जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…
पडघम - विदेशनामा
भावेश ब्राह्मणकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 15 April 2024
  • पडघम विदेशनामा बोत्सवाना Botswana जर्मनी Germany शिकार ट्रॉफी Trophy Hunting हत्ती Elephant

जगभरात सध्या एका धमकीची विशेष चर्चा आहे. ती म्हणजे, जर्मनीमध्ये तब्बल २० हजार हत्तींचा कळप सोडून देण्याची. मात्र ही धमकी काही दहशतवादी संघटनेने किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेली नाही, तर चक्क एका देशाच्या अध्यक्षांनी दिली आहे. त्यामुळे तिला विशेष महत्त्व आहे. ही धमकी का देण्यात आली, कुठल्या देशाने दिली, याविषयीचा हा विशेष लेख....

.................................................................................................................................................................

भारतामध्ये जसा बिबट्या आणि हत्ती यांच्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष आहे, अगदी तशाच प्रमाणे जगातील अनेक देशांमध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामागे वृक्षतोड, विकासासाठी जंगलांमध्ये मानवी हस्तक्षेप आणि विविध प्रकारचे कारणे आहेत. बोत्सवाना हा अफ्रिका खंडातील एक देश. या देशात सध्या हत्तींचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या देशात हत्तींची संख्या आहे तब्बल १ लाख ३० हजारांहून अधिक. एका देशातच एवढे हत्ती झाल्याने अनेकानेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

मुळात हा देश गरीब आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बोत्सवाना आणि जर्मनी यांच्यात नेमका काय वाद आहे, ते आधी समजून घेऊया. जर्मनीतून मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि शिकारी हे बोत्सवानामध्ये येतात. विशेष म्हणजे, बोत्सवानामध्ये शिकारीला अधिकृत परवानगी आहे. तसेच, हत्तींचे शीर परत घेऊन जाण्याची मुभाही शिकारी असलेल्या पर्यटकांना आहे. त्यापोटी बोत्सवाना सरकारला पैसे द्यावे लागतात. खरे सांगायचे, तर बोत्सवाना सरकारची अर्थव्यवस्थाच यातून चालते. कारण जगभरातून शिकारी येथे हत्तींची शिकार करण्यासाठी येतात.

आता जर्मनीने नेमके काय केले ते पाहूया. या वर्षाच्या सुरुवातीला जर्मनीच्या पर्यावरण मंत्रालयाने असे सुचवले की, शिकार करणारे आणि वन्यजीवांचे अवयव आयात करण्यावर कठोर मर्यादा असावी. याचा मोठा परिणाम बोत्सवानाच्या पर्यटन आणि शिकारीवर होणार आहे. कारण जर्मनीमधून मोठ्या संख्येने शिकारी येतात. ते प्रमाण कमी झाले, तर बोत्सवानावर आर्थिक परिणाम तर होईलच, पण हत्तींच्या वाढलेल्या संख्येमुळेही अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत.

बोत्सवानाचे अध्यक्ष मेस्सी यांनी जर्मन प्रसारमाध्यमांना सांगितले की, जर्मनीच्या या निर्णयामुळे बोत्सवानातील लोक गरीब होतील. आमच्या विशेष संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे हत्तींच्या संख्येचा स्फोट झाला आहे. शिकारीमुळे त्यांना नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. जर्मन आम्हाला सांगतात की, प्राण्यांसोबत राहायला हवे. तसे आम्ही सांगतो की, त्यांनी राहून दाखवावे, असे मोस्सी यांनी म्हटले आहे.

बोत्सवानामध्ये जागतिक संख्येच्या तुलनेत तब्बल एक तृतीयांश हत्ती आहेत.  १ लाख ३० हजारांहून अधिक हत्ती सध्या तेथे आहेत. त्यामुळे तेथे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हत्तींचे कळप मालमत्तेचे नुकसान करत आहेत. शेत पिके खात आहेत. रहिवाशांनाही पायदळी तुडवत आहेत. वाढत्या संख्येमुळे बोत्सवानाने यापूर्वी शेजारच्या अंगोला या देशाला ८ हजार हत्ती दिले आहेत. त्यानंतर आता मोझांबिक या देशालाही शेकडो हत्ती देऊ केले आहेत. हाच धागा पुढे नेत मेस्सी यांनी धमकी दिली की, आम्ही जर्मनीला भेट देऊ इच्छितो. २० हजार हत्तींचा कळप आम्ही जर्मनीत पाठवू, असे त्यांनी स्पष्ट केले. 

