‘माती, पंख आणि आकाश’ या आत्मचरित्रातील प्रांजळ निवेदन फार वेगळं आहे. जे आहे, जसं आहे तसं, अभिनिवेशरहित
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
जीवन तळेगावकर
  • ‘माती, पंख आणि आकाश’
  • Tue , 02 November 2021
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो ज्ञानेश्वर मुळे Dnyaneshwar Muley माती पंख आणि आकाश Mati Pankh Aani Akash

‘माती, पंख आणि आकाश’ हे अमेरिकेतील माजी राजदूत, परराष्ट्र सचिव आणि ‘राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा’चे सदस्य, ‘चांगुलपणाची चळवळ’चे प्रणेते डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचं आत्मचरित्र. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांतून त्यांनी लेखन केलं आहे. आजकाल आत्मचरित्रातून एखादी गोष्ट, विशेषतः, दारिद्र्य वगैरे अतिवास्तववादी भूमिकेतून उजागर करून सांगितली जाते. या पार्श्वभूमीवर या आत्मचरित्रातील प्रांजळ निवेदन फार वेगळं आहे. जे आहे, जसं आहे तसं, अभिनिवेशरहित.

‘प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं’ असं कुसुमाग्रज जेव्हा म्हणतात, तेव्हा त्यांना आकाशाला गवसणी घालणाऱ्यांना अपेक्षापूर्तीचे पंख आणि उमेद जरी लाभली तरी मातीशीदेखील नातं सांगता आलं पाहिजे, हेच कदाचित सुचवायचं असावं. यशाची शिखरं गाठणाऱ्यानंही या सोप्या मंत्राचा परिपाठ कायम ठेवला तर त्याचं यश झळझळत राहतं, असं या पुस्तकाच्या शीर्षकामागचं अर्थ-गंभीर अंतरंग वाचत असताना उलगडत राहतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

विचारांची जडणघडण होण्याच्या दिवसांत स्वतःच्या खिशात खडकू नसताना नशिबानं मिळालेले ५.५० रुपये एका आजीबाईंचे आहेत, हे कळल्यानंतर लगेच ते परत देणं, हा प्रतिक्षेप बालवयात घरातून मनावर कळत-नकळत घडणाऱ्या संस्कारांचा फलित असतो. यासारख्या सहज स्मृतींतून निसटू शकणाऱ्या घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात, पण त्या शब्दांच्या वीणेतून घट्ट पकडून अर्थगर्भ बनवणं लेखकाचं वैशिष्ट्य असतं, विशेषतः आत्मचरित्रकारांचं. अशा छोट्या पण महत्त्वपूर्ण प्रसंगांतून आपल्या मनाची जडणघडण होते. त्यातील मूल्यं किती शाश्वत आहेत, याची जाणीव कालांतरानं होत राहते. अशा प्रवाही घटना आणि त्यामागाहून येणारा लक्षित मूल्यनिर्देश, ही या पुस्तकाची वैशिष्ट्यं आहेत.          

यातले काही प्रसंग फार उत्कंठा निर्माण करणारे होतात उदा. अग्निहोत्री बाई किंवा जपान मारुती इत्यादी. ते वाचताना या पात्रांचं पुढे काय होतं, ही उत्कंठा कायम राहते. तसेच काही प्रसंग हृदय पिळवटून टाकणारे होतात, उदा. काका निवर्तल्याची बातमी अचानक समजणं, मोठ्या चुलत बहिणीचा मृत्यू इत्यादी. या पारिवारिक विपत्तीच्या काळात परक्या गावात शिक्षणासाठी गेलेला, होता-तोंडाची जेमतेम जुळवणी करत अभ्यासात सर्वस्व झोकून देणारा पोरसवदा विद्यार्थी भरकटण्याचीच शक्यता जास्त असते. पण इथं अशा प्रसंगांतून आयुष्याचे धडे गिरवणारं नायकाचं तरुण मन एकीकडे आपण असाहाय्य आहोत, या जाणिवेशी झुंजत असतं, तर दुसरीकडे आपण या परिस्थितीवर मात करणार, केवळ आपणच, या आंतरिक उमेदीतून बळ मिळवत असतं.

यशाला गवसणी घालण्याची त्याची जिद्द अखेर फलद्रूप होते. तो केवळ परिवारासाठी नव्हे, तर आपल्या छोट्या गावासाठीदेखील जखमांवर फुंकर घालणारा ठरतो, एवढा हा नायक आधीपासूनच ‘जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं ।’ अशा निर्विष समाजमनाचा भाग होतो. त्याच्या यशात अब्दुल लाट या छोट्या गावातील घट्ट बंधात राहिलेल्या इतर लोकांनाही आपलं यश दिसतं.   

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

लेखक पुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होतात आणि भारताचे राजदूत बनून जपानला जातात. तिथं त्यांना होणारं जपानचं दर्शन हे या पुस्तकाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अधूनमधून येणारं जपान या देशाचं, लोकांचं, स्वभावाचं, मूल्यांचं वर्णन विचारातील संज्ञाप्रवाह साहित्यात कसा दिसतो, याचं ठळक वस्तूरूप बनून येतं.

