इतिहासात फार कमी व्यक्ती असतील ज्यांना ब्राऊनप्रमाणे संधी आणि माफी मिळाली असेल. अनेक कु-कृत्ये करूनही त्याला नायकत्व लाभले

ब्राऊन वरिष्ठ क्रूर एसएस अधिकारी असल्याची माहिती कुठेही नमूद करण्यात आलेली नाही. त्याच्या कामासाठी जी छळछावणी चालवण्यात यायची, त्याचाही उल्लेख अमेरिकन माहिती स्त्रोतांतून गायब करण्यात आला. त्याचे हात रक्ताने माखलेले होते, पण चलाखपणा दाखवत त्याने त्या गोष्टीचा कधी उल्लेख केला नाही. त्याच्यावर कोणताही खटला चालला नाही. त्याला नाझी कृत्यांचे दुःख असल्याचे कधीही जाणवले नाही. त्याने कधीही जगाची माफी मागितली नाही.......