हीरक महोत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्रात पुस्तकांची अत्यावश्यकता दुर्लक्षित राहावी, हे दुर्दैव आहे...
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
विलास पाटील
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 12 May 2021
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो पुस्तके Books अत्यावश्यक वस्तू Essentials जीवनावश्यक वस्तू Essentials

मराठी प्रकाशन परिषदेच्या वतीने अ‍ॅड. असीम सरोदे यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. पुस्तकांना ‘अत्यावश्यक वस्तू’ म्हणून दर्जा मिळावा आणि पुस्तक विक्री ही औषध व अन्नधान्य विक्री याप्रमाणे अत्यावश्यक सेवा समजली जावी, अशी मागणी या यचिकेत केली आहे. ही मागणी काहींना हास्यास्पद वाटू शकते, काहींना ती अजब वाटू शकते, तर काहींना हा निव्वळ वेडेपणा किंवा मूर्खपणा वाटू शकतो. परंतु थोडा खोलात जाऊन विचार केला, तर आपल्याला मानवी आयुष्यात ग्रंथांचं स्थान किती मोलाचं आहे, हे लक्षात येईल. त्यासाठी आपण या याचिकेचाच आधार घेऊ शकतो.

प्रतिष्ठेसह जीवन जगण्याच्या हक्काचा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करता, त्यात पुस्तकांचा वाटा खूप महत्वाचा आहे. पुस्तकांमुळे माणसाला भावनिक, मानसिक व सकारात्मक आधार मिळतो. सध्याच्या नकारात्मक स्थितीत पुस्तके नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. तेव्हा पुस्तकांना मानवी जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून मान्यता द्यावी आणि पुस्तक विक्रीचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा, अशी मागणी या याचिकेत केली आहे.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा

नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -

https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१

..................................................................................................................................................................

या पार्श्वभूमीवर माणसाच्या आयुष्यात पुस्तकं आलीच नसती तर काय झालं असतं? या प्रश्नाचा विचार आपण करूया... खरोखरच असं घडलं असतं तर आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगातला स्मार्ट माणूसदेखील या क्षणाला कित्येक शतकं मागास राहिला असता. आजही जंगलाच्या बाहेर पडू न शकलेल्या काही आदिवासी समूहांची स्थिती पाहिली तर याचा प्रत्यय आपल्याला येऊ शकेल. हे केवळ भारतासारख्या देशातच पाहायला मिळेल असं नाही. पुढारलेल्या अनेक देशांमध्येही असे समूह पाहायला मिळू शकतात. मात्र अशा समूहातील ज्या ज्या लोकांच्या हाती पुस्तकं पडली, ती वाचायला येण्याइतपत त्यांना शिक्षण मिळालं, असे लोक आता प्रगतीच्या वाटेवर पाहायला मिळतात.

डॉ. राजेंद्र भारूड हे त्यापैकीच एक आहेत. एखाद्या दुर्गम खेड्याला मिळणाऱ्याया सेवासुविधांपासूनही कोसो मैल दूर असणाऱ्या आदिवासी भिल्ल समाजातला पहिला उच्च शिक्षित युवक, पहिला डॉक्टर आणि पहिलाच आयएसआय अधिकारी होण्याचा मान डॉ. भारूड यांनी मिळवला आहे. आणि हे शक्य झालं आहे शिक्षणाच्या संधीमुळे आणि पर्यायानं हाती पडलेल्या पुस्तकांमुळे.

हवेपासून ऑक्सीजनची निमिर्ती करणाऱ्या ‘नंदुरबार पॅटर्न’ची आजच्या करोना काळात विशेष चर्चा आहे. त्याचं सारं श्रेय नंदुरबारचे कलेक्टर म्हणून डॉ. राजेंद्र भारूड यांना जातं. शिक्षणाची दारं उघडली नसती, पुस्तकांचा स्पर्श झाला नसता, तर आज त्यांना जगण्यासाठी मोहाच्या फुलांच्या दारूचा आधार घ्यावा लागला असता…

जोवर धर्माने बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, महिलांना घराच्या उंबऱ्याआड कैद करून ठेवलं, तोवर बहुसंख्य समाज अत्यंत मागास जीवन जगत होता. त्याच्यासाठी शिक्षणाची दारं जशी खुली होत गेली, तसा तो प्रगती करू लागला. विशेष म्हणजे सन्मानजनक जगू लागला. अब्राहम लिंकन यांच्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक मोठी उदाहरणं सांगता येतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

म्हणूनच एका टप्प्यानंतर ‘सर्वांसाठी शिक्षण’ ही घोषणा राष्ट्रीय धोरण म्हणून पुढे आणली जाते. देशाच्या जडणघडणीत नागरिकांचं शिक्षण याला विशेष महत्त्व आहे. कारण शिक्षण माणसाला घडवतं. त्याच्या विचारांची कक्षा रुंदावतं, त्याला आत्मसन्मान मिळवून देतं, त्याचं जीवन समृद्ध करतं. या साऱ्यातून देश घडत असतो. म्हणून शिक्षित समाज हा त्या त्या देशाचा सन्मान असतो, अभिमान असतो आणि स्वाभिमानही असतो.

पुस्तकं ही सर्व प्रकारच्या शिक्षणाचं, ज्ञानार्जनाचं माध्यम आहेत. त्यामुळे माणूस केवळ वाचायला शिकला आणि पुस्तकांच्या संगतीत राहू लागला तरी तो सन्मानाने जगू शकतो, राहू शकतो, समाजात वावरू शकतो. कारण पुस्तकं माणसाला वाचनाच्या आनंदाबरोबरच आणखी बरंच काही देऊन जातात. ती माणसाचं आयुष्य समृद्ध बनवतात, त्याला वेळी-अवेळी आधार देतात, निराशेपासून दूर ठेवतात, एकटेपणा घालवतात, मानसिक संतुलन राखण्याचं काम करतात, निरोगी आयुष्यासाठी मदतगार ठरतात.

इतकंच नाही, तर सजगपणे जगायला मदत करतात, काळाच्या पुढे घेऊन जात सकारात्मक दृष्टी बहाल करतात, दूरदृष्टीचा विचार रुजवतात, नवनिमिर्तीला प्रोत्साहन देतात, नवनव्या संकल्पनांना जन्माला घालतात. पुस्तकं खरोखरच प्रतिष्ठेसह जगण्याचा हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करतात. म्हणूनच स्वतंत्र भारताची पुनर्बांधणी करताना पंतप्रधान पंडित नेहरू यांनी ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ ही प्रकाशन संस्था आणि ‘साहित्य अकादमी’ ही विविध भाषांमधील साहित्याला ऊर्जा पुरवणारी संस्था स्थापन केली.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य संस्कृति मंडळ, विश्वकोश निमिर्ती प्रकल्प अशा संस्थांच्या निर्मितीला प्राधान्य दिलं. असं असूनही हीरक महोत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्रात पुस्तकांची अत्यावश्यकता दुर्लक्षित राहावी, हे दुर्दैव आहे.

सर्वांसाठी शिक्षण जितकं आवश्यक आहे, तितकीच माणसाच्या जीवनात पुस्तकं आवश्यक आहेत. तेव्हा या याचिकेच्या निमित्ताने आता गरज आहे, ती पुस्तकप्रेमींनी आपल्या कृतीतून ग्रंथांची जीवनावश्यकता दाखवून देण्याची आणि अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत पुस्तकांचा समावेश व्हावा, यासाठी आग्रही राहण्याची. कारण जगभरातून हा विचार आता उचलून धरला जात आहे, मग आपण त्यात मागे का राहायचं?

‘मनोविकास वर्डस’च्या मे २०२१मधून साभार

..................................................................................................................................................................

लेखक विलास पाटील मनोविकास प्रकाशनाचे ग्रंथसंपादक आहेत.

manovikaspublication@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......