करोना हे जागतिकीकरणाच्या हावरटपणाचे फळ आहे
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
शैलेश
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 14 September 2020
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कोविड-१९ Covid-19करोना Corona लॉकडाउन Lckdown भांडवलशाही बहुराष्ट्रीय कंपन्या

डावे अभ्यासक शैलेश यांचा ‘पूंजीवादी लोभ का फल’ हा हिंदी लेख ‘समयांतर’ या मासिकाच्या सप्टेंबर २०२०च्या अंकात प्रकाशित झाला आहे. त्या लेखाच्या पूर्वार्धाचा हा मराठी अनुवाद. 

..................................................................................................................................................................

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शेती व्यवसायातील अन्न-उत्पादन व तिची वाहतूक व्यवस्था ही साम्राज्यवादी उत्पादनाची नवीन रचना म्हणून उदयास आली. जसजसा एकाधिकारी वित्तीय भांडवलाचा विकास होत गेला, तसतसा जागतिकीकरणाने असा मार्ग अवलंबला की, त्यातून बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे नियंत्रित केलेल्या उत्पादित वस्तूंच्या वितरणाने मुख्यत: जगाच्या दक्षिण भागातील वेगवेगळ्या उत्पादन क्षेत्रांना आपापसात जोडले. पण त्याचा सर्वाधिक उपभोग व भांडवलाचा संजय मात्र जगाच्या उत्तर भागातच केंद्रित झाला. या प्रणालीमध्ये कृषी व्यवसायात गुंतलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जागतिक उत्पादनाचा ताबा घेतला आणि जगभरात, विशेषत: अविकसित देशांमध्ये स्वस्त कामगार व स्वस्त जमीन ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात नफा कमावला आहे.

अशा स्वस्त मजुरी आणि स्वस्त जमिनीच्या अत्याधिक शोषणातून निर्माण झालेले उत्पादन, विक्रीसाठी भांडवलाच्या केंद्रस्थानी पाठवले जाते. २०१४मध्ये अमेरिकेच्या तुलनेत उत्पादनासाठी होणारा प्रति युनिट मजुरीवरील खर्च हा भारतात ३६ टक्के, मेक्सिकोमध्ये ४३ टक्के, चीनमध्ये ४६ टक्के आणि इंडोनेशियामध्ये ६२ टक्के होता. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अवलंबलेले उच्च तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणामुळे या देशांतील कामगारांची उत्पादन क्षमता अमेरिकन कामगाराइतकीच आहे. म्हणूनच विकसित देशांत उत्पादन करण्यापेक्षा या अविकसित देशांत उत्पादन करण्यासाठी होणारा मजुरीवरील खर्च कमी करून, तेथे उत्पादन करणे जास्त फायदेशीर ठरते. त्यामुळे या देशातील कामगारांचे आत्यंतिक शोषण केले जात आहे.

जागतिक वित्तीय भांडवलाच्या फायद्यासाठी या प्रणालीनेच सर्व पर्यावरणीय वातावरण दूषित केले आहे. श्रमांबरोबरच कृषी व्यवसायात गुंतलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी स्वस्तात जमिनी मिळवण्यासाठी जागतिक मोहीम सुरू केली. या अविकसित देशांतील जमिनीच्या किमती त्यांची उपयुक्तता आणि उत्पादनक्षमतेपेक्षा खूपच कमी आहेत. स्वस्त कामगार आणि स्वस्तातीलच जमिनी, याबरोबरच वाहतूक आणि संपर्क साधनांमध्ये झालेल्या क्रांतीने, प्रचंड नफा मिळवण्याच्या मार्गात असलेल्या (दूरवरच्या ठिकाणी कमीत कमी वेळेत पोचण्याच्या) सर्व मर्यादा दूर केल्या आहेत.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

मोबाइल, इंटरनेट, ब्रॉडबँड, ऑप्टिकल फायबर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि क्लाऊड संगणकांमुळे संवाद सुकर झाला आहे. मोठमोठे उत्तम कंटेनर वाहतुकीस मदत करतात आणि स्वस्त विमान प्रवास रहदारी सुलभ करते. यामुळे जगातील कोणत्याही देशात अत्यल्प काळात उत्पादन करणे, त्याची देखभाल करणे आणि मागणी असलेल्या इच्छित स्थळी त्याचे वितरण करणे सहज शक्य झाले आहे. श्रम आणि जमीन यांच्या शोषणाशी संबंधित वस्तूंच्या उत्पादन-वाहतुकीच्या या मोठ्या साखळ्यांतच सध्याच्या आर्थिक, पर्यावरणीय आणि साथीच्या रोगांशी संबंधित असलेल्या  रोगराईच्या संकटांची मुळे या उत्पादन वितरणाच्या व्यवस्थेमध्येच दडलेली आहेत. आताच्या कोविड-१९ची कारणेही त्यातच आहेत. 

या विध्वंसक भांडवलशाहीने केवळ पर्यावरणीय संकटच निर्माण केले नाही, तर परिसंस्थेच्या नैसर्गिक सीमांच्या अतिक्रमणाची परिस्थिती निर्माण करून एकामागून एक जागतिक महामारीची मालिका निर्माण केली आहे. गेल्या दोन दशकांत प्राणी किंवा वन्यजीवांपासून मानवांना लागण झालेल्या ‘सार्स’, ‘मार्स’, ‘बर्ड फ्लू’, ‘स्वाइन फ्लू’, ‘झिका’, ‘एच 1 एन 1’, ‘एच 5 एन 1’ ही त्यांची उदाहरणे आहेत. ‘एच 1 एन 1’ने जगभरात पाच दशलक्षांहून अधिक लोकांना मारले. आणि आता सार्स-कोव्ह-२ म्हणजेच कोविड-१९ ही ताजी आणि सर्वांत धोकादायक ठरलेली साथीच्या रोगाची साखळी आहे. या साथीने जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाच लाख मृत्यू झाले आणि अजूनही ती थांबण्याचे नाव घेत नाहीये.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

कृषी व्यवसायाशी निगडित संस्था महामारीचे संकट आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे नातेसंबंध अधोरेखित करणाऱ्या संशोधनाला नेहमीच निरुत्साही करत असतात. सार्वजनिक आरोग्य, प्राण्यांचे आरोग्य, कृषी व्यवसाय, औषधनिर्माण व्यवसाय आणि हवामान बदल यांसारख्या विविध बाबींचा समावेश असणारा एक समग्र दृष्टिकोन अवलंबून अशा महामारीचे संकट आणि भांडवली अर्थव्यवस्थेचे नातेसंबंध अधोरेखित करणारे संशोधन न करताच या जागतिक साथीच्या गोष्टी समजून घेणे किंवा त्यावर मात करता येईल, असे समजणे बाळबोधपणाचे ठरेल.

मोठी शेती, मोठे आजार

प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ रॉब वॉलेस यांनी त्यांच्या ‘बिग फॉर्म्स मेक बिग फ्लू’ या पुस्तकात कृषी व्यवसाय आणि अन्न-पुरवठा साखळींचा सखोल अभ्यास सादर केला आहे. फ्लूच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उद्भवणाऱ्या या महामाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या फायद्यासाठी करत असलेल्या जीवजंतूंचं भ्रूण-विज्ञान आणि पर्यावरणशास्त्राच्या तंत्राचा परिणाम आहे. कृषी व्यवसायाने जास्तीत जास्त प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्याची आणि कमीत कमी वेळेत हे उत्पादन जास्तीत जास्त ठिकाणी वितरित करण्याची यंत्रणा विकसित केली आहे. लाखो क्रॉस-ब्रीड कोंबड्या, ज्यातून प्रत्येक कोंबडी तिच्या शेजारील दुसऱ्या कोंबडीप्रमाणेच अनुवांशिकदृष्ट्या समान निपजेल, अशा प्रकारे संशोधन करून त्याचे उत्पादन केले जाते. असे उत्पादन मागासलेल्या देशातील दुर्गम भागात असलेल्या महाकाय कुक्कुट पालन केंद्रात केले जाते. त्यांना कृत्रिम चारा आणि रसायनांच्या साहाय्याने वाढवले जाते. नंतर त्यावर उर्वरित प्रक्रिया केली जाऊन कंटेनर आणि जहाजाद्वारे पृथ्वीच्या दूरवरच्या कानाकोपऱ्यात पाठवले जाते.

बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या नफ्याच्या हावरटपणासाठी अशा भयंकर जैव तंत्रज्ञानाचा अवलंब करतात की, ज्यातून पंख नसलेल्या कोंबड्या तयार करता येतील. जेणेकरून अशा पंख नसलेल्या कोंबड्यांना स्वच्छ करणे सुलभ होईल. आणखी असेही केले जाते की, सर्व कोंबड्या समान वजनाच्याच असाव्यात, जेणे करून प्रत्येकीचे वजन करण्याची झंझट राहू नये, तसेच त्यांचे पायसुद्धा (लेग पीस) समान वजनाचे असावेत. डुकराचे मांस आणि गोमांस यांचे उत्पादन, वाहतूक व वितरण प्रक्रियाही सर्वसाधारणपणे अशीच असते.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : पत्रकार पांडुरंग रायकरच्या मृत्युच्या निमित्ताने काही प्रश्न…

..................................................................................................................................................................

