विसाव्या शतकाच्या दूषित वातावरणातील जे उदयोन्मुख लेखक आहेत, त्यांना स्वत:ला राजकारणाशी संलग्न करण्याची मुळीच गरज नाही
पडघम - साहित्यिक
गाओ झिंगझियान
  • गाओ झिंगझियान आणि त्यांच्या ‘The Position of Writer’ पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 23 December 2020
  • पडघम साहित्यिक गाओ झिंगझियान Gao Xingjian लेखकाचे स्थान The Position of Writer एस्थेटिक्स अँड क्रिएशन Aesthetics and Creation

नोबेल पारितोषिक विजेते चिनी कादंबरी-कथाकार च्याव शिंज्यान (गाओ झिंगझियान, Gao Xingjian) यांना नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीने साहित्य, रंगभूमी व सौंदर्यशास्त्र या विषयांवर व्याख्यानमालेसाठी आमंत्रित केले होते, परंतु त्यांच्या आजारपणातून ते पूर्णपणे बरे न झाल्यामुळे त्यांना लांबचा प्रवास करत नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यान देणे शक्य झाले नाही म्हणून त्यांचे व्याख्यान त्यांनी एकूण ११ प्रकरण असलेल्या ‘Aesthetics and Creation’ या पुस्तकरूपात प्रकाशित केले. हा अनुवादित लेख त्या पुस्तकाले पहिले प्रकरण ‘The Position of  Writer’ (२०१२) होय. या प्रकरणाच्या उत्तरार्धाचा हा मराठी अनुवाद...

अनुवाद : विजय अशोक इंदुशोकाई

..................................................................................................................................................................

लेखक सुस्पष्ट निरीक्षण करण्यासाठी एकटा एकाकी उभा असतो, त्याचे निरीक्षण भावनिक उद्रेकाची जागा घेत असते. ते निरीक्षण ‘चांगले आणि वाईट’ या ‘मॉरल जजमेंट’च्या (moral judgement) पलीकडचे असते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास लेखकाकडे समाजाच्या सुस्पष्ट निरीक्षणाकरता ‘कोल्ड आइज’ (cold eyes) असतात, असे म्हणता येईल. हे असे जग असते, जे त्याच्या बाह्यनिरीक्षणाने एखाद्याला जर बदलायचे असते, म्हणून ते बदलत नाही, कारण लेखक मानवाच्या अंतर्मनाचीही छाननी करत असतो. 

सार्त्र म्हटला होता- ‘others are hell’. त्याचे म्हणणे होते की, साहित्य हे सामाजिक समीक्षेत गुंतायला हवे, परंतु ते मानवतेकडेच वळून बघायला विसरले. नि:संशयपणे सार्त्रसाठी ‘स्व’ (self) सुद्धा नरकच होता. पूर्वीच्या जगात जेव्हा बंड आणि क्रांतीचे पडसाद उमटलेले होते, तेव्हा या महाशयांकडे स्वत:ला पुनर्निर्मितीसाठी वेळ नव्हता, म्हणून अमर्याद ‘स्व’चा गोळा आला आणि या संकटाने आधुनिक समाज त्रस्त झाला. समाजाची समीक्षा करताना मानवता आणि मानवजातीच्या जन्मजात स्वभावाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. जगाला समजणे आणि पुन्हा खोलवर मानवतेला समजणे, हाच साहित्याचा उद्देश असतो.     

साहित्य हे समीक्षेकडे ज्ञानाच्या पर्याय म्हणून बघत नाही. उत्तरआधुनिकवादी भाषाशास्त्रींच्या (postmodern linguistics) कार्यक्षेत्राद्वारे भाषेचा अर्थ विरचना करत लावला जातो. ही भाषेची मोडतोड किंवा तिची समीक्षा फक्त हावभाव दाखवण्यासाठी किंवा फक्त काहीतरी देखावा करण्यासाठी कधीही केली जात नसते.

