वातंत्र्य नाही का? पँटालून्समध्ये मी सिनिअर सेल्स क्लर्क होऊन आणखी थोडा पगार कमावला की, तशीच स्वतंत्र होईन ना…”

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

मग एक व्हिडिओ जीवन पाहते. एक बाई त्वेषात सांगतेय की, ‘रेल्वे स्थानकापाशीच एक जीपभर पोलीस होते. जा, त्यांना विचारा की माझा नवरा जळत असताना ते तसेच उभे का होते. तो डब्याचे दार उघडू पाहत होता. आमची मुलगी वाचू पाहता होता. तो खूप झटला.’

जीवन हा व्हिडिओ जोडते अन लिहिते- ‘सरकारी पगार घेणारे पोलीस बघे बनले. त्यांनी काहीच केले नाही. या निरपराध बाईने मात्र सारे गमावले.’

मग फेसबुकवरचा खेळ सुरू होतो. जीवनला दोनच लाईन्स येतात. एक बाई लिहिते – ही व्यक्ती बनाव रचतीय की नाही तुला काय माहीत? कदाचित ती आपल्याकडे लक्ष वेधत असेल!

“मी उठून बसते. ही बाई माझी फ्रेंड असेल का? तिच्या प्रोफाईल पिक्चरमध्ये ती एका बाथरूममध्ये पोझ देताना दिसतीय. मी लिहिले, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तरी का? माझ्या डोक्यात त्या निर्दयी बाईचे शब्द घुमू लागले. मला त्या बाईने रागच आणला…. माझ्या अंगठ्याखाली मी रेल्वेवरच्या हल्ल्यावर ५० लाईक्स पाहिल्या. मग शंभर लाइक्स, तीनशे लाइक्स. माझे उत्तर कोणालाच आवडले नाही. मग मी त्या छोट्या चमकदार काचेवर एक मूर्खपणा केला. मी एक धोकादायक गोष्ट, लिहायची सोडा, साधी विचारात आणणे कोणी केले नसेल अशी केली. ‘आई मला माफ कर : तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पोलीस मदत करणार नसतील, समोर माणसे मरताना पोलीस केवळ पाहत बसतील याचा अर्थ सरकारसुद्धा एक दहशतवादी नसावे काय?’ ”

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘द हीट ऑफ विंटर’ : पं. नेहरूंच्या हत्येची काल्पनिक गोष्ट

..................................................................................................................................................................

पहिल्या साडेतीन पानांत मेघा हे सारे इतक्या भेदक भाषेत सांगते की, त्यात कादंबरीचे शीर्षक आणि आशय सारे ओतते. छोटी वाक्ये, चित्रमय अन धावती मांडणी वाचकाला कादंबरीच्या शेवटापर्यंत ओढतच नेते.

लव्हली हे एक तृतीयपंथी पात्र, पीटी सर हे जीवनच्या शालेय शिक्षकाचे आणि स्वत: जीवनचे, अशा तीन पात्रांच्या आलटूनपालटून अनुभवांमधून कथानक उलगडले जाते. लव्हलीला झोपडपट्टीत इंग्रजी शिकवायला जीवन जात असते, तर पीटीसरांना तिचा कबड्डीचा आक्रमक खेळ इतका आवडलेला असतो की, तिला ते त्यातच गुंतवू पाहतात. पण गरिबीमुळे जीवनशाळा सोडते, इंग्रजी शिकवणे थांबवते अन काम करू लागते.

दोन्ही व्यक्ती जीवन फार चांगलीय आणि दहशतवादाशी काहीही तिचा संबंध नसल्याचे मानतात. खटल्यात तिच्या बाजूने साक्ष देण्याचे ठरवतात अन मग सुरू होतो फेसबुकच्या निमित्ताने उसळलेला सत्य आणि खोटेपणा यांचा ‘अ बर्निंग’मधला संघर्ष. लेखिकेने हिंदुत्ववादी पक्ष व समर्थक असत्याचा कसा वापर करतात, त्यासाठी कसकसा दबाव आणतात, याचे फार रेखीव संदेशन केलेय. माणसाचा स्वार्थ कसा सत्याची चाड विसरायला लावतो, हे या कादंबरीचे मर्म. त्यात गरीब मुस्लीम पार भरडले जातात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

लव्हलीला पडद्यावर झळकायचेय. अभिनयाचा वर्ग ती करतीय. तिच्या पहिल्या साक्षीने ती विख्यात झालीय. तसेच पीटीसर. एका हिंदुत्ववादी पक्षाच्या व त्याच्या महिला नेत्याच्या जवळ जाताच त्यांच्यावर न्यायालयात खोट्या साक्षी देण्याचे काम सोपवले जाते. त्यांच्या अशा साक्षीने मुसलमान शिक्षा भोगतात. जीवनबाबत ते द्रवतात. पण तिने राष्ट्रपतींकडे पाठवण्यासाठी केलेला अर्ज त्यांच्या पक्षाला सत्ता मिळताच ताब्यात घेऊन तिला फाशी देण्याची सरकारी व्यवस्था करतात. मोठ्या चित्रपटात काम मिळाले म्हणून लव्हलीवर दबाव टाकला जातो की, आता एका दहशतवादी तरुणीची साथ केल्यास तिचीच बदनामी होईल.

असहाय, निरपराध, गरीब, स्वातंत्र्याची आस धरण्यासाठी पैसा कमवू पाहणारी मुसलमान जीवन फासावर चढवली जाते. तिची ही अतिशय करुण, टोकदार शोकांतिका आपल्याला चटका लावून समाप्त होते.

..................................................................................................................................................................

‘अ बर्निंग’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Burning-Megha-Majumdar/dp/0670093793/ref=tmm_hrd_title_0?_encoding=UTF8&qid=&sr=

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......