अशा या विशिष्ट प्रकारच्या उत्पादन, वाहतूक व वितरण प्रक्रियेच्या वातावरणामध्ये वाढणारे जंतू या उत्परिवर्तनानुसार स्वतःला अनुकूल करवून घेतात आणि मग तेही काही दिवसांत, बऱ्याचदा काही तासांतच कृषी व्यवसायातील उत्पादनाचा हाच महामार्ग पकडतात आणि आपले यजमान असलेल्या वरीलप्रमाणे उत्पादित डब्बा बंद पदार्थांवर बसून अथवा तेथील मानवावर स्वार होऊन पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पोहोचतात.

इतर कृषी उत्पादनांमध्येही हे ‘मोनो कल्चर’ (एकाच प्रकारची उत्पादने मोठ्या प्रमाणावर निर्माण करणे) अवलंबले जाते. जिथे जैवविविधता आहे, तेथे निसर्ग स्वतः सूक्ष्म रोगजंतूंचा प्रसार होण्यात अडथळा आणतो. कारण वेगवेगळ्या प्रजातींना संक्रमित करण्यासाठी सूक्ष्मजंतूंना स्वत:ला बदलणे आवश्यक असते, पण ते तितके सोपे नसते. मात्र वरील प्रकारच्या ‘मोनोकल्चर’ उत्पादनांत असे नैसर्गिक अडथळे नसतात. त्यामुळे सूक्ष्म रोगजंतूंना संपूर्ण शेती उत्पादनात स्वतःला संक्रमित करवून घेणे खूप सोपे जाते.

वन्यजीवांशी संपर्क आणि जंगलांचा विनाश  

मांस व इतर कृषीजन्य पदार्थांच्या उत्पादनांची ही शेती जंगलाच्या सीमेजवळील भागात वारंवार अतिक्रमण करते. आपल्या उत्पादनाच्या विस्तारासाठी वेगाने व फार मोठ्या प्रमाणात जंगलांची तोड करतात. ब्राझीलमध्ये सोयाबीनच्या लागवडीसाठी सध्या अ‍ॅमेझॉनची जंगले साफ केली जात आहेत. आतापर्यंत सर्वाधिक भीषण प्रमाणात लागलेल्या आगीला सरकार समर्थक भूमाफियांनी लावलेल्या आगीशी जोडले जात आहे. ही जंगले इतकी ऑक्सिजन तयार करत होती की, अ‍ॅमेझॉनला जगाचा फुप्फुस समजले जात असे. संपूर्ण जगातच वनक्षेत्र कमी आणि विरळ केले जात आहे.

जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी वन्य पशु-पक्ष्यांच्या जनुकांमध्येसुद्धा या शेतीत व त्यांच्या प्रयोगशाळांमध्येही औद्योगिक उत्पादन करणाऱ्या प्राण्यांच्या जीन्ससोबत छेडछाड केली जाते.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘c u soon’ : ‘रिअल लाइफ’मधल्या तरुणांचं ‘व्हर्च्युअल’ दर्शन घडवणारा उत्कृष्ट मल्याळम सिनेमा

..................................................................................................................................................................

याबरोबरच ते अन्नामध्ये वापरल्या जाणाऱ्या सी फूड (समुद्री खाद्याच्या) बाजाराच्यादेखील संपर्कात येतात. या संपर्कामुळे वन्यजीवांमध्ये मर्यादित असलेले सूक्ष्मजीव शेतीतल्या प्राण्यांमध्ये जातात. ते या प्राण्यांनुसार स्वतःला अनुकूल करतात. शेतीच्या उत्पादन आणि प्रसंस्करणाच्या संपूर्ण प्रक्रियेत हे जंतूदेखील बऱ्याच काळापासून मानवांच्या संपर्कात येत असतात. याप्रमाणे त्यांना एक नवीनच जागा सापडते, ज्यामध्ये ते स्वतःस अनुकूल करत राहतात.

मानवांना संक्रमित करणारे कमीत कमी ६० टक्के जंतू वन्यजीवांपासून स्थानिक लोकांत याच प्रकारे पसरले आहेत आणि तेथूनच त्यांनी अन्न-उत्पादन-वाहतुकीचा राजमार्ग पकडला आहे. कॅम्पीबॅक्टर, निपाह विषाणू, क्यू ताप, हिपॅटायटीस-ई आणि नोवेल इन्फ्लूएन्झा यांसारख्या मानवांसाठी घातक असलेल्या रोगांचे स्रोत, अशा अन्न-उत्पादन आणि वाहतूक संरचनांतच असल्याचा शोध लागलेला आहे.

इको-सिस्टमचा विनाश आणि चयापचयात बिघाड

सध्याची राजकीय व्यवस्था कृषी व्यवसायाशी संबंधित बहुराष्ट्रीय कंपन्यांना नफ्याचे खासगीकरण आणि खर्चांचे सामाजिकीकरण करण्याची परवानगी देते. म्हणूनच संपूर्ण समाजाला त्याच्या पर्यावरणीय दुष्परिणामांची किंमत मोजावी लागते. त्यामुळेच अशा घातक जागतिक साथीचे आजार उद्भवतात.