सामाजिक बदलाची पुनर्निर्मिती करणे किंवा मूळ मानवतेच्या स्वभावाची पुनर्निर्मिती करणे अशक्य असते. ‘बर्लिन वॉल’चे (Berlin wall) कोसळणे यूएसएसआर आणि पूर्वयुरोपच्या साम्यवादी बुरुजाचा अंत असेल, असा कोणीही विचार केला नव्हता. आणि शीतयुद्धानंतर पश्चिम संघाचे (Western Bloc) विघटन होईल व त्यामुळे आर्थिक मंदी येईल हे कुणालाच अपेक्षित नव्हते. यानंतरच्या जागतिकीकरणाच्या योजना पश्चिमात्य देशांना फायदा करण्यासाठी सुरू करण्यात आल्या, परंतु हे कुणालाच माहीत नव्हते की, यामुळे तिसऱ्या जगाच्या देशांची (Third World Countries) झपाट्याने आर्थिक प्रगती होईल आणि युरोपची उतरती कळा थांबणार नाही. पाश्चिमात्य भाष्यकारांनी पुन्हा-पुन्हा भाकीत व्यक्त केले होते की, चीनच्या हुकूमशाही (totalitarianism) शासनाचा अंत होईल, परंतु त्याच्या उलट घडले. आणि विरोधाभास असा की, चीनची अभूतपूर्व आर्थिक प्रगती त्याला लोकशाही राष्ट्र करण्याकडे नेत नाही, ही भाकिते ‘पश्चिमी प्रसारमाध्यमां’मध्ये (western media) पुन्हा-पुन्हा यायला लागलीत. जगात हा महत्त्वाचा विकास गेल्या २० वर्षांच्या आत झाला. हे पूर्णपणे अनपेक्षित होते.  

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

..................................................................................................................................................................

एखादा फक्त जगाच्या ज्ञानावर अविरत प्रश्न विचारू शकतो आणि हे ज्ञान मानवजातीच्या ज्ञानाशी संबंधित असते. मानवतेचे ज्ञान कधीही क्षय पाहू शकत नाही, ही गोष्ट जर वास्तव मानली तर मानवी स्वभावात सुधारणा कशी करता येईल? माणुसकी पुनर्निर्मित करण्याकरता कोण निर्मात्याची भूमिका बजावू शकतो? विसाव्या शतकात नवीन लोकांविषयीची आणि नवीन जगाविषयीची मिथके हिंसक क्रांतीद्वारे तयार केली गेलीत, जे भयानक होते. जर माणुसकी स्वत:ला समजण्यास असमर्थ ठरली तर जगाला समजण्यासाठी ती कशी सक्षम असेल? इतिहासाच्या शृंखलेत व्यक्ती अविरतपणे फक्त मानवी अस्तित्वाच्या स्थितीला समजत आलाय. साहित्य हे मानवजातीचे उरलेले अस्तित्व आहे, या गोष्टीची साक्ष देते.

लेखकाला नैतिकतेसाठी नीतीविषयक मते बनवायची  नसतात, त्याला न्यायाधिशाची किंवा निर्णायकाची भूमिका बजावत नैतिकतेविषयीची अशी मते बनवायची नसतात. साहित्य आणि इतिहास हे दोन्ही मानवजातीच्या अनुभवांच्या आणि भावनांच्या नोंदणीची साक्ष देतात असे म्हणता येईल. शिवाय आज लोकांना प्राचीन ग्रीसचा राजकीय इतिहास थोडाफारच माहीत आहे. फक्त इतिहास विशेषतज्ज्ञ यावर संशोधन करतात, तरीही अशी खूप सारे लोक आहेत, ज्यांना ग्रीस साहित्याचे ज्ञान आहेच.

प्रत्येक राजघराणे, राजकीय हुकूमत किंवा राजकीय पक्ष हे त्यांच्या आवडीनुसार व सोयीनुसार इतिहास लिहितात, ज्याच्यात त्यांची सत्ता कशी बळकट होती, याचे पुष्टीकरण केलेले असते. राजकीय हुकमत जेव्हा इतिहास लिहिते, तेव्हा ते खूप सारे राजकीय बदल व सुधारणादेखील सातत्याने त्याच्यात करत असते, परंतु इतिहासाचे काही असे प्रकार (forms) आहेत, ज्यांच्यात बदल करता येत नाही आणि तो इतिहासाचा प्रकार म्हणजे लेखकाने केलेली साहित्यनिर्मिती  होय. हा इतिहास राजकीय हुकूमतने लिहिलेल्या इतिहासापेक्षा कितीतरी पटीने विश्वसनीय असतो. हे कथन मानवी अस्तित्वाच्या सत्य परिस्थितीला कितीही बनावटी वाटत असले तरी या गोष्टीला ज्ञान तारून नेते. काळाच्या ओघात उत्कृष्ट साहित्यकृती नाहीशी होत नाही. ती प्राचीन काळाची असो की, सध्याची असो, उलट मानवी संस्कृतीच्या रूपाने ती स्पष्ट होत जाते, बिलोरी काचेसारखी चमकायला लागते.

