‘बुक्सनामा’ बेस्टसेलर पुस्तके
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
टीम अक्षरनामा
  • ‘बुक्सनामा’ बेस्टसेलर पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 14 July 2017
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक ‌Book of the Week बुक्सनामा बेस्टसेलर ‌Booksnama Bestseller

१. आय​ अॅम अ ट्रोल - स्वाती चतुर्वेदी, मराठी अनुवाद - मुग्धा कर्णिक

मूल्य – २०० रुपये, सवलतीत - १८८ रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3506

इंटरनेट ट्रोल्स म्हणून वावरणाऱ्या या व्यक्ती नेटवरील वातावरण कलुषित करत असतात. ते वादावादी सुरू करतात, विचित्र हिंसक शेरेबाजी करून, चित्रे टाकून लोकांना भडकवतात. ऑनलाइन जगातले गुंडच ते! भारताच्या बाबतीत, असले ऑनलाइन ट्रोल्स बहुतेक वेळा उजव्या विचारसरणीचे आणि अतिराष्ट्रवादी असतात. सरकार, भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मते असलेले राष्ट्र यांना आव्हान देणाऱ्या कुणावरही ते हल्ले करतात...

या पुस्तकाची प्रस्तावना वाचण्यासाठी क्लिक करा-

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/947

.............................................................................................................................................

२. अंगारवाटा : शोध शरद जोशींचा - भानू काळे

मूल्य - ५०० रुपये, सवलतीत - ४०० रुपये

हे पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3480

काळे यांच्या या पुस्तकाचे महत्त्व यासाठी मोठे आहे की, त्यांनी शरद जोशी यांच्या संघर्षपूर्ण आयुष्याची वस्तुनिष्ठ मांडणी करण्याचा अतिशय संतुलित प्रयत्न केला आहे. शेतकरी संघटनेच्या बऱ्याच मोहिमांशी त्यांचा या ना त्या कारणाने अप्रत्यक्षरीत्या संबंध आला असल्याचे जोशींच्या आयुष्यातील पानापानावर चितारलेले बरेच प्रसंग वाचताना जाणवते....

या पुस्तकाचे परीक्षण वाचण्यासाठी क्लिक करा-

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/819

.............................................................................................................................................

३. रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि द वर्ल्ड इज फ्लॅट - नितिन भरत वाघ

मूल्य – १८० रुपये, सवलतीत - १६२ रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3508

वास्तव-अवास्तव, भ्रम-भासांच्या मायाजालात गुरफटलेल्या सापेक्ष अशा सत्याला भिडताना अनेक गोष्टी स्पष्ट करायला हव्यात. त्यासाठी प्रचंड उत्खनन करायला हवं. केवळ जातीच्या अंगाने जर नेमाडेंची चिकित्सा होत राहिली तर नेमका ध्रुव सापडणार नाही. एका गोष्टीकडे फक्त लक्ष वेधायचं आहे. ती म्हणजे काही गोष्टींबाबत नेमाडेंनी ठेवलेली संदिग्धता. ज्यांचा फायदा दोन्ही बाजूचे विरोधक तर घेतातच परंतु समर्थकही घेतात....

या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा संपादित अंश वाचण्यासाठी क्लिक करा -

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/948

.............................................................................................................................................

४. निवडक नरहर कुरुंदकर (ग्रंथवेध) - नरहर कुरुंदकर

मूल्य - ३००, सवलतीत - २२५ रुपये

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2362

ज्यांना पुरेशा गांभीर्याने ‘विचारवंत’ हे विशेषण लावता येईल असे महाराष्ट्रातील लेखक म्हणजे नरहर कुरुंदकर. आजच्या परिस्थितीतही कुरुंदकर हे समकालीन ठरतात. कुरुंदकरांनी केलेल्या महत्त्वाच्या मराठी पुस्तकांची समीक्षा इथे संकलित केली आहे.

.............................................................................................................................................

५. निवडक नरहर कुरुंदकर (व्यक्तिवेध) - नरहर कुरुंदकर

मूल्य - ३००, सवलतीत - २२५ रुपये

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2358

ज्यांना पुरेशा गांभीर्याने ‘विचारवंत’ हे विशेषण लावता येईल असे महाराष्ट्रातील लेखक म्हणजे नरहर कुरुंदकर. आजच्या परिस्थितीतही कुरुंदकर हे समकालीन ठरतात. कुरुंदकरांनी केलेल्या महत्त्वाच्या चरित्र लेखनाचे इथे संकलन केले आहे.

.............................................................................................................................................

