इरॅस्मस डार्विन : ‘उत्क्रांतीवादा’ला चालना देणारा आणि ‘विज्ञानसाहित्या’चा प्रेरणास्त्रोत ठरलेला प्रतिभावान शास्त्रज्ञ
पडघम - विज्ञाननामा
संजय करंडे
  • इरॅस्मस डार्विन
  • Tue , 18 April 2023
  • पडघम विज्ञाननामा इरॅस्मस डार्विन Erasmus Darwin चार्ल्स डार्विन Charles Darwin विज्ञान साहित्य Science Literature उत्क्रांतिवाद Evolutionism

इरॅस्मस डार्विन यांचा जन्म १२ डिसेंबर १७३१ रोजी झाला. ते एक शल्यचिकित्सक, तत्त्ववेत्ते, संशोधक, कवी म्हणून अठराव्या शतकात परिचित होते. उत्क्रांतीवादाचा सिद्धान्त मांडणाऱ्या चार्ल्स डार्विन यांचे ते आजोबा. त्यांचे वैद्यकीय, साहित्य, संशोधन या क्षेत्रांत फार मोलाचे योगदान आहे. विज्ञान कादंबरीच्या उदयामध्ये व उत्क्रांतीवादाच्या सिद्धान्ताच्या पायाभरणीत त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. १८ एप्रिल १८०२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा आज स्मृतिदिन.

इरॅस्मस यांनी ५० वर्षांहून अधिक यशस्वी वैद्यकीय सेवा केली. त्यांना तिसऱ्या जॉर्ज यांच्या दरबारातून शाही वैद्याचे निमंत्रण मिळाले होते, पण अतिशय नम्रतापूर्वक त्यांनी त्यास नकार दिला. वैद्यकीय सेवेबरोबरच त्यांनी आपले जीवन नीतीपरक कविता, नैसर्गिक उत्क्रांतीच्या कविता व वेगवेगळ्या प्रकारची संशोधने करणे, यात व्यतीत केले. आपली विज्ञानाविषयीची मते, उत्क्रांतीवादाविषयीचे विचार त्यांनी आपल्या वेगवेगळ्या लेखनातून व कवितांमधून मांडले आणि वैज्ञानिक साहित्याची पाऊलवाट तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यासोबतच चार्ल्स डार्विन यांनी पुढे जगाला उत्क्रांतीवादाचा जो सिद्धान्त दिला, त्याची बीजेदेखील त्यांच्या साहित्यात दडलेली दिसून येतात.

इरॅस्मस यांनी संशोधन क्षेत्रात संशोधकांना प्रेरित करण्याचे महत्त्वपूर्ण कामदेखील केले. त्यांनी ‘लीचफील्ड बोटॅनिकल सोसायटी’ (Lichfield Botanical Society)ची स्थापना केली. या सोसायटीचा हेतू स्वीडिश वनस्पतीशास्त्रज्ञ कॅरोलस लिनस त्यांच्या संशोधनाचे लॅटिन भाषेतून इंग्रजीमध्ये भाषांतर करणे, हा होता. हे भाषांतर करत असताना त्यांनी आज प्रचलित असलेले वनस्पतीशास्त्रातले अनेक शब्द इंग्रजी भाषेत रूढ केले. त्यामुळे वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळाली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

इरॅस्मस यांचे वनस्पतीशास्त्रावर असलेले नितांत प्रेम आपल्याला त्यांच्या एकूणच निर्मित साहित्यात पाहायला मिळते. त्यांनी कॅरोलस लिनस यांच्या संशोधनावर आधारित ‘द लव्हज ऑफ द प्लांट्स’ ही दीर्घ कविता लिहिली. त्यासोबतच वनस्पतींचे अर्थकारण, यावर आधारित ‘द बोटॅनिक गार्डन’ हे काव्यही. ‘झुनॉमिया’ (Zoonomia) हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ मानता जातो. यामध्ये त्यांनी उत्क्रांतीवादातील अनेक संकल्पना, आडाखे, अनुमाने व निरीक्षणे नोंदवली आहेत. ती नंतर आपण लॅम्मार्क व चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीच्या संशोधनात स्पष्ट रूपाने व सैद्धान्तिक पद्धतीने सप्रमाण नोंदवल्याचे पाहतो. याचा अर्थ त्यांनी वनस्पतीशास्त्राच्या व उत्क्रांतीवादाच्या मांडणीसाठी पूरक जमीन तयार करण्याचे काम आपल्या केले.

आज विज्ञानकथा, कादंबरी, चित्रपट हे जगभरात लोकांच्या आवडीचे विषय बनले आहेत. जसजसा विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा विकास होत गेला, तसतसा त्या विकासाचा परिणाम सामान्य माणसाच्या जगण्यावर होऊ लागला. हे नवीन तंत्रयुगातील सामान्य माणसाचे जगणे, जीवनमान, एकुण भवताल, मानवी भावविश्व, संवेदना घेऊन साहित्य अवतरू लागले. त्यातूनच विज्ञानकथा, कादंबरी, चित्रपट यांचे विज्ञान साहित्यविश्व अस्तित्वात आले. त्यालाच ‘विज्ञान साहित्य’ (Science Fiction) असे संबोधले जाऊ लागले.

तसं पाहिलं तर ‘Science’ आणि ‘Fiction’ या दोन संकल्पना परस्परविरोधी आहेत. ‘Science’ हे ‘Facts’वर म्हणजेच वस्तुनिष्ठतेवर आणि तथ्यांवर अवलंबून असते, तर ‘Fiction’ कल्पनाविलासावर (Fantasy). आणि कल्पनाविलास सत्यापासून दूर असतो, परंतु ‘विज्ञान साहित्य’ या दोन्हींना एकत्रित आणण्याचे काम करते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

विज्ञान कथालेखक ज्ञात किंवा अज्ञात वैज्ञानिक संकल्पना, सिद्धान्त, तत्त्व यांचा वापर करतात आणि भविष्यकालीन कल्पनाविश्वात वाचकांना घेऊन जातात. हे कल्पनाविश्व वैज्ञानिक तत्त्वांवर बेतलेले आणि कार्यकारण सिद्धान्तांवर आधारलेले असते. त्यामुळे त्याला शास्त्रीय कसोट्यांवर मोजता येऊ शकते व असेही घडू शकते, हा आभास वाचकांच्या मनात तयार होतो. हे विज्ञान कथासाहित्याचे वैशिष्ट्य असते. हे कथाविश्व पूर्णतः काल्पनिक असले, तरी त्याला विज्ञानाच्या भविष्यकालीन अस्तित्वाच्या शक्यतेची किनार असते. थोडक्यात, सत्य आणि विस्मय हा विज्ञानकथेचा गाभा असतो.

काही वेळा वैज्ञानिकसुद्धा आपला शास्त्रीय सिद्धान्त, प्रमेये  मांडत असताना कल्पनाविलासाचा आणि तर्काचा वापर करतात. आजदेखील आईन्स्टाइनसारख्या शास्त्रज्ञाचे सिद्धान्त प्रयोगशाळेमध्ये सिद्ध करता येत नाहीत, तर ते तर्काच्या व गणिती कसोटीवरच सिद्ध करता येऊ शकतात. इथे आपल्याला विज्ञान आणि साहित्य यांची संगमभूमी दिसते. विज्ञानाचे साहित्यरूप व साहित्याचे विज्ञानरूप आपण सहज अनुभवू शकतो.

अनेक वैज्ञानिक सिद्धान्तांनी प्रेरित होऊन साहित्यकृती आकाराला आल्याचे आपण पाहतो आणि अनेक साहित्यिकांनी वैज्ञानिक संकल्पनांना प्रेरित केल्याचे आपल्याला दिसते. म्हणूनच स्टीफन हॉकिंगसारखा वैज्ञानिक विज्ञान आणि विज्ञानसाहित्य यांचं नातं मान्य करताना म्हणतो ‘Today’s Science Fiction is Tomorrow’s Science Fact’. (आजची साहित्यिक कल्पना उद्याचे वैज्ञानिक सत्य असू शकते.)

