‘मन की आँखे’ : समाजाला आणि व्यवस्थेला मानसिक आरोग्याचा आरसा उत्तमरीत्या दाखवणारा लघुपट. आता आपलं काम आहे- त्यात स्वतःला निरखून बघण्याचं...
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अनुज घाणेकर
  • ‘मन की आँखे’ या लघुपटातील एक प्रसंग
  • Tue , 01 December 2020
  • कला-संस्कृती चलत्-चित्र मन की आँखे Mann Ki Aankhein पर्ण पेठे Parna Pethe देविका दफ्तरदार Devika Daftardar ज्योती सुभाष Jyoti Subhash

कोविडकाळात आपल्या समाजाचे आरोग्याविषयीचे विविध प्रश्नही ऐरणीवर आले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मानसिक आरोग्य. मानसिक समस्या, आत्महत्या अशा अनेक घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांत सातत्यानं वाढ होत आहे. मानसिक समस्यांच्या बाबतीत ‘महामारी’ असं म्हटलं जात नाही इतकंच. पण भारतासारख्या देशात हा प्रश्न महामारीइतकचा भीषण आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून गेल्याच आठवड्यात कोविडकाळात मानसिक आरोग्याबद्दल मार्गदर्शिका जाहीर करण्यात आली आहे.

परंतु आपल्याकडे अजूनही मानसिक आरोग्याला ‘सामुदायिक’ प्रश्न असं फारसं मानलं जात नाही. मुळात आपल्याला वैयक्तिक पातळीवर काहीतरी मानसिक समस्या आहे, हेच कित्येक व्यक्ती सहसा स्वीकारत नाहीत. त्यामुळे ती समस्या जवळच्या लोकांना सांगणं किंवा कुटुंबाला सांगणं हा तर अजूनच पुढचा टप्पा. आणि त्याहूनही पुढचा टप्पा म्हणजे आख्ख्या समुदायाला व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबद्दल कल्पना असणं आणि त्यांनी एकजुटीनं त्याचा मुकाबला करणं. दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये ही संस्कृती तितकीशी रुजलेली नाही. त्यामुळे अनेक मानसिक समस्या लपलेल्या राहतात, लोक दुःखी राहतात आणि समस्या रौद्र रूप घेईपर्यंत त्याचा थांगपत्ता लागत नाही.

‘मन की आँखे’ हा गेल्या आठवड्यातच ‘विषय खोल’ या वेबव्यासपीठावर प्रदर्शित झालेला हिंदी लघुपट ‘समुदायाचं मानसिक आरोग्य’ हा प्रश्न सुंदररीत्या हाताळतो. परिवर्तन ट्रस्टने या लघुपटाची निर्मिती केली आहे. प्रत्येक गावात आणि शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘राष्ट्रीय आरोग्य मिशन’ अंतर्गत आशा कार्यकर्त्या नेमलेल्या आहेत. आरोग्य व्यवस्थेला लोकांसोबत जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा असा दुवा आहे. साताऱ्याजवळच्या एका खेड्यातील शांती नावाची आशा कार्यकर्ती (देविका दफ्तरदार) कशा प्रकारे एका जोडप्याच्या मानसिक समस्या सोडवते, याची कथा म्हणजे ‘मन की आँखे’.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

कमला (पर्ण पेठे) आणि विद्याधर (श्रीकांत यादव) हे गावातील सर्वाधिक शिक्षित नवविवाहित जोडपं. कमलाच्या आत्महत्येच्या प्रयत्नापासून त्यांची कथा आपल्याला उलगडत जाते. काय असं घडतं की, कमला आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते? शांतीचा कमला, विद्याधर आणि कमलाच्या सासूबाई यांच्याबरोबर होणारा संवाद समस्येचं मूळ कुठे आहे ते आपल्याला सांगतो. कुटुंबातल्या लोकांच्या एकमेकांबद्दल असणाऱ्या अपेक्षा, त्यांची स्व-प्रतिमा, मानसिक समस्येकडे ते कशा प्रकारे बघतात, हे हळूहळू उलगडतं. शांती कशा प्रकारे त्यांना मदत करते, यातून एक कथा उलगडत जाते, उत्सुकता कायम ठेवत...

सामाजिक विषय चित्रपटातून मांडणं हे तसं जोखमीचं काम. विषय किचकट, उपदेशात्मक होणार तर नाही ना, हे एका बाजूला सांभाळावं लागतं; तर गोष्ट सांगताना वाहवत जाऊन जे मुख्य संदेश द्यायचे आहेत, ते बाजूला राहणार नाहीत ना, हेही पाहावं लागतं. पण सुमित्रा भावे यांच्यासारख्या कसलेल्या लेखिका-दिग्दर्शिका असताना ही कसरत सुरेख जमली नसती तरच नवल.

‘डिप्रेशन’, ‘स्व प्रतिमा’, ‘समुपदेशन’, ‘मानसिक आरोग्य’ असे कुठलेच अवजड शब्द या लघुपटात येत नाहीत. पण कमला आणि विद्याधरचं मानसिक आरोग्य बिघडलं आहे, याची लक्षणं ओघात दिसतात. जसा शरीराचा आजार असतो, तसाच मनाचासुद्धा आजार असतो. त्यावर उपचार असतात. या समस्येचं निदान ही सामूहिक जबाबदारी आहे, हा महत्त्वाचा संदेश या लघुपटातून आपल्यापर्यंत पुरेपूर पोहोचवला जातो. शहरी शिक्षित वर्गाच्या पलीकडे गावातील एखादी कष्टकरी महिला किंवा मजुरीचं काम करणारा एखादा पुरुष, किंवा स्वतः एखादी आशा कार्यकर्ती हे संदेश सोप्या भाषेत समजू शकते, स्वतःला त्या पात्रांच्या सोबत जोडू शकते, हे या लघुपटाचं मुख्य यश. पार्थ उमराणी यांचं संगीत लक्षवेधी आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

सामुदायिक मानसिक आरोग्य जपण्यासाठी दोन महत्त्वाचे धडे हा लघुपट देतो, एक समाजासाठी आणि एक व्यवस्थेसाठी. हे धडे उलगडल्याशिवाय या लघुपटाचं विश्लेषण पूर्ण होत नाही.

