‘हा बघा तारा’ असे म्हणण्यापेक्षा, ‘बघा, तिथे तारा उगवतो आहे काय?’ असे म्हणणे केव्हाही चांगले!
पडघम - सांस्कृतिक
विनोद शिरसाठ
  • साधना साप्ताहिकाच्या जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमात सूरज ऐंगडे व दै. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर
  • Wed , 03 May 2023
  • पडघम सांस्कृतिक सूरज ऐंगडे Suraj Yengde साधना साप्ताहिक Sadhana Saptahik जात Caste

सूरज एंगडे हा तरुण २०१०मध्ये नांदेड शहरातून बाहेर पडला, नंतरच्या १२ वर्षांत त्याने उच्च शिक्षण व संशोधनाच्या निमित्ताने जगभरातील अनेक देशांत मुशाफिरी केली आहे. त्याच्या ‘नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वीत्झर्लंड’ या प्रवासाची हकीगत सांगणारी दीर्घ मुलाखत २०२०च्या ‘साधना युवा’ दिवाळी अंकात प्रसिद्ध केली आहे. त्याच वर्षीच्या ‘साधना’च्या मुख्य दिवाळी अंकात त्याचा ‘विवाहसंस्था व जातीसंस्था’ या विषयावरील दीर्घ लेख (‘बॅफ्लर’ या इंग्रजी नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा अनुवाद) प्रसिद्ध केला आहे. त्यानंतर त्याची ‘बॉर्डर लाइन्स’ या संकेतस्थळावरील दीर्घ मुलाखत अनुवाद करून, जानेवारी २०२१मध्ये ‘साधना’च्या सलग तीन अंकांतून प्रसिद्ध केली होती.

तेव्हापासून सूरज ‘साधना’च्या वाचकांना परिचित आहे. त्यामुळे, अडीच वर्षांपूर्वीच त्याला कळवले होते, ‘‘तू भारतात येशील तेव्हा ‘साधना’च्या वतीने तुझे व्याख्यान किंवा मुलाखत असा एक मोठा कार्यक्रम करू.’’ त्यामुळे, तीन महिन्यांपूर्वी तो भारतात आला, तेव्हा त्याच्या सोयीनुसार ५ एप्रिल २०२३ रोजी, त्याच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठरवला. मुलाखत कोणी घ्यायची, असा प्रश्न त्याला विचारल्यावर, त्याने पटकन उच्चारलेले नाव होते गिरीश कुबेर. अर्थातच आम्ही पटकन होकार दिला. मात्र कुबेर यांनी (ज्युनिअर-सीनियर याला महत्त्व न देता) होकार दिला, तेव्हा आम्हाला विशेष आनंद झाला.

कार्यक्रमाचे नियोजन होत असताना पुण्यातील शक्य तेवढे मोठे सभागृह घेणे आवश्यक होते. तारीख व वेळ यानुसार उपलब्ध झालेले सर्वांत मोठे सभागृह म्हणजे ‘गोखले इन्स्टिट्यूट’चा काळे हॉल. आपल्या आवारात असा कार्यक्रम होतोय म्हटल्यावर ‘गोखले इन्स्टिट्यूट’ने सहसंयोजक होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे अर्थातच आमच्या आनंदात भर पडली. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नावाने चालणाऱ्या संस्थेच्या साथीने, साने गुरुजींनी सुरू केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाच्या अमृतमहोत्सवी वर्षातील एक कार्यक्रम, असा दुग्धशर्करा योग जुळून आला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

बुधवार, ५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी सहा ते साडेआठ अशी वेळ ठरवली. परंतु वेळेच्या पंधरा मिनिटे आधीच सव्वातीनशे आसनक्षमतेचे सभागृह गच्च भरले होते. बरोबर सहा वाजता कार्यक्रम सुरू करताना विचारमंचावर येऊन मांडी घालून बसण्यासाठी तरुणांना विनंती केली, तिथे जवळपास दीडशे तरुण-तरुणी येऊन बसले. सभागृहातील पुढच्या व मागच्या मोकळ्या जागेत काही खुर्च्या टाकल्या गेल्या, उर्वरित मोकळ्या जागेतही उभे राहून किंवा मांडी घालून बसून काही लोकांना कार्यक्रम ऐकावा लागला. म्हणजे एकूण ६०० दरम्यान श्रोत्यांची व्यवस्था होऊ शकली. थोडे उशिरा आलेल्या लोकांना मात्र नाईलाजाने परत जावे लागले. श्रोत्यांमध्ये सर्व स्तरांतील ‘क्रीम क्लास’ म्हणावे असे लहान-थोर लोक होते. मात्र ७० टक्क्यांहून अधिक श्रोते तरुण वर्गातील होते.

