ज्यांनी गरिबी अनुभवली; बेघरपणा, शोषितपणा बघितला, त्यांच्यासाठी हा चित्रपट ‘मस्ट’ आहे
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
मिलिंद कांबळे
  • ‘काला’चं एक पोस्टर
  • Sat , 09 June 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie काला Kaala रजनीकांत Rajinikanth नाना पाटेकर Nana Patekar

‘क्या रे सेटिंग किया है!’ रजनीकांतच्या तोंडी असे दमदार संवाद असल्यावर हा चित्रपट पूर्णपणे थलावामय होऊन जाईल असे वाटणारा ‘काला’ मात्र दिग्दर्शक पारणजितच्या दृष्टीतून दिसतो! हा चित्रपट रजनीकांतच्या करियरला चार चांद लावणारा आहे.

हा तमिळ दिग्दर्शक पारणजितचा चौथा चित्रपट. त्याला शोषित वर्गाची कायमच जाणीव असल्यामुळे त्याचे चित्रपट त्याच वातावरणात पुढे सरकतात. ‘अत्तकाठी’, ‘मद्रास कबाली’ आणि आता ‘काला’.

या चित्रपटाची कथा खूप सोपी आणि सुटसुटीत आहे. सध्या शहरीकरण खूप जोरात सुरू आहे. शहरातल्या सर्वांना झोपडपट्टी नकोशी वाटते. ‘स्लम रि-हॅबिलटेशन’ या गोंडस नावाखाली १६० ते ४५० स्क्वेअर फुटाच्या उभ्या स्लॅम टाकायचे काम सुरू आहे. त्यालाच धरून दिग्दर्शक पारणजितनं हा चित्रपट बनवला आहे. देशातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असणाऱ्या ‘धारावी’मध्ये हा चित्रपट घडतो. धारावीमध्ये रि-डेव्हलपमेंटचा प्लॅन आला आहे (या मोक्याच्या जागेवर बऱ्याच बिल्डरांचा डोळा आहे!) त्यासाठी झोपडपट्टी हटाव मोहीम सुरू आहे. ती काला उर्फ रजनीकांत कशी थांबवतो याची ही कथा आहे. लोकांची मागणी काय आहे आणि सरकार कुण्यासाठी काम करतंय हे अगदी स्पष्ट जाणवतं. ‘सध्या बिल्डर हेच राजकारणी आणि राजकारणी हेच बिल्डर’ असल्यानं चित्रपटात खलनायक कोण हे लगेच समजतं आणि कथा कुठल्या दिशेनं पुढे सरकेल, याचा अंदाज येतो, पण कथा पुढे सरकतानाचा फील वेगळाच आहे

हा चित्रपट सर्वच अंगानी नितांत सुंदर झालेला आहे. जी. मुरली यांचा कॅमेरा इराणी चित्रपटाचा भारतीय फील करून देतो. पारणजितला जे जे दाखवायचं आहे, ते ते जी मुरली यांनी टिपलं आहे. झोपडपट्टी आतून कशी असते, तिथली माणसं कशी असतात, तिथला एकोपा कसा आहे, हे सगळं सुंदरतेनं टिपलं आहे. फ्लायओव्हरवरील फाईट सीनसुद्धा उत्तम प्रकारे शूट झालाय.

त्यानंतर येतं ते चित्रपटाचं संगीत. ते या चित्रपटाचं शक्तीस्थान आहे. हिंदी चित्रपट संगीत शब्दरचनेमुळे तितकंसं सुंदर वाटत नाही, पण तमिळ संगीत ऐकतानार एकदम जबरदस्त वाटतं सगळीच्या सगळी गाणी ऊर्जापूर्ण, एक उत्तम मॅसेज देणारी आहेत. याही चित्रपटात संतोष नारायणचं संगीत सुंदर आहे. (संतोष नारायण आणि पारणजित जोडीचाही हा चौथा चित्रपट) सगळ्यात जोशपूर्ण आहे ते ‘कात्रवाईपत्रवाई’ (शिका, संघटित व्हा). 

त्यानंतर येतो ‘अभिनय’. चित्रपटभर अभिनयाची जुगलबंदी सुरू आहे असं वाटत राहतं, इतका जबरदस्त अभिनय सर्व कलाकारांनी केला आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची जुगलबंदी विशेष लक्षात राहते. दोघांची संवादफेक शिट्टी वाजवायला मजबूर करते. ईश्वरी राव, हुमा कुरेशी आणि अंजली पाटील या तिघींनी त्यांच्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. अंजली पाटील लक्षात राहते. बाकी पंकज त्रिपाठी, सयाजी शिंदे यांच्या भूमिका खूप छोट्या आहेत. त्यांना जास्त वाव नाही. पी. सामुथीकरणीच्या सतत दारूच्या नशेत राहणारा मेव्हणा, पण चांगला रंगलाय. 