असाच आपल्या साहित्याचा प्रभाव इरॅस्मस यांनी विज्ञानविश्वावर पाडला आणि विज्ञान कथाविश्वाला  नवी दृष्टी प्रदान केली. कोणत्याही साहित्य प्रकाराचे मूळ शोधणे कठीण काम असते. तेच विज्ञानसाहित्यालासुद्धा लागू आहे. विज्ञानसाहित्याच्या उगमाबद्दल अनेकांची अनेकविध मते दिसतात, पण ब्रायन अल्डीस मेरी शेली यांच्या ‘Frankenstein’ (१८१८) या कादंबरीला ‘पहिली खरी विज्ञान कादंबरी’ मानतात. म्हणजे विज्ञान साहित्यविश्वाचा उगम त्यांना या कादंबरीमध्ये दिसतो आणि या कादंबरीच्या प्रेरणास्थानी इरॅस्मस दिसतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

इरॅस्मस ज्ञान प्रसाराच्या कालखंडात डीडेरोट यांसारख्या तत्त्ववेत्त्याच्या व विश्वकोश निर्मितीच्या काळात आपल्या कल्पना व सिद्धान्तामुळे ख्यातप्राप्त होते. चौकस बुद्धी व सर्जनशीलता यांच्या बळावर त्यांनी काही उपकरणेही शोधून काढली. त्यात ‘Rocket Motor’च्या मॉडेलचासुद्धा समावेश होतो. ते एक महान कवी होते. त्यांच्या उत्क्रांतीवादाच्या कवितांनी अनेक लेखक व संशोधकांना प्रेरित केले.

एस. टी. कोलरीजसारखा कवी त्यांच्याबद्दल म्हणतो, “He was the first literary character of Europe, and the most original-minded man; by his grandson’s day, he was quite forgotten.” त्यांच्या ‘Zoonomia’ या दोन खंडांत प्रकाशित झालेल्या पुस्तकाने सजीवांच्या ‘Sexual Selection’, ‘the search for food’, ‘need of protection in living things’, ‘natural habitats’, ‘control the diversity of life’ इत्यादी बाबींवर मते मांडून उत्क्रांतीवादाच्या अध्ययनाचा नवीन मार्ग निर्माण करून दिला. त्यामुळे चार्ल्स डार्विनचा ‘The Origin of the Species’ (१८५३) हा सैद्धान्तिक ग्रंथ उदयाला येऊ शकला.

इरॅस्मस यांच्या ‘Zoonomia’चा प्रभाव आपल्याला विलियम गौडविन (William Godwin) यांच्या ‘Caleb Williams’ आणि ‘Mrs.Radcliffe’s Mysteries of Udalpho’ यांवरही दिसतो. विलियम गौडविन आणि इरॅस्मस डार्विन हे प्रत्यक्ष कधी भेटले नसले, तरी त्यांच्यातील विचार साधर्म्यामुळे त्यांच्यात समान अनुबंध दिसून येतो. मेरी शेली या विलियम गौडविन व मेरी वोल्टन्सक्राफ्ट या प्रथितयश दाम्पत्याची कन्या आणि मुक्त विचारधारा जोपासणाऱ्या नास्तिकवादाचा प्रभाव असणाऱ्या पी. बी. शेली यांच्या पत्नी होत्या. या सर्वांसोबत होणाऱ्या चर्चा आणि या सर्वांवर असणारा इरॅस्मस डार्विन यांच्या उत्क्रांतवादी विचाराचा प्रभाव, साहजिकच त्यांच्या ‘Frankenstein’वर पडल्याचे आपल्याला दिसून येते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

मेरी शेली आपल्या कादंबरीचा स्त्रोत पी. बी. शेली, लॉर्ड बायरन आणि डॉ. पोलीडोरी यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या गप्पांच्या प्रभावामुळे पडलेल्या स्वप्नात असल्याचे स्पष्ट करतात. त्यांच्या चर्चा या अदभुत, अलौकिक आणि अतींद्रिय घटकांवर आणि इरॅस्मस यांच्या उत्क्रांतीच्या सैद्धांतिक मांडणीवर व त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांवर होत्या, हे विशेष.

