टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • चित्र - श्रीनिवास आगवणे
  • Fri , 07 April 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या रवींद्र गायकवाड Ravindra Gaikwad उर्जित पटेल Urjit Patel केंडाल जेन्नर kendall jenner

१. खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानप्रवासाची बंदी उठवा अथवा एनडीएच्या जेवणाच्या निमंत्रणावर बहिष्कार घालू असा राणा भीमदेवी पवित्रा शिवसेनेने घेतलेला असताना कथानायक खासदारांनी मात्र अखेर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि आपल्या कर्तव्यांचं योग्य निर्वाहन करण्यासाठी आपल्यावरची विमान प्रवासाची बंदी उठवण्याची विनंती नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांना केली.

‘बैल गेला आणि झोपा केला’ ही म्हण मराठीत का जन्माला आली, हे मान्यवर गायकवाडांच्या माफीनाम्यावरून लक्षात यायला हरकत नाही. आतापर्यंत ते मीडिया ट्रायल, विमान कंपन्यांची अरेरावी वगैरे मुलामे देत वेळ काढत बसले होते. आपण कॅमेऱ्यासमोर कोणाला तरी चपलेने २५ वेळा हाणल्याच्या गमजा केल्या होत्या, शिवसेनेचे खासदार आहोत, भाजपचे नव्हे, असं गुर्मीत बोललो होतो, हे कसं नाकारता येणार होतं त्यांना? गायकवाड हे भाजपचे खासदार असते, तर विमान कंपन्यांची आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची त्यांच्याशी असं वागण्याची हिंमत झाली नसती. शिवसेनेला जागा दाखवून देण्यासाठीच हा सगळा खेळ झाला. पण, ती जागा शिवसेनेने स्वकर्तृत्वानेच ‘कमावलेली’ आहे.

………………………………………………………………………………

२. महाराष्ट्र विधानसभेने आज बैलगाडा शर्यतींच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. पशुपालन मंत्री महादेव जानकर यांनी हे विधेयक विधानसभेत ठेवले होते. पशु क्रूरता प्रतिबंधक कायद्यामध्ये सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आल्याने आता बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा होणार आहे.

घ्या आणि उगाच लोक म्हणतायत की हे सरकार शेतकरी-विरोधी आहे. आज शेतकऱ्याला काय हवं आहे, याची व्यवस्थित कल्पना आहे या सरकारला. अफू, गांजा, दारू, भांग... यांची नशा फुटकळ आहे... ती काय आज केली की उद्या उतरते. कृषक संस्कृतीची पुरातन परंपरा वगैरे म्हटलं की एकदम छानच वाटायला लागतं. आपल्याला किती आणि कसं कसं भिकारी करून ठेवलं गेलं आहे, याचा विसर पडतो.

………………………………………………………………………………

३. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास कर्ज देणे आणि परतफेड करण्याची जी नैसर्गिक प्रणाली आहे ती नष्ट होईल, असे भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी म्हटले. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. त्यासाठी त्यांनी ३६,००० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. आपल्या देशामध्ये कर्ज घेऊन प्रामाणिकपणे परतफेड करण्याची संस्कृती आहे. ही संस्कृतीच यामुळे नष्ट होईल असे पटेल यांनी म्हटले. सध्या या निर्णयामुळे काही जणांना दिलासा मिळाला तरी देखील भविष्य काळात यामुळे एक चुकीचा संदेश जाईल असे पटेल म्हणाले.

पटेल साहेब थोर अर्थतज्ज्ञ आहेत, याबद्दल नोटाबंदीच्या अभूतपूर्व यशानंतर काही शंकाच उरलेली नाही. त्यामुळे ते सांगतायत तर ते आपल्याला सपशेल मान्यच आहे. फुल रिस्पेक्ट भई फुल रिस्पेक्ट. फक्त कर्ज घेऊन परतफेडीची आपली परंपरा आहे, हा शोध त्यांना कसा लागला, ते स्पष्ट होत नाही. ही संस्कृती आहे, तर सगळ्याच बँकांच्या बुडीत कर्जांचं (शेतकऱ्यांच्याच नव्हे, तर इतरांनीही बुडवलेल्या) प्रमाण इतकं कसं, हेही त्यांनी उलगडून सांगावं.

………………………………………………………………………………

४. पुढील २० वर्षानंतर मुस्लिम महिला मुलांना जन्म देण्याच्या बाबतीत ख्रिस्ती महिलांना मागे टाकतील, असा दावा प्यू रिचर्स सेंटरने केला आहे. सध्याच्या घडीला ख्रिस्तीधर्मीय महिला सर्वाधिक मुलांना जन्म देतात. मात्र २०३५ मध्ये या आकडेवारीत बदल होईल, असे त्यांनी अहवालात म्हटले आहे. गेल्याकाही वर्षांमध्ये ख्रिस्तीधर्मियांमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आणि येत्या काही वर्षांत मृत्यूचे प्रमाण वाढणार आहे. कारण ख्रिस्ती समाजात वृद्धांची संख्या सर्वाधिक आहे, असे संस्थेचे म्हणणे आहे.

चिंता करू नका. मिशीवाल्या काकांनी दिलेला संदेश तुम्हीही पाळा. किमान १०-१२ मुलं जन्माला घाला. प्रश्न आपोआप निकालात निघेल. पृथ्वीवरच्या जमिनीच्या इंच अन् इंचावर माणसं खेटून खेटून उभी राहिली तरी चालतील, पण, मुसलमानांपेक्षा इतर धर्मीयांची संख्या जास्तच असली पाहिजे. आता लवकरच अँटी कंडोम स्क्वॉड स्थापन होणार आहेत, त्यांचा लाभ घ्या.

………………………………………………………………………………

५. सुपरमॉडेल केंडाल जेन्नरचा सहभाग असलेली वादग्रस्त जाहिरात मागे घेत असल्याचे पेप्सी कंपनीने बुधवारी जाहीर केले आहे. कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराविरोधातल्या आंदोलनाचा वापर जाहिरातीसाठी केल्यावर चहूबाजूंनी टीकेची राळ उठल्यावर ही जाहिरात मागे घेण्यात आली.

पेप्सीने अशीच आचरट जाहिरात जेएनयूमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली होती. पण, आपल्याकडे प्राधान्यक्रमामध्ये आझादीपेक्षा पेप्सी वरच्या क्रमांकावर असल्याने लोकांनी पेप्सीप्रमाणेच तिचाही आनंदाने आस्वाद घेतला होता. या जाहिरातीत ‘देशद्रोह्यां’ची खिल्ली उडवली जात आहे, अशी अडीच वर्षे वयाच्या बालदेशभक्तांची ठाम समजूत झाली होती.

………………………………………………………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......