कविता महाजन प्रथम स्मृतिदिन विशेषांकाच्या निमित्ताने…
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • कविता महाजन यांची छायाचित्रं
  • Fri , 27 September 2019
  • पडघम साहित्यिक कविता महाजन Kavita Mahajan भारतीय लेखिका Bhartiya Lekhika

किरकोळ आजाराचं निमित्त झालं आणि आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली कविता हे जग सोडून गेली. सगळं इतकं अचानक झालं होतं की, बराच काळ बधीरपणातच गेला. घडलंय ते खरंच आहे, हे स्वतःला समजावण्यात बरीच मानसिक शक्ती खर्च करावी लागली. दुःखाचा पहिला भर ओसरल्यावर कविताची मुलगी - दिशाबरोबर आवराआवर करताना कविताच्या अनेक नोंदी, मनातल्या लेखनाचे कच्चे खर्डे, पूर्वी निमित्ता-कारणानं केलेली भाषणं, मुलाखती अशी बरीचशी मौल्यवान संपत्ती हाती लागली… त्या शब्दांमध्ये सांत्वन, आनंद, जिद्द, समजूत, गांभीर्य अशा अनेक भावभावनांचा कल्लोळ होता.

तोपर्यंत कविताचं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य सगळ्यांनी वाचलं होतंच. साहित्याच्या क्षेत्रात कविता, कादंबरी, अनुवाद, संपादन अशी चौफेर भटकंती तिनं केली होती. ‘बदलापूरची बखर’, ‘ग्राफिटी वॉल’, ‘घुमक्कडी’ अशी सदरलेखनं, फेसबुकवर या समाजमाध्यमातली तिची लोकप्रियता आणि सर्व प्रकारच्या सामाजिक चळवळींना ती देत असलेला सक्रिय पाठिंबा, यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू सगळ्यांना माहिती होतेच. पण एक लेखिका म्हणून ती साहित्यव्यवहाराकडे किती गांभीर्यानं बघत होती; कविता, कादंबरी, अनुवाद यांसारख्या साहित्यप्रकारांविषयी तिची काय मतं होती, हे संकलित करणं अत्यंत आवश्यक होतं.

त्या दृष्टीनं डायमंड प्रकाशनातर्फे कविताच्या अप्रकाशित भाषणांचं आणि मुलाखतींचं संपादन करून एक पुस्तक करावं अशी योजना होती. पण प्रत्यक्षात संपादनाच्या दृष्टीनं वाचन सुरू केलं, तेव्हा पुस्तकाचं स्वरूप देता येईल एवढा मजकूर हाती लागला नाही. काही मजकूर त्रोटक होता, तर काही अत्यंत सविस्तर. विषयाच्या दृष्टीनंही त्यात एकसूत्रता नव्हती. यावर मार्ग म्हणून ‘अक्षरनामा’चा हा विशेषांक काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

या विशेषांकात कविताचं लेखन, कविताची मावशी चित्रलेखा मेढेकर आणि मानसपुत्र वैभव छाया यांचे लेख आहेत. त्याचबरोबर कविताच्या स्मृतीदिनानिमित्त रोहन प्रकाशन आणि इंद्रायणी साहित्य यांच्यातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या कविताच्या पुस्तकांचे परिचय करून देणारे लेखही आहेत.

या सर्व लेखांतून कविताच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगळ्याच पैलूंचं दर्शन होईल असा विश्वास वाटतो.

- संजीवनी शिंत्रे, राम जगताप

.............................................................................................................................................

विशेषांक अनुक्रम

१) तू अशी गेलीस, त्यासाठी तुला कधीच माफ करणार नाही! - दिशा महाजन
https://www.aksharnama.com/client/article_detail/3659

२) ‘माय मरो, मावशी जगो’ या म्हणीच्या अर्थाला सामोरं जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही! - चित्रलेखा अरुण मेढेकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/3658

३) ‘कविता’ प्रत्यक्ष कृतीत उतरवता उतरवता खरी ‘कविता’ आयुष्यातून कधी गमावली, याचा मलाच पत्ता लागला नाही! - वैभव छाया
https://www.aksharnama.com/client/article_detail/3657

४) माझे बाबा : जिव्हाळ्याचा पूल - कविता महाजन
https://www.aksharnama.com/client/article_detail/3656

५) जोयानाची आजी... लिली परेरा - कविता महाजन
https://www.aksharnama.com/client/article_detail/3655

६) कविता ही मानेजवळच्या शिरेला स्पर्श करणारी गोष्ट आहे. ती शीर सापडावी लागते. सापडली की, तिला स्पर्श करत राहावं वाटतं! - कविता महाजन
https://www.aksharnama.com/client/article_detail/3654

७) ‘कुहू’ ही मल्टिमीडिया कादंबरी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध कला यांचा मिलाफ आहे! - कविता महाजन
https://www.aksharnama.com/client/article_detail/3653

८) कादंबरी लिहिताना भोवती पात्रांचा जो गोतावळा तयार होतो, त्यामुळे तेवढा काळ माझा एकटेपणा दूर होतो. म्हणून मला कादंबरी लिहिणं आवडतं. - कविता महाजन
https://www.aksharnama.com/client/article_detail/3652

९) ...हा अनुवाद केला नसता तर पुढे स्वतंत्र गद्यलेखनाचं धाडस मी कधीच केलं नसतं! - कविता महाजन
https://www.aksharnama.com/client/article_detail/3651

१०) कोणत्याही वयाच्या स्त्रिया जेव्हा लैंगिकतेविषयी लिहितात, तेव्हा त्यांना ‘बोल्ड’, ‘बिनधास्त’ समजले जाते! - कविता महाजन
https://www.aksharnama.com/client/article_detail/3650

११) जे घडतेय त्याची गती लेखनाला नाही आणि लेखनात जे घडतेय त्याची गती समीक्षेला व अभ्यासाला नाही! - कविता महाजन
https://www.aksharnama.com/client/article_detail/3649

१२) भारतीय लेखिका : ४० पुस्तकांच्या अनुवाद प्रकल्पाचा अनुभव - कविता महाजन
https://www.aksharnama.com/client/article_detail/3648

.............................................................................................................................................

लेखिका संजीवनी शिंत्रे व्यवसायाने शिक्षिका व ग्रंथसंपादक आहेत.

smita1707@gmail.com

.............................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख