भारतीय रेल्वे कात टाकणार! ५ मेगा हर्ट्झ स्पेक्ट्रममुळे ‘फोर-जी’ नेटवर्क प्रत्यक्षात येणार आहे...
पडघम - देशकारण
जीवन तळेगावकर
  • भारतीय रेल्वेचं एक प्रातिनिधिक चित्र आणि रेल्वेचं बोधचिन्ह
  • Wed , 22 September 2021
  • पडघम देशकारण भारतीय रेल्वे Indian Railway ५ मेगा हर्ट्झ स्पेक्ट्रम 5 MHz spectrum

केंद्र सरकारने ५ मेगा हर्ट्झ रेडिओ स्पेक्ट्रम भारतीय रेल्वेला बहाल केलं, या महत्त्वाच्या निर्णयावर प्रसारमाध्यमांमध्ये अपेक्षेप्रमाणे चर्चा झाली नाही. त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या दृष्टीनं ‘या निर्णयाचं महत्त्व काय?’ हा सहज उद्भवणारा प्रश्न अनुत्तरित राहिला. या आधुनिकीकरणामागे तंत्रज्ञानाशी निगडित विकास असल्यामुळे ही सुधारणा सर्वांना समजावून सांगणं आवश्यक आहे. तोच प्रयत्न या लेखाद्वारे करतो आहे. आता आपली ‘झुक झुक झुक झुक अगीनगाडी...’ कात टाकणार, हे नक्की!

‘दूरसंचार’ (‘टेलिकम्युनिकेशन’/‘टेलिकॉम’) ही आज सामान्यांसाठी एक अत्यावश्यक सेवा झाली आहे. हातात मोबाईल आल्यामुळे लोकांचा आपसांतील संवाद वाढला, व्यवहार वाढला. आज भारताच्या दृष्टीनं सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या क्षेत्राचा वाटा ८ टक्के आहे. जसे जनतेला संप्रेषणासाठी व अर्थार्जनासाठी ‘टेलिकॉम’ महत्त्वाचं झालं आहे, तसंच ते व्यवसायांसाठी वा उद्योगांसाठीदेखील अपरिहार्य झालं आहे. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

रेल्वेच्या संचालनात वापरल्या गेलेल्या तंत्रज्ञानप्रणालींचा इतिहास चाळला तर लक्षात येतं की, याची सुरुवात ‘सिग्नल्स’पासून झाली. हळूहळू ‘सिग्नल्स’च्या वेगवेगळ्या यंत्रणा अस्तित्वात आल्या. एकेकाळी इंग्रजीतल्या ‘सिग्नल’ या शब्दाला एक लांबलचक मराठी प्रतिशब्द वापरला जायचा- ‘अग्निरथ-गमनागमन-भयसूचक-ताम्रनीलवर्ण-लोहपट्टिका’. म्हणजे, एका लोहमार्गावर एका वेळी एकच गाडी धावत आहे आणि ती पुढच्या-मागच्या गाडीपासून सुरक्षित अंतरावर आहे, हे नियंत्रित करण्यासाठी ही व्यवस्था होती.

आधी तर लाल, पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे झेंडे घेऊन माणसंच लोहमार्गाच्या बाजूला पेरली जायची. नंतर आले, ‘मेकॅनिकल सिग्नल्स’ (यांत्रिक) आणि त्याबरोबर मार्गावर दिशादर्शनासाठी कंदील. त्यांचे पुढे ‘इलेक्ट्रिकल सिग्नल्स’ झाले आणि सोबत आले लाईटचे दिवे. त्याचा परिणाम म्हणून रस्त्यांवर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी जसे दिवे लागतात, तसे उपरोक्त तीन रंगांचे दिवे लोहमार्गाच्या बाजूला लागू लागले. त्यावरून रेल्वे चालकाला ट्रॅकवरील इतर गाड्यांबद्दल माहिती मिळू लागली. एकीकडे दूरसंचार क्षेत्रदेखील विकसित होऊ लागलं. ‘टेलिग्राम’, ‘टेलिफोन’, ‘ऑप्टिकल फायबर’ आणि ‘मोबाईल टेक्नॉलॉजी’मुळे (‘टू-जी’, ‘थ्री-जी’, ‘फोर-जी’ आणि आता ‘फाईव्ह-जी’) मशीनसोबत आणि माणसांसोबत जलद संवाद साधणं सोयीचं झालं. सिग्नल्सच्या तंत्रज्ञानाचीदेखील प्रगती झाली, रेल्वेची गती वाढली आणि ती अधिक सुरक्षित झाली.