६.  पुतिन - गिरीश कुबेर

मूल्य – ३०० रुपये, सवलतीत - २४० रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3482

सोविएत संघराज्याचं विघटन झाल्यानंतर रशियात निर्माण झाली निर्नायकी. रशियाला साम्यवादाच्या जोखडापासून जास्तीत जास्त दूर नेण्याच्या नादात बोरिस येल्त्सिन यांनी अनेक प्रयोग केले. ते बहुतांशी फसले; तथापि व्लादिमिर पुतिन यांना सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयोग मात्र अपवाद ठरला. पुतिन निघाले महाबेरकी आणि तितकेच क्रूरही. यथावकाश येल्त्सिनना बाजूला सारून पुतिननी सारी सत्तासूत्रं आपल्या हातात घेतली. विरोधकांचा काटा काढताना त्यांना कसलाही विधीनिषेध बाळगला नाही. रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचा ध्यास घेऊन देशविदेशात त्यांनी जी पावलं उचलली, ती खूप वादग्रस्त ठरली. राष्ट्रवादाचा मुलामा दिलेली त्यांची व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही प्रदीर्घ काल टिकली तरी कशी, हा भल्याभल्या राजकीय निरीक्षकांची सत्त्वपरीक्षा पाहणारा एक महत्त्वाचा प्रश्न. त्या कुटप्रश्नाची एका व्यासंगी आणि गोष्टीवेल्हाळ पत्रकारानं करून दाखवलेली ही उकल... आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेता घेता एका जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची त्याच्या असंख्य भल्याबुऱ्या कंगोऱ्यांसह करून दिलेली ही ओळख...

या पुस्तकाचे परीक्षण वाचण्यासाठी क्लिक करा -

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/968

.............................................................................................................................................

७. भारतातील मुस्लीम राजकारण - हमीद दलवाई

मूल्य - १५० रुपये, सवलतीत - १३५ रुपये

पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3492

हे पुस्तक आकाराने अगदीच छोटेसे आहे. अगदी खरेय! अगदी प्रस्तावनेसह मोजायचे झाले तरी उण्यापुऱ्या एकशे वीस पानांत ते संपूनही जाते. पण या ठिकाणी हेही लक्षात घेणे गरजेचे की, मुळात जाहीरनामे अर्थात मॅनिफेस्टो हे आकाराने लहानच असतात. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो तरी असा कितीसा मोठा आहे? साधारणतः दीडशे पानांत तो संपतो. जाहीरनामे हे नेहमीच आकाराने छोटे, थेट काय ते बोलणारे आणि समोरच्याचे लक्ष चटकन वेधून घेणारे असेच असतात.....

या पुस्तकाचे महत्त्व सांगणारा विनय हर्डीकरांचा लेख वाचण्यासाठी क्लिक करा-

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/902

.............................................................................................................................................

८. द मराठाज् (१६००-१८१८) - डॉ. स्टुअर्ट गॉर्डन, अनु. र. कृ. कुलकर्णी

मुल्य - २९५ रुपये, सवलतीत - २३६ रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/320

डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मधून सन १९७१मध्ये पीएच.डी. मिळवली. कैक वर्षे भारतात राहून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला आणि त्यातूनच ‘द मराठाज्’ हा ग्रंथ निर्माण झाला आहे. स्वातंत्र्यानंतर मराठा राज्यव्यवस्थेशी निगडित कागदपत्रांचा प्रचंड साठा संशोधकांसाठी उपलब्ध झाला. सरदार घराण्यांकडील कागदपत्रेही उपलब्ध झाली. डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांनी चिकित्सक वृत्तीने या साधनांचा अभ्यास केला असून मराठेशाहीचे प्रमुख आधारस्तंभ असलेल्या विविध देशमुख घराण्यांच्या अनुषंगाने या इतिहासाची मांडणी केली आहे. मराठे मुळात कोण होते, त्यांनी प्रतिष्ठा कशी मिळवली, त्यांची निष्ठा कशी बदलत होती आणि कायदेशीर हक्कांविषयी ते किती सजग होते अशा विविध प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हत्यारबंद टोळ्यांपासून सुसज्ज कवायती लष्करापर्यंत मराठ्यांच्या सैन्यात झालेला बदल, मराठ्यांनी विकसित केलेली महसूल व्यवस्था आणि त्यांनी नोंदलेल्या माहितीच्या भांडाराचा इंग्रजांना झालेला उपयोग अशा महत्त्वाच्या गोष्टींचीही विस्तृत चर्चा या पुस्तकात वाचायला मिळेल. मराठा कालखंडातील सामाजिक परिवर्तनाकडेही लक्ष वेधण्यात डॉ. गॉर्डन यशस्वी झाले आहेत. इतिहासाचे अभ्यासक आणि सामान्य वाचक अशा सर्वांना भावेल अशी खात्री वाटते.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा संपादित अंश वाचण्यासाठी क्लिक करा-

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/945

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......