नांगेलीची मिथककथा, दलित स्त्रिया, ‘Breast Tax आंदोलन’ आणि ‘केरळ स्त्रीसत्ताक’
दिवाळी २०२२ - लेख
भाऊसाहेब नेवरेकर
  • नांगेलीची इंटरनेटवर उपलब्ध असलेली चित्रे
  • Thu , 27 October 2022
  • दिवाळी २०२२ लेख मुलाकरम Mulakaram स्तनाचा कर The Breast Tax नांगेली Nangeli दलित महिला Dalit Women दलित महिला संघर्ष Dalit Women Fight

नांगेली. केरळची. तिच्या घरासमोर राजाचे कर वसुली सैनिक येतात, कराची मागणी करतात. नांगेली घरात जाते, आपला एक स्तन कापते आणि तो केळीच्या पानावर ठेवून सैनिकांना देते. अति रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू होतो. नांगेलीचा नवरा तिला पाहून प्राण सोडतो. १८०३ सालची ही नांगेली व तिचा पती यांची दुर्दैवी पण अनोखी प्रेमकथा केरळमधील सामाजिक इतिहासात एक मिथककथा बनली आहे. आणि मिथककथा सोयीनं वापरण्याची आपल्याला सांस्कृतिक देणगीच आहे.

नांगेली माडाच्या झाडावरून माडी काढणाऱ्या ‘एजवा’ (Ezhva) जातीची. केरळात बहुसंख्येनं असणारी ही जात सध्या ओबीसीमध्ये येते. (केरळचे विद्यमान मुख्यमंत्रीही ‘एजवा’च आहेत.) केरळातील अस्पृश्य स्त्रियांना केवळ कंबरेपुरतेच वस्त्र गुंडाळता येत असे आणि उरोभाग उघडा ठेवणे बंधनकारक होते. अस्पृश्य स्त्रियांचा या प्रथेविरुद्धचा लढा १८५९ ते १९३० असा दीर्घकाळ चालला. अखेर त्याला यश आले. या लढ्यात केरळी जनमानसात रुजलेल्या नांगेलीच्या मिथककथेची अतिशय जाणीवपूर्वक गुंफण केलेली आहे, असे दिसून येते.

नांगेलीने स्तन कापून देण्याचा अस्पृश्य स्त्रियांच्या लढ्याशी, अर्थाअर्थी काही संबंध आहे का?

नांगेलीने १८०३ साली आपला एक स्तन कापून राजाला कर रूपाने दिला, त्या वेळी केरळ कसा होता?

केरळ भारतीय जंबुद्वीपाचा भौगोलिक भाग असला तरी ब्रिटिश साम्राज्यापूर्वी भारतीय एकछत्री अंमलाखाली केव्हाही नव्हता. अगदी सम्राट अशोक असो वा कनिष्क यांची राजवट असो- केरळचे राजेपण कायम स्वतंत्रच होते. साहजिकपणे तेथील समाजधारणा व रचनाही इतर भारतीय प्रदेशांपेक्षा स्वतंत्र, तुटकच राहिल्याचे दिसते.

केरळचा प्रदेश हजारो वर्षांपासून मसाल्याचा उत्पादक व निर्यातदार राहिला आहे. १६०० वर्षांहून अधिक काळ अरब व्यापाऱ्यांचे केरळमधील मसाल्याचे खरेदीदार म्हणून वर्चस्व होते, पण १५व्या शतकाच्या दरम्यान पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी अरबी उपसागरावर वर्चस्व मिळवले आणि अरब मागे पडले.

अरब व ख्रिश्चन पोर्तुगीज व्यापाऱ्यांमुळे भारतातील दुसरी मशीद व पहिले चर्च केरळमध्ये उभारले गेले.

इटलीचा रोबेर्टो डे नोबीली हा (१६२३) तरुण मिशनरी धर्मगुरू पोपच्या आदेशानुसार भारतात, मदुराईला यायला रोमवरून निघाला. तो गोवामार्गे कोचिनला राजाच्या भेटीसाठी राजदरबारात पोहचला. त्याच्या केरळ राजाच्या दरबारातील नोंदी फार महत्त्वपूर्ण आहेत. त्याला राजदरबारात अदभुत व विचित्र अशी दृश्ये दिसली. तो लिहितो -

‘‘राजदरबार सर्व वयाच्या राजघराण्यातील स्त्रियांनी गच्च भरलेला होता. प्रत्येकीच्या अंगावर नेसते वस्त्र केवळ कंबरेपुरतेच होते व प्रत्येकीचा उरोभाग निर्वस्त्र होता. स्त्रियांतील एक-दोघी जणी राजाला डाफरतही होत्या.’’

