२०२१चे टोकियो ऑलिम्पिक झाले; महाराष्ट्रासाठी पुढे काय?
पडघम - राज्यकारण
प्रभाकर देवधर
  • महाराष्ट्राचा नकाशा आणि टोकियो ऑलिम्पिक २०२१चे बोधचिन्ह
  • Tue , 10 August 2021
  • पडघम राज्यकारण खाशाबा जाधव Khashaba Jadhav ऑलिम्पिक Olympic लियंडर पेस Leander Paes

भारताने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांसाठी १२७ खेळाडूंना निवडून पाठवले. आजवरच्या ऑलिम्पिक्सपेक्षा ही संख्या मोठी आहे, पण हे गरजेचे होते. पोहायचे असेल तर पाण्यात उतरले पाहिजे. मुख्य म्हणजे निवडलेले खेळाडू आपापल्या क्षेत्रांत आपले नैपुण्य सिद्ध केलेले होते. त्यात गैरकारभार नव्हता. सध्याच्या केंद्र सरकारकडून हे अपेक्षितच होते, पण खेळाडूंची कामगिरी आणि त्यांचे यश-अपयश त्यांना एक धडा देऊन गेले. जिंकले नाहीत, त्यांना आपले ध्येय उमजले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरायचे असेल तर त्या खेळातील ऑलिम्पिक विक्रमावर नजर ठेवून स्वतःची तयारी करण्याची जिद्द असणे आवश्यक.

टोकियोत एक सुवर्णपदक, दोन रौप्यपदक आणि चार ताम्रपदक अशी सात पदके आपल्या खेळाडूंनी मिळवून दिली. आजवरच्या ऑलिम्पिक स्पर्धांपेक्षा ही सख्या मोठी आहे. मीराबाई चानुने रौप्यपदक कमावून सुरुवात केली आणि नीरज चोप्राने भालाफेकीत पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकले! रविकुमार दाहियाचे कुस्तीतील रौप्यपदक, पीव्ही सिंधूने बॅडमिंटन स्पर्धेत ताम्रपदक, लवलीना बोरगोहैनने वेटलिफ्टिंग स्पर्धेत ताम्रपदक, पुरुषाच्या हॉकी टीमचे ताम्रपदक आणि बजरंग पुनियाचे कुस्तीतील ताम्रपदक अशी कमाई केली.   

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

विविध देशांत ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्यांना खूप मोठ्या रकमेची बक्षिसे आधीपासून जाहीर केली जातात. अमेरिका, जपान, कॅनडा, ब्राझील, साउथ आफ्रिका, सिंगापूर, कझाकस्तान, मलेशिया, इटली इत्यादी देश पदक मिळवण्यासाठी देशातील विविध खेळाडूंना असे भलेमोठे आर्थिक आमिष जाहीर करतात. 

त्याशिवाय काही देश खेळाडूंना शरीर स्वास्थ्यासाठी विमा, हॉस्पिटलात मोफत उपचार, विद्यार्थी खेळाडूंची फी इत्यादी सुविधा आधीपासून जाहीर करतात. सुवर्णपदक मिळवणाऱ्यांना सिंगापूर ७५०,००० युएस डॉलरचे बक्षीस देते. मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे अनेक होतकरू खेळाडू जोमात तयारी करतात. त्याशिवाय अनेक देश निवडक खेळाडूंना त्यांचा खेळ ऑलिम्पिक तोडीचा करण्यासाठी मासिक रक्कम देतात.

खाशाबा जाधवांनी १९५२ साली ऑलिम्पिक पदक जिंकले होते. मात्र लिएडंर पेसनंतर आपल्या महाराराष्ट्राची झोळी रिकामी आहे. खेळाडूंच्या निवडीसाठी आंतरशालेय खेळ स्पर्धा महाराष्ट्र सरकारने सुरू करणे अगत्याचे आहे. त्यातून कुशल खेळाडू निवडणे सोपे होईल. मुलामुलींच्या पालकांना त्यांच्या खेळाडू अपत्याच्या भविष्याविषयी चिंता असते. त्यावरील सोपा उपाय म्हणजे महाराष्ट्रातील मोठ्या उद्योगांनी अशा आंतरशालेय खेळाडूंना जर मदत केली आणि त्यांच्या नोकरीची काळजी मिटवली तर असे खेळाडू आपले कौशल्य विकसित करण्याची पराकाष्ठा करतील.

आजच आलेल्या बातमीनुसार केरळ सरकारने पुढील ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आपली योजना जाहीर केली आहे. त्रिचूर शहरामध्ये त्यांच्या क्रीडामंत्र्यांनी ही योजना जाहीर केली. त्यांनी खेळाडूंसाठी सर्व सुविधा राज्यात निर्माण करण्याची घोषणा केली. अॅथलेटिक, उंचउडी, स्त्रियांची कुस्ती, नेमबाजी, जलतरण, बॅडमिंटन, सायकलिंग या खेळांवर त्यांचा भर असणार आहे. केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’च्या धर्तीवर ही योजना आहे. खेळाच्या सरावासाठी एक परिपूर्ण स्टेडियम आणि सोबत खेळाडूंसाठी वसतीग्रह बांधण्याचे त्यांनी ठरवले आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

यु-ट्यूबवर खेळाडूंना उपयुक्त सूचना उपलब्ध आहेत. प्रवीण खेळाडू त्याद्वारे सल्ला देतात. इंटरनेटवर विशिष्ट खेळातील मंडळी एकत्र चर्चा करू शकतात, प्रात्यक्षिक देऊ शकतात. राज्यांना मोठ्या शहरात ‘मिनी ऑलिम्पिक स्पर्धा’ घडवून चांगले खेळाडू निवडता येतील. विविध स्थरावर स्पर्धा हव्यात. राज्य सरकारे आपल्या तरुणांसाठी प्रवीण खेळाडूंना नोकरी देऊ शकतात.

२०२१च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील केवळ एकच खेळाडू होता. अविनाश साबळेने ३००० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला, पण पदकासाठी तो पुरेसा नव्हता, याची खंत वाटली.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

पद्माकर वळवी महाराष्ट्राचे क्रीडामंत्री आहेत. त्यांनी ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्रीय तरुण-तरुणींची संख्या कशी वाढवता येईल, यावर तातडीने विचार करणे गरजेचे आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याभोवती अनेक मराठी तरुण जमलेले आहेत. ठाकरे बंधूंनी असे तरुण हेरून त्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा निर्माण केली, तर हे साधता येईल. त्यांच्या उठसूट दंड थोपटणाऱ्या अनुयायात दंगेखोरपणा भरपूर आहे. त्याला वेगळे वळण दिले, तर काही विक्रमी तरुण महाराष्ट्रात निर्माण होतील आणि खाशाबा जाधवांसारखे यश ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवू शकतील.

आपण सध्या फक्त ‘राजकारण’ खेळतो, त्याऐवजी मैदानी खेळात प्रावीण्य मिळवण्याची जिद्द राखली, तर ऑलिम्पिक स्पर्धेत मोठ्या संख्येने मराठी तरुण दिसतील.

ध्येय असावे - २०२४ सालच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र!

..................................................................................................................................................................

लेखक प्रभाकर देवधर अ‍ॅपलॅब कंपनीचे संस्थापक आणि भारताच्या इलेक्ट्रॉनिक धोरणाचे प्रणेते आहेत.

psdeodhar@aplab.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा