देवपुत्र कच आणि राक्षसकन्या देवयानी
कला-संस्कृती - कृष्णकथांजली
श्रीकृष्ण तनया
  • कच आणि देवयानी
  • Sat , 17 November 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti कृष्णकथांजली कच Kachha देवयानी Devayani

कश्यप मुनींच्या दिती व अदिती या दोन स्त्रियांनी दैत्य व देव यांना जन्म दिला. नात्यानं ते सावत्रबंधू होते आणि दोघांचे विळी-भोपळ्याइतके सख्य होते. परस्परांच्या नाशासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. युद्ध वा कलह करण्याची एकही संधी ते दवडत नसत. दिती व अदिती दोघी सख्या बहिणी. दिती नेहमी अदितीला कमी लेखून दैत्यांना कलह निर्माण करण्यास प्रोत्साहन देत असे. देवांनी बृहस्पतीला आपला गुरू केले, तर दैत्यांनी त्या पदावर शुक्राचार्यांची नियुक्ती केली. हे दोन्ही गुरू प्रथमपासूनच परस्परांशी स्पर्धा करत असत.

शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र येत असल्यानं ते युद्धांत मृत्यू पावलेल्या दैत्य-दानवांना जिंवत करत. त्यामुळे त्यांचं पारडं नेहमीच वरती असे. तसा मंत्र बृहस्पती वा अंगिरसांना येत नसल्यानं देवांची संख्या रोडावत चालली. तेव्हा सर्व देव बृहस्पतींचा पुत्र कच याच्याकडे गेले. कोणत्याही प्रयत्नानं संजीवनी मंत्र आत्मसात कर असं त्यांनी त्याला विनवलं. देवगण त्याला म्हणाले, ‘‘कचा, तू तरुण व बुद्धिमान आहेस. वेदशास्त्रसंपन्न तर आहेचस, शिवाय सारासार विवेकही तुझ्या ठिकाणी आहे. शुक्राचार्यांची देवयानी नामक कन्या अत्यंत देखणी व शिलवान आहे. तू शुक्राचार्यांच्या गृही जाऊन आपल्या सद्वर्तनाचा व सौजन्याचा अभाव तिच्यावर पाडलास की, तो मंत्र प्राप्त होण्यास कसलीही अडचण येणार नाही. म्हणून तू तिकडे जाऊन मंत्र शिकावास व आपला पक्ष बळकट करावास.’’

देवांच्या विनंतीला अंगिरसांनी संमती दर्शवली. त्यांनी आपल्या नातवाला-कचाला परवानगी दिली. एका शुभमुहूर्तावर कचानं देवलोक सोडला. तो राक्षसराज वृषपर्वा यांच्या राज्यांत येऊन दाखल झाला. तिथंच शुक्राचार्यांचा आश्रम होता. त्यांची भेट घेऊन त्यानं आपली ओळख करून देऊन सेवा करण्यास आलो आहे असं सांगितलं. खरं कारण गुप्त ठेवलं. त्यांच्या आज्ञेनुसार एक सहस्त्र वर्षं कठोर ब्रह्मचर्य पाळून त्यानं सेवाव्रत स्वीकारलं. कचाची शालीनता, आज्ञाधारकपणा व सेवाभावी वृत्ती यामुळे शुक्राचार्य प्रसन्न झाले. मोकळ्या वेळांत ते त्याच्याशी विविध विषयांवर चर्चा करू लागले. त्याचे व्यक्तिमत्त्व, देखणेपण व ज्ञान याकडे देवयानी आकृष्ट झाली. कचानंही पितापुत्रीची मनं अथक परिश्रमानं जिंकून घेतली. अंगिरसांचा नातू असल्यानं सर्व शास्त्र कला व विद्या यांत तो प्रविण होता. त्या दोघांच्या चर्चेत देवयानीही भाग घेऊ लागली. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यातील कौशल्यानं त्यानं देवयानीला संतुष्ट केलं. त्याच्या सततच्या सहवासामुळे देवयानी नकळत गुंतत गेली. त्यानं मात्र तिला भगिनी मानून मर्यादा सोडली नाही. एकांतात ती त्याला नृत्यगायनानं रिझवू लागली. नृत्य गायनातही अभिसारिका, मानिनी, विरहिणी, भामिनी प्रेमिका या स्त्रियांचा हटकून उल्लेख असे. आपल्या हळूवार फुलणाऱ्या प्रीतीच्या भावना कचापर्यंत जाऊन त्यानं प्रतिसाद द्यावा असाच तिचा प्रयत्न असे. पण कचानं मात्र एक कला या दृष्टीनंच तिकडे पाहिलं. संशयास्पद वागला नाही व प्रतिसादही दिला नाही.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

कचाचा आश्रमातील मुक्काम व देवयानीची त्याच्याशी नको इतकी सलगी काही असुरांच्या मनांत काट्यासारखी सलू लागली. कारण त्यांचीही मनं देवयानीत गुंतली होती. इंद्राचा नातजावई होण्याची स्वप्नं ते पाहात होते. कानांमागून येऊन तिखट झालेल्या कचावर त्यांनी बारीक नजर ठेवली.