तर राजघराण्यातील तरुणींनी समुद्रकिनाऱ्याच्या उष्ण, उकाड्याच्या दमट वातावरणात नोबीलीने अंगाभोवती एवढे गळाबंद कपडे का गुंडाळले, याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते.

हा नोबीली पुढे इटालियनन ब्राह्मण म्हणून मदूराईत प्रसिद्धीस आला.

आजच्या पुरुषसत्ताक समाजरचनेत ‘सदाचारी’ स्त्रीचा जो अर्थ विचारात घेतला जातो, तसा केरळात कधीही अस्तित्वात नव्हता. तिथे बलवान व वर्चस्ववादी समुदायाच्या अंतरंगात स्त्रीसत्ताक समाजरचनेचे आचार, विचार, संस्कार कायम पक्के रुजलेले, ठसलेले होते आणि त्यात स्पष्टता होती.

एक उदाहरण. बाराव्या शतकातील जगदगुरू बसवन्ना यांच्या ‘अनुभव-मंटप’मधील ३५ स्त्री शरणींची वचने उपलब्ध आहेत. त्यातील मूळ केरळीयन असलेल्या रेमव्ये या शरणीच्या एका मूळ वचनाचा इंग्रजीमधील अनुवाद असा आहे -

‘Other women have to wash themselves,

But for my husband washing is not needed.

All other men are emitting their seed,

but my husband does not so.

All other men have seed,

but my husband has no seed in his balls.

All other men lie on top,

but my husbond is under, I am on top.

O Lord,  over the devils, my master.’

‘स्त्री पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, कनिष्ठ नाही’, हे शरणी रेमव्वेने किती थेट रूपकाद्वारे व्यक्त केले आहे, मांडले आहे!

बारावे शतक असो, सोळावे वा सतरावे, नोबीलीचा अनुभव ‘केरळ स्त्रीसत्ताका’चा व्यवहारातील स्थायीभाव अधोरेखित करतो.

काय आहे ‘केरळ स्त्रीसत्ताक’?

केरळमध्ये सर्वच वर्ग व वर्णातील स्त्रियांनी केवळ कंबरेभोवती वस्त्र गुंडाळणे, ही शेकडो\हजारो वर्षांची परंपरा होती. (१९६० साली युनोने बंदीची सक्ती करेपर्यंत इंडोनेशियातील बाली बेटावरील स्त्रियाही असाच वेश परिधान करत.)

१९२०पासून नंबुद्री ब्राह्मण स्त्रिया प्रथमच शिवलेली चोळी /ब्लाऊज/ झंपर घालू लागल्या. थोडक्यात, शिवलेले कपडे अंगात घालण्याची पद्धत नंबुद्री स्त्रियांनी सुरू केली. 

अशा उरोभाग उघडा असणाऱ्या स्त्रियांकडे उत्पन्नाची सर्व संसाधने एकवटलेली होती. मग तो समुद्रकिनाऱ्यावरचा मच्छीबाजार असो, मसाल्याच्या जिन्नसाची आडत असो, स्थानिक खरेदी असो, परदेशी व्यावसायिकांसोबतचे आर्थिक व्यवहार असोत, स्थावर मालमत्ता मालकीचे व्यवहार असोत... सर्व स्त्रियांच्या अधिकाराखाली असत. या मालकी हक्कातून होणाऱ्या छोट्या-मोठ्या भांडणांपासून युद्धातही अनावृत स्त्रियांच्या पलटणी सैन्यात आघाडीवर, अग्रभागी असत.

केरळी पुरुष दुय्यम स्थानी राहून पडेल ते काम करणारा होता.

एखाद्या स्त्रीचा नवरा असला तरीही पसंतीच्या अन्य अनेक पुरुषांशी केरळी स्त्री उघड संबंध ठेवू शकत असे, त्यांना आश्रय देऊ शकत असे, एवढे लैंगिक स्वातंत्र्य त्या सहजपणे उपभोगत असत.

केरळच्या शेकडो वर्षांच्या समाजधारणेत स्त्रीचे अर्धनग्न शरीर, आर्थिक मालकी आणि लैंगिक स्वातंत्र्य आणि त्याचा तिरस्कार न करणारा पुरुषांचा नैतिक विवेक, हा उच्च पातळीचा राहिला. त्यामुळे केरळ स्त्री ‘मुक्त’ राहिली. 

