वीणाताई, मराठी वाचकांचा आपल्या लेखणीवर अलोट व अजोड विश्वास आहे!
पडघम - साहित्यिक
दिलीप माजगावकर
  • वीणाताई गवाणकर आणि त्यांची निवडक ग्रंथसंपदा
  • Fri , 10 June 2022
  • पडघम साहित्यिक वीणा गवाणकर Veena Gavankar एक होता कार्व्हर Ek Hota Carver

प्रसिद्ध चरित्रकार वीणा गवाणकर यांनी नुकतेच वयाच्या ८०व्या वर्षांत पर्दापण केले आहे. त्यानिमित्ताने ९ जून २०२२ रोजी त्यांचा राजहंस प्रकाशनाकडून मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. वीणाताईंची सर्वाधिक पुस्तके राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. एखाद्या लेखकाचा अशा प्रकारे सत्कार-सन्मान करण्याचा हा मराठीतला दुर्मीळ प्रसंग आहे. त्यामुळे ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी हे मानपत्र इथे पुनर्प्रकाशित करत आहोत…

..................................................................................................................................................................

राज(हंस)मान्य राजश्री वीणाताई गवाणकर

यांना सादर नमस्कार...

अलीकडेच आपण ८०व्या वर्षांत पदार्पण केले आहे. अशी निमित्ते मागे वळून पाहण्यासाठी आदर्श असू शकतात, परंतु केवळ मागे पाहणे आपल्यासारख्या लेखनतपस्विनीच्या बाबतीत संभवत नाही. पुढे पाहण्यात आपल्याला जास्त रस असतो, म्हणूनच केवळ दोनच महिन्यांपूर्वी म्हणजे एप्रिल २०२२मध्ये ‘अवघा देहचि वृक्ष जाहला’ हे आपले नवीन पुस्तक प्रकाशित झाले आणि चाहत्या वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे दुसऱ्याच महिन्यात त्याची दुसरी आवृत्तीही प्रसिद्ध झाली!

अप्रूप वाटते ते याचे की, अतुलनीय कर्तृत्व गाजवणारी देशोदेशींची आणि प्रसंगी कानाकोपऱ्यांतील नररत्ने आपण यत्नपूर्वक वेचून आणता आणि नैसर्गिक बुद्धिमत्तेला अथांग परिश्रमांची भक्कम जोड देऊन त्यांची जीवनचरित्रे आम्हा मराठी वाचकांसमोर मूर्तीमंत उभी करता… डॉ, आयडा स्कडर, डॉ.खानखोजे, डॉ. सालिम अली, रोझलिंड फ्रँकलिन, डॉ.रेमंड डिटमार्स, लीझ माइट्नर, विलासराव साळुखे, रॉबी डिसिल्व्हा, गोल्डा मायर आणि आता रिचर्ड बेकर...

यांतले कोणी कृषितज्ज्ञ, कोणी अणुशास्त्रज्ञ, तर कोणी दीनदलितांचे सेवक, कोणी राजकारणी, तर कोणी पक्षी वा सर्प सांभाळण्यासाठी आयुष्य वेचलेले, कोणी चित्रकार, तर कोणी पाण्याचे महत्त्व ओळखलेले द्रष्टे आणि असे आणखीही लोकसेवक...

यांतल्या अनेकांची अवस्था निदान आम्हा मराठी वाचकांसाठी तरी ‘नाही चिरा नाही पणती...’ अशीच राहिली असती, जर आपल्या वेधक नजरेचा आणि रत्नपारखी लेखणीचा जादुई स्पर्श त्यांना झाला नसता! जे कर्तृत्व करतात ते थोरच, परंतु त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे जे प्रभावीपणे गातात, त्यांच्याबद्दलही आम्ही वाचक कृतज्ञ आहोत, आणि म्हणूनच आपला आजचा हा सत्कार...

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

................................................................................................................................................................

एखाद्या नवख्या फलंदाजाने पदार्पणातच षटकार मारावा आणि पुढे सहजपणे धावफलकावर द्विशतक लावावे, तसे आपले उपजत साहित्यिक कर्तृत्व जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या अमेरिकन शास्त्रज्ञाच्या परीसस्पर्शामुळे पदार्पणातच उजळून निघाले.

‘एक होता कार्व्हर’ या आपल्या पहिल्याच पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद प्रारंभापासून आजपर्यंत थंडावलेला नाही. आणि त्यामुळे त्याच्या आवृत्त्यांच्या संख्येलाही विश्रांती माहीत नाही. १९८१मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या आपल्या या अद्वितीय साहित्यकृतीची सध्या ४६वी आवृत्ती चालू आहे आणि लवकरच आवृत्त्यांचा सुवर्णमहोत्सव करण्याचे भाग्य त्याला लाभेल, याविषयी राजहंस परिवारातील कोणाच्याही मनात तीळभरही शंका नाही.

आपल्या ‘कार्व्हर’ने गेली ४२ वर्षे जगभरातील मराठी माणसांवर जादू केली आणि जे वाचक नव्हते, त्यांना वाचक बनवले. मानसिक औदासीन्य आलेल्या व्यक्तींनी कार्व्हर वाचला आणि त्या कडेलोटापासून वाचल्या, अशी उदाहरणे घडलेली आहेत. असे भाग्य आपल्या या चरित्रग्रंथाच्या वाट्याला आले, हा निव्वळ योगायोग नसून त्यामागे आपल्या प्रतिभेचे आणि परिश्रमांचे पक्के पाठबळ आहे.

‘राजहंस’साठी आपण १० पुस्तके लिहिलीत. त्यांतील एकही पुस्तक केवळ एक आवृत्ती पुरी करून थांबले नाही, यात मराठी वाचकांचा आपल्या लेखणीवरचा अलोट व अजोड विश्वास प्रतिबिंबित झाला आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

वयाच्या केवळ २३व्या वर्षी आपण औरंगाबाद येथील ‘मिलिंद महाविद्यालया’त ग्रंथपाल म्हणून काम करायला सुरुवात केलीत आणि या सेवेतून संदर्भाचे ज्ञान व महत्त्व समजून घेतलेत. घरापासून दूर एकटी राहण्याने विचारात स्वतंत्रता आणि ठामपणा हे गुण आले, ते लेखनासाठीही उपयुक्त ठरले. अभ्यासू, व्यासंगी, विपरीत परिस्थितीवर मात करणारी, रूढ चौकट मोडत आपले कर्तृत्व सिद्ध करणारी आणि वरकरणी सामान्य दिसणारी माणसे हीच समाजाचा खरा पोत ठरवीत असतात, अशा धारणेने दर्जेदार लेखनाचा महायज्ञ आपण गेली ४२ वर्षे अथक चालवीत आहात. या यज्ञात आपण आपल्या बौद्धिक क्षमता व लेखनगुणांचे सर्वस्व समर्पण केलेत.

आजपर्यंत अनेक प्रतिष्ठित संस्थांचे १४ पुरस्कार आपल्याला लाभले आहेत. अर्थात तरीही, डोळस वाचकांच्या नजरेतील कृतज्ञता हाच आपल्याला सर्वांत मोठा पुरस्कार वाटत आला आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आपली ही उज्ज्वल वाटचाल अशीच पुढेही चालू राहू दे, या शुभेच्छेसह, ‘राजहंस प्रकाशन परिवारा’तर्फे आपल्याला हे मानपत्र धन्यतापूर्वक अर्पण करीत आहोत.

.................................................................................................................................................................

वीणाताई गवाणकर यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......