गोल्डन रेकॉर्डस्, वोयजर स्पेस प्रोग्रॅम, २० ऑगस्ट १९७७ (विज्ञानकथा)
पडघम - विज्ञाननामा
सौरभ नानिवडेकर
  • गोल्डन रेकॉर्डसचं एक छायाचित्र
  • Fri , 13 December 2019
  • पडघम विज्ञाननामा व्होयजर अवकाश प्रोग्रॅम voyager space mission व्होयजर Voyager वोयजर गोल्डन रेकॉर्डस् Voyager Golden Records

ही विज्ञानकथा ‘व्होयजर अवकाश प्रोग्रॅम : अंतराळयुगातली अचंबित करणारी दुनिया’ या लेखातल्या या संदर्भावर आधारित आहे.

............................................................................................................................................

गंधर्व कुमार सकाळपासून उन्हातान्हात बरीच पायपीट करून दमला होता आणि दुपारच्या वेळेला जरा विसावा म्हणून त्याचा campsiteवरच्या आरामखुर्चीत विसावला होता. सकाळपासून ‘प्लॅनेट 494’वरचे मातीचे आणि दगडांचे बरेच नमुने गोळा करून त्यांचं तिथंच जारविस/garvis (geology-air-radiation-vertual-inteligence-system) या आपल्या ai पार्टनरच्या मदतीनं परीक्षण करून त्याचे निष्कर्ष ISS Rohini मध्ये असलेल्या आपल्या लॅबला पाठवत होता. लालसर जांभळ्या जांभ्या दगडासारखी भू-संरचना असलेला ‘प्लॅनेट 494’ हा संपूर्ण खडकाळ आणि निर्जीव वाटावा असा ग्रह होता. या ग्रहावर पाण्याचे साठे आणि त्यात बुरशीसदृश सुक्ष्मजीवांचे अस्तिव सापडल्यामुळे, तसेच ग्रहावर श्वास घेण्यायोग्य ऑक्सिजनही असल्यामुळे वर space station Rohiniमध्ये असणाऱ्या माणसांना या ठिकाणाबद्दल बऱ्याच आशा होत्या.

म्हणूनच ग्रहावरचे इतर parameters जसे की, माती आणि दगडांचे नमुने, पाण्यात असणारी खनिजे, ग्रह ज्या ताऱ्याभोवती फिरतो त्याच्याकडून येणाऱ्या अतिनील किरणांची मारक क्षमता इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी Garvis नावाची Ai प्रणाली बनवली होती आणि ती गंधर्वच्या space suiteमध्ये बसवण्यात आली होती. Garvis शी गप्पा मारत त्याच्या lesar scannerच्या मदतीने गोळा केलेले नमुने स्कॅन करत गंधर्वचं काम चालू होतं. बॅकग्राऊंडला पं. भीमसेन जोशी यांची ‘सावन की बुंदनिय’ ही रेकॉर्ड वाजत होती आणि त्यात भीमसेनजींनी घेतलेल्या तानेबरोबर हातवारे करत दाद देत गंधर्व काम करत होता. दुसऱ्या कुणी त्याला लांबून पाहिलं असतं तर तो वेडाच आहे, असं त्यांना वाटलं असतं.

आज माणूस कितीही प्रगत झाला, अंतराळात गेला तरी त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवलेलं हे सोनं न्यायला काही ते विसरले नव्हते. Exogeologist असलेला गंधर्व खरं तर संगीताचा खूप वेडा होता. त्याला रोज गाणं वाजवणं, संगीत ऐकणं असंच करावंसं वाटायचं Space Station मध्ये. शाळेत असताना तो Virtual तबलाही शिकला होता. २०९४ मध्ये प्रदूषण आणि नैसर्गिक संपत्तीचा सर्वनाश झाल्यावर पृथ्वी सोडून आता अंतराळ भ्रमण करणाऱ्या मानवांना त्यांच्या पोरांनी असले शौक केलेले परवडणारं नव्हतं. त्यात Space Stationवरच्या शाळेत Space football, Asteroid climbing इत्यादी शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या खेळांमध्ये पुढे असल्यामुळे आणि एकूणच Outstation Personality असल्यामुळे गंधर्व Exogeologist झाला होता. हेही बरंच होत म्हणा! Space Station मधल्या माणसांचा कोलाहलापासून दूर कुठे तरी एखाद्या ग्रहावर जा, तेथे मातीचे-दगडांचे नमुने गोळा करत बसा आणि बॅकग्राऊंडला ही असली गाणी, आणखी काय पाहिजे! त्यामुळे वर लॅबवर्क करण्यापेक्षा गंधर्वला धोकादायक असलं तरी हे फिल्डवर्क खूप आवडायचं.