कार्यक्रमाचा पूर्वार्ध ४० मिनिटांचा होता. त्यात ‘साधना’च्या संपादकांनी प्रास्ताविक केले, ‘साधना ट्रस्ट’चे अध्यक्ष विवेक सावंत यांनी स्वागताचे मनोगत व्यक्त केले, ‘गोखले इन्स्टिट्यूट’चे कुलगुरू अजित रानडे यांनी अध्यक्षीय भाषण केले, ‘कर्तव्य साधना’चा सहसंपादक सुहास पाटील याने सूत्रसंचालन केले. त्यानंतर दोन तास दहा मिनिटे इतका वेळ गिरीश कुबेर यांनी सूरजची मुलाखत घेतली.

या संपूर्ण मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले असून, ते ‘साधना’ साप्ताहिकाच्या यु-ट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे. त्यानंतरच्या दोन आठवड्यांत जवळपास ९० हजार लोकांनी ती मुलाखत कमी-अधिक वेळ पाहिली आहे.

यु-ट्यूबवर अपलोड केल्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया ३०० पेक्षा अधिक आहेत, बहुतेकांनी मुलाखतीचे जोरदार स्वागत केले आहे. मात्र काही तीव्र टीकेचे स्वरही निघाले आहेत. पण गंमत अशी की, दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रांत आलेल्या बातम्यांवरून तीव्र टीका सुरू झाली. मुलाखतीतील काही निवडक विधाने वाचूनच लिहिलेल्या टीकात्मक प्रतिक्रिया सोशल मीडियावरून फिरू लागल्या. वस्तुतः दोन तासांच्या त्या मुलाखतीबाबत केवळ दोनशे शब्दांतल्या बातम्या वाचून, लगेच घाई करून निष्कर्ष काढणे योग्य नव्हते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

विशेष म्हणजे तशी तीव्र टीका-टिपणी करणारे लोक ना कार्यक्रमाला उपस्थित होते, ना त्यांनी तो व्हिडिओ पाहिला होता. अर्थातच कार्यक्रमाला आलेल्या काही लोकांनीही आणि नंतर व्हिडिओ पाहिलेल्या लोकांनीही, एकूणात स्वागत करून काही मुद्द्यांबाबत खासगीत नाराजी व्यक्त केली किंवा उघड टीका केली. ती टीका विविध प्रकारची होती.

पहिल्या प्रकारच्या टीकाकारांचा, एक आक्षेप होता ‘साधना’ने मुलाखत आयोजित करण्याला आणि गिरीश कुबेर यांनी ती मुलाखत घेण्याला. ब्राह्मणी व भांडवली माध्यमे त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी सूरजचा उपयोग करून घेत आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. आणि दुसरा आक्षेप होता, सूरज स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आपला गैरवापर होऊ देत आहे.

दुसऱ्या प्रकारची टीका सूरजच्या मुलाखतीतील काही वक्तव्यांविषयी झाली. त्यातील एक आक्षेप होता, जात ही या ना त्या प्रकारे जगात सर्वत्र आहे, असे सांगून सूरज भारतातील जातीसंस्थेच्या जाचाची तीव्रता कमी करत आहे. आणि दुसरा आक्षेप होता, जातीव्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सवर्णांच्या नैतिक जाणिवा उन्नत होण्याची गरज व्यक्त करणारा सूरज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या संदर्भातील विचारांचे महत्त्व दुर्लक्षित करतो आहे.

तिसऱ्या प्रकारची टीका करणारांचे दोन आक्षेप होते. पहिला आक्षेप, गांधींविषयी सूरजने एक-दोन तिरकस विधाने करून गांधींचे अवमूल्यन केले आहे. दुसरा आक्षेप केशरचनेच्या संदर्भात गमतीगमतीत का होईना, त्याने शाहरूख खान व सलमान खान यांना ‘चिल्लर व्यक्ती’ संबोधले आहे.

चौथ्या प्रकारची टीका करणारांचे दोन आक्षेप होते. एक आक्षेप म्हणजे, ‘जात’ याच मुद्द्याभोवती संपूर्ण मुलाखत फिरत राहिली. आणि दुसरा आक्षेप, या मुलाखतीत संवाद कमी आणि मनोगत जास्त झाले.

