प्रसाद कुमठेकर नावाच्या ‘त्रिशंकू माणसा’नं ‘त्रिशंकू पिढी’साठी केलेलं लिखाण…
पडघम - साहित्यिक
अमोल उदगीरकर
  • प्रसाद कुमठेकर आणि त्यांच्या ‘अतित कोण? मीच...’ व ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Fri , 23 June 2023
  • पडघम साहित्यिक प्रसाद कुमठेकर Prasad Kumthekar अतित कोण? मीच... Atit kon? Meech बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या Barkulya barkulya shtoryaअमोल उदगीरकर Amol Udgirkar

मी एकदा चित्रपट दिग्दर्शक निखिल महाजनच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला गेलो होतो. तिथं त्याच्या टेबलवर एक छोटंसं पुस्तक पडलं होत- ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’. हे रोचक नाव असलेलं पुस्तक मी चाळायला घेतलं. पहिली काही पानं वाचल्यावर मला जाणवलं की, आपण जे वाचत आहोत, ते काही तरी वेगळं आहे. हे अस्सल मराठवाडी निमशहरी लिखाण आहे, जे यापूर्वी आपण आसाराम लोमटेंसारखे काही अपवाद वगळता वाचलेलं नाहीये.

लेखक कुणी प्रसाद कुमठेकर होता. मग लेखकाबद्दल माहिती गोळा करणं आलं. असं यापूर्वी एकदा सचिन कुंडलकरचं ‘कोबाल्ट ब्ल्यू’ वाचल्यावर घडलं होतं. सुदैवानं दुसरा एक मित्र शार्दूल सराफ हा प्रसादचा जवळचा मित्र होता. त्याने ‘इंडस्ट्री’मध्ये प्रसाद कुमठेकर नावाची जी किवंदती तयार झाली, त्याबद्दल मला त्याच्या खास शैलीमध्ये भरभरून सांगितलं. मग एके दिवशी साक्षात कुमठेकरची भेट होण्याचा योग शार्दूल कृपेनं आला. पहिल्याच भेटीत मी औपचारिकता वगैरे सोपस्कार बाजूला ठेवून ‘तू माझा आवडता लेखक आहेस’ असं स्वभावाच्या विरुद्ध जाऊन सांगितल्याचं लख्ख आठवतं.

प्रसादशी मैत्रीची नाळ जुळण्याचं आणि त्याच्या लिखाणाबद्दल प्रचंड आपुलकी वाटण्याचं सगळ्यात मोठं कारण, म्हणजे आम्हाला जोडणारा ‘त्रिशंकूपणा’चा धागा. आम्ही दोघंही मराठवाड्यातल्या निमशहरी भागातले… आता राज्यातल्या सोनेरी त्रिकोणात स्थायिक होऊन करिअर वगैरे करणारे. तुम्ही अमुक एका जातीचे आहात, म्हणून तमुक संघटनेच्या विचारांवर तुमचं प्रेम असावं, या हल्लीच्या रूढ नियमाला अपवाद असणारे... नव्वदच्या दशकातल्या हिंदी सिनेमांवर आणि गाण्यांवर प्रेम असणारे आणि स्वतःचं अस्सल असं मानसिक आणि वैचारिक ओझं घेऊन जगणारे... आता इथं त्रिशंकूपण कुठं येतं?

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

एक तर आमचं मूळ गाव प्रचंड स्थितीस्थापकवादी असल्यानं आम्ही पंचवीसेक वर्षांपूर्वी गाव सोडलं, तेव्हा ते जशी होतं, अगदी तशीच अजून आहे. आमच्या कॉलनीमधलं प्रस्तावित उद्यान अजून प्रस्तावितच आहे. आम्ही मनानं अजूनही त्या आमच्या बदलायला मुळीच तयार नसणाऱ्या गावांमध्येच रेंगाळतोय. आणि राहतोय स्वतःला सतत अपडेट ठेवत राहणं, ही टिकून राहण्याची गरज आहे, अशा महानगरात.

