‘आपुलाची संवाद आपणाशी’ करावयाचा असेल तर ‘कासव’ अनुभवायला हवा, कासवाप्रमाणे आपले हात-पाय आक्रसून न घेता...
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • ‘कासव’ची काही पोस्टर्स
  • Thu , 14 October 2021
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie कासव Kaasav सुमित्रा भावे Sumitra Bhave सुनील सुकथनकर Sunil Sukthankar इरावती हर्षे Iravati Harshe आलोक राजवाडे Alok Rajwade

समुद्राच्या लाटा, अचानक आलेली जाग, घड्याळाजवळ असलेली दोन कासवं, लोकलमधून दिसणारं भरधाव आयुष्य आणि एसटीमध्ये निद्रिस्त असलेला मानव (आलोक राजवाडे). गर्दीत हरवलेला, निर्हेतुकपणे भटकणारा, गर्दीचा एक भाग बनलेला, कुठे जायचे ते माहीत नसलेला, चार्जरबरोबर खेळता खेळता चार्जर गमावलेला, आयुष्यच चार्ज झालेले नसलेला… मानव मोबाईलवर कॉन्टॅक्टस बघतो आणि त्याला समजते की, यात आपल्या आयुष्याला चार्ज करणारे कोणीच नाही... 

दिग्दर्शक दाखवत असलेल्या प्रत्येक फ्रेमला काहीएक अर्थ असतो… अनेक फ्रेम्सचा कोलाज चित्रपटात पुढे काय वाढून ठेवलेलं आहे याची कल्पना देतो. ‘कासव’ या चित्रपटाची सुरुवात अशा अनेक फ्रेम्सच्या कोलाजमधून होते. त्या सर्व फ्रेम्सना अर्थ लावून बघणं, हे या चित्रपटाच्या दृश्यात्मकतेला न्याय देणारं ठरतं.  

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

कोणाला आयुष्यात ‘राम’ का वाटत नाही? कारण कोणीच आपलं नाही, ही भावना बळावते. आत्महत्येमधून कोणीही वाचवलं तरी आता पुढे काय करायचं, हे मानवला  माहीत नाही. त्यामुळे तो पुन्हा एका वाहनामध्ये बसतो. वाहन जिथं थांबतं, तिथंच तो बाकड्यावर पहुडतो आणि तिथंच त्याला गुंगी येते. त्याची अवस्था (इरावती कर्वे) बघून जानकी त्याला कारमधून आपल्या कोकणातल्या घरी घेऊन जाते.

कथा महत्त्वाची असतेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं- दिग्दर्शक आणि कॅमेरामन ती कशी दाखवतात. कोकणचा नयनरम्य परिसर, जानकीचा टुमदार बंगला… चालण्याची शुद्ध नसलेल्या मानवला यदु हा ड्रायव्हर (किशोर कदम) सांभाळून आणतो, पण त्याचीही चिडचिड होत असल्याची दिसते. बाईंनी हे नसते उद्योग करून याला कशाला घरी आणलंय? हे सगळं आपण चित्रपटाच्या फ्रेममधून धनंजय कुलकर्णी आणि अमोल साळुंखे यांच्या कॅमऱ्याच्या नजरेतून बघतो.

मुंबईच्या कोलाहलापासून दूर कोकणात आल्यानंतर आपल्याला निरव शांतता जाणवते. शांतता चांगली असते की, खायला उठते, हे त्या माणसाच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून असतं. समुद्रकिनारी मानव स्वतःमध्येच रममाण होतो आणि विचित्र आवाजात ओरडत असतो. कोणाला ते निरर्थक गाणं वाटेल, यदुसारख्या कोणाला हा माणूस यडाबिडा झाला की काय, असं वाटतं. यदु म्हणतो, ‘त्याला डोक्यावर चढवू नका. एक कानाखाली वाजवली की, सगळं सुरळीत होईल.’

मानसिक आजार असलेला किंवा स्वतःमध्ये मश्गुल असलेला कोणी दिसला की, अनेक जण असाच विचार करतात. यदु त्यांचंच प्रतिनिधित्व करतो. दिग्दर्शकद्वयी सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांनी असे प्रसंग दाखवताना आलोकची मनोवस्था दाखवली आहे. मनाचा कोलाहल चित्रभाषेत कसा दाखवायचा, हे दिग्दर्शकांसमोर आव्हान असणार यात शंका नाही. ते आव्हान त्यांनी कसं लीलया पेललं आहे, हे बघण्यासारखं आहे. त्यामुळे मानवचं काय झालं, यापेक्षा ते सुमित्रा भावे यांनी पटकथेत कसं मांडलं आहे आणि कॅमऱ्याच्या भाषेत आपल्याला कसं समजावून सांगितलं आहे, हे महत्त्वाचं. 

