नृत्य ही केवळ संगीताच्या तालावर केली जाणारी तालबद्ध शारीरिक हालचाल नसून त्यात नऊ रस आहेत!
कला-संस्कृती - सतार ते रॉक
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 04 February 2021
  • कला-संस्कृती सतार ते रॉक नृत्य Dance संगीत Music सिनेमा Cinema

“And those who were seen dancing were thought to be insane by those who could not hear the music.”
― Friedrich Nietzsche

‘ब्लॅक स्वान’ (Black Swan) या इंग्रजी चित्रपटात नायिका बॅलेट नावाच्या नृत्य प्रकारात सर्वोच्च उंची गाठण्याच्या नादात स्वत:चे मानसिक संतुलन घालवते आणि शारीरिक इजा करून घेते. चित्रपट संपेपर्यंत तिचं नृत्यप्रेम वेडाचं स्वरूप घेतं. अप्रतिम अभिनय व नृत्याविष्कार असणार्‍या या चित्रपटाने नृत्य व मानवी भावना यांचा अनोखा संगम दाखवला आहे.

बोली भाषा विकसित होण्यापूर्वी देह-बोली विकसित झाली. त्यात डोळ्यातील हावभाव, शारीरिक हालचाली व अ-शाब्दिक संकेत येतात. हीच आपली मूळ मानवी भाषा आहे. त्यामुळे भाषा समजत नसली तरी संवाद साधणं मानवाला शक्य होतं. जगातील सगळ्या संस्कृतीमध्ये नृत्य हा संवादाचा प्रकार आहे. वेगवेगळ्या लोककथा, पौराणिक कथा, ऐतिहासिक घटना या पुढच्या पिढीला सांगण्यासाठी नृत्याचा उपयोग केला जातो. आपल्याकडे कथक, भरतनाट्यम, ओडिसी व अनेक लोकनृत्यं- जसे महाराष्ट्रात तमाशा, आसाममध्ये बिहू, गुजरातमध्ये गरबा व राजस्थानमध्ये घुमर हे काही लोकप्रिय नृत्य प्रकार आहेत.

आपली नृत्याची परंपरा फारच जुनी आहे. भरतमुनिचं ‘नाट्यशास्त्र’, वात्सायनाचं ‘कामसूत्र’ या ग्रंथांत नृत्य ही ६४ कलांमधील एक महत्त्वाची कला मानली गेली आहे. नृत्य ही केवळ संगीताच्या तालावर केली जाणारी तालबद्ध शारीरिक हालचाल नसून त्यात नऊ रस किंवा भाव (ज्यात भरताने आठ रस व त्यांचे आठ स्थायीभाव सांगीतले) आहेत. नंतर अभ्यासकानी शांत हा नववा रस व त्याचा शांती हा स्थायीभाव सांगितला आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

माणसाच्या ठिकाणी स्थिर व शाश्वत अशा भावना असतात. या स्थिर व शाश्वत भावनांना स्थायीभाव म्हणतात. म्हणजे रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, कंटाळा, विस्मय, शांती. हे सर्व स्थायीभाव कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. हे स्थायीभाव चाळवले जाऊन नऊ प्रकारचे रस निर्माण होतात - शृंगार, वीर, करुण, हास्य, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत.

म्हणजे नृत्य हे शारीरिक व मानसिक अशा दोन्ही पातळीवर परिणामकारकरित्या काम करतं. ‘भावनिक बुद्ध्यांका’ (emotional intelligence)मध्ये चार ते सहा मानवी मूलभूत भावना, ज्यांचे चेहर्‍यावरील हावभाव सारखेच असतात. म्हणजे चेहर्‍यावरील हसू किंवा डोळ्यातील राग हे सगळ्या जगात एकाच पद्धतीने व्यक्त होतात. आफ्रिकन माणसाचं दु:ख वेगळं व भारतीय माणसाचं दु:ख वेगळं असं होत नाही. म्हणूनच तर बॉलीवुडमधील नृत्य व गाणी सगळ्या जगात लोकप्रिय आहेत.

