‘या’ आणि ‘त्या’ आणीबाणीदरम्यानचं खरं सत्य काय आहे नेमकं?
पडघम - देशकारण
श्रवण गर्ग
  • इंदिरा गांधी आणि आणीबाणीविषयी एक हेडलाइन
  • Mon , 05 July 2021
  • पडघम देशकारण इंदिरा गांधी Indira Gandhi आणीबाणी Emergency लोकशाही Democracy काँग्रेस Congress

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा इंदिरा गांधींच्या आणीबाणीवर टीका करतात, तेव्हा एकीकडे भीती वाटते, तर दुसरीकडे चार वेगवेगळ्या प्रतिक्रिया मनात उमटतात. पहिली ही की, जर बहुतेक प्रत्येक जण म्हणत आहे – देशात सध्या अघोषित आणीबाणी चालू आहे. तर मग तो आवाज मोदींपर्यंत पोहोचतोय की नाही? हे आरोप करणारे त्या वेळच्या आणीबाणीची आणि सध्याच्या आणीबाणीची तुलना करणारे अनेक उदाहरणेही देत आहेत. या आरोपांमध्ये घटनात्मक संस्थांचा ऱ्हास यापासून ‘देशद्रोहा’च्या असत्य आरोपांअंतर्गत निरपराध लोकांच्या अटका आणि मानवाधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक घटनांचा समावेश होतो. त्यामुळे असं वाटतं की, हे सगळं होत असतानाही पंतप्रधान १९७५च्या आणीबाणीवर टीका करत असतील, तर त्यांना त्यासाठी बरंच धाडस गोळा करावं लागत असणार. अलीकडेच पंतप्रधानांनी सांगितलं- आणीबाणीच्या ‘काळ्या दिवसां’ना यासाठी विसरता येत नाहीये की, त्या काळात काँग्रेसने आपल्या लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवलं होतं.

पंतप्रधानांच्या म्हणण्यावर दुसरी प्रतिक्रिया अशी उमटते की, त्यांचं सरकार ‘घोषित आणीबाणी’ देशात लागू करणार नाही. नोटबंदी आणि लॉकडाउनच्या अनपेक्षित घटनांमुळे देशातल्या कोट्यवधी लोकांना जो त्रास\वेदना झाल्या, त्याचा समावेश पंतप्रधान नक्कीच आपल्या सरकारच्या आणीबाणीविषयक कार्यक्रमांमध्ये करणार नाहीत. ते तर आजकाल नोटबंदीचा नामोल्लेखही करू धजत नाहीत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

तिसरी प्रतिक्रिया ही होते की, भविष्यात एखाद्या पंतप्रधानाला आणीबाणीवर टीका करायची असेल तर त्याच्यापुढे यक्षप्रश्न उभा राहील की, कुठल्या आणीबाणीचा उल्लेख कशा प्रकारे करावा? जर बऱ्याच आणीबाणींच्या घटना घडल्या तर त्यांचा ‘स्मृतिदिवस’ वा ‘काळा दिवस’ साजरा करताना जनताही संभ्रमातच पडणार!

चौथी आणि शेवटची प्रतिक्रिया सर्वांत महत्त्वाची आहे. असा कुठला कागदोपत्री पुरावा जाहीर व्हायचा बाकी आहे का, की, त्यामुळे आणीबाणीच्या काळात किंवा तिच्या मागेपुढे कुठल्याही काँग्रेस सरकारच्या काळात मोदींना त्यांच्या राजकीय विरोधामुळे तुरुंगात जावं लागलं वा नजरकैदेत राहावं लागलं? आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त मानवाधिकार संघटना ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशल’च्या अहवालानुसार आणीबाणीच्या वीस महिन्यांच्या कालावधीत जवळजवळ एक लाख चाळीस हजार लोकांना कुठल्याही खटल्याशिवाय तुरुंगात डांबण्यात आलं होतं. त्यात संघ, जनसंघ, समाजवादी पक्ष, जयप्रकाश नारायण यांचे समर्थक, गांधीवादी नेते आणि पत्रकार आदींचा समावेश होता. जनसंघाचे त्या वेळचे अनेक प्रमुख नेते सध्या ‘मार्गदर्शक मंडळा’ची शिक्षा भोगत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्या वेळी मोदी वेषांतर करून संघ वा पक्षाचं काम करत होते. ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ला तर नुकताच भारतातून आपला गाशा गुंडाळावा लागला.

