‘The Right Choice’ : मॅनेजमेंट ट्रेनीपासून मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत सर्वांच्या दहा दुविधांवरील औषध
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
जीवन तळेगावकर
  • ‘The Right Choice’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Mon , 15 March 2021
  • ग्रंथनामा दखलपात्र द राइट टॉइस The Right Choice शिव शिवकुमार Shiv Shivakumar

‘The Right Choice’ हे शिव शिवकुमार यांचे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर उभ्या ठाकणाऱ्या दहा समस्यांवरील (dilemma) इंग्रजी पुस्तक नुकतेच बाजारात आले आहे. त्यांनी नोकरी करणाऱ्या मॅनेजमेंट ट्रेनीपासून मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत सर्वांच्या दहा दुविधांवरील औषध या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध करून दिले आहे.

शिवकुमार हे कायम बिझनेस मॅगझिन्समधून झळकणारे भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातील एक प्रमुख नाव आहे. त्यांनी ‘फिलिप्स’, ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’, ‘नोकिया’, ‘पेप्सी’, ‘बिर्ला’ अशा कंपन्यांमध्ये मोठमोठ्या हुद्द्यांवर काम केलं आहे. भारतीय आणि जागतिक बाजारातील कंपन्यांचं व्यापारविश्व सांभाळलं आहे. आयआयएमसारख्या संस्थांमधून व्याख्यानं दिली आहेत, काही कंपन्यांचे ‘बोर्ड मेंबर’ म्हणून काम केलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः एक आयआयटी आणि आयआयएम ‘ग्रॅड’ आहेत. त्यामुळे त्यांचं अनुभवातून आलेलं विश्लेषण नेमकं मार्गदर्शन करतं.

त्यांनी आपल्या कथनात प्रांजळपणा ठेवला आहे, तो मनाचा ठाव घेतो. या पुस्तकाची भाषा बोली स्वरूपाची आहे, त्यामुळे ती आकलनास सोपी जाते. सोपं लिहिणं अवघड असतं, कारण त्यासाठी आपण काय म्हणतो आहोत, ते इतरांना कळलं पाहिजे, हा ध्यास घ्यावा लागतो. म्हणजे आपल्याच मनांतील विचारांची गुंतवळ आधी सोडवावी लागते, स्वतःला अधिक प्रश्न विचारावे लागतात आणि प्रामाणिकपणे त्यांची उत्तरं शोधावी लागतात. हे केल्यामुळे ते आपले मुद्दे व्यवस्थित मांडण्यात आणि पोचवण्यात यशस्वी झाले आहेत.

- यशस्वी होण्याचे काही विशिष्ट असे नियम नाहीत, ते प्रसंग आणि कालपरत्वे वेगळे असू शकतात.

- एकच शिक्षण घेतलेल्या आणि एकाच संस्थेत काम करणाऱ्या किंबहुना ज्यांचे अधिक गुण जुळतात अशा दोन व्यक्तींची ‘करिअर्स’ खासगी क्षेत्रात कधीच एका मार्गानं जात नाहीत.

- चांगल्या ‘करिअर’साठी उचित वेळ साधावी लागते.

- यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या कामाच्या बाहेर पडूनही आपलं व्यक्तिमत्त्व घडवता आलं पाहिजे, आणि स्वतःची वेगळी नाममुद्रा उमटवता आली पाहिजे.    

- कामाच्या ठिकाणी येणारं दडपण आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे आणि त्याचा सामना करता आला पाहिजे. 

अशा काही पंचतत्त्वांपासून या पुस्तकाची सुरुवात होते.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

ज्या दहा समस्यांवर पुस्तक प्रकाश टाकतं, त्यातील या पुस्तकात आलेले काही निवडक विचार खाली देत आहे.

खरंच करियरमध्ये पैसा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे का?

If you are good, money will follow you. However, if you have money, it doesn’t mean you are good. Try and be very good… My advice to young managers, that is, to anyone below the age of thirty, is to maximize their learning and work at a place where they can multiply their capabilities rather than choosing money as the variable to maximize.   

यशस्वी होण्यासाठी दुसऱ्यांदा एमबीए करणे खरेच आवश्यक आहे का?

All businesses want top-performing managers, not managers with top degrees… I think we will see a higher emphasis on skills as opposed to degrees in the next decade… In summary, I am not a great believer in the theory that you must do a second MBA.

‘करिअर’च्या मागे लागून नवरा-बायको वेगवेगळ्या शहरांत आणि देशातदेखील राहतात, त्याचा फायदा होतो का?

They are called LAT couples, which stands for ‘Living Apart Together’ couples… Living apart is tough at any stage of your career… A support system is crucial to the living apart decision.

आपलीच जुनी कंपनी फिरून जॉईन करणे, बरे का वाईट?

An article in HBR brings home the point: ‘The facts are, it costs half as much to re-hire an ex-employee as it does to hire a brand new person; re-hires are 40 percent more productive in their first quarter at work; and they tend to stay in the job longer. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

कामापासून एकाद्या वर्षाची विश्रांती (sabbatical) घ्यावी का?

A sabbatical is when you take a break either to re-energize yourself, or to go and study, or to travel and see the world… Compellingly, sabbaticals are a way to beat attrition.

‘करिअर’ घडवण्यासाठी आपली ‘इंडस्ट्री’च बदलावी का?