अनेक शास्त्रोक्त नृत्याचं माहेरघर समजल्या जाणार्‍या भारतात शास्त्रीय नृत्य हा प्रकार प्रामुख्याने देव व भक्ती यांच्याशी जोडला जातो. जे चुकीचं आहे. कारण गेली काही शतकं आपली संस्कृती अनेक वेगवेगळ्या लोकांच्या हातात होती. त्यामुळे खजुराहोची शिल्पं असणार्‍या आपल्या देशात नृत्य व कामुकता हे घाणेरडे प्रकार समजले जातात. विशेष करून देवदासी व गणिका ही कोणतेही सांसारिक बंधन नसलेली जमात (लैंगिक स्वतंत्रता) विक्टोरियन संस्कृतीला पटत नव्हती. त्यामुळे नृत्यातील ‘काम-रसा’ची जागा ‘भक्ती-रसा’ने घेतली आणि शास्त्रीय नृत्य प्रकार हा विशेष करून ब्राह्मण समाजाची मक्तेदारी झाली. हे गेल्या दोन शतकांत घडले. हे पहा -

गेल्या काही वर्षांतील संशोधनावरून असं आढळून आलं आहे की, संगीत मेंदूतील भावना, स्मरण व सामाजिक देवाण-घेवाण या गोष्टींची केंद्रं सक्रिय करतं, मात्र संगीताच्या तालावर नृत्य करतानासुद्धा ही केंद्रं सक्रिय होतात. तसेच व्यक्ती तल्लीन होते, तेव्हा स्वत:च्या शरीराबद्दलचं ज्ञान वाढतं व मेंदू शांत होतो. दुसर्‍या व्यक्तीसोबत नृत्य करताना ‘ताल से ताल मिला’सारखी सम साधता येणं म्हणजे समोरच्याची देहबोली समजून त्यानुसार हालचाल करणं... त्यामुळे नृत्य करणार्‍या दोन व्यक्ती एक वाटू शकतात.

एका संशोधनानुसार नृत्याचा एक भाग ध्वनीची नक्कल करण्याच्या मानवी क्षमतेचा उप-उत्पादक म्हणून उदयास आला. ध्वनि नसेल तर आपण ताल धरून ठेवू शकत नाही. या प्रक्रियेत Basal Ganglia हा हालचालींचं नियंत्रण करणारा मेंदूतील भाग महत्त्वाचा ठरतो, जो auditory cortex सोबत संगीत ऐकताना उत्तेजित होतो. चालण्यापेक्षा कुठलीही वेगळी शारीरिक हालचाल मेंदूला शिकावी लागते, त्याने मेंदूला चालना मिळते. त्यामुळेच मेंदूची लवचिकता वाढवण्यास नृत्य खूप फायदेशीर ठरतं असं हे संशोधन सांगतं. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

नृत्यामुळे बुजरेपणा कमी होऊन स्वत:ला सादर करण्याची करण्याची कला जमते. त्यातून लोकांसमोर जाऊन बोलण्याचा आत्मविश्वास वाढतो. पार्किंसनसारख्या आजारात नृत्य ‘movement therapy’ म्हणून वापरलं जातं, तसेच अनेक वेळा ज्या कठीण भावना लिहून व्यक्त करता येत नाहीत, त्यांचा निचरा होण्यासाठी ‘Art therapy’ म्हणूनही नृत्य वापरलं जातं.

‘सिल्वर लायनिंग प्लेयबुक’ या इंग्रजी चित्रपटात दोन्ही मुख्य पात्रं मानसिक आजाराशी झुंज देत असतात, ते एकमेकांना मदत करत, भावनिकरित्या समजून घेत (ज्यात त्यांची नृत्याची तयारीही दाखवली आहे). शेवटी एका जोडप्यासाठी असलेल्या नृत्य स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस जिंकतात आणि एकमेकांची मनंही. George Bernard Shaw यांचं एक विधान प्रसिद्ध आहे -  ‘Dancing : the vertical expression of a horizontal desire legalized by music.’ म्हणजे नृत्याविष्कार हा लैंगिक सुखाचा वेगळा पण सर्व मान्य आविष्कार आहे. त्यामुळे जोडप्यांना नृत्य शिकवल्यास स्वत:च्या शरीराची व जोडीदाराच्या शरीराशी ओळख होते आणि भावनिक बंध घट्ट होऊन त्याचा चांगला परिणाम सहजीवनावर होतो. हे पहा -

व्यायामाचे मानसिक व शारीरिक फायदे नृत्यातही होतात, जसे स्नायू मजबूत होणे, हृदयाची शक्ती वाढणे. त्याचसोबत संगीताच्या तालावर केलेल्या नृत्याने शरीराचा तोल चांगला राहतो. चेहर्‍यावरील हावभावामुळे चेहर्‍यावरील स्नायूंना व्यायाम होतो. त्यामुळे बरेच शास्त्रीय नर्तक अगदी ८० व्या वर्षांपर्यंत व्यासपीठावर नृत्य सादर करतात.