आता पारणजितच्या दिग्दर्शनाबद्दल. ‘काला’च्या प्रमोशन वेळेस रजनीकांत म्हणाले होते, ‘हा चित्रपट पारणजितचा आहे.’ खुद्ध रजनीकांत यांनीच पाठीवर थाप टाकल्यावर अजून काय बोलणार? पारणजित हा खूप हुशार दिग्दर्शक आहे, हे चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये लक्षात येतं. चित्रपटातल्या सगळ्या भूमिका खूप सुंदर रीतीनं लिहिल्या आहेत. बहुतांश दक्षिणात्य चित्रपटात नायिकांना दुय्यम महत्त्व दिलं जातं. नायिका हिरोच्या मागे पळणाऱ्या दाखवल्या जातात, पण यात मात्र तसं नाही. ईश्वरी राव, हुमा कुरेशी आणि अंजली पाटील यांच्या भूमिका एकदम व्यवस्थित लिहिल्या आहेत. हुमा कुरेशी ही सिंगल मदर आहे, जी पूर्वाश्रमीची रजनीकांतची प्रेयसी आहे. ती परत रजनीकांतला भेटते, पण ईश्वरी राव रजनीकांतवर संशय घेत नाही. आणि काळी पाटीलची भूमिका तर खूपच प्रेरक आहे. घरातून पळून आलेल्या प्रियकरला स्वतःच्या घरात घेणारी, त्याच्याबरोबर प्रत्येक क्षणी थांबणारी, मग ती मारामारी असो किंवा चर्चा. यातून स्त्रीवाद म्हणजे काय हे नेमकेपणे सांगितलं आहे. (हुमा कुरेशीनं याबद्दल पारणजितचे कालच रात्री आभार मानले आहेत.).

‘काला’मध्ये पारणजितनं प्रत्येक चुकीच्या समजुतीला दुसरी बाजू असते हे सांगत त्याही कशाबरोबर हेही सांगितलं आहे. उदा - काळा रंग विरुद्ध सफेद रंग. काळ्या रंग म्हटलं की, काहीतरी घाण, वाईट अशा अर्थानं बघितलं जातं, पण तसं नसतं. नाना पाटेकर रजनीकांतच्या घरी पाणी पित नाही, पण रजनीकांत पितो. नाना पाटेकरची नात रजनीकांतच्या पाया पडायला येते, तेव्हा तो तिच्यासोबत हात मिळतो. अशा बरीच गोष्टी आहेत, जिथं पारणजितनं चुकीच्या समजुतींना मोडीत काढलं आहे. पारणजितनं त्याला जे सांगायचं आहे, ते रजनीकांतच्या स्टारडमचा उपयोग करत सांगितलं आहे. उदा. ‘ये जमीन तेरे लिये पॉवर होगी, हमारे लिये जिंदगी है.’ दक्षिण भारतात रावणाला पूजतात, पण उत्तर भारतीय लोकांनी रावणाची होळी करून टाकली आहे. तीसुद्धा हा चित्रपट पुसून टाकायला मदत करतो.

त्याचबरोबर सर्वत्र दिसत राहतात बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, पेरियार. बौद्धविहारही दाखवला आहे. शिक्षण का महत्त्वाचं आहे ते सांगितलं आहे. मी पारणजितचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. त्यामुळे एक अनुमान काढता येऊ शकतं की, पारणजित ‘आंबेडकरवादा’ला ग्लोबलाझेशनच्या मार्केटमध्ये बबसवण्याचा प्रयत्न करत आहे. (अनेक लोकांना वाटतं की, बाबासाहेबांनी फक्त आरक्षण दिलं.  प्रत्यक्षात बाबासाहेबांनी समाज्यातल्या प्रत्येकासाठी काही ना काही करून ठेवलं आहे.)  

चित्रपटाचा शेवट हा या चित्रपटाचा आत्मा आहे. चित्रपटातून जो मॅसेज द्यायचा आहे, तो हा शेवट देतो. (फार कमी चित्रपटांचे शेवट परिणामकारक असतात. नागराज मंजुळेचा ‘फँड्री’चा शेवट कायम लक्षात राहणारा आहे). शेवटाबद्दल खूप लिहायची इच्छा असूनसुद्धा मी लिहिणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघितला तरच ‘काला’ला न्याय मिळेल.

या चित्रपटाला कथेसाठी ३.५ स्टार, अभिनयासाठी मिळतील ४.५ स्टार, संगीतासाठी ४.५ स्टार आणि पारंजितच्या अप्रतिम दिग्दर्शनासाठी मिळतील ५ पैकी ५ स्टार द्यावे लागतील. यामध्ये क्राईम आहे, रोमान्स आहे, थ्रिलर आहे, संगीत आहे... एक चित्रपट परिपूर्ण व्हायला जे जे लागतं, ते सर्व काही आहे.

हा चित्रपट कदाचित देशाला नवीन वळण देऊ शकतो, क्रांती करायला स्फुरण देणारा असा हा चित्रपट आहे. 

ज्यांनी आयुष्यात एकदा तरी गरिबी अनुभवली आहे, बेघरपणा, शोषितपणा बघितला आहे, त्यांच्यासाठी हा चित्रपट ‘मस्ट’ आहे.

वास्तव, खरंखुरं पात्र साकारून वैविध्यपूर्ण भूमिका करेल, अशी आशा करायला हरकत नाही.

.............................................................................................................................................

लेखक मिलिंद कांबळे स्मार्ट सिटी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये प्रोजेक्ट कॉऑर्डिनेटर आहेत.

milind.k@dcfadvisory.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Prem Manuel

Sun , 10 June 2018

Nice review Milind, am surprised you have seen all pa.ranjith's movie. Agree its a must see for people who have struggled in poverty in some time of their life.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......