आता जरा एक डुलकी काढावी म्हणून Garvisला गाणी बंद करायला सांगून तो खुर्चीत रेलला होता. त्या खडकाळ प्रदेशात एक मोठ्या दगडाच्या आडोशाला त्यानं आपला तंबू ठोकला होता. त्याचा डोळा लागायचा जरा अवकाश, त्याला मंद गाण्याचे सूर ऐकू यायला लागले. त्यानं झोपेतच Garvisला गाणं बंद करायला सांगितलं खरं, पण उलट त्यानंच त्याला उठवलं आणि म्हणाला- ‘गाणं मी नाहीच लावलेलं. मलाही काहीतरी ऐकू येतंय.’

गंधर्व आश्चर्यानं ताडकन उभा राहिला. थोडं कान देऊन ऐकल्यावर त्यालाही दुरून कुठून तरी गाण्याचे सूर ऐकू येतायत असं वाटलं. त्यानं Garvisला Source हुडकायला सांगितलं. Campsiteच्या मागच्या बाजूला असणाऱ्या दगडांच्या एका गुहेतून सूर ऐकू येत होते. गंधर्व कोणताही विचार न करता तडक आत घुसला. खरं तर Security Protocallप्रमाणे जारविस त्याला ड्रोन सोडण्याबद्दल सांगत होता. पण गंधर्वच्या कुतूहलानं त्याच्या तर्कबुद्धीवर केव्हाच मात केली होती. गुहेत आत आत जाईल तसं गुहा अजून अजून अरूंद होत होती आणि गाण्याचे सूर अजून स्पष्ट कानावर येत होते. गंधर्वच्या आवडीचंच असं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वाटत होतं. गंधर्वचं डोकं फिरायची पाळी आली होती.

इथं एक संपूर्ण निर्मनुष्य ग्रहावर, जिथं माणूस पहिल्यांदाच उतरतोय तिथं हे संगीत ऐकू तरी कसं येतंय? हे म्हणजे काही तरी फारच अदभुत होतं. हा USP (Unidentifide Scientific phenomenon) आपल्याला शोधून काढलाच पाहिजे असं गंधर्वला वाटत होतं. आणि त्याच विचारत आणि गोंधळात लक्ष न गेल्यामुळे गंधर्वचं डोकं वरच्या कपारीला दाणकन आदळलं आणि तो तोल जाऊन बेशुद्ध पडला. पडताना त्याला गुहेतून एक मानवसदृश आकृती त्याच्याजवळ येतीय असा भास झाला.

“अरे गंधर्व उठ लवकर, तुला उठलंच पाहिजे” जारविस गंधर्वला उठवण्याचा प्रयत्न करत होता, हळूहळू गंधर्वनं डोळे उघडले. त्याचं डोकं जाम ठणकत होतं. थोडे डोळे किलकिले करून पाहिल्यावर त्याला त्याच्या बाजूनं सहा मानवसदृश आकृत्या उभ्या असलेल्या दिसल्या. त्याला प्रथम आपल्याला भास झालाय असंच वाटलं. त्यातल्या एकानं हस्तांदोलन करायला हात पुढे केला. त्याच्या हाताची तीन लांबसडक बोटं बघून गंधर्व ताडकन उठून बसला. ती मानवी आकृती सावकाश मागे सरकली. आपल्याला प्रगत परग्रहवासी भेटलेत, हे गंधर्वच्या तार्किक बुद्धीला पटल्यावर तो मोठ्यानं ओरडलाच- “व्वा जारविस, आपल्याला काय USP मिळालाय बघ.”

ते मानवी प्राणी उंचीला जेमतेम चार फूट असावेत. ते दोन पायांवर चालत होते. त्यांचं अंग ग्रहावरच्या मातीसारखंच लालसर जांभळ्या रंगाचं होतं. त्यांचे कान लांब होते. हाताला तीन लांबसडक बोटं होती. बांधा मजबूत होता आणि त्यावर त्यांनी पांढऱ्या रंगाचे अंगभर कपडे घातले होते. तितक्यात त्यांच्यातला एक बुजुर्गसा प्राणी पुढे आला आणि म्हणाला, “नमस्कार, मी लिडो क्विपू लोकांचा लोकनियुक्त प्रतिनिधी. आमच्या हेरा ग्रहावर मनुष्य देवाचं स्वागत आहे.” गंधर्वनेही आपलं नाव सांगितलं. “पृथ्वीवासी गंधर्व देव आज आमच्या हेरा ग्रहावर अवतरले हे आमचं भाग्यच.” लिडो म्हणाला.

पूर्वी एकदा प्रचंड उल्कापात झाल्यामुळे ‘प्लॅनेट 494’ किंवा हेरा ग्रहावरची बरीचशी जीवसृष्टी नष्ट झाली. क्विपू लोकही लुप्त होण्याचा मार्गावर होते. त्यांनी जमिनीखाली आपली एक आधुनिक संस्कृती तयार केली होती. त्यामुळंच खरं तर वर जमिनीवर गंधर्वला कोणत्याही सजीवाचा मागमुसा मिळाला नव्हता.

