‘जजमेंट’ : ‘फूल टू थ्रीलर’ नसला तरी त्यातला ‘ड्रामा’ बघण्यासारखा
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘जजमेंट’चं पोस्टर
  • Sat , 25 May 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie जजमेंट Judgement नीला सत्यनारायण Neela Satyanarayana तेजश्री प्रधान Tejashree Pradhan मंगेश देसाई Mangesh Desai

‘जजमेंट’ हा सिनेमा नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’ या कादंबरीवर आधारीत आहे. स्त्रीप्रधान भूमिका असलेली कथा आणि त्याला समांतर चालणारी मांडणी हा या सिनेमाचा पाया आहे. या दोन्हींमुळे कथानकाला दिशा मिळाली आहे. हा सिनेमा सामाजिक वास्तवावर भाष्य करतो. त्यामुळे त्यातला प्रभावीपणा आणि साचेबद्धता विशेष लक्ष वेधते. सामाजिक भान मांडू पाहणारा आणि स्त्रियांचं जगणं अधोरेखित करणारा हा सिनेमा अप्रतिम प्रयोग ठरतो.

दिग्दर्शक समीर सुर्वे यांनी अत्यंत चांगल्याप्रकारे सिनेमाची मांडणी केली आहे. त्यामुळे ‘ड्रामा’ रेखाटण्यात त्यांना यश आलं आहे. सिनेमाचा गाभा समाजव्यवस्थेत स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार हा असल्यानं तो व्यापक पातळीवर बोध देणारा ठरतो.

याची कथा आयएएस असलेल्या अग्निवेश साटम या उच्चपदस्थ अधिकाऱ्याभोवती गुंफलेली आहे. अग्निवेशचा स्वभाव तापट आणि रागीट असतो. तो, पत्नी आणि दोन मुली असं त्यांचं छोटं कुटुंब असतं. मात्र अग्निवेशचा स्वभाव पुरुषी मानसिक विकृतीनं भरलेला असतो. त्यामुळे अग्निवेश पत्नीचा खून करतो आणि पुढे कथेची सुरुवात होते. दोन पिढीतलं अंतर रेखाटताना अवास्तविक गोष्टीचा भरणा दिग्दर्शकानं टाळला असल्यानं सिनेमा निरस होत नाही.

कथा पुरुषप्रधान संस्कृतीवर भाष्य करत सुरळीत पुढे जाते. मात्र कथेतला चढउतार अधूनमधून हलकेसे हेलकावे खात राहतो. मात्र मानसिक आरोग्य आणि त्यातून निर्माण होणारी विकृती यावर आधारलेला हा सिनेमा एकाच पातळीवर दोन्ही घटनांचा समतोल साधतो. प्रामुख्यानं तीन प्रवृत्तीचा त्रिकोण उभा करून एका विशिष्ट टप्यानंतर त्यातलं साम्य दिग्दर्शकानं सफाईनं दाखवलं  आहे. त्यामुळे कथा प्रेक्षकांला खिळून ठेवते. सक्षम, भावनिक स्त्रीनं वर्चस्ववादी मानसिकतेतील पुरुषी विकृतीच्या विरोधात पुकारलेलं हे बंड आहे. त्यामुळे त्यातला संघर्ष सामाजिक वास्तवाच्या परिघाला आणि पारंपरिक मानवी मनाच्या चौकटीला सुरुंग लावणारा ठरतो. मात्र स्त्रीप्रधान सिनेमाच्या पारंपरिक सीमारेषा ‘जजमेंट’लाही ओलांडता आलेल्या नाहीत. ही या सिनेमाची कमकुवत बाजू आहे.

पूर्वार्धात कथा सिनेमाला पूरक घटनांची मांडणी संथ आणि रंगतदाररीत्या करते. काही वेळा धरसोड करणारी कथा उत्तरार्धात मात्र क्रमबद्ध प्रवास करते. सहज सोप्या पद्धतीनं केलेला शेवट सिनेमाच्या गाभ्याला अनुकूल असाच आहे.

सिनेमातले संवाद प्रभावी आहेत. उत्तरार्धातला कोर्टड्रामा सिनेमाचा भाग असल्यामुळे प्रत्येक संवादातील चढउतार काटेकोररीत्या वापरले आहेत. अभिनय ही या सिनेमाची आणखी एक जमेची बाजू. मंगेश देसाई, माधव अभ्यंकर आणि तेजश्री प्रधान यांनी आपापल्या भूमिका समर्थपणे निभावल्या आहेत. त्याचबरोबर फ्रेम, संगीत आणि दिग्दर्शन यांचा चांगला मिलाफ झाला आहे.

थोडक्यात हा सिनेमा भोवतालच्या वास्तवाची जाणीव करून देताना त्यातला सुसंगतपणा सोडत नाही. त्याचबरोबर मांडणीतला प्रभावीपणा कथेची साथ सोडत नाही.

एकूण सिनेमा ‘फूल टू थ्रीलर’ नसला तरी त्यातला ‘ड्रामा’ बघावा असा नक्कीच आहे.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......