त्या संध्याकाळ नंतर तर जणू तिच्या अंगात वीजच संचारली होती. दिवस असेच चालले होते. हर्षा मात्र खूष होती स्वतःवर व तिला पडलेल्या प्रश्नावर
ग्रंथनामा - आगामी
विवेक कुलकर्णी
  • ‘अनरउबिक’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Sat , 16 October 2021
  • ग्रंथनामा झलक अनरउबिक Anaraubik विवेक कुलकर्णी Vivek Kulkarni

कादंबरीकार व चित्रपटसमीक्षक विवेक कुलकर्णी यांची ‘अनरउबिक’ ही कादंबरी दिवाळीत गोल्डन पेज पब्लिकेशन, पुणे तर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

नमस्कार, मी आयत टाके व ही सना टाके. ए... नमस्कार कर. तर आम्ही द ट्विन्स फ्रॉम काझी गल्ली. तुम्ही गल्लीत गेलात की, ट्विन्स कोठे राहतात म्हणून विचारा, कोणी पण पत्ता सांगतील.

आयत, काय चाललंय? आपण इथं कशासाठी आलो आहोत?

ओह... सॉरी... सॉरी. विसरूनच गेले. त्याचं काय की, एवढ्या सकाळी इथं यावं लागलं, त्यामुळं थोडंसं घाबरले होते अन् रात्री उशिरा डोळा लागला.

आयत, मी बोलू का? आम्ही खरं तर इथं निवेदनाचं बॅटन घ्यायला आलोत. इतक्या पहाटे टाऊन हॉलच्या ह्या पायऱ्यांवर बसून हर्षाच्या पुढच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीचं निवेदन आम्हाला करायचंय.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

हं... बरोबर. आतापर्यंत तुम्ही तृतीयपुरुषी सर्व साक्षी निवेदन ऐकत होतात जे की...

अर्थात खोटं आहे यातली एकही गोष्ट घडली नाही म्हणजे...

इंदिरा-राजीव गांधी हत्याकांड अन् पी. व्ही. नरसिंहराव, मनमोहन सिंगांचं पदभार स्वीकारणे, डॉ. मनमोहन सिंगांनी अर्थसंकल्प सादर करणे, मोहिते पाटील, मोहिते पाटलांचा मुलगा व सून, हर्षा, हर्षाचा इंदिरा गांधींच्या हत्येच्या दिवशी जन्म होणे अन् तिची देशाच्या एका नव्या अध्यायासोबत वाटचाल करणे पण...

निवेदनाची पद्धत एकदम चुकीची अन् दिशाभूल करणारी आहे. तसंच त्यात बराच अद्भुततेचा अंतर्भाव केलेला आहे. जे की मनाला पटत नाही. अतर्क्य वाटतं अन्...

...वास्तववादी कथानक सांगताना अशा गोष्टींचा अंतर्भाव करायचा नाही असा अलिखित नियम आहे...

आयत, तू खूप पुढचं बोलतेस. त्यापेक्षा आपण असं करू की, हर्षाच्या आयुष्याची कहाणी परत सांगू...

नको, परत परत तेच तेच दळत बसायचं नाही. त्यापेक्षा पाठीमागे जे सांगितलंय, ते तसंच राहू देऊ अन् पुढच्या दहा वर्षांचं निवेदन आपण करू आपल्या पद्धतीने...

म्हणजे कसं?

म्हणजे अॅडम कादंबरीसारखं वास्तववादी पद्धतीनं.

हो, पण नेहमी वास्तववादी पद्धतीनं निवेदन केल्यानं ते पात्र एक जिवंत व्यक्ती आहे, असं वाटायला लागतं.

तुझं म्हणणं बरोबर आहे, पण निवेदकानं कुठल्या तरी एका निवेदनशैलीचा वापर करायला हवा. त्याशिवाय त्याला गोष्ट कशी सांगता येईल.

तुला नेमकं म्हणायचय काय? अॅडममध्ये तर वरदाच स्वतः निवेदक व कादंबरीचा मुख्य पात्र आहे. मग त्याच न्यायानं बघायला गेलं, तर हर्षालासुद्धा तिचं आयुष्य तिच्याच तोंडून सांगायला लावूयात म्हणजे आपली काही गरजच नाही.

नाही, तसं नाही, माझं म्हणणं ते नव्हतं. मला एवढच म्हणायचंय की, एखाद्या कथेत निवेदकाची भूमिका काय असते. उदा. ‘अॅडम’ कादंबरीत वरदा स्वतःची कहाणी सांगतो. लहानपणापासून ते वयाची चाळीशी ओलांडण्यापर्यंत. यात लेखकाचा छुपा अजेंडा असा की, ही खरीखुरी घडलेली कथा आहे किंवा यातील घटना, प्रसंग किंवा पात्रे काल्पनिक असली तरी ती खरीखुरी मानावीत.

मला नाही लक्षात येत.

थांब, तुला एका समीक्षकाची लंबीचवडी व्याख्याच ऐकवते.

पारंपरिक वास्तववादी कादंबरी नेमकं काय करत असते?

पारंपरिक वास्तववादी कादंबरी सादर केली जाते, तेव्हा ती एक कल्पितकथा असूनही आपली कल्पितता शक्य तेवढा दडवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. खरे म्हणजे तिचं रूपाने एक कल्पितकथाच सादर होत असते. तरीदेखील वाचकाने तिच्या वास्तव असण्यावर विश्वास ठेवायचा असतो, कादंबरीतील पात्रांकडे खरोखरीची माणसे म्हणून पहायचे असते. समोर जे काही उलगडले आहे, ते खरोखरीच आहे, अशी वाचकाची समजूत व्हावी, यासाठी ही कादंबरी वाचकाची सतत मनधरणी करत असते. तिचे विविध विभ्रम, सादरीकरणाची तंत्रे, तिचे रूपविशेष याच उद्देशांमधून निर्माण होत असतात. अशा कादंबरीचा वर्ण्यविषय ‘कादंबरी बाहेरचे जग’ असतो. निदान तसा तो असतो, असा प्राथमिक विश्वास तिने वाचकाच्या मनात निर्माण करायचा असतो.

याचाच अर्थ असा की, वास्तव जग आणि त्याचे प्रतिरूपण यांच्यामधील सुरक्षित आणि सोयीस्कर संबंध पारंपरिक वास्तववादी कादंबरीने गृहीत धरलेले असतात. तिच्यातील कल्पित, वास्तवाचे प्रतिबिंब सादर करण्याच्या हेतूने निर्माण झालेले असते. एखादी प्रत्यक्षातली वस्तू आणि आरसा या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्या तशा असल्यामुळे त्या वस्तूचे प्रतिबिंब आरशामध्ये पडू शकते. वास्तव आणि कल्पित या अशाच दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्यामुळे वास्तवाचे प्रतिबिंब पडते, तेव्हा कल्पिताच्या प्रत्यक्षतेची जाणीव लोपते आणि आपण वास्तवातील वस्तुचेच दर्शन घेतो आहोत, अशी वाचकाला जाणीव होते.

याचाच अर्थ असा की पारंपरिक वास्तववादी कादंबरीमध्ये वास्तव आणि कल्पित यांचे संबंध श्रेणीयुक्त असतात. तिच्यामध्ये वास्तवाला प्राथम्य आणि प्राधान्य असते. कल्पिताला गौण पातळीवर ठेवण्यात आलेले असते. वास्तवाच्या प्रतिरूपणाचे एक साधन एवढेच महत्त्व कल्पिताला असते.

इति हरिश्चंद्र थोरात

कादंबरीविषयी (२००६)

आलं लक्षात.

नाही.

अरे देवा, ऐक ‘अॅडम’ कादंबरीच्या सुरुवातीला वरदा एक तत्त्वज्ञान सांगतो. ते तत्त्वज्ञान असं, “आमच्याकडे एक म्हण आहे तिचा अर्थ असा की, ज्याच्या ढुंगणावर तीळ असतो तो पुरुष अनेक आसनांवर बसतो आणि ज्याच्या लिंगावर तीळ असतो तो अनेक स्त्रियांचा उपभोग घेऊ शकतो.” आता हीच फिलॉसॉफी शेवटीसुद्धा येते, तोपर्यंत आपल्याला त्याच्या आयुष्यात काय घडले, हे माहिती होते. यातून आपण काय निष्कर्ष काढतो की, वरदा ही एक जिवंत व्यक्ती असून तिने स्वतःच्या चाळीस वर्षापर्यंतच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडला आहे. आलं लक्षात.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

नाही. तू म्हणतीस ते कळलं, पण वरदाचं आयुष्य आपल्या डोळ्यांसमोर उलगडलं त्याच्या तोंडून मग ते परत-परत सांगायची काय गरज?