“गंधर्व देवा, चला आम्हाला तुम्हाला ‘मनुष्य मंदिरा’त न्यायचं आहे” असं म्हणून लिडो चालायला लागला. आल्यापासून हे ‘देव, देव’ काय चाललं आहे हे काही गंधर्वला कळत नव्हतं. प्रगत जीवसृष्टीसारखा USP मिळाल्यामुळे त्याच्या तर्कबुद्धीनं त्या विचाराकडे तात्पुरतं दुर्लक्ष केलं होतं. गंधर्व लिडोमागून चालायला लागला. बाहेर रस्त्यांवर क्विपू लोक भरल्या नजरेनं गंधर्वकडे पाहत होते. त्याच्यावर फुलं उधळत होते. लिडो गंधर्वला एक मोठ्या घुमटाकार इमारतीकडे घेऊन गेला. त्यावर माणसाचा चेहरा कोरला होता आणि खाली चक्क इंग्रजीत “To the makers of the music, all worlds all times” असं वाक्य कोरलं होतं. आत शिरल्यावर लिडो म्हणाला, ‘मनुष्य मंदिरात आपलं स्वागत आहे.’ आतली परिस्थिती बघून तर गंधर्वला चक्क वेड व्हायची पाळी आली. आत भिंतींवर माणसांची आणि पृथ्वीवरची खूप चित्रं होती. नद्या, डोंगर, झाडं, पानं, फुलं, प्राणी, पक्षी... हे सगळं गंधर्वनं शाळेत असताना Historical geography या विषयात पाहिलं होतं, अगदी हुबेहूब तसंच होतं.

एवढंच नव्हे तर माणसांच्या आधुनिक युगाचा भरीच्या काळातलीही बरीचशी चित्रं होती. खाणारी माणसं, शिकार करणारी माणसं, खेळणारी मुलं, बाळाला दूध पाजणारी आई, हसणारी स्त्री इत्यादी माणसाचं जीवन दाखवणारी वेगवेगळ्या अवस्थेतील भरपूर चित्रं मंदिरभर होती. आश्चर्यानं गंधर्वचा तोंडाचा नुसता ‘आ’ वासला होता.

शेवटी मंदिराचा त्या टोकाला पोहोचल्यावर आत गाभाऱ्यासारख्या भागात सोन्याची एक तबकडी गंधर्वला कसल्याशा यंत्रावर ठेवलेली दिसली. लिडोने भिंतींवरचं एक बटन दाबलं आणि म्हणाला “मनुष्य देवा, तुम्ही हा आम्हाला दिलेला तुमचा सगळ्यात मोठा ठेवा.” तबकडी गोल गोल फिरायला लागली आणि अप्रतिम सूर घुमले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वाजत होतं. बंदिशीचे बोल होते- ‘जात कहा हो’. इतक्या वेळ विसर पडलेल्या जारविसनं लगेच सांगितलं- “सूरश्री केसरबाई केरकर. राग भैरवी”. गंधर्व आश्चर्यानं गुढघ्यावर बसला. त्यानं जारविसला विचारलं, ‘काय आहे, हे सगळं, तुझ्या डाटाबेसमधून शोधून काढ.’

जारविसनं lesar beam वापरून सोनेरी तबकडी स्कॅन केली. त्याला हवे ते की-वर्डस मिळाले. गंधर्वच्या डोळ्यापुढं 3D स्क्रीन उभा राहिला. त्यावर शब्द उमटले- “गोल्डन रेकॉर्डस्, वोयजर स्पेस प्रोग्रॅम, २० ऑगस्ट १९७७.”      

............................................................................................................................................

लेखक सौरभ नानिवडेकर व्यवसायाने मॅकेनिकल इंजिनीअर असून त्यांना वाचन, लेखन, संगीत, चित्रपट, रानावनात फिरणे, आकाशनिरीक्षण, प्राणी, पक्षी इत्यादी अनेक विषयांची आवड आहे.

 saurabhawani@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

रशियाचा भारताला भडकवण्याचा प्रयत्न दिसतो आहे. भारत-अमेरिका संबंधांत काडी घालणे, हा त्यामागचा हेतू असावा. आंतरराष्ट्रीय पटावरील ‘प्रोपगंडा’ची ती एक चाल असणार...

आपण घरात घुसून दहशतवाद्यांना टिपतो, हे प्रचारात सांगणे अडचणीचे असले, तरी समाजमाध्यमांतून त्याचा प्रचार करता येतोच. तेव्हा अमेरिकेतून त्याबाबतच्या बातम्या आल्या, तरी त्या येथे सरकारला फायद्याच्याच ठरतात. किंबहुना त्या हेतूने तर तशा बातम्या पेरण्यात येत नाहीत ना, अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. धर्मस्वातंत्र्याच्या अहवालाचे तसे नाही. त्यातील टीका उघडच तोट्याची ठरू शकते. ते लक्षात घेऊनच रशियाने तो मुद्दा उचलला.......