देशात आणीबाणी लागू झाली, तेव्हा मोदींचं वय २४ वर्षं नऊ महिन्यांच्या आसपास होतं. त्यांच्या वयाचे अनेक तरुण गुजरात आणि बिहारमध्ये रस्त्यांवर आंदोलन करत होते. आणीबाणीचं एक प्रमुख कारण १९७४चं बिहारचं विद्यार्थी आंदोलन हे होतं. या आंदोलनाची प्रेरणा १९७३-७४ सालचं गुजरातमधलं विद्यार्थ्यांचं नवनिर्माण आंदोलन हे होतं. तेव्हा या दोन्ही राज्यांत काँग्रेसची सरकारं होती. दोन्ही आंदोलनांना इतर विरोधी पक्षांसह जनसंघ आणि त्याच्या विद्यार्थी संघटनांचं समर्थन होतं. गुजरात आंदोलन चालवणारे नव निर्माण समितीचे विद्यार्थी नेते त्या वेळी जयप्रकाश नारायण यांना भेटण्यासाठी दिल्लीला यायला निघाले होते, आणि आम्ही पत्रकार मंडळी त्यांच्याशी बोलत होतो. आणीबाणीदरम्यान गुजरातमध्ये काही काळ विरोधी पक्षांच्या जनता मोर्चाचं सरकार (जून १९७५ ते मार्च ७६) होतं. त्यानंतर राष्ट्रपती राजवट (मार्च १९७६ ते डिसेंबर ७६) लागू केली गेली. १९७७मध्ये लोकसभेच्या निवडणुकीआधी चार महिने काँग्रेसचं सरकार (डिसेंबर ७६ ते एप्रिल ७७) होतं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

नरेंद्र मोदींनी आणीबाणीच्या ‘काळ्या दिवसां’विषयी आणि त्या काळातल्या लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवण्याविषयी निदान सध्याच्या दिवसांत तरी बोलायला नको, कारण ‘भक्तां’शिवाय सामान्य नागरीक त्याला फार गंभीरपणे घेणार नाहीत. त्यांच्या पक्षातील लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, शांता कुमार आणि गोविंदाचार्य यांसारखे नेते यांचा उल्लेख केला जाऊ शकतो. कारण ते आणीबाणीविषयी अधिकारवाणीने बोलू शकतात.

आणीबाणीच्या पूर्णपणे सोलवटून निघालेल्या पाठीवर कोरडे ओढण्याची दोन कारणं असू शकतात. पहिलं, या अपराधगंडापासून सुटका करून घेणं की, त्या आणीबाणीला विरोध करण्यामुळे जे लोक तुरुंगात डांबले गेले होते, ते आज अशा सत्तेत सहभागी आहेत, जी ती केवळ त्यापेक्षा केवळ वेगळीच नाही, तर जास्त रहस्यमयही आहे. पंतप्रधान स्वत: कसं सांगणार की, लोकशाही संस्था आणि मूल्यं १९७५च्या आणीबाणीच्या तुलनेत आज किती चांगल्या अवस्थेत आहेत?

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

दुसरं महत्त्वाचं कारण वर्तमानातल्या गांधी परिवारावर शरसंधान करण्याचं असावं, ज्यांचे पूर्वज आणीबाणीसाठी जबाबदार होते. आणीबाणीच्या काळात राहुल गांधी पाच वर्षांचे आणि प्रियांका गांधी तीन वर्षांच्या असतील. त्यांचे वडील राजीव गांधी तर त्या वेळी राजकारणातही नव्हते. ते तेव्हा वैमानिक होते. त्यांचा छोटा भाऊ संजय गांधी यांना आणीबाणीसाठी तेवढंच जबाबदार मानलं जातं, जेवढं इंदिरा गांधींना. असं म्हटलं जातं की, तेव्हा इंदिरा गांधी पूर्णपणे संजय गांधींच्या कह्यात होत्या. देशाचा कारभार पंतप्रधान कार्यालयाऐवजी पंतप्रधान निवासामधून चालवला जात होता. आणीबाणीच्या नऊ महिने आधी संजय गांधींचं लग्न झालं होतं. उपलब्ध माहितीनुसार असा उल्लेख सापडतो की, त्या वेळी त्यांची पत्नी त्यांच्यासोबत राहून त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना मदत करत होती. पंतप्रधान ज्या आणीबाणीचा उल्लेख करतात, ती त्या वेळच्या ‘काळ्या दिवसां’चं केवळ अर्धसत्य आहे. उरलेलं अर्धसत्य त्यांच्याच पक्षात विद्यमान आहे.

मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख https://janjwar.com या पोर्टलवर ४ जुलै २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

https://janjwar.com/vimarsh/what-is-the-deference-between-indira-and-modi-emergency-shravan-garg-analysis-759287

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा