‘पथेर पांचाली’ : २१ व्या शतकातील जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट!
पडघम - सांस्कृतिक
देवेंद्र शिरुरकर
  • ‘पथेर पांचाली’चं एक पोस्टर आणि अरुणा ढेरे
  • Mon , 05 November 2018
  • पडघम सांस्कृतिक पथेर पांचाली Pather Panchali अरुणा ढेरे Aruna Dhere

एखादी मूळ साहित्यकृती फारशी मोडतोड न होता इतर माध्यमात साकारणे अथवा त्याचे रूपांतरण करणे तसे सोपे नसते. मुळात एखाद्या कलाकृतीच्या आधारावर दुसरी कलाकृती अथवा इतर माध्यमांत त्याचा आविष्कार करण्याचा मोह होणे हा तिच्या उपजत दमदारपणाचा प्रभाव असतो. ही सरळ कबुली असते त्या-त्या कलाकाराच्या सृजनशीलतेला दिलेली. तिचा अंगीकृत प्रवाहीपणा, पावित्र्य अबाधित राखत त्याचा अन्य माध्यमातला आविष्कार हासुद्धा तेवढाच मोहक आणि रसग्रहण करण्यासारखा असतो. 

२१ व्या शतकातील जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट असे शंभर चित्रपट निवडण्यात आले आहेत, ज्यात आपल्या ‘पथेर पांचाली’ या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत एकाच भारतीय चित्रपटाची वर्णी लागू शकली यावरून अद्याप चर्चा सुरू व्हावयाची आहे. सत्यजित रे यांच्या दिग्दर्शनाखालील ‘पथेर पांचाली’चा गौरव हा बिभुतिभूषण बंधोपाध्याय यांचाही गौरव आहे. १९२९ साली बिभुतिभूषण बंधोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘पथेर पांचाली’ या साहित्यकृतीवर याच नावाने सत्यजित रे यांनी १९५५ साली चित्रपट काढला. रे यांचा हा मोठ्या पडद्यावरचा कलाविष्कार खरेतर हल्लीच्या सर्वांनाच पथदर्शक ठरावा असा आहे.

चित्रपटनिर्मिती हा धंदा झाल्याचा आजचा काळ आणि ‘पथेर पांचाली’चा निर्मितीचा काळ यात तसे महद्अंतर आहे. दिग्दर्शकाला त्यातला धंदा, व्यवसाय न कळण्याचा हा काळ आहे. मुळात सृजनशीलता ही अशी भौतिक समीकरणांनी बांधली जाणारी कृती असतेच कुठे? काहीतरी आतून सांगण्याची ही अनिवार अशी ओढ असते, त्यातून विकसित झालेली, गुण-दोषांसकटची अभिव्यक्ती असते ती. बीबीसीने पाहणी करून तयार केलेल्या यादीत परदेशी भाषांमधील कलाकृतींचा समावेश आहे.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

यात भारतीय म्हणून ‘पथेर पांचाली’चा समावेश करण्यात आला असून सर्वोत्कृष्टच्या निकषांत हिंदी चित्रपटाचा समावेश नाही, ही एक गोष्ट आणि जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या १९५० साली प्रदर्शित ‘सेव्हन सामुराई’चा यादीत समावेश असला तरी तो जपानी समीक्षकांच्या पसंतीस पडलेला चित्रपट नाही, ही दुसरी गोष्ट समाधानकारक आहे. कलाकृतींना बांध घातले जाऊ शकत नाहीत, नव्हे ते असे घालायचेच नसतात, या तत्त्वानुसार ‘पथेर पांचाली’चा हा सन्मान निखळ कलाकृतीचा सन्मान मानायला हवा. तसाच तो बंधोपाध्याय यांच्या कसदार लेखणीचाही सन्मान आहे. बंगाल तसा प्रथमपासूनच सर्वार्थाने समृद्धच. बंधोपाध्याय यांचे ‘पथेर पांचाली’ असो वा आरण्यक, सुनील गंगोपाध्याय यांचे  ‘प्रथम आलो’ असो वा ‘मुजरिम हाजिर हो’सारखी अर्थगर्भ कलाकृती असो. या बंगाली कलाकृतींनी त्या-त्या काळातल्या समष्टीचा आणि एका अथांग काळप्रवाहातील सर्वांगाचा घेतलेला वेध, त्यांनी रसिकमनांवर केलेले साहित्यसंस्कार, वाचनानंदाची गोडी सगळेच अद्भुतरम्य आहे. साहित्याचे समीक्षक या सगळ्यांबद्दल यथार्थ व अधिकारवाणीने  सांगू शकतील. भारतात असा दरारा, लौकिक बंगालपाठोपाठ महाराष्ट्राचाही मानला जातो.

