‘भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी’ आणि ‘मैत्री मनाशी’ : मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबतची सजगता, सतर्कता आणि जाण वाढवणारी पुस्तके
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राहुल विद्या माने
  • ‘भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी’ आणि ‘मैत्री मनाशी’ या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Mon , 08 January 2024
  • ग्रंथनामा शिफारस भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी Bhavnik Prathmopchar Gharchya Ghari मैत्री मनाशी Maitri Manashi

कोविडपाठोपाठ जगभर मानसिक अस्वस्थतेची एक साथ येऊन गेली. तिचे पडसाद अजूनही चालूच आहेत. अर्थात हेही तितकेच खरे की, अलीकडच्या काळात जगातील जवळपास सर्वच देशांत, समाजांत मानसिक स्वास्थ्याबद्दलची सजगता वाढू लागली आहे. खरं तर ती आता दैनंदिन मूलभूत गरजांइतकी महत्त्वाची झाली आहे. अन्न, वस्त्र, निवारा, इंटरनेट आणि मानसिक आरोग्य, अशी आधुनिक जीवनशैलीची ‘पंचसूत्री’ सांगता येतील.

भारतात दर हजार लोकसंख्येमागे उपलब्ध असलेल्या मानसोपचारतज्ज्ञांची संख्या अतिशय कमी आहे. त्यात भर म्हणजे बऱ्याचशा समस्या अज्ञान, अनास्था यांमुळे निर्माण होतात. आपल्या वागण्यातील बऱ्याचशा नकारात्मक बदलांची नोंद, अभ्यास आणि त्यांचे विश्लेषण हे पुरेशा वैज्ञानिक पद्धतीने होत नाही अन् त्यावर विवेकी संवादही होत नाही.

अर्थात या संवादासाठी मोकळ्या मनाची आणि समोरच्याचे ऐकून संयमी, तर्कशील प्रतिसाद देणे गरजेचे असते. त्यासाठी सर्वसाधारणपणे आपल्या भवतालच्या माणसांचा या विषयावरील प्राथमिक जागृतीचा लसाविसुद्धा सकारात्मक असावा लागतो. त्याचबरोबर सामूहिक साक्षरता आणि सामूहिक इच्छाशक्ती यांची टक्केवारी वाढवावी लागते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

म्हणूनच याच विषयावरील नुकत्याच प्रकाशित झालेल्या दोन पुस्तकांची दखल घेणे अत्यावश्यक आणि गरजेचे ठरते. डॉ. हमीद दाभोलकर यांचे ‘भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी’ आणि दीपक पाटील यांचे ‘मैत्री मनाशी’ ही ती दोन पुस्तके. हे दोन्ही लेखक मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे या पुस्तकांचे स्वरूप केवळ माहितीचे संकलन अशा प्रकारचे नसून ते अभ्यास, अनुभव आणि कार्यानुभवातून आलेले आहे. माहितीचे नेमकेपण, अचूकता आणि बदलत्या काळानुसार मानसिक ताणतणावांच्या व्यवस्थापनासमोरची आव्हाने लक्षात घेऊन सोप्या भाषेतले, पण वैज्ञानिक भान जागवणारे लेखन, ही या पुस्तकांची वैशिष्ट्ये सांगता येतील. 

दाभोळकर यांच्या पुस्तकात ‘जागतिक आरोग्य संघटने’ने सुरू केलेल्या ‘मानसिक प्रथमोपचार मोहिमे’च्या अनुषंगाने आणि मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आलेल्या अनुभवांच्या आधारे मांडणी केली आहे. समाजातील सर्वच आर्थिक किंवा सामाजिक स्तरांत मानसिक आरोग्याबाबतच्या अज्ञानाचा आणि गैरसमजांचा निर्देशांक बराच मोठा असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण दाभोळकर नोंदवतात.

अज्ञान दूर करून मनोव्यापाराबद्दल वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्याच्या दृष्टीने संवाद साधणे, मानसिक आधार देण्याचे कौशल्य शिकणे आणि इतरांच्या ताणतणावाची कारणे समजून घेण्यासाठी व त्यापासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी वापरणे, ही या प्रथमोपचाराची सुरुवातीची पावले आहेत, यावर ते भर देतात.

हे स्पष्ट करताना दाभोळकर ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या ‘मानसिक प्रथमोपचार पुस्तिके’मध्ये उल्लेख केलेल्या काही पायऱ्या नमूद करतात.

मानसिक प्रथमोपचार म्हणजे :

- व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप न होईल याप्रमाणे त्यांना आधार देणे आणि त्यांची काळजी घेणे.