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

दत्ताभाऊ (मोहन आगाशे) कासवांचं आयुष्य कसं असतं, ते समजावून सांगतात. कासव पिल्लं घालायला किनाऱ्यावर येतात, त्या काळात त्याना फार जपावं लागतं. जमिनीवरची कासवं जगापासून स्वतःला अलग करून घेण्यासाठी पाय आक्रसून घेतात. काहीशी अशीच अवस्था मानवची झाली असते. आपल्यातच हरवलेला, गुरफटलेला, जगानं आपला तिरस्कार करावा, आपल्यावर कोणीच प्रेम करू नये, असाच आग्रह धरणारी माणसं... का वाटतं त्यांना असं? प्रेमाला पारखी झालेली माणसं जगाचा असा तिरस्कार करतात की, इतरांनी तिरस्कार करावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात? असे निर्हेतुकपणे भटकणारे अनेक अश्वत्थामा असतात. त्यांची काळजी घेणाऱ्या ‘मुक्तांगण’सारख्या संस्था आहेत, पण त्यांची काळजी घेणारी माणसं कुठे आहेत? अनेकांच्या निराशेनं ग्रासून टाकणारे प्रसंग येतात. ज्यांना जवळची माणसं असतात, ती झगडतात. ज्यांच्या जवळच्या माणसांना लक्ष द्यायला वेळ नाही, ती काय करतात? कासवाप्रमाणे पाय आक्रसून घेतात? स्वतःच्या कोशात जातात?

आलोक राजवाडेने मानव कमालीच्या कौशल्यानं साकारला आहे आणि नैसर्गिक अभिनयानं मानवच्या मनातला कोलाहल आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. पत्र वाचताना त्याचे डोळे बोलतात. ‘मनाने आजारी म्हणजे मेंटल’ एवढंच माहीत असणारा किशोर कदमचा यदु अगदी कोकणातला हरकाम्या वाटतो. त्यांनी कोकणी माणसाची बोली भाषा अंगिकारली आहे आणि देहबोलीसुद्धा. इरावती हर्षे सर्वच चित्रपटांत एकाच टोनमध्ये बोलताना दिसतात. मोहन आगाशे यांनी कासव आणि आपण यांच्यातली साम्यस्थळं उत्तमरीत्या दाखवली आहेत. त्याची सांगड घालताना ते मानवकडे ज्या पद्धतीनं बघतात ते कमाल आहे. ओमकार घाडेने परशुचं काम अतिशय सुंदररीत्या केलं आहे. साकेत कानेटकर यांचं संगीत ठीक आहे.

मोहन आगाशे प्रस्तुत ‘कासव’ हा चित्रपट २०१७ साली मल्टिप्लेक्सवाल्यांनी थिएटरवरून एका आठवड्यात काढला. पैसा सगळ्यांनाच कमवायचा आहे, पण कलेची थोडीफार काळजी असती तर त्यांनी अशा चित्रपटासाठी एखादा दिवस किंवा एखादा प्राईम टाईम राखीव ठेवला असता. पण ते घडत नाही. मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघत नाहीत. त्यामुळे मल्टिप्लेक्सला मराठी चित्रपट दर्जेदार असूनही दुपारच्या आडमुठ्या वेळी दाखवले जातात, कारण प्राईम टाईम गर्दी खेचणाऱ्या गल्लाभरू चित्रपटांसाठी राखून ठेवायचा असतो. त्यामुळे आपण असे चित्रपट निदान ओटीटीवर बघायला हवेत. त्यामुळे होईल काय? निदान ओटीटीवर तरी मराठीतल्या दर्जेदार चित्रपटांना चांगले दिवस येतील.

याबाबतीत केरळचा प्रेक्षक सुजाण आहे. तो मल्याळम चित्रपट थिएटरला जाऊन बघतो. त्यामुळे तिथं दर्जेदार चित्रपटांना लोकाश्रय लाभला आहे आणि परिणामस्वरूप दर्जेदार चित्रपट निर्माण होत आहेत. सोनी लिव्हवर नुकताच रिलीज झालेला कासव हा चित्रपट तमिळ, तेलगु, मल्याळम, हिंदी, बंगाली, कन्नड भाषेत डब केलेला आहे. त्यामुळे मराठी सिनेमा महाराष्ट्राबाहेर बघितला जाईल, अशी आशा करूया.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आपल्याला माणसात रहायचं असतं, शिवाय स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वही जपायचं असतं. त्यामुळे कोलाहलामध्ये इतरांशी बोलण्यात आपण गुरफटून जातो. समुद्रावर कधी निर्हेतुकपणे भटकला आहात का? किंवा नुसतंच बसून राहिला आहात का? समुद्रावरून येणाऱ्या लाटा बघता बघता आपण आपल्याच मनात डोकावतो आणि आपल्याशीच बोलतो. हा संवाद हा रोजच्या घाई गडबडीमध्ये कुठे हरवला आहे का?

तुम्हाला तर ‘आपुलाची संवाद आपणाशी’ करावयाचा असेल तर ‘कासव’ अनुभवायला हवा, कासवाप्रमाणे आपले हात पाय आक्रसून न घेता...

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा

जगण्याचं बळ देणाऱ्या 'कासवा'ची गोष्ट

कासव : सुमित्रा भावे यांचा हा सिनेमा एक अप्रतिम मास्टरपीस आहे! एकदा पहाच!!

‘कासव’ला मिळालेलं सुवर्णकमळ म्हणजे अत्यंत योग्य मार्गानं जाण्याचं द्योतक

‘कासव’ : एका ‘गे’ तरुणाच्या नजरेतून

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......