बालम केतकर यांचा कवितेतला आवडता छंद म्हणजे अभंग. त्यांची कविता यापुढेही कायम ‘अभंग’ राहील
संकीर्ण - श्रद्धांजली
सुधीर रा. देवरे
  • बालम केतकर आणि त्यांच्या तीन कवितासंग्रहांची मुखपृष्ठे
  • Thu , 31 December 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली बालम केतकर Balam Ketkar

चित्रकार आणि कवी बालम केतकर यांचं २६ डिसेंबर २०२० रोजी वयाच्या ६६व्या वर्षी निधन झालं. त्यांच्याविषयीचा हा लेख…

.................................................................................................................................................................

बालम केतकर गेले. २६ डिसेंबर २०२० रोजी बातमी येऊन धडकली. ती प्रचंड कासावीस करणारी होती. विश्वास बसत नव्हता. म्हणून त्यांच्याच नंबरवर फोन केला. त्यांच्या पुतण्याने उचलला. बातमी खरी होती. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं होतं.

२३ डिसेंबरला त्यांनी मला लिहिलेलं सविस्तर पत्र २६ डिसेंबरला मिळालं, जे मी त्यांच्या निधनानंतर वाचत होतो. (प्रत्येक चार दिवसांनी वा आठवड्याने त्यांचा फोन येत होता, आणि सोबत पत्रेही.) २४ डिसेंबरला सकाळी आठ वाजता त्यांचा शेवटचा फोन आलेला. म्हणजे फक्त तीन दिवस आधी. म्हणाले, ‘‘कूपर हॉस्पिटलमधून काल फोन आला. लॉकडाऊनमुळे माझ्या पायाचं ऑपरेशन पुढं ढकललं, ते पुढच्या आठवड्यात करू असं डॉक्टर म्हणाले. ऑपरेशन झाल्यानंतर घर शिप्ट करायचं आहे. म्हणून ‘चंद्रकंस’ आता जानेवारीच्या (२०२१) शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होईल...’’

बालम केतकरांनी कविता लिहायला सुरुवात केली, तेव्हापासून म्हणजे १९९६पासून त्यांच्या सर्वार्थाने ‘वेगळ्या’ कविता विविध नियतकालिकांत वाचत होतो. पण त्यांच्याशी व्यक्तीगत परिचय नव्हता. तो अगदी अलीकडचा म्हणजे आठ महिन्यांचाच. तोही फक्त फोनवर आणि पत्राने. (पत्रं तेच लिहीत. माझ्याकडून पत्र लिखाणाची त्यांनी खूप अपेक्षा केली, पण त्यांच्या पत्राचं उत्तर फोनवरच देत होतो.) ‘तुम्ही मला पत्रं लिहिली नाहीत, तर मी नाराज होईल,’ असंही त्यांनी नोव्हेंबरातल्या एका पत्रातून मला धमकावलं होतं.  

मार्च २०२०मध्ये स्पीड पोष्टाने त्यांचं एक पार्सल आलं. त्यात त्यांचे दोन कवितासंग्रह, ‘विरक्‍त फुलपाखरे’ आणि ‘चंद्र गंजलेला’.  सोबत सविस्तर पत्र. ‘पोच देऊ’ असं ठरवत असतानाच त्यांचा फोन. ‘देवरे सर, मी बालम केतकर बोलतो. दोन कवितासंग्रह पाठवले आपल्याकडे. पहिल्या संग्रहाच्या प्रती आता शिल्लक नाहीत. ‘चंद्र गंजलेला’वर आपण समीक्षा लिहावी, अशी माझी विनंती आहे.’

अशी ही आमची पहिली भेट. माझा संदर्भ त्यांना नक्की कोणी दिला, हे शेवटपर्यंत त्यांनी सांगितलं नाही.

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

..................................................................................................................................................................

आठ दिवस होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या सविस्तर पत्रासह ‘तळघरातले हंसध्वनी’ची झेरॉक्स प्रत आणि त्यांच्या कवितासंग्रहांवरील काही लेख पोचले. सोबत त्यांचा फोन. त्यानंतर पुन्हा आठच दिवसांनी त्यांच्या नुकत्याच लिहून झालेल्या (२०-८-२०१९ ते २८-२-२०२०) २६ कवितांच्या हस्तलिखितासह सविस्तर पत्र. त्या नंतरच्या फोनवर त्यांनी थोडक्यात त्यांचं आत्मकथन केलं. नवीन येऊ घातलेल्या कवितासंग्रहाला मी प्रस्तावना लिहावी असा आग्रह धरला. फोनवरचे त्यांचे काही शब्द आठवतात, ‘तुमच्यासारखाच मीही प्रसिद्धीपासून, सभा, भाषणं, संमेलनांपासून आणि पारितोषिकांपासूनही लांब आहे. म्हणून मला तुमची प्रस्तावना हवीय...’

मी स्पष्ट होकार न देता त्यांच्या कवितांचा अभ्यास सुरू ठेवला. त्यांची कविता आकलनाला आव्हानात्मक असल्यानं खूप वेळ देत होतो. मध्यंतरी लॉकडाऊन सुरू झाल्यानं त्यांची पत्र येणं बंद झालं. पण फोन येत होते. ऑगष्ट २०२०च्या शेवटी अजून ३४ कविता त्यांनी पाठवल्या. आधीच्या तिन्ही कवितासंग्रहांचा विचार मी प्रस्तावनेत करत असल्याने एप्रिलपासून ३० नोव्हेंबरपर्यंत साडेआठ हजार शब्दांच्या दीर्घ प्रस्तावनेला मी आठ महिने घेतले. या चौथ्या कवितासंग्रहाला काय शीर्षक द्यावं यावर ते फोनवर विचार विनिमय करत. माझ्यासह अजून दोन मित्रांशी चर्चा करून ‘चंद्रकंस’ नाव नक्की करण्यात आलं.

बालम केतकर हे कवितेच्या प्रांतात ज्येष्ठ आहेतच,  पण वयानेही माझ्यापेक्षा ११ वर्षांनी मोठे होते. तरीही ते मला ‘सर’ म्हणायचे. पत्रात ‘मा.’, ‘ति.’ असे मायने वापरायचे. त्यासाठी मी वेळोवेळी विरोध केल्यामुळे नंतर ते ‘प्रिय मित्र’वर स्थिरावले. प्रस्तावनेत त्यांना मी ‘अहो-जाहो’ वापरू नये. केवळ ‘बालम’ म्हणावं, असा त्यांचा आग्रह होता.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

३० नोव्हेंबर २०२०ला प्रस्तावना ई-मेलनं पाठवताना बालमना मी लिहिलेलं पत्र -

‘‘आपली एकांतवासातली कविता मला मनापासून भावली व समीक्षेसाठी आव्हानात्मक वाटली म्हणून मी प्रस्तावना लिहायला होकार दिला. केवळ प्रकृतीमुळेच असं नाही, पण एक तत्त्व म्हणूनही मी संमेलनं, भाषणं, सेमिनार्सपासून कायम अलिप्त असतो. (म्हणून माझंही साहित्य दुर्लक्षित आहे.) घरात बसून कलेची आराधना करतो- अहिराणीसह- सर्वच भाषांसहीत इतर अभ्यास करतो. या अर्थानं मी स्वत:ला ‘गुहामानव’ म्हणतो. हेच गुहामानवपण मला आपल्यात दिसलं म्हणून मी प्रस्तावना लिहिली. प्रस्तावना पूर्ण ताकदीनं लिहिण्यासाठी या दरम्यान अनेकांना लिखाण द्यायला मी नकार दिला. आपल्या कवितेविषयी मला जे काही म्हणायचं आहे, ते प्रस्तावनेत आलं आहेच. प्रस्तावना जशीच्या तशी छापावी. काही बदल अपरिहार्य असलाच तर ते संपादन मी करून देईन. परस्पर एका शब्दाचाही बदल करू नये. प्रस्तावना पुस्तकातूनच वाचकांना व समीक्षकांना वाचायला मिळावी. पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी ही प्रस्तावना कोणालाही वाचायला देऊ नये, ही विनंती.’’

प्रस्तावना वाचायला डोळ्यांच्या समस्येमुळे त्यांना दोन दिवस लागले. वाचून त्यांनी तात्काळ फोन केला. (आणि पत्रही लिहिलं.) माझी प्रस्तावना त्यांना आवडली होती. आणि कवितासंग्रहाव्यतिरिक्त ती चांगल्या नियतकालिकात छापून यावी असं त्यांना वाटत होतं.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सामान्य माणूस असो, श्रीमंत असो की कलावंत आपल्या मृत्यूरेषेच्या पलीकडच्या काळातही डोळे उघडे ठेवून स्वप्न पहात असतो. ज्यांची स्वप्ने पूर्ण झाली आणि केवळ मृत्यूची वाट पहात बसले, असं खूप कमी लोकांना भाग्य लाभतं. अनेक इच्छा मनात ठेवून लोक अनंताच्या प्रवासाला कायमचं निघून जातात. ‘चंद्रकंस’ हा चौथा कवितासंग्रह प्रकाशित झाल्यावर बालमांना तो ‘आपल्या अजून एका अपत्यासारखा’ हाताळायचा होता. आपला अजून किमान एक तरी - पाचवा कवितासंग्रह निघावा असं वाटत होतं. आपल्या कवितेची दखल सर्वदूर घेतली जावी, आपल्या पुस्तकाला एखादा पुरस्कार मिळावा, आपल्या कवितांवर एखादं स्वतंत्र पुस्तक कोणीतरी लिहावं असं वाटत होतं. आणि मुख्य म्हणजे पायाचं ऑपरेशन करून आपल्याला चालता येईल असंही वाटत होतं. या सगळ्या त्यांच्या इच्‍छा निसर्गाने हिरावून घेतल्या.

बालम केतकर यांचा कवितेतला आवडता छंद म्हणजे अभंग. त्यांची कविता यापुढेही कायम ‘अभंग’ राहील याची शाश्वती त्यांच्या कवितेचा अभ्यास असलेला कोणीही देऊ शकेल. त्यांच्या इच्छा पूर्ण न होताच ते लौकीकार्थाने भंग पावले तरी या शापित कलावंताने त्यांचे ‘अभंग’ अक्षरांत ओवून मागे ठेवले आहेत.

२०२० हे संपूर्ण जगात एक भयानक वर्ष ठरलं. करोनाने अनेक मित्रांना गिळंकृत केलं. ‘आता होता कसा गेला’, हे अनुभव रोज येऊ लागले. हे जग सोडून गेलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत, बाकी सगळ्यांनाच उदंड आयुष्य मिळो, अशी प्रार्थना करण्याशिवाय आपल्या हाती काहीच नाही.

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सुधीर रा. देवरे कथा-कादंबरीकार आणि समीक्षक आहेत.

drsudhirdeore29@gmail.com 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......