- अन्न, पाणी या प्रकारच्या लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे.

- मानसिक आधाराची गरज असलेल्या व्यक्तींचे ऐकण्याची तयारी ठेवणे, पण त्यांना बोलायला भाग पाडण्यासाठी दबाव टाकू नये. 

- त्यांना बरं वाटेल आणि ते शांत होतील यासाठी प्रयत्न करणे.

- अधिक हानी होण्यापासून त्यांना वाचवणे. 

दाभोळकर यांनी सहा भागांत पुस्तकाची रचना केली आहे. पहिल्यात मनाच्या प्रश्नांची तोंडओळख करून दिलेली आहे. दुसऱ्यात मनातील भावनांच्या विविध छटा समजावून सांगितल्या आहेत. यामध्ये मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अनेक प्रसंगांना, अवस्थांना आपण सामोरे जात असतो, त्याबद्दल माहिती दिली आहे. यात अपराधीपणा, रागाचा स्फोट, दारुण अपयश, चिंताग्रस्त राहणे, भीती व अप्रिय घटना घडणे, तसेच निराशेच्या टोकातून आत्महत्येचे विचार येणे, लैंगिक भावनांची गुंतागुंत, संशय अशा विविध मनोवस्थांबद्दल दैनंदिन जगण्यातील काही गोष्टी सांगून संवाद साधला आहे.

त्याचप्रमाणे मानसिक प्रथमोपचार म्हणजे काय नाही, हेसुद्धा ‘जागतिक आरोग्य संघटने’ची पुस्तिका स्पष्ट करते.

- मानसिक प्रथमोपचारचे काम फक्त प्रशिक्षित तज्ज्ञ करू शकतात असे अजिबात नाही.

- हे काम म्हणजे व्यावसायिक पातळीवरचे समुपदेशन नाही

- ज्या कारणांमुळे तणाव वाढतो, त्याची कारणमीमांसा करून सखोल विश्लेषण करण्याचे ते ‘debriefing’ सत्र नाही.

- एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत काय काय आणि कसे कसे झाले, त्याचा क्रमवार आलेख मांडणे म्हणजे प्रथमोपचार नाही.

- व्यक्ती-व्यक्तींच्या आयुष्यात घडत असलेल्या कहाण्या ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी उपलब्ध असणे, हे यात येऊ शकते, परंतु याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला एखाद्या घटनेबद्दल प्रतिक्रिया देण्यास दबाव टाकणे, हे येत नाही.

हे सर्व लक्षात घेऊन ताण-तणावातील व्यक्तीला मदत करताना तिच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पार्श्वभूमीनुसार वागवणे, तिच्या हक्कांचे उल्लंघन होऊ नये यासाठी काळजी घेणे, चुकीची माहिती न देणे, आपल्या कौशल्याबद्दल अवाजवी दावा न करणे, तिच्या आत्मसन्मानाला ठेस लागू नये, यासाठी विशेष प्रयत्न करणे, हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे, यावर ‘जागतिक आरोग्य संघटना’ विशेष भर देते. 

दाभोळकर यांनी सहा भागांत पुस्तकाची रचना केली आहे. पहिल्यात मनाच्या प्रश्नांची तोंडओळख करून दिलेली आहे. दुसऱ्यात मनातील भावनांच्या विविध छटा समजावून सांगितल्या आहेत. यामध्ये मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अनेक प्रसंगांना, अवस्थांना आपण सामोरे जात असतो, त्याबद्दल माहिती दिली आहे. यात अपराधीपणा, रागाचा स्फोट, दारुण अपयश, चिंताग्रस्त राहणे, भीती व अप्रिय घटना घडणे, तसेच निराशेच्या टोकातून आत्महत्येचे विचार येणे, लैंगिक भावनांची गुंतागुंत, संशय अशा विविध मनोवस्थांबद्दल दैनंदिन जगण्यातील काही गोष्टी सांगून संवाद साधला आहे.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

बीबीसीने एका अहवालात करोना संपल्यावर मानसिक आरोग्याच्या समस्यांची त्युनामी येईल, असं म्हटलं होतं. ते दुर्दैवानं आता खरं ठरताना दिसू लागलं आहे…

भारतात कामाच्या ठिकाणच्या मानसिक आरोग्यावर अजूनही पुरेसं शास्त्रोक्त पद्धतीचं काम झालेलं नाही. भारतीयांच्या अ-वैज्ञानिक दृष्टीकोनसुद्धा यासाठी कारणीभूत आहे

संशोधन सांगतं की, सतत ऑनलाइन व्यवहार/देवाणघेवाण करणारे लोक हळूहळू प्रत्यक्ष व्यवहार करण्यात असमर्थ ठरतात. त्यांच्या ‘सामाजिक क्षमतां’चा ऱ्हास होत जातो!

