तेव्हा वाटतं, या आदिम चराचराचा हा एक अंश माझ्यामध्ये पेरून माझी नाळ या अथांग चराचराशी, माझ्या या आईशी जोडून ठेवलीय
संकीर्ण - ललित
रेखा शहाणे
  • डावीकडे पेंगाँग लेकचं एक छायाचित्र. उजवीकडे पेंगाँग लेकच्या काठावर लेखिका
  • Thu , 22 April 2021
  • संकीर्ण ललित पेंगाँग लेक Pangong Lake हिमालय Himalaya अरुणाचल प्रदेश Arunachal Pradesh

एकदा हिमालयाचं अथांगरूप नजरेत साठलं की,

हिमालय तुम्हांला पुन:पुन्हा साद घालतच राहतो.

 

या आधी दोन-तीन वर्षांपूर्वी पेंगाँग लेकवर तर त्या लोभस गर्द निळाईत खोलखोल खोलपर्यंत

बसल्या जागेवरून मी उतरत उतरत उतरतच राहिले होते. कुठपर्यंत? शांततेचा भंग करत माझा

हात धरून कुणी म्हणतं,

रेखाबाई भानावर आलात का?

सगळे पोहोचले पुढपर्यंत. 

नकळत चालत राहते त्याच्याबरोबर. नि:शब्द!

पायाखालचा रस्ताही माहीत नसतो.

ती निळाई अजून घेरूनच आहे मला.

मी टाकतेय ती पावलं माझी नाहीएत.

मी भारावलेली नि निळाई

माझ्या मागून मागून माझी भाषा घेऊन, 

कार समोर दिसल्यावर अल्लद नाहीशी होतेय. मला दिसतंय.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मी हरवलेय. कुणी काही बोललं, विचारलं तरी मी काही बोलत नाही! 

समोर आलेलं कॅडबरी, खमंग लाडू, चिवडा, बदाम, मसाला काजू काहीही मी तोंडातही टाकत नाही.

फ्रंट सीटवर नि:शब्दपणात

डोळे बंद करून शांत पडूनए नुसती.

कार पुढे जात राहते.

 

ती गडगंज निळाई, ते भान आजही कित्येकदा अगदी माझंमाझं असतं.

 

कधी स्वत:शीच एकटं एकटं बसलं की, ती निळाई आई होऊन मला अगदी चिरपरिचित

अनादी मायेनं वेढून टाकते.

मी माझी राहत नाही.

असे मन विसरले क्षण माझे होत मला अंगाई गातात. मी उठते.

तेव्हा एक समाधी भंग पावलेली असते.

 

चैतन्य महाप्रभू त्या निळ्याच्या नादात समुद्रात अदृश्य होतात. हे सगळं अगदी स्वप्नवत तर

खरंच, पण अशा अनुभूतीत त्यांचं नाहीसं होणं नकळत कधी खरंखरंसं वाटून जातं

नि हसू येतं.

वेडेपण आणि शहाणपण यातली सीमारेषाही अगदीच अस्पष्ट होत जाते कित्येकदा.

ही गोष्ट २०१६ मधली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

तर आता २०१९.

दोन-तीन वर्षांनंतर

कार अरुणाचलमधल्या रस्त्यांवरून

धावत होती.

सकाळचं हलकं कोवळं रेशमी मुलायम ऊन

शुभ्र एकसंध दूरपर्यंत पसरलेल्या बर्फावर बेमालूम मिसळत समतल पडलं होतं.

बर्फाची एकसंथ अखंड पसरलेली हलवू नये अशी वाटावी अशी दुलई

जमिनीचं नखही दिसू देत नव्हती.

तुरळक कुठे छोटी छोटी गडद हिरवीगार झुडूपं उन्हात न्हात बसली होती. रस्त्यालगतच्या

सुस्नात  हिरव्या गडद झाडांच्या हलकेच उजळलेल्या पानांमागे

गडदच पण लालचुटूक,

आकारांनी मध्यमच पण तशी मोठाली

लालचुटूक चुकार फुलं

नि त्यांच्या लहान, मोठ्या, नुकत्याच उमलूउमूलू पहाणाऱ्या चुकार कळ्या त्यांच्या अनाघ्रात

सौंदर्यात उन्हात न्हात होत्या.