हे बघ. तुला अजून एक उदाहरण देते. धोंडो भिकाजी जोशी कडमडेकर या माणसाच्या आयुष्यावर आधारित असलेली ‘असा मी, असामी’ ही कादंबरी.

ती कादंबरी नाही. ते एका कारकुनाचं आत्मचरित्र आहे.

हो, बरोबरय, पण साठोत्तरी मराठी कादंबरीने जेव्हा पारंपरिक परीघापासून फारकत घेऊन नवीन मार्ग चोखाळायला सुरुवात केली, तेव्हा या पुस्तकाने तोच मार्ग स्वीकारून एक उत्तम विनोदी कादंबरी म्हणून स्वतःचा नावलौकिक मिळवला आहे.

तरीपण मी तिला कादंबरी म्हणणार नाही. फार तर विनोदी पुस्तक म्हणूयात.

कादंबरी का म्हणायचं नाही? ‘वासूनाका’सारख्या मुख्यतः कथा मांडणाऱ्या पुस्तकाला जर कादंबरी म्हणू शकतोत किंवा ‘चक्र’सारख्या तद्दन सरधोपट वास्तव मांडणाऱ्या पुस्तकाला कादंबरी म्हणू शकतोत, तर याला का नाही? सांग ना! का नाही?

नाही. बिलकुल नाही. तिला कादंबरीच्या कोणत्याच व्याख्येत ते पुस्तक बसत नाही.

का बसत नाही? एका कारकुनाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर १९६०-६५पर्यंत चाळ संस्कृतीतून फ्लॅट संस्कृतीत झालेलं स्थलांतर व त्या अनुषंगाने मध्यमवर्गीय मानसिकता यावर टाकलेला प्रकाशझोत काय सांगतं. ते पुस्तक वाचताना कादंबरीचे सर्व घटक लख्खपणे समोर दिसत असून त्याला कादंबरी का म्हणायचं नाही?

माझ्याजवळ याचं उत्तर नाही.

ओके. ठीकय. तुला महत्त्वाचं सांगायचय हर्षाच्या बाबतीत घडलंय, ज्यामुळे तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

काय?

ऐक.

त्या वर्षी हर्षानं अकरावीला अॅडमिशन घेतली होती. कॉलेज लाईफला सुरुवात झाल्यामुळे तिच्या मनात नवनिर्मितीचे, तसेच नवीन अनुभवांना सामोरे जायचे विचार येत होते. त्यातच गेले बरेच दिवस ती जेव्हा आरश्यासमोर आपलं सौंदर्य न्याहाळायची किंवा मेक-अप करताना किंवा कपडे घालताना स्वतःकडे बघून तिच्या मनात काहीतरी चलबिचल व्हायचं. ही चलबिचलता का याचं उत्तर मिळत नव्हतं. वर्गातल्या सगळ्यात चांगल्या व सुंदर मुलांकडे बघून ही चलबिचलता त्या बाबतीतली आहे का, याचा शोध घ्यायची, पण याही बाबतीत तिची निराशा व्हायची.

या बाबतीत तिनं दीपाला विचारलं होतं, पण तिनं हसून त्याचं उत्तर द्यायचं टाळलं होतं. तिला विचित्रच वाटलं. तिला असं का होतंय, याचं उत्तर सापडतच नव्हतं. त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर ती व तिची आई बेडरूममध्ये बसले होते, तेव्हा तिनं विचारलं होतं- “तू कुणाच्या प्रेमात वगैरे पडली नाहीस ना! की कोणी सरफिर आवडायला लागलाय. या वयात वयानं मोठे असणारे सरसारखे पुरुष लोक आवडायला लागतात. खरं तर यात आकर्षणच जास्त असतं अन् प्रेम कमी.” हर्षाला काय बोलावं ते सुचलं नाही. तिनं फक्त तिच्या परिस्थितीबद्दल विचारलं होतं. पण आईचं उत्तर काहीतरी वेगळंच होतं. तिला वाटलं जनरेशन गॅप असल्यामुळे कदाचित असं असू शकेल.

वर्गात लेक्चर चालू असताना किंवा कॉलेजातले पायऱ्या उतरताना ही चलबिचलता शिगेला पोचायची. कशाचा तरी आधार घ्यावासा वाटायचा. तिने बऱ्याच वेळा अशा वेळी पायऱ्यालगतच्या कठड्यांचा आधार घेतला होता. ती जेव्हा कॉलेजच्या बाहेर यायची, तेव्हा कॉलेजच्या प्रवेशद्वाराच्या कमानीखाली काही मिनिटं थांबायची. मागे वळून वर पहायची. कमानीवर लिहिलं होतं- ‘राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर’. तेव्हा तिचं मन भरून यायचं. आपण दहावीत असताना किती मेहनत घेतली म्हणून आपल्याला ८५ टक्के पडले अन् लातूरच्या क्रमांक एकच्या कॉलेजात प्रवेश मिळाला. तिला दहावीचा रिझल्ट लागला तो दिवस आठवला.

“बघू किती टक्के पडलेत?,” हर्षाच्या वडिलांनी मार्कमेमो हातात घेत विचारलं. त्यांनी हर्षाच्या दहावीचा रिझल्ट आहे म्हणून रजा घेतली होती. “वा! छान. ८५ टक्के.” असं म्हणत त्यांनी कौतुकानं पाठीवर थाप मारली. हर्षाचा ऊर भरून आला होता. हर्षाच्या आईला तर मुलीला कुठं ठेवू अन् कुठं नको असं झालं होतं. त्यांच्या डोळ्यात अन् तोंडातून अपार कौतुक वाहत होतं. त्यांनी संपूर्ण कॉलनीला पाच किलो पेढे वाटले होते. त्या रात्री जेवतेवेळी त्यांच्यात बरीच चर्चा झाली. “तुला काय वाटतं? हर्षानं पुढं करिअर म्हणून काय चुझ करावं. आर्टस, कॉमर्स की सायन्स?” हर्षाच्या वडिलांनी संभाषणाला सुरुवात केली. “मला वाटतं आपण तिलाच विचारावं कारण हा तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आजची पिढी तेवढी सक्षम आहे की, ती स्वतःच स्वतःचा निर्णय घेऊ शकते. काय हर्षा तुला काय वाटतं?” हर्षाच्या आईनं स्वतःचं मत मांडलं. हर्षा मात्र विचारात गढल्यासारखं दिसत होती. काही वेळानंतर ती बोलली. “मी आर्टस घेणारे जेणेकरून पुढे मला युपीएससीची तयारी करून आयएएस होता येईल.”

“वा! खूप छान. मी तुला हेच सुचवणार होतो. माझ्या मनातलं बोललीस अगदी. मला फार आवडतं. अगदी योग्य तो निर्णय घेतलास.” वडील म्हणाले.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

आता कमानीसमोर खाली उभं राहत असताना तिला हा प्रसंग संपूर्ण आठवला, परंतु सध्याच्या मन:स्थितीवर तो काहीच प्रकाश टाकू शकला नाही. तिने एकदा डावीकडे व एकदा उजवीकडे मान वळवून बघितलं. डावीकडे वळून गेलं तर लातूरचं मुख्य बसस्थानक लागतं अन् उजवीकडं वळून सरळ पाच मिन्टं चालत गेलं तर गुळमार्केटकडून येणारा गांधी चौकाकडे जाणारा रस्ता लागतो. जिथे शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या ऑटो मिळतात. तिला थोडासा विचार करावा लागला, कारण जर ती डावीकडे वळली तर तिला मुख्य बसस्थानकासमोरून गांधी चौकाकडे जावं लागेल. कारण तो एकेरी रस्ता आहे. त्यामुळे तिने उजवीकडं वळायचा निर्णय घेतला. ती तिकडे जायला वळणार इतक्यात तिच्या डाव्या खांद्यावर चापटी बसली. डावीकडे कोण आहे म्हणून वळाली तर उजवीकडून आवाज आला.

“मी किती हाका मारल्या तुला, तिथनं,” दीपानं तक्रारीच्या सुरात बोलली. उत्तरादाखल हर्षानं नुसतंच स्मित केलं.

“का? काय झालं? चेहरा एरंडेल पिल्यासारखा का झालाय तुझा?,” दीपानं परत विचारलं.

“काही नाही गं. असंच. चल, यायलीस का घराकडं?”

“नाही, थांबणार आहे थोडा वेळ.”

“ओके. चल बाय.”

हर्षा तिला बाय करून निघाली. ऑटोसाठी फार वेळ वाट पहावी लागली नाही, कारण गंजगोलाई ते बांधकाम भवन असा प्रवास करणारे ऑटो अक्षरशः दर एक मिनिटाला मिळतात. अशाच एका ऑटोत ती बसली.

स्टॉप येईपर्यंत तिचं लक्षच नव्हतं. वाटेत कित्येक प्रवासी चढले अन् उतरले, पण हर्षा आपल्याच विचारात होती. ऑटोवाल्याला पैसे देऊन तिने घरच्या रस्त्याची वाट धरली. ऑटोस्टॉपपासून तिचं घर पाच मिनिटांच्या अंतरावर होतं. तिला हा रस्ता अंगवळणी पडला होता. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अडथळ्याविना ती घरी पोचली. गेट उघडून ती आली अन् बंद दरवाजा बघून तिने बेल दाबली.

आत कुठेतरी बऱ्यापैकी कर्णकर्कश आवाज आला. बेल दाबल्यानंतर तब्बल तीन मिनिटांनंतर दरवाजा उघडला गेला. हर्षाच्या आईनं दरवाजा उघडला होता. तिच्याशी काहीच न बोलता हर्षा तिच्या खोलीत गेली अन् पलंगावर अंग टाकलं. कॉलेजच्या ड्रेस बदलून घरचा ड्रेस घालायचंसुद्धा तिच्या ध्यानात आलं नाही. हर्षाच्या आईनं तिचे पलंगाबाहेर लोंबकळणारे पाय पलंगावर ठेवले व तिच्यावरून एक पातळ चादर पांघरली. त्या माऊलीला माहिती होतं की, तिची लेक आता किमान तीन तास उठणार नाही. कुंभकर्णाचीच झोप होती तिची.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

घड्याळात पाचचे ठोके वाजले त्या ठोक्यासरशी हर्षा दचकून उठली. उठली म्हणजे झोपेतून जागी झाली, पण पलंगावरच पडून होती. डोळे मात्र टक्कपणे उघडले होते अन् छतावरल्या फॅनकडे बघत होते. तिला काही क्षण काही सुचतच नव्हतं. आपण कुठे आहोत? आपल्याला एवढी गाढ झोप कशी लागली? आपण दुपारी जेवण तरी केलं का? कदाचित नाही वाटतं. भुकेची आठवण झाल्यावर तिच्या लक्षात आलं की, तिने दुपारचं जेवण केलं नाही. पोटात भुकेचा आगडोंब उठल्यावर तिने पलंगाला बाय बाय केलं अन् ती बाथरूममध्ये शिरली.

बाथरूममधून फ्रेश होऊन आल्यावर तिने वेणीफणी केली अन् सैपाकखोलीत आली. सैपाकखोलीत तिची आई देवासमोर दिवे लावत होती. तिने देवाला नमस्कार केला अन् आईला काही खायला आहे का म्हणून विचारलं. आईनं न बोलताच पोहे-चिवड्याच्या डब्याकडे बोट केलं. तिने हसतच तो डबा घेतला व उघडला. त्यातून खरपूस वास येत होता. त्या वासानं तिच्या पोटातली भूक जास्तच वाढली.

एक छोटीशी प्लेट घेऊन तिने थोडं गरडेल त्यात घेतलं. नंतर परत आईला विचारलं की, घरात दही वगैरे काही आहे का, तर परत तिच्या आईनं फ्रीजकडे बोट दाखवलं. तिने फ्रीज उघडला. त्यात समोरच एक पातेलं भरून दही होतं. तिनं ते थंड भांडं बाहेर काढलं अन् डायनिंग टेबलावर ठेवलं. डायनिंग टेबल तिच्या वडिलांनी मागच्याच वर्षी करवून घेतला होता. त्यांना बाजारात मिळणाऱ्या रेडिमेड फर्निचरचा प्रचंड तिटकारा होता. म्हणून त्यांनी ओळखीतल्या सुताराकडून हा तयार जरून घेतला होता. हर्षा व तिची आई डोळ्यात तेल घालून त्याची काळजी घ्यायच्या, कारण त्याचा दर्शनी पृष्ठभाग संपूर्ण काचेचा होता, फक्त खाली आधाराला असणारे चार लाकडी पाय सोडून.