आता भारतीय रेल्वेच्या सुरळीत संचालनासाठी ‘टेलिकॉम सेवा’ अत्यावश्यक झाली आहे. रेल्वेची ऑपरेशन्स सुरळीत चालावीत, यासाठी ‘मशीन-टू-मशीन कम्युनिकेशन’ किंवा आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे-कर्मचाऱ्यांचा आपसांतील संवाद घडवून आणणं आवश्यक झालं आहे. हा संवाद घडवून आणायचा तर मशिन्सना वा लोकांना जोडणारं संप्रेषण-माध्यम गरजेचं आहे आणि इंटरनेटची धावपट्टीदेखील. त्यासाठी आधी ‘ऑप्टिकल फायबर’चं जाळं विणण्यात आलं.

भारतात ‘रेलटेल’ ही नुकतीच स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झालेली सरकारी कंपनी या क्षेत्रात कार्यरत आहे. तिचं मूळ काम रेल्वेतील सगळ्या तंत्रज्ञान-प्रणाली सुरळीत चालाव्यात यासाठी ‘ऑप्टिकल-फायबर’द्वारे इंटरनेट सेवा पुरवणं हे आहे. तिचं जाळं देशभरात भारतीय रेल्वे मार्गाला समांतर पसरलं आहे. जिथं व्यवसायाच्या संधी कमी आहेत, असं समजून खासगी दूरसंचार कंपन्यांनी निवेश केला नाही किंवा इंटरनेट पोचवलं नाही, तिथंदेखील ‘रेलटेल’ने फायबरचं जाळं विणलं आहे.  

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

आता जी आधुनिक ‘सिग्नलिंग सिस्टिम’ आहे, तिला संवादी बनवण्यासाठी ‘ऑप्टिकल फायबर’ किंवा ‘जीएसएम-आर’ (‘ग्लोबल सिस्टिम फॉर मोबाईल कम्युनिकेशन- रेल्वे’) किंवा ‘एलटीई’ (‘लाँग टर्म इव्होल्यूशन’ किंवा ‘फोर-जी’) तंत्रज्ञान जगभरात वापरलं जातं.

भारतीय रेल्वेत इतकी वर्षं ‘ऑप्टिकल फायबर’ किंवा ‘जीएसएम-आर’ संवादासाठी वापरलं जात असताना, ‘एलटीई’ किंवा ‘फोर-जी’ची गरज का पडावी? त्याचं उत्तर असं की, रेल्वे आताशा नवनवे ‘सेन्सर्स’ किंवा ‘आय ओटी’ (‘इंटरनेट ऑफ थिंग्स’) डिव्हायसेस वापरात आणत आहे, त्यांना एकमेकांशी जोडून त्यांचा डेटा किंवा अलार्म ‘कंट्रोल सेंटर’पर्यंत पोचवण्यासाठी ‘सेल्युलर सिम कार्ड’ वापरणं अधिक सोयीचं जातं. त्यासाठी ‘फोर-जी’ तंत्रज्ञानाचा आसरा घेणं आवश्यक होतं. प्रत्येक ठिकाणी ‘फायबर’ नाही जोडता येत आणि ‘जी एस एम-आर’मध्ये तर डेटा वाहून नेण्याची क्षमताच नाही. त्यामुळे ‘फोर-जी’ तंत्रज्ञानाचा पर्याय दृष्टीपथात आला.

