धर्मश्रद्धेच्या क्षेत्रात आलेली नवी ‘विषाणू’बाधा पाहता, ढेऱ्यांनी घेतलेल्या श्रीविठ्ठलाच्या आद्य मूर्तीच्या शोधाकडे पुन्हा पाहायला हवे

सध्याच्या अभूतपूर्व स्थितीत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत १ जुलै २०२० रोजी ‘आषाढी एकादशी’ पार पडली. अशी अस्मानी-सुलतानी संकटे काही पहिल्यांदाच आलेली नाहीत. धर्मश्रद्धेच्या क्षेत्रात आलेली ही नवी ‘विषाणू’बाधा पाहता, ढेऱ्यांनी घेतलेल्या श्रीविठ्ठलाच्या आद्य मूर्तीच्या शोधाकडे पुन्हा पाहणे अत्यंत संयुक्तिक आणि रास्त आहे. ढेऱ्यांनी सर्व माध्यमे-साधने आणि जवळपास निर्दोष असणारी संशोधन पद्धती वापरली आहे.......