श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या साहित्याचे दर्शन कालदर्शिकेच्या माध्यमातून
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
निवड व संपादन – हिमांशू स्मार्त
  • कालदर्शिकेचे श्रावण महिन्याचे पान
  • Fri , 28 July 2017
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक ‌Book of the Week श्रीनिवास विनायक कुलकर्णी हिमांशू स्मार्त

श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे मराठीतील एक सर्वोत्तम ललितलेखक. त्यांची ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ ही चार ललितलेखांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ही चारही पुस्तके मराठी ललितलेखनातील मानदंड मानली जातात. अतिशय तरल, आशयघन आणि चित्रमय शैली ही कुलकर्णी यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या लेखनाचा हा आविष्कार कालदर्शिकेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे नाटककार-ललितलेखक हिमांशू स्मार्त आणि प्रकाशक राहुल कुलकर्णी यांनी.

मराठीमधला हा एकमेवाद्वितीय म्हणावा असा प्रयोग आहे.

ही कालदर्शिका ११ एप्रिल २०१३ (गुढीपाडवा) रोजी प्रकाशित करण्यात आली. मात्र ही दिनदर्शिका नसून कालदर्शिका आहे. त्यामुळे ती तुमच्या लेखनाच्या, कामाच्या टेबलवर, ग्रंथसंग्रहात, कपाटात असायलाच हवी अशी आहे.

या कालदर्शिकेत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे बारा मराठी महिने आहेत. या प्रत्येक महिन्याला साजेसा श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या साहित्यातील एक उतारा हिमांशू स्मार्त यांनी निवडला आहे. त्या महिन्याला साजेसे असे अतिशय सुंदर पेंटिंग रिचा वोरा या चित्रकर्तीने केली आहे. सोबत दिलेल्या छायाचित्रांमधून तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पानाची किती सुंदर पद्धतीने मांडणी केली आहे याची कल्पना येईलच. आणि या सर्वांची अतिशय कल्पक कालदर्शिकेची निर्मिती रावा प्रकाशन, कोल्हापूरच्या राहुल कुलकर्णी यांनी केली आहे. याशिवाय कालदर्शिकेत वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर या ऋतूंचाही उल्लेख आहे.

तर अशी ही कालातीत साहित्य, चित्र, मराठी महिने आणि मराठी ऋतु यांचा अतिशय सुंदर मिलाफ असलेली कालदर्शिका प्रत्येक साहित्यप्रेमीच्या संग्रही असायलाच हवी.

या कालदर्शिकेची ही एक झलक

या सुरुवातीच्या परिचयपर दोन पानानंतर कालदर्शिका सुरू होते

चैत्र

वैशाख

ज्येष्ठ

आषाढ

श्रावण

भाद्रपद

अश्विन

कार्तिक

मार्गशीर्ष

पौष

माघ

फाल्गुन

आणि हे कालदर्शिकेचे शेवटचे पान

.............................................................................................................................................

अशी ही संग्राह्य कालदर्शिका केवळ ५० रुपयांना उपलब्ध आहे.

या कालदर्शिकेच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3748

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......