कच कधी कधी असुरांचे पशुधन घेऊन रानावनांत चराईसाठी जाई. तो गुरूच्या सेवेचाच एक भाग होता. पहाटे गेलेला कच सूर्यास्तापूर्वीच परत आश्रमात येई. सायंकाळी येताना सरपण-समीधा गुरूसाठी आणि फळे-फुलं-मध देवयानीसाठी तो आणत असे. आता कच ही असुरांची डोकेदुखी झाली. त्याचा काटा काढण्यासाठी ते पाळतीवर राहिले. एकदा कच गुरे घेऊन वनांत गेला असता राक्षसांनी संधी साधून कचाला ठार मारलं. हत्यारानं त्याचे तुकडे करून लांडग्यांना खाऊ घालून पुरावा नष्ट केला. साळसूदपणे राज्यांत परत आले. संध्याकाळ होताच नेहमीच्या सवयीनं गुरे परतली, पण कचाची चाहूल लागेना. देवयानी चिंतीत झाली. रात्रभर वाट बघूनही तो परतला नाही तेव्हा तिनं तो कुठे मृत झाला असल्यास त्याला जिवंत करा असं सांगितलं. कारण अलीकडे कचाबरोबरचं दैत्यांचे वर्तन संशयास्पद असल्याचं तिनं पाहिलं होतं. शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानानं कच मृत झाल्याचं जाणलं. संजीवनी मंत्र जपून त्याला हाक मारली. त्याबरोबर ज्या लांडग्यांनी त्याला खाल्लं होतं त्यांची पोटं विदीर्ण करून कच गुरूपाशी आला. देवयानीनं विचारल्यावर त्यानं दैत्यांचं कृष्णकृत्य तिला सांगितलं. आता तर तिला कचाची फारच काळजी वाटू लागली. सकाळी कच जिवंत असल्याचं पाहून मारेकऱ्यांचा कपाळशूळ वृद्धिंगत झाला.

हा प्रसंग घडल्यानंतर देवयानीनं खात्री करून घेण्यासाठी कचाला मुद्दाम रानपुष्पं आणण्याच्या निमित्तानं जंगलात पाठवलं. दैत्य त्याच्या मागावरच होते. बेसावध कचावर त्यांनी हल्ला करून त्याला मारलं आणि त्याची गठडी वळून सागराच्या अथांग पाण्यांत भिरकावून दिली. शव समुद्रतळाशी गेलं, तसे ते राज्यांत परतले. त्या रात्री कच आला नाही तेव्हा तिचा तर्क खरा ठरला. त्याचं इथलं अस्तित्व दैत्यांना खुपते हे तिच्या लक्षात आलं. तिनं पुन्हा पित्याला गळ घातली. पित्यानं लेकीसाठी कचाला जीवदान दिलं. लाटांवर स्वार होऊन कच सागरतीरावर आला व आश्रमांत परतला.

तिसऱ्या खेपेस मात्र असुरांनी पूर्ण खबरदारी घेऊन कचाला ठार केलं व त्याला जाळून ती रक्षा फक्त शुक्राचार्यांच्याच मदिरेत बेमालूम मिसळली. असुर मदिरा व मदिराक्षीचे भोक्ते होते. गुरूसह सर्वजण मदिरेचा आस्वाद घेत असत. गुरूनं मदिरा प्राशन केल्यावर असुर आपापल्या गृही गेले. कच दिसेना तेव्हा त्याला ठार मारलं असावं असा देवयानीला संशय आला. गुरूनं अंतर्ज्ञानानं पाहिलं व ते चांगलेच हादरले. वास्तविक देवयानीनं कचाविषयी फाजिल आस्था दाखवणं त्यांना पसंत नव्हतं. पण दर वेळेस लाडक्या लेकीसाठी ते माघार घेत असत. यावेळेस मात्र त्यांच्या जीवावरच बेतणार होतं. ते लेकीला म्हणाले, ‘‘देवयानी, कचाला असूर ठार करतात अन् मी त्याला जिवंत करतो, हे एक कामच होऊन बसलं. देवलोकांतील व्यक्तीसाठी जीव टाकणं तुला शोभत नाही. तो बृहस्पतींचा पुत्र असला तरी त्याला जिवंत करणं आता शक्य नाही, कारण याक्षणी तो माझ्या उदरांत गेला आहे. ही ब्रह्महत्या करणाऱ्या दैत्यांचा कुळाचा विनाशकाल जवळ आला आहे, हेही तितकंच खरे. कच जिवंत झाला तर मी मरणार हे ओघानं आलंच.’’

