अजूनकाही
कवी-कादंबरीकार बाळासाहेब लबडे यांचा ‘ब्लॉटेंटिया’ हा चौथा काव्यसंग्रह लवकरच न्यू एरा पब्लिशिंगतर्फे प्रकाशित होत आहे. या संग्रहाच्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
‘ब्लॉटेंटिया’ हा बाळासाहेब लबडे यांचा चौथा काव्यसंग्रह. आगळावेगळा असा हा काव्यसंग्रह. गूढ-गहन. घट्ट विणीचा. आशयघन. एकेक पाकळी उकलत, उलगडत गेलो तरी आत आकारासहित कायम घट्ट असणारा- केळीच्या कमळासारखा. प्रत्येक पाकळीत केळफूल. पुन्हा आशयघनता तीच. तशीच.
‘ब्लाटेंटिया’ हा इंग्रजी शब्द ‘Blatta’ या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. जर्मन भाषेत तो ‘Blatta’ असा आलेला आहे. अर्थ आहे - झुरळ! सजीवाची, माणसाचे प्रतीक म्हणून आले आहे हे झुरळ. याशिवाय अनेकविध प्रतिमांच्या बहुविधमिती याला लाभलेल्या आहेत! झुरळ मानवाच्या दुर्दम्य आशावादाचे प्रतीक, प्रतिनिधी म्हणून या कवितेत दिसून येते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मानवाचा मेंदू इतर प्राण्यांपेक्षा उन्नत असल्याने माणूस बुद्धिमान आहेच, पण भाषा हे साधन लाभल्याने खऱ्या अर्थाने संस्कृतीच्या विकासाला प्रचंड गती आली नि माणसाची प्रगती झाली. मानवी संबंधांमुळे सामाजिकताही विकसित झाली. विकासाबरोबर विकारही आलेत. राजकीय संस्था, राजेशाही, सरंजामशाही, हुकूमशाही, लोकशाही, मताधिकार, शासनव्यवस्था, विनिमयासाठी आलेले चलन, त्याचा संचय, अर्थव्यवस्था, व्यापार, चोऱ्या, धर्म नि संस्कृती -
‘धर्म-समाजांची धारणा की व्यक्तीची?
हत्ती आहे आता आंधळ्याच्या हाती?
बोलघेवड्या ज्ञानाच्या या ज्योती!’
आंधळ्यांना हत्ती गवसावे, तसेच एक व्यक्तिकेंद्रित धर्माचे आहे. म्हणून कवी विचारतो,
‘धर्म-समाजाची धारणा की व्यक्तीची?’
व्यक्तिनिष्ठ विचारसरणी काळानुसार परिवर्तनशीलतेतील अडसर ठरले. काळ, परिस्थिती बदलते, त्यानुसार धर्म संकल्पनांमध्ये विकासशील परिवर्तन अपेक्षित असते. मूठभर लोक ‘धर्म’ या संकल्पनेला साधन बनवून समाजावर प्रभुत्व गाजवतात. सत्ता भोगतात. बुद्धिभेद आणि दिशाभूल करतात. आर्थिक शोषण करतात. समाजात फूट पाडून उच्चनीचता निर्माण करून आपले वर्चस्व प्रस्थापित ठेवतात. म. जोतीराव फुल्यांसारखा प्रश्न विचारतो ब्राह्मणश्रेष्ठत्व का? शूद्र नीच का? “घोडा उच्च, गाढव शूद्र! कशातून?” चांडाळ अंत्यज, अतिचांडाळ शूद्र कसे? उतरंड ढळे गुणांवर, जाती असतात सार्या समाज पुरुषाचे खोटेच बहाणे.’ प्रश्न विचारणारे चार्वाकासारखे जन्म घेतात. सत्यावर विश्वास ठेवा सांगतो.
‘डोळ्याने दिसतो कुठे परमेश्वर?
सत्यावर ठेवा विश्वास’
तथाकथिक धर्माचे ठेकेदार, धर्माधिकारी, स्वघोषित परमपूज्य, स्वघोषित गुरू हे खरे म्हणजे परजीवी जंतू आहेत. पण आपणच समाजाचे उद्धारकर्ते आहोत, असे प्रस्थापित करतात. लोकांच्या मनात भयगंड निर्माण करतात, मग सांगतात ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’. कवी म्हणतो, ‘अरे, मी घाबरतच नाही, तू कशाला आमच्या पाठी लागतोस? तूच असमर्थ आहेस. असमर्थ आमचा स्वामी, मालक, गुरू, मार्गदर्शक कसा होऊ शकतो? तुझं जोखड फेकलं की, मी कोणत्याही परिस्थितीला स्वर्ग बनवू शकतो!’
‘गरगर फिरणारी वटवाघुळांची रत्ने
चिरतारुण्याची स्वप्ने अमावस्या!’
हे धर्माधिकारीही खरे म्हणजे झुरळेच. प्रत्येक पिढीत अशी झुरळे निर्माण होतच जातात. कधी भक्त म्हणवतील, कधी संत! कोणी कोणी तर स्वत: भगवंत, अशी यांची रूपे.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
धर्मक्षेत्रात भयगंडावर आधारित व्यापार चालला आहे. बुवा, बाबा, दादा, गुरू, इतकेच काय ताई, माई अशा स्वघोषित परमपूज्यांद्वारा धार्मिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक, आध्यात्मिक शोषण, दिशाभूल, बुद्धिभेद चालू आहे. अदृश्य शक्तीचे भांडवल करत धर्म व देव यांना साधन बनवून वर्चस्व गाजवत सर्वकाही भोग घेतले जात आहेत.