आधुनिकीकरणाच्या सर्वच टप्प्यांतील नवता, उदारमतवाद, मोकळेपणा, स्वीकारार्हता आणि सौंदर्यदृष्टी आंगोपांगी व पानोपानी खेळवणारे बंगाली साहित्यविश्व जसे पुढे सरकत गेले, उन्नत होत गेले तसा प्रवाहीपणा अन्यत्र क्वचितच पहावयास मिळेल.

काळानुसार बदलते प्रवाह सामावून घेत अथवा त्यापलीकडेही मजल मारत सुरू असणारी ही साहित्यविश्वाची वाटचाल यथार्थपणे वैश्विकतेशी जोडल्या जाते. अशा साहित्यकृती सार्वकालिक अभिजात असतात. ‘पथेर पांचाली’सारख्या साहित्यकृती अशा सर्वव्यापक असतात. त्या अभिजात तर असतातच शिवाय लोकप्रियही असतात. सध्या प्रकर्षाने पाहावयास मिळणारी सवंगता त्यात प्रवेश करू शकत नाही.

मराठी साहित्यजगतातही काही प्रतिभावंतांनी अशी मजल मारलेली आहे, अर्थात कंपूशाही, आत्मप्रौढी आणि कोशाबाहेर न पडण्याची मानसिकता हे त्रिदोष इतरांपेक्षा इथे जरा अधिक दिसून येतात हे खरे. मूळ कलाकृतीचा गाभा न हरवता त्याचा इतर माध्यमात आविष्कार साधण्यासाठी अंगी प्रतिभाशक्तीच हवी. त्याची कसर तंत्रज्ञानातल्या कसरतींनी भरून काढण्याचा केविलवाणा प्रकार सत्यजित रे यांच्या काळात नव्हता. एक अभिजात शब्दसौंदर्य रसिकांसमोर चित्रमय स्वरूपात सादर करण्याचा ध्यास सोडला तर चित्रपटासाठी पैसेही नव्हते.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/ya2ydx3u

.............................................................................................................................................

प्रतिकूलतेशी दोन हात करत तीन वर्षांच्या कालावधीत ‘पथेर पांचाली’ मोठ्या पडद्यावर आला. हे वास्तव आजच्या गल्लाभरू निर्मात्यांनी व नकलाकार सुपरस्टार्सनी आवर्जुन लक्षात घेण्यासारखे आहे. अभिव्यक्तीच्या नावाखाली इतिहासाची तोडफोड, लोकभावनांशी खेळ करत कोट्यवधींचा चुराडा करूनही चित्रपटात एखादे आयटम साँग घालावेच लागत असेल तर या सगळ्यांची गुणवत्ता व दर्जा याची चर्चाच न करणे बरे. चित्रपटसृष्टी असो वा साहित्यविश्व गुणवत्ता व लोकप्रियता असे दोन स्वतंत्र निकष पहावे लागतात ते वरील सवंगतेमुळेच. लोकांना पचेल न पचेल ते लिहिण्याचे धाडस आणि लोकांना हवे ते विकण्याचा धंदा करणारे यातला हा फरक आहे.

कसदार साहित्यापेक्षा अशी दुकानदारी करणारे या सवंग मलिनतेचे सहप्रवासी होतात. कलाविष्कारापेक्षा, थेट अभिव्यक्तीच्या आग्रहापेक्षा ‘प्रति आणि आवृत्ती’चा खेळ बेधुंद व्हायला लागतो. या गढूळ लोंढ्याला मूळ प्रवाह समजण्याचा मूर्खपणा वाचक करत नाही हे यांचे दुर्दैव! या लोंढ्यात साहित्याचा आत्मा भरकटत गेला तरी त्याची तमा बाळगण्याएवढा विवेक राखण्याचे भान या सुमारांना कुठचे राहणार? प्रस्थापिताविरोधातून मुळे रोवणारे लेखक लेखकराव होतात आणि प्रस्थापित चौकटीत आपली वीट रचून मोकळे होतात. या सगळ्या आत्मविलासी कंपूशाहीत वाचक, रसिकांशी असणारा ऋणानुबंध तुटतो तो कायमचाच. संमेलनाचे सुंदर सोहळेदेखील या गलिच्छ राजकारणातून सुटत नाहीत. 

वाचकांशी, साहित्याशी बांधीलकी जोपासून समर्पित  आयुष्य जगणारे दिग्गज रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात, पण संमेलनापासून दूर राहतात तर काहीजण अध्यक्षपदी विराजमान झाल्यावरच त्यांच्या साहित्यिक असल्याचा साक्षात्कार घडवून आणतात. सर्वोत्कृष्टच्या यादीत ‘पथेर पांचाली’चा समावेश आणि यंदाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणाताईंची बिनविरोध झालेली निवड ही कलाविश्वाने सवंगतेपासून दूर राहण्याचा निर्णय असेल तर या घडामोडींचा आनंद मानायलाच हवा.

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......