हर्षाने गरडेलवर थोडसं दही घेतलं व त्यात एक चमचा ठेवला. प्लेट घेऊन ती हॉलमध्ये आली. टीव्ही चालू करून सोफ्यावर बसली. चॅनल्स सर्फ करता-करता तिने खायला सुरुवात केली, पण एकाही चॅनलवर बघण्यालायक काहीही नव्हतं, म्हणून ती परत सैपाकखोलीत आली. तिची आई अजूनही देवासमोर बसून होती अन् ती अजून अर्धा तास तरी तिथून उठणार नाही, याची तिला खात्री होती. डायनिंग टेबलाची एक खुर्ची ओढून घेतली अन् त्यावर बसली.

चार-पाच घास पोटात गेल्यावर तिला थोडं बरं वाटलं. त्यासरशी गेली काही दिवस व सकाळपासून मनात उठणाऱ्या चलबिचलतेनं डोकं वर काढायला सुरुवात केली. हळूहळू तिचं मन व मेंदू त्या गोष्टीभोवती फिरायला लागलं. तिचं लक्ष त्या क्षणातून उडून जायला लागलं. तिने एकवार तिच्या आईकडं बघितलं अन् प्लेटमधला शेवटचा घास संपवून प्लेट सिंकमध्ये ठेवली. एक ग्लास पाणी पिऊन ती तिच्या खोलीत आली. पाठीमागे दरवाजा बंद केला. ती मटदिशी पलंगावर बसली पाय खालती सोडून. तिला काय करावं सुचतच नव्हतं. तिने उगाचच खोलीत एकवार नजर फिरवली जणू काहीतरी शोधत असावी अशी. तिने नजर फिरवायचं थांबवून काही एक विचार केला. नंतर ती पलंगावरून उठली. जवळच असणाऱ्या लोखंडी कपाटाकडं गेली. कपाटाचा दरवाजा उघडला. आत वरतून तिसऱ्या कप्प्यामध्ये ठेवलेली एक पिशवी बाहेर काढली. पिशवी घेऊन ती पलंगावर बसली, पण बसण्यापूर्वी दरवाज्याला कडी घातली. तिला माहिती होतं तिची आई देवासमोरची संध्याकाळची पूजा झालं की, तिच्या खोलीत येईल. दरवाजा बंद करून येतानाच तिने लाईट बंद केली अन् पलंगावर येऊन बसली. तिने पिशवी उघडली. त्यातून तो गोळा बाहेर काढला अन् समोरच्या रिकाम्या भिंतीकडे निर्देश करून त्यावर काही ठिकाणी बोटं दाबली. लगेच त्याच्यातून बरीच किरणं निघाली व ती त्या समोरच्या भिंतीवर स्थिरावली. समोर दिसणाऱ्या दृश्यांनी हर्षा पलंगावरून खाली पडायचीच राहिली होती.

***

त्या दृश्यानं ती पूर्णपणे भारावून गेली. समोर जे दिसत होतं, ते तिच्या कल्पनेपलीकडलं होतं. तिला वाटलं नव्हतं त्या गोळ्यामुळे इतकं विचारांच्या व कल्पनेच्या पलीकडलं दिसेल म्हणून. तिने पलंगावर व्यवस्थित बैठक मारली अन् ते दृश्य डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करू लागली. त्या दृश्यात टीव्ही न्यूज चॅनल्सच्या बातम्या दाखवल्या जात होत्या. ती बातमी २०११ सालातली होती. त्या दिवशी साधारण पन्नास-साठ बायकांचा समूह हातात फलक घेऊन नारे देत चालला होता. त्या मोर्चाला त्यांनी ‘बेशरमी मोर्चा’ असं नाव दिलेलं होतं. त्या मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या एका बाईनं सांगितलं की, भारतात पुरुष अत्याचाराला बळी पडणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्या हेतू व त्यांना तशी जाणीव करून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. हर्षाला ती बातमी बघून एकदम एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडावं तसं झालं.