शुक्राचार्यांना हतबल झालेलं देवयानी प्रथमच पाहात होती. कितीही बलाढ्य राक्षस, असुर वा दानव असो तो त्यांच्यापुढे नतमस्तक होत असे. याचं कारण त्यांना संजीवनी मंत्र येत होता. देवयानीला काही सुचेना. तिला पिताही हवा होता व पतीही. होय, तिनं कचाला मनोमन पती म्हणून मानलं होतं. पण ही मनीषा तिनं अजून व्यक्त केली नव्हती. अगदी मैत्रिणीना व जयंतीमातेलाही हे गुपीत ठाऊक नव्हतं. पण शुक्राचार्यांना थोडा अंदाज आला होता. मात्र त्यांनी कधीही याची वाच्यता केली नव्हती. आता मात्र देवयानी पेचात पडली. नेमका निर्णय तिला घेता येईना आणि कुणाला सल्लाही विचारता येईना.

अखेर मदिरेनेच घात केला असं शुक्राचार्यांना वाटलं. मद्याविषयी त्यांना घृणा आली. त्यांनी मद्यपींवर मर्यादा घालून दिली. ध्यानस्थ होऊन त्यांनी उदरस्थ कचाला विचारलं, ‘‘कचा, तू मद्यात कसा गेलास?’’ त्यावर त्यानं आतूनच सविस्तर घटना सांगितली. गुरूनं त्याबद्दल सर्व राक्षसकुळाचा उद्धार करून म्हटलं, ‘‘झालं ते झालं. तू माझा शिष्य आहेस. तू खरोखर अंगिरसांचा नातू आहेस, देवेंद्र नाहीस असं मी गृहीत धरतो. मी तुला संजीवनी मंत्राची दीक्षा देतो. ती लक्षपूर्वक ग्रहण कर. कारण ही विद्या तुला द्यावी लागेल असा ईश्वरी संकेतच दिसतो. तू त्या मंत्राद्वारे मला जिवंत कर. कारण तुझा पुनर्जन्म हा माझा मृत्यू होय.’’ असं म्हणून त्यांनी सावकाश मंत्र म्हटला. त्यानं तो शांत चित्तानं ग्रहण केला. नंतर गुरूंनी तो मंत्र पुन्हा म्हटल्याबरोबर कच त्यांचं उदर विदीर्ण करून बाहेर आला. गुरू वाळवीनं पोखरलेल्या प्रचंड स्तंभाप्रमाणे भूमीवर कोसळले. देवयानी व जयंती दुःखातिशयानं मूर्च्छित झाल्या. यावेळी पुनर्जन्म झालेला कच चंद्राप्रमाणे मनोहर व तेजस्वी दिसत होता. कचानं प्रथम मायलेकींना भानावर आणलं. संजीवनी मंत्र जपून त्यानं शुक्राचार्यांनाही जिवंत केलं. त्यांना व माता जयंतीला प्रणाम करून कच म्हणाला, ‘‘तात, आज मी तुमचा पुत्र झालो. सदैव तुमचा मी ऋणी राहीन.’’

.............................................................................................................................................

‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

त्यानंतर सहस्त्र वर्षं पूर्ण झाल्यावर कचानं गुरूकडे देवलोकी जाण्याची अनुज्ञा मागितली. देवयानी त्याच्या विरहाच्या कल्पनेनं विव्हल झाली. तिनं एकांतात संकोच सोडून म्हटले, ‘‘जिवलगा, मला सोडून एकटाच चाललास? माझं पाणिग्रहण करून तुला इथंच राहावं लागेल. कचा, माझ्या भावना तुला कधी कळणार? बोल ना?’’

कचावर तर हा वज्राघातच होता. तिला दूर लोटून तो म्हणाला, ‘‘देवी, शुद्धीवर ये. मी तुझ्याकडे कधीही त्यादृष्टीनं पाहिलं नाही. आता तर तू माझी भगिनी आहेस. देवी, या पवित्र नात्याला ‘विषयाचा’ डाग लावू नकोस.’’ कच याप्रकारे तिला अविचारापासून परावृत्त करत होता. मात्र तिच्या ते नेणिवेपर्यंत पोहोचत नव्हतं. इतक्या विनवण्या करूनही कच ऐकत नाही, ते पाहून तिनं दुर्गेचा अवतार धारण केला.