पाचव्या प्रकारच्या टीकाकारांचे दोन आक्षेप होते, दलित पँथरचा व अन्य काही व्यक्तींचा नामोल्लेख त्यात ओझरता आला. आणि दुसरा आक्षेप आंबेडकरी चळवळीचे मूल्यमापन करायचे सूरजने टाळले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

याशिवाय, कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रस्तुत संपादकाने म्हटले की, ‘सूरजचे (पटकन कोणाशीही मैत्री जुळवणारे) व्यक्तिमत्त्व व ‘ऑफ बीट’ विचार करण्याची पद्धत पाहता तो हमीद दलवाई व नरहर कुरुंदकर यांच्यासारखा  वाटतो.’ या प्रशस्तीलाही काही लोकांचा तीव्र आक्षेप होता, त्याचे कारण त्यांच्या मनात दलवाई व कुरुंदकर यांच्याविषयी या ना त्या कारणाने असलेली नाराजी.

वरील सर्व प्रकारची टीका प्रामुख्याने सोशल मीडियावरून झाली. मात्र काही लोकांनी प्रत्यक्ष सूरजला भेटून वा फोन करून, एसएमएस वा मेलद्वारे आपल्या मनातील चांगल्या-वाईट प्रतिक्रिया कळवल्या. प्रस्तुत संपादकालाही काही लोकांनी प्रत्यक्ष भेटून वा फोन करून, मेल वा मेसेज करून बऱ्या-वाईट प्रतिक्रिया कळवल्या. अनेकांनी सूरज आणि त्याचे विचारकार्य याविषयी जिज्ञासा व्यक्त केली.

शिवाय, ‘इतका गहजब चाललाय खरा, पण मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यात वावगे असे काहीच नाही,’ असेही काही महनीय व्यक्तींनी सांगितले. ‘त्याची काही मते आम्हाला पटणार नाहीत, काही बाबतींत त्याचे आकलन अपुरे आहे, काही बाबतींत त्याची मते वेगळी असू शकतात, मात्र एकूण मुलाखत चांगली आहे,’ असा समंजस सूरही मोठ्या प्रमाणात निघाला.

या मुलाखतीवर इतका गहजब का, या प्रश्नाला तीन प्रकारची उत्तरे काही लोकांनी दिली.

एक- कार्यक्रम भलताच यशस्वी झाल्यामुळे, ज्यांच्या मनात ‘साधना’विषयी किंवा गिरीश कुबेर यांच्याविषयी या ना त्या कारणाने राग होता, तो या निमित्ताने बाहेर आला. 

दुसरे- काही प्रस्थापित मतांना सूरजच्या मुलाखतीतून धक्के मिळाल्यामुळे, त्याचा काहींना राग आला. तिसरे- आपल्या बुद्धिमान तरुण पोरांना ही प्रस्थापित ब्राह्मणी वा भांडवली माध्यमे किंवा संस्था ‘हायजॅक’ करतील की काय, ही भीती आणि त्याच वेळी ज्यांच्याशी संघर्ष करायचा त्यांच्याशी संवादाची भाषा सूरज बोलतोय, याचा राग असे ते मिश्रण.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

गंमत अशी की, ‘साधना’च्या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी हरी नरके यांनी मेहता प्रकाशनाच्या कार्यक्रमात सूरजची मुलाखत घेतली, नंतरच्या आठवड्यात ‘एबीपी माझा’ या टीव्ही चॅनलने ‘माझा कट्‌टा’वर त्याची मुलाखत घेतली.

दरम्यान आणखी दोन-तीन ठिकाणी त्याची भाषणे झाली, काही लहान-मोठ्या बैठका झाल्या. त्याला अनेकांनी कार्यक्रमांची आमंत्रणे दिली. ‘त्याची काही मते व काही भूमिका पटणाऱ्या नाहीत, तरीही त्याचे स्वागत केले पाहिजे,’ असे म्हणणाऱ्यांनी व त्याच्यावर टीका करणाऱ्यांनीही त्याला पुढच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे.

वरील सर्व प्रकारच्या टीकेत कमी-अधिक तथ्य असले तरी, त्यात विपर्यास जास्त आहे, पूर्वग्रह खूपच आहेत, आपल्याला हवे ते बोलले गेले नाही, याचा राग आहे, आपल्या धारणांना धक्का लागला, याची नाराजी आहे. अर्थातच, अशा मतमतांतराचे व टीकेचे ‘साधना’ला वावडे नाही. तरीही एक आश्चर्य वाटले, ते असे की, ‘ ‘साधना’ हे ब्राह्मणी माध्यम आहे आणि ते सूरजचा उपयोग करून घेत आहे,’ अशी टीका इतक्या स्पष्टपणे झाली नव्हती.