‘भीतीला मार्केट करत जन्मास येते व्यवस्था
अमिबा एकेक अवयव तोडतो
काळे घोडे उधळत राहतात भयगंडाचे...
नाकात व्यसन घातली की रांगतोच आपण...
मूर्ख माणसे सर्वज्ञापुढे लोळण घेत राहतात... ’ (अबाधित)
डोळसपणे समाजाकडे पाहिले की, संवेदनशील मन बेचैन होते. उद्विग्नता येते. दिवास्वप्ने कधीच पूर्ण होत नाहीत -
‘मिणमिणत्या काजव्याचं चंदेरी नातं स्मशानी
स्वप्नांच्या रांगोळ्यात सोनेरी दिवे यातनांचे...
नैतिक अनैतिकतेच्या पाकोळ्या देवघरात सलामी
ही दमायची सळसळून धावत सुटायची दिवास्वप्ने
मिश्या हलवत हलवत मनाची झुरळं कोणत्याही दिशेला.’ (कोणत्याही दिशेला)
झुरळाने आपल्यातला न्यूनगंड झटकला आणि परिस्थिती आली की, झुरळही उडू शकते! मनातली भीतीच देव, स्वघोषित परमपूज्य, बाबा, नाना, गुरू यांकडे आशेने पाहायला प्रवृत्त करते! ‘किती वेळा दयेची याचना करायची दयाघना!’ अनाकलनीय शेवाळावरून घसरून गुढगे फुटतातच कितीतरी वेळा तुझ्या तत्त्वज्ञानाची जडीबुटी उशाला आणून ठेवते. कुणीतरी आणि आपण वाहवत जातो. तुझ्या-माझ्या दरम्यान नैराश्य हा जणू स्थायिभावच आहे का माणसांचा? तुटकेपण, दुरावा-एलिनेशन वाटते माणसांच्या गर्दीनेही.
‘कोणतंच गाव मला आपलं म्हणत नाही
मी मला कधीपासून झुरळ समजतोय
हा गलबला माझ्या भोवती
अंधार पापण्यांच्या सुरात गायला लागलाय
डोळे माझेच मला दिसत नाहीत आता आरशात’ (पापण्यांचा अंधार)
अशा हृदयाला भिडणार्या शब्दकलेत आर्तपणे हे दुरावलेपण कवी अभिव्यक्त करतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अस्तित्वार्थ, जीवनार्थ संघर्षात कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणे, हाच विजय असतो. मानवी मनातील दुर्दम्य आशावाद आणि विजिगीषू जीवनवाद संपृक्ततेने झुरळाच्या योजनेमध्ये आढळतो. या दृष्टीने व्यापक, वैश्विक सत्याचे दर्शन या संग्रहातील कवितेतून घडते.
मानवनिर्मित जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, ग्लोबल वार्मिंग, पर्यावरणाचा ऱ्हास, नैसर्गिक जंगलांचा माणसांनी चालवलेला ऱ्हास, विस्कळित होत असलेली अन्नसाकळी, पंक्चरलेला ओझोन स्तर, अदृष्य लहरी, वाढता इ-कचरा, देशादेशांमधील आंतरराष्ट्रीय समस्या, त्यातून उद्भवणारी महायुद्धे, अण्वस्त्रांमुळे होणारी हानी, आण्विक अस्त्रांप्रमाणेच रासायनिक युद्धे, विषाणू युद्धे, मानवनिर्मित पण व्यक्तिकेंद्रित स्थितिशील धर्मसंकल्पनांच्या अपरिवर्तनिय अतिरेकांमुळे मानव्यालाच निर्माण झालेला धोका… अशी कितीही संकटे आली तरी टिकून राहण्याची क्षमता झुरळात असते. इतिहासात अनेक संस्कृतींचा विनाश झालेला असला तरी मानववंश टिकून आहे. वंशसातत्यातून टिकणे म्हणजे डीएनएच्या स्वरूपात अमर होणे असते. या दृष्टीने मानव अमर आहे. हे अमरत्व झुरळाच्या प्रतिमेतून अधोरेखित होते.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या कवितेत जीवनमूल्ये हीच वाङ्मयमूल्ये ठरतात. मानवी जीवनातील श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचे अनेकानेक पैलूंना कवीने स्पर्श केलेला आहे. वास्तविक जीवनदर्शन वस्तुनिष्ठपणे चित्रित करण्याचा कवीचा प्रयत्न असला तरी निवेदक त्याच संस्कृतीचे अंग असल्याने संज्ञाप्रवाहात आत्मनिष्ठा हेही जीवनमूल्य इथे प्रभावी वाङ्मयमूल्य ठरते. प्रवाही निवेदनासाठी मुक्तच्छंदचा अंगीकार संयुक्तिक वाटतो. रचनेचे प्रयोग करण्याचा मोह गझलकारही असणाऱ्या कवीने इथे टाळलेला आहे. तंत्रमूल्यांच्या दृष्टीने कोणाला ही उणीव वाटू शकते, पण औचित्यपूर्णतेच्या दृष्टीने ते उपकारकच ठरले आहे.
एकंदरीतच मानवी संस्कृतीच्या अनेक अंगांचे चिंतन करताना वस्तुनिष्ठ न राहता ही कविता आत्मनिष्ठ होते. हा काव्यसंग्रह सामान्य माणसाचे आत्मचिंतन ठरावे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.

Post Comment