त्यापूर्वी दुर्दैवाने १८१५मध्ये लहान वयात झालेल्या गर्भधारणेमुळे त्यांचे लहान मूल जन्मताच मरण पावले होते. त्यांच्या स्वप्नावर या मानसिक आघाताचा प्रभावदेखील दिसून येतो. स्वप्नात त्या आपले अर्भक पुन्हा जिवंत झाल्याचे पाहतात. त्यातूनच त्यांच्या कादंबरीतील नायक व्हीक्टर स्मशानातील वेगवगळ्या प्रेताचे अवयव गोळा करतो आणि त्यामध्ये चेतना निर्माण करतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

यात उत्क्रांतीवादी विचारांचा पगडाही दिसून येतो. मुख्य म्हणजे सजीवांच्या निर्मितीतील ईश्वरी हस्तक्षेप नाकारलेला आहे. जर सजीवांची निर्मिती ईश्वरी अधिपत्यात नसेल, तर मग माणूस त्यावर आधिपत्य गाजवू शकेल का? हे आधिपत्य मेरी शेली यांचा शास्त्रज्ञ नायक कादंबरीत गाजवताना दिसतो. अशा पद्धतीने ही कादंबरी अर्ध-उत्कांतीवादी कल्पनेवर आधारित आहे. ती इरॅस्मस यांच्या सजीवांची उत्पत्ती आणि ईश्वर यांचा सहसंबंध नाकारणाऱ्या विचारांनी प्रेरित आहे. सजीवांच्या उत्पत्तीत दैवी हस्तक्षेप नसतो, तर ती एक उत्क्रांतीची प्रक्रिया आहे व जन्मजात नैसर्गिक कृती असून दैवी हस्तक्षेपाशिवाय ती सुरू झालेली असल्यामुळे अखंड सुरू राहणार आहे.

अशा पद्धतीने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला विविध क्षेत्रांत काम करून इरॅस्मस यांनी संशोधक व लेखक यांना प्रेरित करण्याचे काम केले. त्यांनी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांच्या उगमाला प्रेरणा दिली. विज्ञानाच्या क्षेत्रात उत्क्रांतीवादाचे जनक म्हणून ज्यांना आपण पाहतो, त्या चार्ल्स डार्विन यांना त्यांनी उद्युक्त केले आणि उत्क्रांतीच्या अभ्यासाला, निरीक्षणाला सुरुवात झाली आणि सजीवांच्या उत्पत्तीकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलून गेला… विज्ञानविश्वदेखील बदलले. त्यासोबतच विज्ञानसाहित्याचा जन्म ज्या कादंबरीत मानला गेला, त्याचा स्त्रोतदेखील बनले…

.................................................................................................................................................................

लेखक डॉ. संजय करंडे बार्शीच्या बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत.

sanjayenglish @gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

रशियाचा भारताला भडकवण्याचा प्रयत्न दिसतो आहे. भारत-अमेरिका संबंधांत काडी घालणे, हा त्यामागचा हेतू असावा. आंतरराष्ट्रीय पटावरील ‘प्रोपगंडा’ची ती एक चाल असणार...

आपण घरात घुसून दहशतवाद्यांना टिपतो, हे प्रचारात सांगणे अडचणीचे असले, तरी समाजमाध्यमांतून त्याचा प्रचार करता येतोच. तेव्हा अमेरिकेतून त्याबाबतच्या बातम्या आल्या, तरी त्या येथे सरकारला फायद्याच्याच ठरतात. किंबहुना त्या हेतूने तर तशा बातम्या पेरण्यात येत नाहीत ना, अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. धर्मस्वातंत्र्याच्या अहवालाचे तसे नाही. त्यातील टीका उघडच तोट्याची ठरू शकते. ते लक्षात घेऊनच रशियाने तो मुद्दा उचलला.......