नेताजींच्या अस्थी सांभाळून ठेवणारं जपानी जोडपं जेव्हा त्या भारतीय दूतावासात आणून पोचवतात, तेव्हा ‘आपल्याला हे स्वीकारण्याचं भाग्य लाभलं’, असा विचार करणारा लेखक आणि ‘आता आपल्या पूजाघरातील नेताजी जाणार’, या भावनेनं सद्गतीत झालेलं जपानी जोडपं, या प्रसंगाला अधिक चित्रदर्शी बनवतात.

हे असे प्रसंग आणि त्यांचं शब्दांतून साधलेलं सकस प्रकटीकरण हे या पुस्तकाचं बलस्थान आहे. ‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार’, हे एकदा मनात ठसवलं की, आपण ध्येयाच्या जवळ जातो, हा संदेश देणारं हे आत्मचरित्र कित्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरलं आहे, ठरत राहील, हे नक्की.

गावातील छोट्या छोट्या प्रसंगातून सामाजिक अ-स्वास्थ्यावर केलेलं भाष्य आपल्याला असमान परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव करून देतं. कालमानानं काही दशकांपूर्वीचं हे वर्णन जिवंत आणि ताजं वाटण्यामागचं कारण अजूनही आमूलाग्र अशा सुधारणा न घडणं, हे जसं आहे तसंच समाजमानसाची गुणसूत्रं विवेचनात अचूक पकडली गेली आहेत, हेही आहे.

निलांबरीच्या प्रेमाचा प्रसंग हळुवारपणे रेखाटणं लेखकाला कवीहृदयामुळे शक्य झालं आहे. या प्रसंगात नाजूकपणानं हाताळले गेलेले शब्द हळूवार होतात, तेच कर्तव्य-कठोर प्रसंगी, कठोर.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

ग्रामीण भागांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघर्षाला पारावार नसतो. तो त्यांचा कायम सोबती असतो. त्याला काही जण धैर्यानं सामोरं जातात, परिस्थितीच जगण्यायोग्य बनवतात, त्यांच्या मनगटात पाणी आणि बुद्धीत बळ असतं, तरी ते आपल्या यशाचं श्रेय गुरुजनांना, आई-वडिलांना देतात. तसंच स्वतःच्या जिद्दीला आणि कठोर परिश्रमांना त्यांनी श्रेय द्यावं, हे पण स्वाभाविक असताना, ते इतरांना बहाल करण्यात अशी निवडक मुलं मनाचा मोठेपणा दाखवतात आणि त्यांना त्यात आपण काही विशेष करतो आहोत, याची जाणीव असत नाही. एवढी ही संस्कारांची सहजता या भारतभूमीत आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं की, ‘ज्या वृक्षावर फळं लगडलेली असतात तीच विनम्र असतात’.

लेखक विद्यार्थिदशेत आपल्या यशाच्या मार्गात येणारे अडथळे मुख्यमंत्र्यांपर्यंत थेट पत्र लिहून कळवतो, त्यासाठी लागणारं धारिष्ट्य त्याला स्वबळावर असणाऱ्या अडिग विश्वासानं पुरवलेलं असतं.

समारोपाच्या भागात जपानी जीवन पद्धती, प्रामाणिकपणा, भूकंपसदृश परिस्थितीला सामोरं जाण्याची कायम सिद्धता, नीटनेटकेपणा, कामसूपणा, नियमांचं कठोर पालन याबद्धल माहिती आहे. लेखक जपानमध्ये प्रत्यक्ष राहून आल्यामुळे हे वर्णन जिवंत झालं आहे. रवींद्रनाथ आणि सुभाषबाबू यांच्या स्मृती जपानी लोकांनी जीवापाड दोन पिढ्यांपासून किती प्रेमादरानं जतन केल्या आहेत, याचं वर्णन लेखकाच्या स्वानुभवातून आलं आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘परोक्ष’ या शब्दाबद्दलचा काटेकोरपणा पाळणारा हा लेखक विरळा आहे. बहुधा हा शब्द ‘समक्ष’ या अर्थानं व्यवहारात वापरला जातो, पण त्याचा नेमका अर्थ ‘असमक्ष’ असा आहे, याची जाणीव जेव्हा एखाद्या लेखकाला असते, तेव्हा ती त्याच्या साहित्यिक व्यासंगाबद्दल बरंच काही सांगून जाते.

थोडक्यात, सूक्ष्म अवलोकन व संवेदनशील मन यांबरोबरच भाषा-प्रेम आणि आकाश व्यापण्याची उमेद बाळगून बळकट पंखांसह भरारी मारणारा एक मनस्वी प्रशासक मातीशी असलेलं नातं जपत राहतो. त्या सर्वांचा एकजिनसी आविष्कार म्हणजे हे आत्मचरित्र! आता या प्रेरणादायी आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद ‘अँड द जिप्सी लर्न्ड टू फ्लाय’ या नावानं उपलब्ध आहे. अनेक भारतीय भाषांमध्ये हे आत्मचरित्र अनुवादित झालेलं आहे.

‘माती, पंख आणि आकाश’ - डॉ. ज्ञानेश्वर मुळे

मनोविकास, पुणे

पाने : २२६, मूल्य – १५० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......