वस्तुतः आतापर्यंत, असाच एक आक्षेप येत राहिला की, ‘गांधी-नेहरू, टिळक-आगरकर या प्रवाहांचे जेवढे प्रतिबिंब ‘साधना’तून पडले आहे; तेवढे फुले-शाहू-आंबेडकर या प्रवाहाचे प्रतिबिंब पडत नाही.’ अशी टीका पूर्वीपासून होत आली आणि ती काही प्रमाणात रास्तही आहे. आणि म्हणूनच ‘साधनामध्ये या दुसऱ्या प्रवाहाचे लेखन पुरेसे का येत नाही,’ अशी विचारणा करून रागावणारा वर्ग आतापर्यंत आम्हाला माहीत होता. मात्र ‘साधना’ने अशा प्रकारची मुलाखत किंवा कार्यक्रम घेतल्यामुळे रागवणारे काही छोटे गट प्रथमच आम्हाला पाहायला मिळाले.

आता आम्ही याकडे कसे पाहतो? अर्थातच आत्मपरीक्षणाच्या दृष्टीनेच! या आक्षेपाचा आम्ही असा अर्थ घेतो की, अद्यापही ‘साधना’ला शोषित घटकांमध्ये सर्वदूर म्हणता येईल, असा विश्वास पुरेसा निर्माण करता आलेला नाही! ‘साधना’बाबत त्या-त्या व्यक्तींचे वा गटांचे अज्ञान किंवा अपुरे आकलन किंवा आकस काही प्रमाणात असणारच. मात्र अंगिकारलेल्या कार्यात अमृतमहोत्सवी वर्ष आले तरी, ‘साधना’ कमी पडते आहे, असाही त्याचा अर्थ होतो!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

ते काहीही असो. या कार्यक्रमातून एक साध्य झाले की, चांगली वैचारिक घुसळण झाली, वाद-संवादाला चालना मिळाली. सूरज २०१०मध्ये परदेशात गेला, तेव्हा केवळ २२ वर्षांचा होता. नंतरच्या १२ वर्षांत तो केवळ तीन वेळा भारतात येऊन गेला, तेव्हा त्याचे काही कार्यक्रम झाले, ते प्रामुख्याने हिंदी व इंग्रजी वर्तुळात. मराठी वर्तुळात मात्र तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत त्याची पुरेशी ओळख नव्हती, आताच्या या चौथ्या भेटीत त्याच्याविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालेले दिसले.

मागील तीन वर्षे ‘इंडियन एक्सप्रेस’मधून त्याचा चालू असलेला कॉलम आणि गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेले स्तंभलेखन, यामुळे त्याचा परिचय विचारी वर्गाला होऊ लागला आहे. शिवाय मराठी, हिंदी व इंग्रजी टीव्ही चॅनल्सवर झालेल्या त्याच्या काही मुलाखती चांगल्याच गाजल्या आहेत. आणि तो स्वतः सोशल मीडियावर बराच ॲक्टिव्ह असल्यामुळे, त्याचे स्वतःचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे.

मुळातून इंग्रजी माध्यमात शिकलेला आणि ऐन बहराची १२ वर्षे विदेशातच वावरल्यामुळे, त्याला महाराष्ट्रातील परिस्थितीचा अंदाज पुरेसा न येणे साहजिक आहे, त्याचे मराठीतले वाचनही तुलनेने कमी आहे. या सर्व मर्यादांचे त्याला पुरेपूर भान आहे.

तो स्वतःच म्हणतोय, ‘मागच्या वेळेपेक्षा आताचा सूरज वेगळा आहे आणि पुढच्या वेळी येणारा सूरज आणखी वेगळा असेल.’ सध्या तरी अभ्यास-संशोधन व अध्यापन हेच कार्यक्षेत्र त्याने निवडले आहे. मात्र आंबेडकरी चळवळीतील उगवता तारा म्हणून तो आम्हाला दिसतो आहे. तसे म्हणण्यात घाई होते आहे, असे काही लोकांना वाटणे साहजिक आहे. पण पूर्ण उगवल्यानंतर ‘हा बघा तारा’ असे म्हणण्यापेक्षा, ‘बघा, तिथे तारा उगवतो आहे काय?’ असे म्हणणे केव्हाही चांगले!

‘साधना’ साप्ताहिकाच्या २९ एप्रिल २०२३च्या अंकातून साभार.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......