‘बुक्सनामा’ बेस्टसेलर पुस्तके
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
टीम अक्षरनामा
  • ‘बुक्सनामा’ बेस्टसेलर पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 15 September 2017
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक ‌Book of the Week बुक्सनामा बेस्टसेलर ‌Booksnama Bestseller

१. लढा नर्मदेचा - नंदिनी ओझा

मूल्य – ३५० रुपये, सवलतीत - २६३ रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3746

‘नर्मदा बचाव आंदोलन’ या सशक्त जनआंदोलनानं विस्थापितांना लढण्याचं बळ दिलं. या आंदोलनातल्या आदिवासी कार्यकर्त्यांच्या भूमिकेचं आणि योगदानाचं दखल घेणारं ‘लढा नर्मदेचा...’ हे पुस्तक. केशवभाऊ वसावे आणि केवलसिंग वसावे हे या लढ्याचा कणा असलेले दोन प्रमुख आदिवासी कार्यकर्ते. नंदिनी ओझा यांनी त्यांच्याशी संवाद साधून या आंदोलनाचा मौखिक इतिहास मांडला आहे. तीन दशकांच्या झुंजीची कथा सांगणाऱ्या, तसंच आदिवासींचं विस्थापनापूर्वीचं व नंतरचं जीवन आणि संस्कृती यावर प्रकाश टाकणारं हे एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे.

.............................................................................................................................................

.  पुतिन - गिरीश कुबेर

मूल्य – ३०० रुपये, सवलतीत - २४० रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3482

सोविएत संघराज्याचं विघटन झाल्यानंतर रशियात निर्माण झाली निर्नायकी. रशियाला साम्यवादाच्या जोखडापासून जास्तीत जास्त दूर नेण्याच्या नादात बोरिस येल्त्सिन यांनी अनेक प्रयोग केले. ते बहुतांशी फसले; तथापि व्लादिमिर पुतिन यांना सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयोग मात्र अपवाद ठरला. पुतिन निघाले महाबेरकी आणि तितकेच क्रूरही. यथावकाश येल्त्सिनना बाजूला सारून पुतिननी सारी सत्तासूत्रं आपल्या हातात घेतली. विरोधकांचा काटा काढताना त्यांना कसलाही विधीनिषेध बाळगला नाही. रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचा ध्यास घेऊन देशविदेशात त्यांनी जी पावलं उचलली, ती खूप वादग्रस्त ठरली. राष्ट्रवादाचा मुलामा दिलेली त्यांची व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही प्रदीर्घ काल टिकली तरी कशी, हा भल्याभल्या राजकीय निरीक्षकांची सत्त्वपरीक्षा पाहणारा एक महत्त्वाचा प्रश्न. त्या कुटप्रश्नाची एका व्यासंगी आणि गोष्टीवेल्हाळ पत्रकारानं करून दाखवलेली ही उकल... आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेता घेता एका जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची त्याच्या असंख्य भल्याबुऱ्या कंगोऱ्यांसह करून दिलेली ही ओळख...

.............................................................................................................................................

३. आयुर्वेद सर्वांसाठी (३ पुस्तकांचा संच) - वैद्य खडीवाले

मूल्य - ५०० रुपये, सवलतीत - ४०० रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4030

नामवंत आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी लिहिलेल्या १. घरगुती आयुर्वेदिक उपचार २. आयुर्वेदिक वनौषधी आणि ३. संपूर्ण आरोग्यवर्धिनी अशा तीन अत्यंत उपयुक्त पुस्तकांचा हा संच आहे. वैद्य खडीवाले हे गेले ५० वर्षे आयुर्वेदावर आधारित आरोग्य सेवा करत आहेत. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची ‘राष्ट्रीय गुरू’ म्हणून निवड केली आहे. 

.............................................................................................................................................

४. ‘फिक्स्ड् - मॅच-फिक्सिंगचा पर्दाफाश!’ - शंतनु गुहा राय, अनुवाद - मुकेश माचकर

मूल्य - २०० रुपये, सवलतीत - १८० रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4032

क्रिकेटमधील बेटिंग आणि फिक्सिंगच्या काळ्या बाजूवर झगझगीत प्रकाशझोत टाकणाऱ्या प्रख्यात शोधपत्रकार शंतनु गुहा राय यांच्या ‘फिक्स्ड् - कॅश अँड करप्शन इन क्रिकेट’ या बहुचर्चित पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. मुकेश माचकर यांनी या थरारक पुस्तकाचा रसाळ अनुवाद केला आहे.