अशा वेळी केंद्र सरकारकडे दोन पर्याय होते. एक, ‘जे जसं चालू आहे तसं चालू देणं’, म्हणजे आधुनिकीकरणाची कास न धरणं. दुसरा, ‘आधुनिक तंत्रज्ञानास प्रोत्साहन देणं’. दुसरा निर्णय रेल्वेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असला तरी जनसामान्यांना न-कळणारा असाच होता\आहे. कारण त्यामागे तंत्रज्ञानाचं जटिल अंतरंग आहे आणि त्याचा फायदा लगेच दिसून न येणारा असल्यामुळे तो एक संभाव्य ‘राजकीय घोडचूक’देखील ठरता. पण त्याची तमा न बाळगता केंद्र सरकारने हा सकारात्मक परिणाम घडवून आणणारा दूरगामी निर्णय घेतला, ७०० मेगा हर्ट्झ फ्रिक्वेंसी (वारंवारिता)मधील स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी करावी लागणारी अडथळ्यांची शर्यत पार करून, हे प्रशंसनीय आहे. ही वारंवारिता महत्त्वाची आहे, कारण याचा वापर करून ‘फोर-जी’ नेटवर्क लावण्यासाठी कमी खर्च येतो.     

यामुळे रेल्वेच्या संचालनात काही अडथळे उद्भवले, तर त्याची माहिती लगेच मिळाल्यामुळे; त्यांचं निरसनदेखील सॉफ्टवेअर प्रणालींद्वारे करणं शक्य होणार आहे. अजून भारतात आणि जगभरात जवळजवळ सगळीकडेच लोहमार्गामध्ये ‘क्रॅक्स’ किंवा ‘फिशर्स’ असल्यामुळे ‘फिश प्लेट्स’ सरकल्यामुळे, किंवा ‘अन्मॅनण्ड रेल्वे क्रॉसिंग्स’मुळे अपघात होत असतात. त्यासाठी रेल्वे मोठ्या प्रमाणात आवश्यक तिथं कॅमेरा आणि विविध सेन्सर्सचं जाळं वाढवत आहे, पण त्यांना ‘कंट्रोल रूम’पर्यंत डेटा वाहून नेण्यासाठी ज्या सेल्युलर वायरलेस तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, ती हे ५ मेगा हर्ट्झ स्पेक्ट्रम वापरून लावण्यात येणाऱ्या ‘फोर-जी’ नेटवर्कमुळे प्रत्यक्षात येणार आहे.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

साहजिक पुढे जाऊन या विदेचा (डेटा) वापर करून अतिजलद निर्णय घेणारी ‘आर्टिफिशिअल इंटलिजन्स’ वा ‘मशीन लर्निंग’ टेक्नॉलॉजीचा मुक्त वापर करणारी सॉफ्टवेअर्स आणि ऍप्लिकेशन्स वापरणं सहज शक्य होणार आहे. त्यामुळे रेल्वेची गती वाढेल, शहरांमधील अंतर कमी होईल, रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होईल. 

आधी भारतीय रेल्वेकडे केवळ १.६ मेगा हर्ट्स स्पेक्ट्रम होतं आणि तेही देशभर नव्हतं. त्यात अत्याधुनिक ‘फोर-जी’ तंत्रज्ञान वापरणं अशक्य होतं. रेल्वेच्या ऑपरेशन/संचालनासाठीदेखील अधिक स्पेक्ट्रमची आवश्यकता होती. ती लक्षात घेऊन सरकारने कित्येक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी ध्यानात घेऊन हा नवा निर्णय घेतला.       