केरळी राजाकडे राज्य महसुलाची साधने तशी कमीच होती. शेतजमीन अत्यल्प असल्याने शेतसाऱ्यातून कररूपाने मिळणारे उत्पन्नही कमीच होते. ती कमी भरून काढण्यासाठी राजाने मच्छीमारांच्या जाळ्यांच्या आकारानुसार, सालगडी अथवा गुलाम बाळगणाऱ्यांच्या संख्येनुसार कर निश्चित केले होते. एखादा जर अक्कडबाज मिशा बाळगत असेल तर त्यावरही कर लावला होता. अशा अनेक करांबरोबर प्रत्येक पुरुषास ‘तालक्करम’ आणि प्रत्येक स्त्रीस ‘मुलाक्करम’ असे कर द्यावे लागत असत. अर्थात स्त्रीचा ऐश्वर्य अधिकार मोठा असल्याने स्त्रियांवरील ‘मुलाक्करम’ कर पुरुषाच्या ‘तालक्करम’ करापेक्षा कितीतरी अधिक पट असे.

सोळाव्या शतकानंतर आलेल्या पोर्तुगीज व्यापाऱ्यांना उरोभाग उघडा ठेवून निःसंकोचपणे वावरणाऱ्या स्त्रियांशी व्यापारी करार वाटाघाटी करणे, अत्यंत अवघड जात असे.

युरोपात स्त्री पोषाखात हाफ पँट १९३५ साली आली, तोपर्यंत गळाबंद, पूर्ण हात-पाय झाकलेले शिवलेले पोशाख स्त्रिया परिधान करत असत.

पोर्तुगीजांआधी किमान हजार वर्षे अरब व्यावसायिक केरळात येत होते. त्यातील काहींनी केरळी स्त्रियांबरोबर निकाहही केले. त्यातून ‘माप्पेली मुस्लीम’ ही नवीन पिढी तयार झाली. जी आजही केरळातील उत्तरेत व लक्षद्वीप बेटावर दिसून येते.

पोर्तुगीज व्यापाऱ्यांबरोबर मिशनरीही आले. आपल्या मालक व्यावसायिकांची अर्धनग्न विक्रेत्या स्त्रियांबरोबर करार-मदार करताना होणारी कोंडी, या मिशनऱ्यांनाही लवकर सोडवता आली नाही.

१८५७नंतर ब्रिटिश अंमल सुरू झाला. केरळी स्त्रियांसाठी नैतिकतेचे, शालीनतेचे पाठ मिशनरी वर्गाकडून पढवण्याचे नियम तयार करण्यात येऊ लागले. मिशनरी वर्गाने मुख्य भर लैंगिक स्वातंत्र्यावर बंधन घालण्यावर दिला. एकच पती कसा योग्य, मुलांना आपल्या नावाबरोबर बापाचे नाव सांगता आले पाहिजे, अशी समाजप्रबोधने सुरू केली. एकापेक्षा अधिक पुरुषांशी संबंध असेल तर ती स्त्री ‘बदफैली’, ‘व्यभिचारी’ अशी ‘कुजबूज मोहीम’ हाती घेतली गेली . एवढेच नव्हे तर ती अधिकाधिक तीव्रतेने राबवली.

स्त्रियांनी कमरेवरचा भाग किमान झाकावा, या उद्देशाने ‘सन्मानाची शाल’ ही योजना राबवायला सुरुवात केली. तरीही ती रुजायला १९वे शतकाची अखेर उजाडावी लागली. राजघराणे, उच्चवर्णीय, व्यावसायिक स्त्रियांना शाल पांघरणे आणि त्यास ‘सन्मानाची शाल’ असा गौरव निर्माण करण्यात आला. यातून काही अंशी युरोपियन व्यापाऱ्यांची कोंडी फुटली. मात्र ‘सन्मानाच्या शाली’च्या उच्चतेचे महत्त्व समाजमनात रुजवण्यासाठी निम्नस्तरातील स्त्रियांना ती नाकारून जातीय विभागणी निर्माण करण्यात आली. सरसकट शाल दिली असती, तर ती सन्मानाची राहिली नसती ना!

जे दलित ख्रिश्चन झाले, त्यांतील स्त्रियांना मिशनरी ‘सन्मानाची शाल’ देऊ लागले, तेव्हा सवर्ण वर्गाने शाल समाजसन्मानाचे प्रतीक आहे, ते ख्रिश्चन दलित स्त्रीलादेखील देता येणार नाही, यावर दीर्घकाळ संघर्ष केला. शेवटी, दलित ख्रिश्चन स्त्रिया ‘सन्मानाची शाल’ नाही, पण झंपर\ब्लाऊज घालू शकतात, असा समेट झाला.