भारतात गेल्या काही दशकांत सिनेमांतील नृत्य हा सगळ्यात लोकप्रिय नृत्यप्रकार आहे. ज्यात पूर्वी शास्त्रोक्त नृत्याचा पगडा अधिक होता, मात्र हळूहळू त्यात इतर नृत्य प्रकारांचे (उदा. हिप-होप, जॅझ, डिस्को) मिश्रण होऊन आजचा बॉलीवुडचा नृत्य प्रकार जन्माला आला आहे. आपला सिनेमा व त्यातील गाणी प्रेम प्रकारात मोडत असल्याने बहुतेक नृत्य प्रकार हे स्त्री पुरुषाला आकर्षित करण्यासाठी करते अथवा जोडपं प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी करतं. त्यामुळे या एका भावनेच्या पुढे सिनेमातील नृत्यं सहसा जात नाहीत. याउलट पाश्चात्य सिनेमात केवळ नृत्य ही मध्यवर्ती कल्पना ठेवून कितीतरी वेगवेगळ्या मानवी भावना दाखवणारे सिनेमे निघालेले आहेत. ‘Singing in rain’, ‘Mary Poppins’, ‘Dirty Dancing’ आणि नुकताच येऊन गेलेला ‘La La Land’ अशा भव्यदिव्य सिनेमांत डोळे दिपवणारं नृत्य बघायला मिळतात. हिंदी सिनेमात ‘नवरंग’, ‘आम्रपाली’, ‘जल बिन मछली’, ‘नृत्य बिन बिजली’ अशा काही मोजक्या सिनेमांत नृत्य एक पात्र म्हणून सादर केलं आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मी अशा एका मध्यमवर्गीय मराठी घरातून आले आहे, जिथे मुलींनी नृत्य करणं वाईट समजलं जायचं. नकळत्या वयापासून पडद्यावर माधुरी दीक्षितला बघून नृत्य शिकले, पण माझी आवड मर्यादित राहिली. कारण दहावीला चांगले मार्क्स घेऊन विज्ञान शाखेत गेले व नृत्य मागे पडलं. तरीही मी मा‍झ्या आवडीसाठी नृत्य करत राहिले. मा‍झ्या एक रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका ज्या लग्नानंतर अमेरिकेत गेल्या त्यांना बघून मी ओडिसी नृत्य शिकायला इतक्यांत सुरुवात केली आहे. नृत्यामुळे जे इतरांना होतात ते फायदे मलाही झाले, त्यात मुख्यत्वे हात व नजरेचा समन्वय, योग्य शारीरिक तोल या गोष्टींमुळे कामाची गती वाढली.

भारतात लोकप्रियतेच्या निकषानुसार हृतिक रोशन (जो माझा पण आवडता नर्तक आहे) सर्वांत चांगला नर्तक समजला जातो. त्याला बघताना ‘poetry in motion’ ही गोष्ट प्रत्यक्षात अनुभवता येते. नृत्याची देवता म्हणून पूजला जाणारा नटराज हा महादेवाचा अवतार असून त्याच्या तांडव नृत्यात रौद्र भाव आहे, तसेच कृष्णाची रास-लीला हा नृत्य शृंगार रस दर्शवतो. वेगवेगळे सण साजरे करतानासुद्धा नृत्य केंद्रस्थानी असतात. सोनल मानसिह, पंडित बिरजू महाराज, गुरु केलुचरण मोहोपत्रा, शोभना अशा अनेक दिग्गज कलाकारांनी संपूर्ण आयुष्य नृत्याला वाहून घेतलं आहे.

आजूबाजूला बघा, निसर्गात तालबद्धता जाणवेल. कारण सगळं विश्व एका तालावर नाचत असून सगळ्यामध्ये सुसूत्रता आहे व एक लय आहे.

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

vrushali31@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......