टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • सरताज अझीझ, नरेंद्र मोदी, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, निशा देसाई-बिस्वाल, सलमान खान, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमिर पुतीन
  • Thu , 19 January 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi डोनाल्ड ट्रम्प Donald Trump व्लादिमिर पुतीन Vladimir Putin सरताज अझीझ Sartaj Aziz सलमान खान Salman Khan रिंकू राजगुरू Rinku Rajguru आकाश ठोसर Akash Thosar

१. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची दादागिरी पाकिस्तान अजिबात सहन करणार नाही; मोदींचा पाकिस्तानविरोध हा केवळ निवडणुकांपुरता मर्यादित आहे. निवडणुका आटोपल्या की, त्यांचा हा विरोधसुद्धा मावळेल. : पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अझीझ.

अझीझभौ, तुम्ही तर टॉपमोस्ट सिक्रेटच सांगून टाकलंत राव! ही ट्रिक समजण्यासाठी तुम्हाला भारताकडे पाहण्याची गरज काय? तुमच्याकडचे लष्करी उच्चाधिकारी आणि राजकीय नेतेही तिकडे परिस्थिती बिघडली की, लोकांचं लक्ष विचलित करायला भारताविरुद्ध गरळ ओकायला सुरुवात करतात, तीही त्यासाठीच.

…………………………………………..

२. तरुणाईला ‘सैराट’ वेड लावणारी आर्ची आणि परशा यांची जोडी राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करणार आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे दोघे राज्य निवडणूक आयोगाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनले असून ते निवडणूक आयोगाच्या पोस्टरवर झळकले आहेत.

मतदानाच्या दिवशी 'सैराट'चा शो ठेवू नका टीव्हीवर म्हणजे झालं. नाहीतर सगळंच मुसळ केरात जाईल. आता या निवडणुकीत हरलेले उमेदवार म्हणतील, 'आर्ची बसली अन् फांदी मोडली'!

…………………………………………..

३. विविध धर्म, महिला आणि अमेरिकेतल्या स्थलांतरितांच्या विरोधात गरळ ओकणारे डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारीला अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर आपल्याला देश सोडून जावं लागेल का, असं माझी मुलं विचारतायत. ती खूप घाबरली आहेत. : भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्री निशा देसाई-बिस्वाल (यांची नियुक्ती अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती. त्या २० जानेवारीला पायउतार होतील.)

अमेरिकन ट्रोलभैरवांनी त्यांचा वंश, धर्म, जात वगैरेंचा अश्लाघ्य भाषेत उद्धार करून त्यांना सहकुटुंब पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला नाही का अजून? की त्यांच्याकडे 'देशद्रोह्यां'ना क्यूबाला पाठवण्याची पद्धत आहे?

…………………………………………..

४. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणीच्या खटल्यातून सबळ पुराव्याअभावी सलमान खानची निर्दोष मुक्तता.

ये बेचारा, शूटिंग के बोझ का मारा, इसे चाहिए जंगल का टॉनिक चिंकारा, अशी जाहिरात वाचल्यामुळे त्याचा गैरसमज झाला, असं न्यायाधिशांनी सांगितलं की नाही निकाल देताना?

…………………………………………..

५. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सेक्स टेपवरून सुरू झालेल्या विवादाविषयी बोलताना पुतीन यांनी ट्रम्प यांच्यावरचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून रशियातील सेक्स वर्कर्स जगात सर्वोत्कृष्ट असल्याचं सांगितलं.

रशियाचे अध्यक्ष अनुभवी दिसतात. बाकी या विधानात ट्रम्प यांना हिंदी सिनेमातल्या 'लॉयन'च्या स्टायलीत दिलेली गर्भित धमकीच दिसते आहे. ट्रम्पही अनुभवी आहेतच. यांच्या अनुभवांची त्यांना माहिती आहेसे दिसते.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......