१९२० साली नंबुद्री ब्राह्मणांतील काही स्त्रिया शिवलेला ब्लाऊज घालू लागल्या, तेव्हा जुन्या पिढीतील वडिलधारी स्त्री-पुरुष त्या स्त्रियांना ‘बदचलन’ म्हणत असत. तथापि युरोपियन सांस्कृतिक वादातून स्त्रीचा एकच पती असणे आणि तिने अंग झाकणे, या विचाराची पुरुषसत्ताक समाजरचना रूढ करण्यास प्रतिगामी तरुणवर्ग यशस्वी झाला.

या सर्व वर्गाने दलित स्त्रियांना कमरेवरचे वस्त्र घालण्यास प्रतिबंध केला आणि नायर या वर्गातील स्त्रियांनाही जाहीर कार्यक्रमात कमरेवरचे वस्त्र न घालणे बंधनकारक केले.

अन १८५९ सालापासून अस्पृश्य स्त्रियांचा संघर्ष सुरू झाला. त्याची मिथक बनलेली नांगेली प्रत्यक्षात १८०३ सालीच मरण पावली होती. त्यामुळे तिचा कसा व का संबंध जोडला गेला, हा प्रश्नच आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

‘केरळमधील दलित स्त्रीस अन्यायकारक Breast Tax द्यावा लागत असे’ याविषयी आंतरजालीय माध्यमांत कितीतरी माहिती वृत्तांकने आणि शेकडो शॉर्ट फिल्म्स आहेत. त्या प्रत्येकामध्ये उघड्यानागड्या दलित महिलांसोबत नांगेली हे प्रमुख पात्र आहे. केरळमध्ये केवळ दलित व नायर स्त्रियांनाच कमरेच्या वरचे अंग उघडे ठेवावे लागणे, हे उच्चवर्णियांनी लादलेले बंधन होते.

या प्रथेची निंदा करताना नांगेलीला त्यात गुंफणे, हे मात्र काळवेळाचा विचार करता  समाजशास्त्रीयदृष्ट्या दृष्टीने संशयास्पद आहे. पुढे ब्रिटिश शासन व मिशनरी धर्मसुधारकांनी केरळमधील राजघराण्यापासून ते व्यावसायिक करार-मदार करावे लागतात, अशा स्त्रियांना शालीनतेचे धडे देताना कमरेवरचे वस्त्र ल्यावे, अशी ‘सन्मानाची शाली’पासून सुरू झालेली मोहीम हाती घेतली, तर १९२०मध्ये काही नंबुद्रीपाद ब्राह्मण स्त्रियांनी पोलका घालण्यास सुरुवात केली. असे असताना उरोभाग झाकण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या कराची कथा रचताना नांगेली दलित आहे, असे का भासवले जाते? प्रत्यक्षात नांगेली बहुजन वर्गातील ‘Ezhva’ (ताडी काढणे व्यवसाय) जातीची आहे, ती अस्पृश्य अथवा दलित नाही!

स्त्रियांवरील ‘मुलक्करम’ कर पुरुषांवरील ‘तालक्करम’पेक्षा जास्त होता. आर्थिकदृष्ट्या गरीब नांगेली मुलक्करम भरू शकत नव्हती. त्यामुळे तिने पुरुष-स्त्रीमधला सकृतदर्शनी भेद असणारे स्तन कापले इतकेच म्हणता येईल .

राजाराम मोहन राय (१७७२-१८३३) यांनी सती प्रथा रोखण्यासाठी आंदोलने केली आणि ब्रिटिश शासनाने सती प्रथेविरोधात कायदा केला. पतीच्या मृत्यूपश्चात पत्नीने जळत्या चितेवर सती जायचे. पती मृत्यूनंतर कौटुंबिक आपत्ती समजून विधवेस जगण्याचा हक्क नाही, ही रूढ परंपरा होती.

महाराष्ट्रात केशवपन व माजघरातच राहणे असे सौम्य स्वरूप होते. तरीही प्लेग निर्मूलनामध्ये ब्रिटिश सैनिक माजघरात प्रवेश करतात, यावरून १८३७ साली रँडची हत्या करण्यात आली होती. देशभरातील सतीप्रथा व माजघरात अडकलेल्या स्त्रियांच्या काळातच केरळमधील सर्वच वर्ण-वर्गातील स्त्रिया मात्र मालमत्तेसह सर्व आर्थिक संसाधने एकहाती ठेवून लैंगिक स्वातंत्र्य उपभोगण्याइतपत बलशाली होत्या.