जागतिक कृषी व्यवसायदेखील आता अभूतपूर्व प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ‘चयापचयात खंड’ पडला (मेटाबोलिक रिफ्ट) आहे. मार्क्सने याला भांडवलशाहीचा एक प्रमुख विरोधाभास म्हणून ओळखले होते. आताच्या आधुनिक काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अशा घातक अन्नसाखळीचे खूप चांगले वर्णन जॉन बेल्मी फॉस्टर यांनी केले आहे. त्यांच्या मते सर्व अविकसित देश (जगाचा दक्षिण भाग) कृषी उत्पादनाचे केंद्र व विकसनशील देश (जगाचा उत्तर भाग) त्याच्या उपभोगाचे केंद्र बनले आहे. अशा प्रकारे जगाच्या दक्षिणेकडील जमिनीतून कृषी उत्पादनांद्वारे सर्व पोषक द्रव्ये काढून घेऊन त्याचा पुरवठा जगाच्या उत्तरेकडे होत आहे. त्यामुळे दक्षिणेच्या मातीतील पौष्टिक द्रव्ये काढले गेल्याने ती अनुत्पादक होत आहे. कारण अशी पोषक द्रव्ये पुढे चालून कोणत्याही रूपात उत्तरेकडून दक्षिणकडे परत येणार नाहीत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हासुद्धा भांडवलशाहीने लूट करण्याचाच एक प्रकार आहे. यामुळे संपूर्ण पृथ्वी आणि तिच्या नैसर्गिक संपत्तीचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. त्यामुळे निसर्गाच्या चयापचयात हळूहळू प्रादेशिक असंतुलन वाढत आहे. अशा प्रकारे उत्पादन आणि उपभोगाच्या स्वरूपात सामाजिक पातळीवर (सोशल metabolijm) आणि जमिनीच्या पोषक तत्त्वांच्या शोषणाच्या रूपात निसर्गाच्या पातळीवर असलेले हे असंतुलन कधीच दुरुस्त करता येणार नाही. त्यामुळे संपूर्ण सामाजिक चयापचयात एक मोठाच पेच निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून भांडवलशाही शोषण करत असलेल्या देशातील लोकांना अनेक प्रकारच्या रोगराईने आणि साथीच्या आजाराने त्रस्त केले आहे. भांडवलशाही करत असलेल्या लुटीमुळे होणारे कुपोषण, शुद्ध पिण्याच्या पाण्याची कमतरता, निरक्षरता, आरोग्य सुविधांचा अभाव, तसेच तेथील जमिनीतील पोषक तत्त्वांचे एकतर्फी शोषण यातून निर्माण होणाऱ्या गरिबीमुळे या आजारांविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेली जनतेची प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळेही असे जीवघेणे साथींचे आजार वाढण्यास पोषक परिस्थिती निर्माण होत आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गरजांनुसार उत्पादन वाढवण्यासाठी कीटकनाशके आणि तणनाशकांच्या बेसुमार वापरामुळे जगाच्या दक्षिणेकडील जैवविविधता नष्ट तर होत आहेच, पण तेथील जमीन, पाणी आणि हवादेखील विषारी बनत आहे. शेतीसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे. या सर्व गोष्टींचा स्थानिक लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रदूषण आणि औद्योगिक कचऱ्याने आरोग्यास धोका निर्माण करणे, हादेखील आज शोषणाचाच एक प्रकार बनला आहे.

अनुवाद - कॉ.भीमराव बनसोड

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख ‘पूंजीवादी लोभ का फल’ या नावाने ‘समयांतर’ या मासिकाच्या सप्टेंबर २०२०च्या अंकात प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भारताच्या पंतप्रधानपदाचा हा ऱ्हास देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की करणारा आहे. आणि खरे देशभक्त, खरे राष्ट्रप्रेमी, खरे राष्ट्रवादी व लोकशाहीची चिंता वाहणारे नागरिक यांचा आत्मविश्वास डळमळीत करणारा आहे

आपल्या देशात राष्ट्रपती देशाचा प्रमुख असतो, लोकसभा व राज्यसभा यांच्या अध्यक्षांना विशेष मान असतो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनाही वेगळे महत्त्व असते आणि मुख्य निवडणूक आयुक्ताला खास असे स्थान असते. मात्र देशाचा पंतप्रधान जेव्हा कार्यक्षम असतो, सुसंस्कृत असतो, दूरदृष्टी (व्हिजन) असलेला, मूल्ये (व्हॅल्यूज) जपणारा असतो, तेव्हा वरील सर्व महनीय पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष इज्जत अ.......