१. आपलं सामाजिक एकटेपण संपवणं आणि एकोपा दृढ करणं

शांतीची सासू कमलाच्या सासूला घरी आल्यावर गूळ-पाणी देते. त्यामुळे तिचं मन जरा शांत व्हावं. पुढे त्यांच्या ‘माझ्यासाठी शेतातून शेवग्याच्या शेंगा आणल्या तर चार काड्या तुझ्यासाठी पण आणल्या’ या संवादातून गावातल्या घरांमधली देवाणघेवाण आपल्याला दिसते. कमला जेव्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा गावातील काही मुख्य व्यक्ती घरच्यांना आधार देतात, असे काही सकारात्मक प्रसंग या लघुपटात उठून दिसतात. ते हेच दर्शवतात की, आपल्या समाजातील काही चालीरीती या मुळात पोषक सामाजिक जीवन राहावं यासाठी असतातच. सामुदायिक मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सगळं काही नवीन करायचीच गरज असते असं नाही. जे मुळात पोषक आहे, ते आपण जास्त भक्कम करू शकतो. विशेषतः शहरी भागात, जिथं लोक अधिकाधिक एकटे होत चालले आहेत, तिथं याची अजून जास्त गरज आहे. एकमेकांची विचारपूस, मानसिक दिलासा देण्याची सवय, समोरच्याचं ऐकून घेण्याची सवय, ही काही मूलभूत पथ्यं पाळण्याची गरज आहे. मात्र ती अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या आजच्या समाजात काहीशी मागे पडत चालली आहेत.

२. प्राथमिक आरोग्य व्यवस्थेनं मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं

या लघुपटाची नायिका आहे आशा कार्यकर्ती. ती मानसिक समस्या कशा प्रकारे कुटुंब, नातेसंबंध उदध्वस्त करू शकतात याबाबत मुळातच सजग होती आणि तिला संभाव्य उपचारांचीसुद्धा जाण होती. पण हा दृष्टिकोन सरकारी आरोग्य व्यवस्थेतील बहुतांश कर्मचाऱ्यांकडे बहुधा नसतो. कित्येक आशा कार्यकर्त्या तर त्यांचे दैनंदिन वेतन-भत्ते, कामाचं स्वरूप, सद्य कोविड काळातल्या समस्या या समस्यांशी लढत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना इतरांच्या मानसिक समस्यांबाबत (ज्या त्यांच्या दैनंदिन गाठायच्या लक्षांकमध्ये येत नाहीत) सजग असणं कितपत जमत असेल? त्यांनी जरी प्रयत्न केले तरी मानसिक उपचार करण्याइतकी सक्षम प्राथमिक आरोग्य व्यवस्था आपल्याकडे आहे का?  

या विषयातील तज्ज्ञ सातत्यानं अशी भूमिका मांडत आले आहेत आणि कोविडकाळात ही भूमिका अजून प्रकर्षानं समोर येत आहे. जागतिक आरोग्य आणि लोकसंख्या या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर विक्रम पटेल यांनी नुकतेच ‘महामारीच्या सावलीत मानसिक आरोग्य व्यवस्थेचा पुनर्विचार करताना’ या व्याख्यानमालेत म्हणाले की, ‘सामाजिक पातळीवर काम करणारे आरोग्य कर्मचारी म्हणजे आपल्याकडचे विशेष लोक आहेत. कोविडकाळात जर भारताला कुणी वाचवू शकतील तर हेच ते कर्मचारी. आपण त्यांना जितका मान देऊ, त्यांची काळजी घेऊ, तितक्या आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या कथा यशस्वी असतील.’

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जेव्हा नियमित व्यवस्थेत मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं जाईल, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात मानसिक समस्यांचा समावेश केला जाईल, कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य सक्षम ठेवलं जाईल, मानसोपचार व्यवस्थांना पुरेसा निधी पुरवला जाईल, तेव्हा संकटकाळात, जसं की, सद्य परिस्थितीत जेव्हा लोक लॉकडाऊनमध्ये मानसिक आरोग्याशी झुंज देत आहेत, तेव्हा मुळात सक्षम असलेल्या व्यवस्था सामुदायिक मानसिक आरोग्य जपू शकतील.

कला हा समाजाचा आरसा आहे, असं म्हणतात. प्रस्तुत लघुपट असाच एक मानसिक आरोग्याचा आरसा समाजाला आणि व्यवस्थेला उत्तमरीत्या दाखवतो. आता आपलं काम आहे - त्या आरशात स्वतःला निरखून बघण्याचं...

‘मन की आँखे’ हा लघुपट पाहण्यासाठी क्लिक करा - 

..................................................................................................................................................................

आत्महत्या रोखण्यासाठी आपण ७४१२०४०३०० या क्रमांकावर संपर्क साधू शकतो, तर कोविड काळात मानसिक समस्यांचा मुकाबला करण्यासाठी ०८०४६११०००७ या ‘NIMHANS’ संस्थेच्या किंवा ९१५२९८७८२० या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई’ या संस्थेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधू शकतो.

..................................................................................................................................................................

लेखक अनुज घाणेकर मानवशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.

anujghanekar2@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......