यापूर्वी बोत्सवानाचे वन्यजीव मंत्री डुमेझवेनी म्थिमखुलु यांनी गेल्या महिन्यात इंग्लंडला धमकी दिली होती. १०,००० हत्ती लंडनच्या हायड पार्कमध्ये आम्ही पाठवू. जेणेकरून ब्रिटिश लोकांना त्यांच्यासोबत राहण्याचा आनंद मिळेल. शिकार करून त्याची ट्रॉफी मायदेशात आणण्यावर बंदी घालावी, या प्रस्तावावर इंग्लंडच्या खासदारांनी गेल्या मार्च महिन्यात मतदान केले, परंतु कायदा होण्यापूर्वी या कायद्याची आणखी छाननी करणे आवश्यक आहे, असे म्थिमखुलु यांनी म्हटले आहे.

इंग्लंडच्या कन्झर्व्हेटिव्ह पार्टीने २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यात म्हटले होते की, शिकारीला आम्ही प्रोत्साहन देणार नाही. म्हणूनच शिकार ट्रॉफीवर आम्ही बंदी घालू. 

बोत्सवाना आणि इतर दक्षिण आफ्रिकन देश हे श्रीमंत पाश्चात्य देशातील पर्यटक आणि शिकारींकडून भरपूर पैसे कमावतात. हत्तींची शिकार परवानगीसाठी हजारो डॉलर्स घेतले जातात. हत्तींचे डोके किंवा त्वचा ट्रॉफी म्हणून घरी घेऊन जाण्याची परवानगी मिळते.

बोत्सवानाचे अध्यक्ष मेस्सी म्हणतात की, आम्ही हा पैसा संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी आणि स्थानिक लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वापरतो. यात गैर काहीही नाही. मात्र, अनेक प्राणी प्रेमी संघटनांनी या शिकारीवर प्रखर टीका केली आहे. हे क्रूर आहे आणि त्यावर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. 

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मेस्सी सांगतात की, काही भागांत माणसांपेक्षा हत्ती व वन्यजीवांची संख्या जास्त आहे. ते त्यांच्या मार्गात येणाऱ्या माणसांना, लहान मुलांनाही पायदळी तुडवतात. शेतकऱ्यांची पिके उदध्वस्त करतात. आमच्या जनतेला उपाशी ठेवतात.

‘ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल’च्या अहवालानुसार, जर्मनी हा आफ्रिकन हत्तींची ट्रॉफी आणि शिकार यांचा सर्वांत मोठा आयातदार आहे. बोत्सवानाने २०१४मध्ये शिकारीवर बंदी घातली होती, परंतु नागरिकांचे मोठे आंदोलन झाले. अखेर पुन्हा २०१९मध्ये शिकारीवरील निर्बंध उठवण्यात आले.  आता तेथे नियंत्रित स्वरूपात शिकारीला परवानगी दिली जाते. कोटा जाहीर केला जातो आणि त्याचे पालन केले जाते, असे मेस्सी यांचे म्हणणे आहे. 

पाळीव प्राण्यांच्या अन्नासाठी हत्तींचा वापर करण्याचाही विचार यापूर्वी झाला आहे. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि बेल्जियम या देशांनी यापूर्वीच शिकार ट्रॉफीवर आणि व्यापारावर बंदी घातली आहे. बोत्सवानाचे शेजारी देश असलेल्या झिम्बाब्वे आणि नामिबियानेदेखील एक मागणी केली आहे: आम्हाला हस्तिदंताचा साठा विकण्याची परवानगी मिळावी. जेणेकरून आम्हाला पैसे कमवू शकतील. पूर्व आफ्रिकेतील देशांनी, तसेच प्राणी प्रेमी संघटनांनी याला विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, यामुळे शिकारीला प्रोत्साहन मिळेल.

.................................................................................................................................................................

लेखक भावेश ब्राह्मणकर पर्यावरण आणि संरक्षण क्षेत्राचे अभ्यासक व मुक्त पत्रकार आहेत.

bhavbrahma@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......