या पुस्तकातील एक संपादित अंश वाचण्यास्तही क्लिक करा -

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1233

.............................................................................................................................................

५. आय​ अॅम अ ट्रोल - स्वाती चतुर्वेदी, मराठी अनुवाद - मुग्धा कर्णिक

मूल्य – २०० रुपये, सवलतीत - १८८ रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3506

इंटरनेट ट्रोल्स म्हणून वावरणाऱ्या या व्यक्ती नेटवरील वातावरण कलुषित करत असतात. ते वादावादी सुरू करतात, विचित्र हिंसक शेरेबाजी करून, चित्रे टाकून लोकांना भडकवतात. ऑनलाइन जगातले गुंडच ते! भारताच्या बाबतीत, असले ऑनलाइन ट्रोल्स बहुतेक वेळा उजव्या विचारसरणीचे आणि अतिराष्ट्रवादी असतात. सरकार, भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मते असलेले राष्ट्र यांना आव्हान देणाऱ्या कुणावरही ते हल्ले करतात...

या पुस्तकाची प्रस्तावना वाचण्यासाठी क्लिक करा-

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/947

.............................................................................................................................................

६. सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संपादक – डॉ. पी. विठ्ठल, डॉ. नागोराव कुंभार

मूल्य – २५० रुपये, सवलतीत - १८७ रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3743

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य हा एक प्रेरणा देणारा जीवनदायी किरणांचा अखंड स्त्रोत आहे. या प्रेरणास्त्रोतातून मिळणारी प्रेरणा जीवनाच्या प्रत्येक अंगास स्पर्श करून उल्हासित आणि उत्साहीत करते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये निराशेचे क्षण येतात, अशा वेळी निराश न होता कार्यरत राहण्याचा दिलासा बाबासाहेबांच्या जीवनातून मिळतो. बाबासाहेबांची बुद्धिमत्ता ही स्तिमित करणारी आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे हस्तीदंती मनोर्यातील नसून सर्वसामान्यांच्या उद्धाराचा ध्यास घेणारे आहेत. प्रज्ञा, शील आणि करुणा या त्रिसूत्रींचा जसा ते पुरस्कार करतात, तसेच समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या विचारांची सबळ पाठराखण ते करतात. भारत हे राष्ट्र म्हणून उदयास यावे, आणि ते चिरकाल टिकावे, यासाठी त्यांनी केलेली संविधान निर्मिती ही एक एकमेवद्वितीय अशीच आहे. शिक्षणविषयक त्यांचे विचार हे मूलगामी, परखड आणि दिशादर्शक असेच आहेत. सर्वसामान्यांचा आणि वंचित घटकांचा उद्धार हे त्यांचे ध्येय होते. वंचित घटकांचा उद्धार हे त्यातील एक प्रयोग होता. अर्थकारण, समाजकारण, राजकारण, धर्मकारण, शिक्षण, स्वातंत्र्य आणि इतर विषयात त्यांनी केलेले अध्ययन, मनन आणि चिंतन यातून हा बोध होतो. या सर्वदर्शी पैलूंचा वेध घेण्याचा प्रयत्न या ग्रंथात केला आहे. डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. जनार्दन वाघमारे, ज. वि. पवार यासारख्या लेखकांनी दिलेल्या योगदानाने हा ग्रंथ समृद्ध झाला आहे.

या पुस्तकातील एका लेखाचा संपादित अंश वाचण्यासाठी क्लिक करा-

http://www.aksharnama.com/client/article_detail/1073

.............................................................................................................................................

७. शम्मी कपूर ...तुमसा नाही देखा - रौफ अहमद, अनु मुकेश माचकर

मूल्य – ३२५ रुपये, सवलतीत - २६० रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4024

‘शम्मी कपूर : अ रेबेल स्टार’ हे ज्येष्ठ पत्रकार रौफ अहमद यांनी लिहिलेल्या शम्मी कपूरच्या अधिकृत चरित्राचा हा मराठी अनुवाद आहे. पत्रकार मुकेश माचकर यांनी हे पुस्तक अनुवादित केले आहे.

या पुस्तकातील संपादित अंश वाचण्यासाठी क्लिक करा -

http://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/1206

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......