‘निळे आकाश’ या पुस्तकातून १६ यशस्वी दलित उद्योजकांच्या कथा आपल्यासमोर येतात. वंचित समाजातील अनेक नवतरुण, महिला, मध्यम तसेच ज्येष्ठ वर्गामध्ये त्या नवचेतना जागवणाऱ्या ठरतील

महाराष्ट्रासारख्या विविधता, विपुलता आणि पुरोगामी चळवळीची पार्श्वभूमी असणाऱ्या राज्यात मातृभाषेत असलेल्या या उद्योजकांच्या कथा अनेक अल्पशिक्षित, उपेक्षित तरुणांना मार्गदर्शक ठरतील. यातील काही कथा या महाराष्ट्रातीलच असल्याने त्यांना ते अधिक भावेल. कठोर आणि प्रतिकूल परिस्थितीतील या उद्योजकांचा प्रवास, तरुणांनी पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्याची प्रेरणा देतील.......