सर्वच वयोगटांत आक्रमकता व हिंसा याचं प्रमाण वाढलं आहे. परंतु वाढत्या वयातील मुलं-मुली यांच्यातलं गुन्ह्यांचं प्रमाण चिंताजनक आहे

..................................................................................................................................................................

तिसऱ्या भागात आपण स्वत:च स्वत:ला कसे सावरू शकतो, याबद्दल छोट्या व सोप्या उपायांची माहिती दिली आहे. चौथ्यात मानसिक आरोग्य आणि नाती-गोती यांचा आढावा घेतला आहे. पाचव्यात भावनिक प्रथमोपचारामध्ये आवश्यक असलेली काही पथ्ये आणि मर्यादा याबद्दलची चर्चा आहे. सहाव्या आणि शेवटच्या भागात मनाची निगराणी करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे सांगितले आहे.

दीपक पाटील यांचे ‘मैत्री मनाशी’ हे दुसरे पुस्तक मानसिक आरोग्याच्या समस्या, त्यांची लक्षणे, त्या दूर करण्यातील विविध आव्हाने यांची चर्चा करते. याच्या पहिल्या भागात मानसिक आरोग्य म्हणजे काय, चांगल्या मानसिक आरोग्याची लक्षणे काय, मानसिक आजार म्हणजे काय, त्याचे प्रकार व लक्षणे कोणती, आजार व उपचाराचा कालावधी किती आणि मानसिक आरोग्य व अंधश्रद्धा कोणकोणत्या आहेत, याची माहिती दिली आहे.

दुसऱ्यात मानसिक आजारशी निगडीत कलंकाची भावना यावर भर दिला आहे. कलंकाच्या भावनेमुळे रुग्ण व कुटुंबावर होणारे परिणाम आणि ती हाताळण्याच्या पद्धती, याची चर्चा केली आहे.

तिसऱ्यात मानसिक आजार आणि व्यसन यांचा परस्परसंबंध उलगडून सांगितला आहे. यात व्यसन म्हणजे काय, व्यसन हा मानसिक आजार आहे का, त्याचे सर्वसाधारण प्रकार कोणते, व्यसनी व्यक्तीची शारीरिक व मानसिक लक्षणे, दारू-अमली पदार्थ वगैरे व्यसने कशी वाढत जातात, व्यसन करण्याची कारणे आणि व्यसनाचे कुटुंबावर, समाजावर काय परिणाम होतात, याची मांडणी केली आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मानसिक आरोग्याचे मूलभूत ज्ञान वाढवण्याबरोबर या आजाराचे ‘कलंक’ व ‘व्यसनाधीनता’ हे दोन महत्त्वाचे दुष्परिणाम या पुस्तकात अधोरेखित केले आहेत. या पुस्तकाच्या निर्मितीमागची सर्व माणसे ग्रामीण भागात मानसिक आरोग्याबद्दल सर्वेक्षण, संवाद आणि समुपदेशन करणारी आहेत. कार्यकर्ता म्हणून आणि या विषयाचे जाणकार म्हणून, या व्यक्ती कोणत्याही विशेष आर्थिक पाठिंब्याशिवाय समाजप्रबोधन करण्याचे काम करतात.

या छोट्या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात आलेल्या महत्त्वाच्या संकल्पना सोप्या करून सांगणारे तक्ते, याद्या, फ्लो-चार्टस, सचित्र गोष्टी. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींनाही मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार यांबाबतची आपली समज वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.  

दाभोळकर यांच्या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाचे नाव आहे- ‘मानसिक आरोग्याच्या क्षितिजावर तांबडे फुटत आहे’. ‘जे जे क्लिष्ट ते ते सोपे करून सांगावे, सजग - संवेदनशील करून सोडावे सकळ जण’, अशी या दोन्ही पुस्तकांची भूमिका आहे.

थोडक्यात, ही दोन्ही पुस्तके मानसिक आरोग्याबाबत समंजस जागृती करण्याचे चांगले काम करतील, असा विश्वास वाटतो.

‘भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी’ - डॉ. हमीद दाभोलकर

राजहंस प्रकाशन, पुणे | पाने - १३० | मूल्य - २०० रुपये.

‘मैत्री मनाशी’ - दीपक पाटील

पाने – ४० | मूल्य – ५० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक राहुल विद्या माने अनुवादक, मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत.

nirvaanaindia@gmail.com
.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......