हा दोन जागांमधला फरक फार पिळवटून टाकणारा आहे. ‘अतित कोण? मीच...’मधल्या ‘मी’च्या उदगीरच्या टोलेजंगी वाड्यातल्या आणि मुंबईतल्या चिंचोळ्या ब्लॉकसारखाच. मला पाठीवर वेताळासारखा जखडून बसलेला त्रिशंकूपणा ‘अतित कोण? मीच...’मध्ये दिसतो.

माझं आडनाव उदगीरकर असलं तरी उदगीरशी माझा कसलाही संबंध नाही. आम्हाला ‘उदगीरकर’ हे आडनाव कसं पडलं, याबद्दल परिवारातल्या ज्येष्ठांनाही फारसं काही माहीत नाही. डॉक्युमेंटेशनचा आळस हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला दोष माझ्यातही उतरला आहेच. पण आपली कुठली तरी जून मुळं ज्या गावात आहेत, त्याबद्दल एक सुप्त आकर्षण आहेच.

प्रसादच्या लिखाणातून मला आमची मुळं असलेल्या या गावाबद्दल वाचायला मिळतं. त्याच्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’मध्ये ती प्रसादने एकहाती महाराष्ट्रभर पोहोचवलेली ‘उदगिरी’ भाषा वाचायला मिळते. उदगीर हे गावाचं नावं उदगीर बाबा या ऋषीच्या नावावरून दिलंय आणि याच गावात लेंडी नावाची पिटुकली नदी आहे… माझ्या कधीच न बनलेल्या गावाबद्दलच्या गोष्टी मला कळतात… 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

प्रसाद हा अशा फार थोड्या लेखकांपैकी एक आहे, ज्यांच्या लिखाणात मला परभणीसारख्या नावालाच शहर असणाऱ्या गावातले गल्लीबोळ दिसतात. त्याच्याच ‘अतित कोण? मीच...’ या पुस्तकात साबुदाणा खिचडीला ‘साबुदाणा हुसळ’ म्हणणाऱ्या आणि पाण्यात दगड मारला तर ‘डुबुक’ असा आवाज येतो, असली गलेलठ्ठ डुकरं फिरतात, अशा गावांचे उल्लेख येतात.

हे असे उल्लेख महाराष्ट्रातल्या कुठल्याही निमशहरी भागातल्या माणसाला परिचित आहेत. प्रसाद असेल किंवा मी असेल आम्ही शेवटी विस्थापितच. ग्लोरिफाईड असू पण विस्थापितच. अशा माणसांत एक उपरेपणा भरून राहतो. मग हा उपरा माणूस तटस्थपणे नवीन जागेकडे, तिथल्या माणसांकडे बघतो. त्याची तिथं भावनिक गुंतवणूक नसते किंवा क्वचितच असते.

प्रसादच्या लिखाणातला ‘मी’ हा असाच त्रयस्थ उपरा आहे. तो मुंबईतल्या लोकलच्या प्रवासाकडे, प्रवासात भेटणाऱ्या लोकांकडे, तो जिथं राहतो त्या सोसायटीतल्या लेखकांकडे तटस्थपणे बघतो. आपली निरीक्षण मांडतो. आपल्याला लेखातून सांगतो. त्यातून तटस्थ उपऱ्याच्या नजरेतून महानगरी आपल्याला नव्यानं कळायला लागते.

मुंबईबद्दल त्रयस्थ निरीक्षण मांडणारा ‘मी’ गावाबद्दल लिहायला लागला की, इमोशनल वगैरे व्हायला लागतो. मग गावाकडचा वाडा, तिथले गल्लीबोळ, तिथलं साचलेपण, अस्तित्व टिकवून असलेल्या परंपरा यांच्याबद्दल लिहिताना तटस्थपणाची पुटं गळून पडायला लागतात. सध्या ज्या शहरात राहतो आणि ज्या शहरांनी आपल्याला भरभरून दिलं आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञता आहेच, पण मन अजूनही कुठंतरी गावात रेंगाळतंय. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेलं त्रिशंकूपण ते हेच.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