‘‘मूर्खा, तीन वेळा मी तुला जीवदान द्यायला भाग पाडलं. कृतघ्न व कठोर काळजाचा असशील याची कल्पना नव्हती. माझ्या पुष्पासारख्या मृदूभावनावर निखारे ओतलेस. माझ्या सोनेरी स्वप्नांची होळी केलीस. अमृत प्यालाऐवजी विषाची कुपी पुढे केलीस. संजीवनी विद्या तुझ्याकडून सफल होणार नाही असा मी शाप देते. चालता हो. माझ्या दृष्टीसमोरून निघून जा.’’ असं म्हणून ती ओंजळीत मुख लपवून विलाप करू लागली.

कचाचाही तोल गेला. तो म्हणाला, ‘‘गुरुकन्या म्हणून तुला मानत आलो. केवळ विद्येसाठी मी इथं आलो. कामवासनेनं बरबटलेले विचार करणाऱ्या मूर्ख मुली, कुणीही ऋषी वा विप्र तुझं पाणिग्रहण करणार नाही हा माझा शाप आहे. ज्याला मी विद्या शिकवीन तो ती फलद्रूप करील. समजलीस? चाललो मी.’’ असं म्हणून देवपुत्र कचानं त्या राक्षसकन्या देवयानीचा त्याग केला. तो दृष्टीआड होईपर्यंत देवयानी आश्रमाच्या दारांत भकासपणे उभी होती.

पदरांत प्रीतीपुष्पांचं निर्माल्य घेऊन.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Parag Patil

Mon , 26 November 2018

Gamma, 'एखादी गोष्ट हजारो वर्षांपासून चालू आहे ' चा अर्थ त्याच्यात काही बोध आहे असे होत नाही. उधारणार्त , १. भारतात जाती प्रथा हजारो वर्षांनी चालू आहे. २. ऍरिस्टोटल च्या पहिले हजारो वर्ष पृथ्वी विश्वाचे मध्य आहे हे हि प्रचलित होते. तात्पर्य, हजारो वर्षांपासून चालत आलेल्या सर्वच गोष्टी बरोबर आहेत असं म्हणून अदृश्य असलेला बोध शोधणे हा एक मूर्खपणा आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा : हे लिखाण ज्ञानात काहीही भर पाडत नसून, एक एकदृष्टी लिखाणकाम आहे असे माझे ठाम मत आहे.


Gamma Pailvan

Sun , 18 November 2018

पराग पाटील, काळ सगळ्या वस्तूंना कुरतडून नाहीसं करतो. मात्र ही कथा थोतांड असली तरीही काळावर मात करून हजारो वर्षं प्रचलित आहे. याचा अर्थ या कथेला काहीतरी सत्त्व आहे म्हणूनंच ना? काय असेल बरं हिचं सत्त्व? हिच्यातनं काही बोध घेता येतोय का? ओळखा पाहू ! आपला नम्र, -गामा पैलवान


Gamma Pailvan

Sun , 18 November 2018

नितीन, या गोष्टीत समाजाला फसवण्यासारखं काय आहे? आपला नम्र, -गामा पैलवान


Nitin

Sat , 17 November 2018

थोतांड, बाकी काही नाही. अजून किती उदात्तीकरण करणार, किती दिवस समाजाला फसवणार आहत.


Parag Patil

Sat , 17 November 2018

1. असुर चा अर्थ, जे सुरा, म्हणजेच दारू म्हणजेच मदिरा न पिणारे. त्यामुळे त्यांनी दारू पिली आणि त्यांना प्यायचीच सवय होती हे बोलणे चुकीचे आहे. 2. एक माणूस, जवळ पस 2 ते 3 हजार वर्षे एका परिवाराकडे फक्त लोभापायी राहतो, जेणेकरून फसवून फक्त संजीवनी मंत्र मिळावा, याच्यात मला देव दानावापेक्षा जास्त कपटी आणि विश्वास घातकी वाटतात. 3. जर हा कच, एवढा सरळ होता की त्या देवयानी ला तो भगिनी मानत होता, तर ते तो सरळ सरळ बोलू शकत होता, मूर्ख मुली बोलण्याचा संबंध काय? एकंदरीत, ही गोष्ट एक थोतांड आहे, ज्या गोष्टीतुन काहीही बोध न घेण्यासारखं आहे. वाचकांनी डोकं लावून वाचावी, लेखकाने परत न लिहावी आणि अक्षर नामा ने दखल घाव्ही अशी ही गोष्ट आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......