भारतीय रेल्वेमध्ये आतापर्यंत ‘जीएसम फॉर रेल्वेज’ नावाची टेक्नॉलॉजी वापरली जात होती, पण त्यात केवळ ‘व्हॉइस’ आणि थोडा ‘डेटा’ तेवढा मिळायचा. त्यामुळे त्याचा उपयोग काही निवडक ऍप्लिकेशन्ससाठी होत असे. मोबाईल पण काही निवडक, महागडे वापरावे लागत. शिवाय रेल्वेचं ऑपरेशन पाहणाऱ्या स्टाफच्या एकमेकांशी होणाऱ्या संवादावर मर्यादा येत. ‘पुश-टू-टॉक’सारखी जुनी टेक्नॉलॉजी त्यांना वापरावी लागे. (कित्येक आशियायी देशांत अजून तीदेखील वापरली जात नाही. त्या दृष्टीनं भारतीय रेल्वे अधिक सुरक्षित आहे.) पण आता ‘एलटीई’ किंवा ‘फोर-जी’ हे आधुनिक तंत्रज्ञान या कामासाठी वापरल्यास केवळ बोलण्याच्या पलीकडे जाऊन ‘डेटा’ आणि ‘व्हिडिओ’ अप्लिकेशन्सना सपोर्ट करणारी यंत्रणा भारतीय रेल्वेला उभारता येईल आणि आपत्कालीन व्यवस्थापन अधिक जलद गतीनं करता येईल, असा विचार करून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

‘एफआरएमसीएस’ नावाची युरोपियन संघटना आहे. ती रेल्वेमध्ये ‘फोर-जी’ किंवा ‘एलटीई’ टेक्नॉलॉजी वापरली जावी म्हणून आग्रही आहे. साऊथ कोरिया सोडला, तर जगभरात अजून रेल्वेमध्ये आपत्कालीन संभाषणासाठी ‘फोर-जी’ तंत्रज्ञानाचा वापर फारसा झालेला नाही. भारतात ती उपलब्ध होणं ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ‘हाय-स्पीड-कॅम्युनिकेशन-कॉरिडॉर’ रेल्वेला तयार करता येतील आणि आपली ऑपरेशन्स अधिक सुरळीत चालवता येतील.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

केंद्र सरकारने ज्या गतीनं या विषयासंबंधी निर्णय घेतले आहेत, ते पाहता ही आधुनिक यंत्रणा रेल्वेसाठी स्वीकारणारा एक अग्रीम देश म्हणून आपण ओळखले जाऊ. पुढे ५ मेगा हर्ट्झपेक्षा अधिक स्पेक्ट्रम मिळाल्यास प्रत्येक डब्यात कॅमेरा बसवून प्रवाशांना अधिक सुरक्षा देणंही सोयीचं जाणार आहे. शिवाय रेल्वेत इंटरनेट उपलब्ध करून देणं शक्य होईल. त्यामुळे रेल्वे संचालनापलीकडे जाऊन प्रवाशांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देता येतील. कदाचित डिजिटल फलकांवर ऑनलाईन जाहिराती करून रेल्वेला अधिक महसूल उभा करता येईल. रेल्वेला स्वतःचे ‘फोर-जी’ सेल्युलर नेटवर्क लावता येतील, कारण ‘रेलटेल’ने डेटा वाहून नेणारं ‘फायबर’चं जाळं विणलेलं आहे. रेल्वेला स्वतःच्या जागेत ट्रॅक्सना समांतर स्वतःची ‘टेलिकॉम टॉवर्स’ उभारता येतील. त्यातील अतिरिक्त जागा ‘बी-टू-सी’ पॅसेंजर ट्रॅफिकसाठी खासगी दूरसंचार कंपन्यांना भाडेतत्त्वावर देता येईल. 

उद्या पुन्हा ‘फाईव्ह-जी’ तंत्रज्ञानाचा स्वीकार करायचा झाल्यास केवळ सॉफ्टवेअर बदललं आणि अधिक स्पेक्ट्रम उपलब्ध झाले की, झालं! त्याकरता आधुनिकीकरणासाठी जी गुंतवणूक केली जाईल, तीच पायाभूत ठरणार आहे.

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......