साधारण तीनेक मिनिटांनंतर त्या गोळ्यातून प्रकाश यायचं बंद झालं. खोली परत अंधारात बुडून गेली. हर्षानं ट्युबचं स्वीच ऑन केलं, त्यासरशी खोली प्रकाशात न्हाऊन निघाली. ती विचार करत पलंगावर बसली. त्या गोळ्यानं आपल्याला बऱ्याच गोष्टी दाखवण्यात मदत केली होती. या वेळीसुद्धा मदत केली. आपल्याला पडलेल्या प्रश्नाचं हे आता काही मिनिटांपूर्वी दिसलेलं चित्र उत्तर आहे का? या पाठीमागे नक्कीच काहीतरी कारण असलं पाहिजे, कारण आपण ज्या पद्धतीने विचार करतोय, तसेच आपल्याला ज्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे, ते मात्र या प्रसंगामुळे मिळेल की नाही शंकाचय.

हर्षानं तो गोळा हातात घेतला, त्याला चहुबाजूंनी एकदा पाहून घेतलं. तिला त्या गोळ्यात विशेष काही जाणवलं नाही, पण थोड्या वेळापूर्वी तो फुल फॉर्ममध्ये होता, जसा एखादा फलंदाज फुल फॉर्ममध्ये शतक ठोकतो. तिला त्याचा मुका घ्यावासा वाटला, कारण गेल्या कित्येक दिवसाची चलबिचलता त्यानं एका क्षणात दूर केली होती. एकदम दारावर टकटक झाली म्हणून तिने दरवाज्याकडे पाहिलं. मग तिच्या लक्षात आलं की, जवळपास अर्धा पाऊणतास झाला तिने दरवाजा उघडलाच नव्हता. तिने चटकन तो गोळा पिशवीत टाकून ती पिशवी लोखंडी कपाटात ठेवली. तोपर्यंत दारावरची टकटक व तिच्या नावाचा हाकारा वाढलेला होता. तिने चटकन दरवाजा उघडला अन् पाहते तर दरवाज्यात आई.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

त्या संध्याकाळ नंतर तर जणू तिच्या अंगात वीजच संचारली होती. ती पूर्वीप्रमाणेच हसायला, खेळायला लागली. हीच का ती पूर्वीची हर्षा असं सर्वांना वाटायला लागलं. खासकरून दीपाला. या बाबतीत तिनं बऱ्याचदा तिला छेडून बघितलं, पण तिने तिला ढिम प्रतिसाद दिला नाही.

दिवस असेच चालले होते. हर्षा मात्र खूष होती स्वतःवर व तिला पडलेल्या प्रश्नावर. त्या प्रश्नावर उत्तर मात्र मिळू शकत नव्हतं, पण मनातली चलबिचलता खूपशी कमी झाली होती अन् त्या संध्याकाळच्या प्रसंगानंतर तिच्यात सकारात्मक बदल घडला होता. आत्मविश्वास वाढला होता. न्युनगंडात कमालीची कमतरता आली होती. तिला नव्या जोमानं आयुष्याला सामोरं जावं असं वाटत होतं. ती नव्या-नव्या गोष्टी शिकण्यात वेळ घालवू लागली. वर्गात नेहमी पाठीमागे राहणारी ती आता सर्वांच्यात मिळू मिसळू लागली. वर्गात घडणाऱ्या चर्चेत उत्साहानं भाग घेऊ लागली. स्वतःची मतं चुकीची असली तरी ठासून सांगू लागली. यातूनच तिच्या लक्षात आलं की, ती सुद्धा एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती आहे. जिला स्वतःची मतं आहेत. या मिळालेल्या देणगीचा आपण कुठेतरी उपयोग करायला पाहिजे म्हणून तिने वाद-विवाद, वक्तृत्व व भाषणांच्या स्पर्धा अन् ‘लिहिते व्हा’ हा त्यांच्या सरांचा संदेश अमलात आणण्यासाठी निबंध स्पर्धेत भाग घ्यायला सुरूवात केली. तसेच लातूरच्या काही महत्त्वाच्या पेपरमध्ये ‘कॉलेज-विश्व’ व ‘कॉलेज-कट्टा’ या सदरांना माफक शैलीतील लेखन पाठवायला सुरुवात केली. ते लेखन छापूनसुद्धा यायला लागले. तिच्या त्या लिखाणाचं भर वर्गात एका मॅडमनी कौतुक केल्यावर तर तिला स्वर्ग दोन बोटच उरलं होतं.

‘अनरउबिक’ - विवेक कुलकर्णी

गोल्डन पेज पब्लिकेशन, पुणे

मूल्य – २०० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......