प्रसादचं अजून एक मत म्हणजे तुमच्या लिखाणात जर तत्कालीन सिनेमांचे आणि गाण्यांचे संदर्भ येत नसतील, तर ते लिखाण अपूर्ण असतं. उदाहरणार्थ, सांगायचं तर ‘विषय मीच्या नजरेतल्या तिचाय’ या माझ्या सगळ्यात आवडत्या लेखांपैकी एक असणाऱ्या लेखात कुमार सानूच्या ‘जिये तो जिये कैसे बिन आप के’ या दर्दभऱ्या गाण्याचे, ‘मोहोब्बत्ते’मधल्या बॅकग्राउंड म्युझिकचे आणि पिंपळाच्या पानाचे उल्लेख, अशा नजाकतीनं येतात की, ज्या पिढीला ‘९०'s किड्स’ म्हणून ओळखलं जातं, ती लगोलग हरखून जावी.

हे शुद्ध गावरान तुपातलं स्मरणरंजन आहेच, पण याला एका अख्ख्या पिढीच्या आयुष्यातले संदर्भही जोडलेले आहेतच. हे तत्कालीन सिनेमांचे आणि गाण्यांचे संदर्भ प्रसादच्या जवळपास सगळ्याच लिखाणात येतात. हे असे संदर्भ आपल्या लिखाणातून देणारी पिढी हळूहळू पुढं येत आहे, ही फार चांगली गोष्ट आहे.

‘फॅंटसीचं वास्तव’ हा माझा दुसरा आवडता लेख. वरवर पाहता हा लेख सध्या सिनेमामुळे जोरात असलेल्या ‘सुपरहिरों’बद्दल बोलतो, असं वाटण्याची शक्यता आहे. पण प्रसाद पुराणांमध्ये घेऊन जातो, माणसाला फॅंटसीची गरज मुळातच का असते, याचं मानसशास्त्रीय विश्लेषण करतो, मराठी साहित्याला ‘सुपरहीरो’ची गरज का पडली नाही, याचा वेध घेतो. मध्येच तुकारामाचे अवतरण सांगतो. एखाद्या विषयाचा परिपूर्ण आढावा कसा घ्यावा, याचा हा लेख उदाहरण आहे. ‘अतित कोण?...मीच’ या पुस्तकात असे वाचनीय आणि श्रीमंत करून जाणारे ढीगभर लेख आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

प्रसाद नेहमी त्याचं लिखाण माझ्याशी शेअर करत असतो. नवनवीन कथांच्या संकल्पना ऐकवतो. तो त्यावर बोलत असताना एका विषयातून दुसऱ्या विषयात घुसतो… मी मात्र बहुतांश वेळी श्रवणभक्ती करत असतो. लहानपणापासूनच हिंदी सिनेमानं मेंदूला ‘सिम्पलीफिकेशन’ची सवय लावल्यानं कधी कधी प्रसादच बोलणं (क्वचित लिहिणंही) माझ्या डोक्यावरून जायला लागतं. माझ्या प्रतिसादावरून प्रसादला ‘आपलं बोलणं याला कळत नाहीये’ असं जाणवतं. मग तोच मला कधीतरी विचारतो, ‘मी कधी कधी क्लिष्ट होतो का रे?’

मग माझ्या उत्तराची वाट न बघताच तो त्याचंही विश्लेषण करायला लागतो. मात्र आज या लेखाच्या निमित्तानं एका जिओग्राफीमधल्या, एका पिढीच्या मनातल्या भावना सतत शब्दबद्ध करणाऱ्या आजच्या काळातला महत्त्वाचा लेखक म्हणून प्रसादचे आभार मानायला पाहिजेत. नाहीतर त्याच्याच एका लेखाचं शीर्षक आहेच – ‘लै सोपाय सोडून देणं’…

.............................................................................................................................................

लेखक अमोल उदगीरकर चित्रपट समीक्षक आहेत.

amoludgirkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......