‘मिरांडा हाऊस’ : रोमांचित करणारा सिनेमा
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘मिरांडा हाऊस’ची पोस्टर्स
  • Mon , 22 April 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie मिरांडा हाऊस Miranda House राजेंद्र तलक Rajendra Talak

‘रोमांचित करणारा सिनेमा’ असं विशेषण मोजक्या सिनेमांना लावता येतं. त्याची कारणं साधी आणि सरळ असतात. एक म्हणजे, असा सिनेमा असंख्य शक्यतांची मोठी इमारत उभी करतो. ती करत असताना त्यात कुठेही नीरसपणा नसतो. त्याचबरोबर पुढे काय होईल याचा प्रेक्षकांना अंदाज बांधता यायला नको, याची काळजी दिग्दर्शकानं घ्यायला हवी. ‘रोमांचक कथा’ हा मूळ गाभा असेल तर दिग्दर्शकाच्या कल्पनाविश्वातील भराऱ्यांना कुठल्याही सीमा नसतात. मात्र अशा वेळी दिग्दर्शक आणि पटकथालेखकाची खरी कसोटी लागते. निव्वळ अकाल्पनिक गोष्टींचा भडिमार केला तर सिनेमा आपटल्याशिवाय राहत नाही.

मात्र प्रेक्षकांच्या मानसिकतेचा अचूक अंदाज घेऊन निर्माण केलेली कलाकृती त्यांच्या मनात अलगद घर करून जाते. अगदी असाच प्रयत्न दिग्दर्शक राजेंद्र तलक यांनी ‘मिरांडा हाऊस’ या सिनेमाच्या माध्यमातून केला आहे. त्यांनी दीर्घ कालावधीनंतर सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचं पटकथालेखनही त्यांनीच केलं आहे.

सिनेमा एका छोट्या वर्तुळात फिरत राहतो आणि कथा संथगतीनं परिघाकडून केंद्राकडे जाते. त्यात येणारे चढउतार संयमी पद्धतीनं हाताळले आहेत. कथेचा एकएक धागा उकलत असताना त्यातली उत्सुकता टिकून ठेवण्याचं काम दिग्दर्शकानं बखूबी पार पाडलं आहे.

या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त दोन व्यक्तिरेखांवर उभा राहिला आहे. शेवटपर्यंत या दोन्ही व्यक्तिरेखा कथेवरची पकड सैल होऊ देत नाहीत. त्यापैकी विक्रम एका प्रसिद्ध चित्रकाराचा मुलगा, तर प्रिया ग्राफिक डिझानर असते. दोघांच्या आयुष्यात काही धक्कादायक गोष्टी घडतात. आयुष्याच्या एका वळणावर त्यांची भेट होते आणि तिथून पुढे सुरू होतो कथेच्या केंद्राकडे जाण्याचा रोमांचित प्रवास. कथा अगदी साध्या विषयाभोवती गुंफलेली आहे. मात्र त्यातलं निखळ मनोरंजन आनंद देऊन जातं. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4782/Lakshaniya-51

.............................................................................................................................................

कथा संथगतीनं पुढे जात असली तरी पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांत विस्कळीतपणा नाही. मुख्य म्हणजे कथा आपली लय सोडत नाही. थोड्याफार उणिवा आहेत नाही असं नाही. संथ चालणारी कथा शेवटी अचानक गती पकडते. दिग्दर्शकानं कथेवर घेतलेली मेहनत दिसून येते.

सिनेमा संवाद, पार्श्वसंगीत, अभिनय यावर थोडा तोल गमावतो. अभिनय फार प्रभावी नसला तरी कथेला पुढे घेऊन जातो. साईंकीत कामत आणि पल्लवी शिरके या जोडीनं अभिनयाचा चांगला प्रयत्न केला आहे. मिलिंद गुणाजी मात्र काहीसा अपेक्षाभंग करतात. शेवटी आणि तीही अवघी पाच मिनिटं त्यांची व्यक्तिरेखा पडद्यावर दिसते. त्यामुळे त्यांचा विशेष असा प्रभाव पडत नाही. संवाद फार प्रभावी नाहीत. संवादातल्या ‘गॅप’ आणि ‘रिपीट’ होणारे संवाद यांचा बहुतांश वेळा ताळमेळ बसत नाही. तांत्रिक बाजूचा वापर आवश्यक तिथं योग्य पद्धतीनं करण्यात आला आहे.

सिनेमा केवळ दीड तासाचा असल्यानं ‘हा सिनेमा आहे की लघुपट?’ असा प्रश्न पडतो. मात्र कथा व दिग्दर्शकाच्या मेहनतीमुळे सिनेमा चढ-उतारासहित चांगल्या पद्धतीनं गुंफला गेला आहे. थोडक्यात मनोरंजनाचा ‘धमाका’ म्हणून सिनेमा ठीक आहे. मात्र त्यातल्या छोट्या छोट्या उणिवा दुर्लक्षित कराव्या लागतात. अन्यथा सिनेमा नीरस वाटू शकतो. 

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......