What should people looking to move industries learn? – Humility, it is either there or not there… The more important point is, very often, when thinking about cross-industry change, people only think about where they want to go. They don’t look at themselves from others’ perspective and ask if they are relevant for or good at what they want to do... You have to mix intuition with data… There is no substitute to preparation when you consider moving to a new industry… Large companies can offer you challenging roles within the same company… Think deeply before moving out.

भारताबाहेरचा जॉब घ्यावा का?

Indians are the world’s talent bank… New Zealand, Canada and Australia- are high on work-life balance… Career development is the top consideration in three of the biggest emerging economies: China, India and Brazil… Going abroad- is this a one-way ticket or is there a return ticket- this should be your next consideration… If you go abroad, please do keep in touch with headhunters and a few senior leaders.  

नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा का? 

For new founders, coming from professional backgrounds, accelerators, incubators and mentorship programs can mean the difference between success and failure… Copycat ideas have no choice of success… Avoid this tendency of thinking that good friends make good partners at work… Gujarat had been a hot bed of entrepreneurship… Get a good sounding board if you are starting on your own.

एखाद्या कंपनीचे ‘बोर्ड मेंबर’ व्हावे का?   

The role of the lead director is pivotal; he/she leads the oversight process... The challenge of every board member is to be constructive and not chase the leadership team into rabbit holes in search of irrelevant detail… As per SEBI guidelines, an independent director can sit on the board of not more than seven listed companies at a time… Being on diverse boards can truly help expand your own horizon, but only if you are ready for ‘jury duty’… ‘I want to point out that the biggest dilemma is when to quit, not when to join’.

सीईओच्या नेमक्या समस्या काय असतात? 

Without time for reflection, a CEO will become an efficiency engine and not a value creating leader… I always valued people who told me the blunt truth and then I could get on and deal with it… In my experience, the best CEOs first do what’s right for the company, then for the team and lastly for themselves.

हे पुस्तक वरील दहापैकी प्रत्येक समस्येचं स्वरूप उलगडून दाखवतं. ती कशी हाताळायची याचं मार्गदर्शन करते, कोणी ती आपल्या पद्धतीने कशी हाताळली हेही सांगतं. यात काही व्यावसायिकांचं अनुभवकथनही येतं. त्यातून त्यांनी हा प्रश्न कसा हाताळला, याची नेमकेपणानं माहिती मिळते, अगदी दोन व्यक्ती दोन स्वतंत्र पद्धतीनं एकच प्रश्न हाताळताना दिसतात. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या ‘मिडल मॅनेजमेंट’साठी हे पुस्तक अधिक उपयुक्त आहे.

‘मानव संसाधन’ मध्यभागी ठेवून या पुस्तकाची मांडणी केली आहे, असं वाटतं. त्यामुळे ते थोडंसं ‘एच. आर. सेंट्रिक’ असल्याचं जाणवतं. आजकाल नोकरदारांना ‘जॉब लॉस’चाही सामना करावा लागतो आहे. मात्र या विषयावर या पुस्तकात मार्गदर्शन केलेलं नाही, कदाचित तो स्वतंत्र पुस्तकाचा विषय होऊ शकेल एवढा मोठा आहे.       

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................    

एका बैठकीत हे २७७ पानांचं पुस्तक वाचून संपवता येतं, पण एकेक समस्या समजावून घेऊन त्याची उत्तरं आपल्या मनातल्या प्रश्नांशी ताडून पाहत, अधिकाऱ्यांनी मांडलेला त्यांचा स्वानुभव वाचत पुढे सरकणं जास्त महत्त्वाचं. काही दिवसांनी पुन्हा आपला नेमका प्रश्न कोणता आणि त्यासंबंधी काय करता येईल, याचं नियोजन करून, स्वतःच्या करिअरचं ‘SWOT’ (Strengths, Weaknesses, Opportunities and Threats) विश्लेषण करून निर्णय घेणं सर्वथा हितावह. या पुस्तकाकडे दीपस्तंभासारखं पाहावं, ते वाचून अर्ध्या किमतीत विकून टाकू नये.                                        

इंद्रा न्यूई या पेप्सीच्या अधिकारीणीने शिवकुमारसोबत केलेल्या चर्चेतून या पुस्तकाची जडणघडण झाली आहे. हे पुस्तक कॉर्पोरेट क्षेत्रातील आतापर्यंत न चर्चिल्या गेलेल्या पैलूंवर प्रकाश टाकणारं आहे. विशेष म्हणजे भारतीयांच्या दृष्टिकोनातून लिहिलं गेलं आहे. शिवकुमार यांनी या पुस्तकात प्रत्येक विधान हाती ‘डेटा’ (विदा) ठेवूनच केलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्षाला प्रमाण शोधावं लागत नाही.

या पुस्तकात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत अधिकारिणींच्या अनुभवांचाही आलेख मांडला आहे. त्या दृष्टीतून हे पुस्तक निर्विवाद सर्वसमावेशक आणि व्यापक झालं आहे. या पुस्तकाच्या शेवटच्या तीन प्रकरणांमध्ये स्वतःचा व्यवसाय करावा का?, एखाद्या कंपनीचा बोर्ड मेंबर व्हावं का, कसं?, सीईओंच्या समस्या- म्हणजे सहजासहजी न उपलब्ध होणारा दस्तावेज आहे.

थोडक्यात, एक संतुलित आणि प्रागतिक दृष्टीकोन देणारं हे पुस्तक आहे. त्याचबरोबर कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीदेखील उपयुक्त आहे.

'The Right Choice' -  Shiv Shivakumar

प्रकाशक - पोर्टफोलिओ पेंग्विन

पाने - २७७, मूल्य - ३९९ रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......