भारतीय कमुनिष्ट पक्ष १९२५ साली कॉ. श्री. अ. डांगे यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आला. कॉ. ईएमएस नंबुद्रीपाद (१९०९-१९९८) पक्षाचे नेते बनले आणि केरळ सर्व भारतीयासमोर आले. कॉ. नंबुद्रीपाद सुमारे ९० पुस्तकांचे लेखक असून सामाजिक कला व संस्कृती अभिजनवर्ग ते बहुजन वर्ग अशी प्रवाही, झिरपणारी असावी, अशा सनातनी दृष्टीकोनाचे होते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

कदाचित ‘आधुनिक केरळ’ या संकल्पनेतून अभिजनवर्गाने नांगेलीची मूळ कथा लपवणे अथवा मूळ कथेच्या माध्यमातून केरळातील वर उल्लेखलेली शेकडो वर्षांची स्त्रीसत्ताक समाजरचना उघड होऊ शकते, यासाठी नांगेलीची मिथककथा ‘दलित स्त्री ब्रेस्ट टॅक्स आंदोलना’त एकत्र केली असावी आणि ‘कॉपी-पेस्ट संशोधकां’नी हा विषय कल्पना विलासाला अधिक वाव देणारा, नाजूक असल्याने आर्थिक लोभाने आणखी दृढ करत नेला, भरकवटत नेला अन् अभिजन वर्गाचे काम सोपे केले असावे.

शेवटी, नांगेली इतकीच अलीकडच्या काळात संशोधकांनी तयार केलेली टिपू सुलतानच्या ब्राह्मणहत्येची (सुरुवातीस ती संख्या ५० होती, आता ती १००० झालीय) कथा तर आणखीनच कीव करावी अशी आहे. वास्तविक टिपू सुलतानचा काळ १७५० ते १७९९ असा खूप मागचा आहे. असो.

आजही केरळी स्त्री - मग ती वयाने छोटी, तरुणी, प्रौढा, वयस्क, शिवाय कोणत्याही वर्गातील, वर्णातील, धर्मातील, पंथातली - असली तरीही एकदा मूल्ये, सत्यता, नैतिकता, भूमिका पटली की, अत्यंत आदरपूर्वक, प्रेमपूर्वक, स्नेहभावनेने, ममतेने, मनमोकळेपणाने समाजात खुलेआम व्यक्त होताना दिसते... आणि हेच मूळ ‘केरळ स्त्रीसत्ताका’चे आजचे दर्शनी रूप आहे.

संदर्भ -

1) ‘The COUTRESAN, the MAHATMA and the ITALIAN BRAHMIN’ by  MANU S. PILLAI

2) ‘REVOLUTION of the MYSTICS’ by J.P. SCHOUTEN

.................................................................................................................................................................

 लेखक भाऊसाहेब नेवरेकर सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता (जलसंपदा विभाग) आहेत.

 bsnevarekar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘दी क्वीन अँड दी रीबेल्स’ : या नाटकातील राणी हे सत्तेचं एक सांकेतिक प्रतीक आहे. ती बंडखोरांप्रमाणेच निष्ठावंतांनाही घाबरते. तिला काहीही नको असतं, फक्त भीतीमुक्त, शांत झोप हवी असते

कळसूत्री बाहुली उभी करून, काही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरुद्ध क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने काहीच केलेलं नाही. ती लपूनछपून दिवस काढत राहते, आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यातून तिला एक मुलगाही होतो. पण ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठावाल्यांचा स्वार्थ आहे. त्यांना कोणाच्या तरी नावानं हे चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात.......

डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात

वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग भावनेने भारलेल्या ज्ञानाचा स्रोत होता. आपण निसर्गात जातो, तेव्हा आपल्या मनात ज्या अस्फुट भावना तयार होतात, त्यांना वर्ड्स्वर्थची कविता शब्दरूप देते. वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग हे एक शांततेचे घरटे होते. फुलांशी गप्पा मारण्याइतके आणि त्यांची चेष्टा करण्याएवढे त्याचे फुलांशी जिवंत नाते होते. शेलीने म्हटल्याप्रमाणे वर्ड्स्वर्थ हा शहरी जीवनातील असंवेदनशील मानवी आयुष्यावरचा एक उतारा होता.......

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत...

राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात म्हणजे ते धार्मिक आहेत असे नव्हे. ते धार्मिक असण्यापेक्षा आध्यात्मिक आहेत. ते हिंदू संस्कृती-धर्म जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे कदाचित ते भाजपच्या हिंदुत्वाला टोकाचा विरोध करतात. त्यांनी उपनिषदे वगैरे वाचलेले आहे. अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधी जाहीरपणे खोटे बोलल्याचे अजून तरी दिसलेले नाहीत. राहुल गांधींना महादेवाचे म्हणजे शंकराचे प्रचंड आकर्षण आहे.......