सुखद शुभ्र सफेद बर्फ

उन्हाने जीवघेणा मोहक होत खुणावत होता.

 

गाडी थांबवावी.

सगळा जामानिमा करत चढवलेले पायातले फ्रॉस्ट फ्री जोडे, लोकरीचे मोजे नि त्या आत

घातलेले साधे कॉटनचे मोजे उतरवावे,

अनवाणी व्हावं नि 

त्या अनावर बर्फावर जाऊन,

एक पाय लांब करून,

एकपाय जरा पोटाशी दमडून,

दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून

मान त्यावर ठेवून

अल्लद बसून राहावं एकांतात

असं काही मनभर वाटत होतं.

बस्स! इथंच पडून राहावं.

कार निघून गेली तरी मला भान येण्याची शक्यता नव्हती.

पण थांबवता न येणारी कार तिच्या गतीत चाललीय.

मी मात्र डोंगर उतारावरच्या जीवघेण्या शुभ्र सफेद मोहक बर्फावरच आहे.

माझ्याबरोबर कोणी नाहीए.

मी एकटी, अनोळखी प्रदेशात दूरदूरपर्यंत जिथं माणूसही दिसणार नाही अशा प्रदेशात

मला जसं जिथं जावं, चालावं, बसावं, लोळावं वाटत होतं तिथंच आहे.

 

मी बसलेय.

उन्हाची एक कोवळी तिरीप माझ्यावर पडतेय.

मन लक्कन लकाकलं.

अरे, ही तर माझी आईच आहे! धरणीमाता!     

हीच्या मांडीवर तर बसलेय मी.

तिच्या अंगावर तर लोळतेय मी!

यापेक्षा अधिक सुरक्षित मी कुठेही असणारच नाही. 

हीची ही ओढाळ शुभ्र धवल शाल, वर निरभ्र अथांग पसरलेलं जीवघेणं निळशार आकाश, निरव

आसमंत, नजरेत न मावणारा अवकाश!

नि:शब्द मी!

आणि मनाची तार छेडणारा भव्य एकांत!

जिथं ऐकूही येऊ नयेत स्वत:चेही शब्द! निर्गुण निराकार अनाहद नाद!

पडलाच कानावर तर स्वत:च्याच तारेत आलाच तर ऐकू यावा.

एका अपूर्व चिरंतन एकतानतेत नकळत मिसळून जातेय मीही!

मन किती अम्लान अगदी आपलं आपलं असतं.

आणि आईजवळ नाही तर आणखी कुठे एवढं आरस्पानी असणार?

 

असं स्वत:पासून अलगद वेगळालं होणं अनुभवलंय कधी?

माहीत नाही, पण सर्वांबरोबर असूनही

माझ्यापासूनही वेगळं होत भवतालाचाच एक भाग होत स्वत:बरोबर असणं हे भटकंतीतलं

माझंमाझं अनमोल सुख असतं.

तिथं माझ्याही नकळत

माझं मीपण उतरवून ठेवत

किती दूरवर पोहोचते मी

त्या नितळ निखळ स्वत:च्या

आरस्पानी रूपात. स्वत:बरोबर.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

तेव्हा वाटतं या आदिम चराचराचा

हा एक अंश माझ्यामध्ये पेरून

माझी नाळ या अथांग चराचराशी,

माझ्या या आईशी जोडून ठेवलीय

माझ्या आईने.

ती गेली.

पण माझ्यासाठी असे क्षण मला असीम सुखात जोजवणारे असतात. अनुभवलंय कधी?

..................................................................................................................................................................

लेखिका रेखा शहाणे या कवयित्री व पर्यावरण अभ्यासक आहेत.

rekhashahane@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......