साहित्य हे इतिहासापेक्षा वेगळे असते. जे व्यक्तीच्या वैयक्तिक इतिहासाचे, जगाचे आणि मानवतेचे इतिहास म्हणून दस्तऐवजीकरण करते. कदाचित या मानवी जगाच्या समजुतीला जाणीव म्हटले जाते. स्व आणि मानवी स्वभावाची व्यक्तीगताकडून पुनर्निर्मिती होत नसते, परंतु लेखक अनुभवांचे दस्तऐवजीकरण करू शकतो आणि हीच साहित्याची सुरुवात असते. या अर्थी लेखक अमर्याद स्वतंत्र उपभोगू शकतो असेच म्हटले पाहिजे.

तथापि हे जे स्वतंत्र साहित्य लिहिले जाते, ते त्या लिखाणापुरताच मर्यादित असते. जर एखाद्या लेखकाने हे स्वातंत्र्य स्वत:च्या फायद्यासाठी हुकूमतीच्या स्वाधीन केले, तर हे राजकारणाच्या युद्धरथावर आधारासाठी लटकण्यासारखे असेल किंवा हे बाजारात लोकप्रिय रुचीसाठी आणि भव्यतेसाठी भटकत विकत फिरण्यासारखं असेल ज्यामुळे हे स्वातंत्र्य त्वरित नष्ट होईल. 

या प्रकारचे साहित्य नफातोट्याच्या नफ्याच्या पलीकडे असते म्हणून ते स्वाभाविकपणे भाररहीत असते. आणि स्वर्गीय अश्व आकाशात जसा मुक्त संचार करतो, तशी या साहित्यात कल्पना (imagination) ही मुक्त असते. या प्रकारच्या साहित्याचे मूल्य हे मानवी जीवनाचे सत्य दाखवणं यांच्यात असतं, कारण ते खरंच मानवी जीवनाचे सत्य दाखवतं आणि हाच साहित्याचा सगळ्यात मूलभूत मापदंड आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आधुनिक आणि समकालीन काळात राजकीय अचूकतेने (political correctness) नैतिक निर्णयांनाही (ethical judgement) पुनर्स्थित केले आहे. तथाकथित राजकीय अचूकपणा हा फक्त त्या वेळच्या राज्यकर्त्यांची रुची आणि वास्तविक सामाजिक संबंध यातला तात्पुरता समतोल होय. हुकूमतच्या बळाशी असलेला समतोल जर संपला तर जे आज योग्य किंवा बरोबर आहे ते उद्याचं अयोग्य किंवा चूक ठरेल आणि काळाच्या ओघात या जागा बदलतील. जे साहित्य अशा प्रकारचा राजकीय अचूकपणा स्वीकारून चालतं ते फक्त टाकाऊ रद्दी म्हणून उरते.

साहित्य हे नफा आणि तोटा या व्यावहारिक संबंधाच्या पलीकडे असते. लेखक हा मानवी जीवनाचे सत्य पुढे आणत असतो आणि या व्यतिरिक्त साहित्यासाठी दुसरा मापदंड निर्माण करण्याची गरज नाही. तत्त्ववेत्त्यांना जगाचे पूर्णपणे आकलनक्षम स्पष्टीकरण देणे हा मापदंड तयार करावा लागतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर तत्त्ववेत्त्यांना जगाला संकल्पना आणि तर्काच्या आधारे विचारप्रणालीत आणावे लागते. हा तत्त्वज्ञानाचा मापदंड आहे. जेथे लेखक प्रत्येक व्यक्तीगताच्या वास्तविक आणि अनुभवांना समजण्यासाठी मानवी जीवनाच्या सत्याकडे परत जातो. साहित्य हे राजकारण आणि तत्त्वज्ञानविषयक स्पष्टीकरणाचे जहागीरदार नसते, तर उलट साहित्य सगळ्या वादांचे व हस्तक्षेपांचे निर्मूलन करते. साहित्याचा सर्वोच्च प्रकार हा साधारणत: सत्याशी, वास्तवाशी झगडतो आणि असेही म्हणता येईल की, साहित्याचा अंतिम शोध म्हणजे सत्याला (वास्तवाला) समजणे हा आहे.

साहित्यात समाजाविषयीच्या सर्व विचारांचा समावेश होतो आणि प्रामुख्याने मानवी जीवनाचा समावेश होतो. कारण लेखकाचे त्याच्या जीवनातील अनुभव हे त्याच्या साहित्यकृतीत येत असतात. असे असले तरी प्राचीन काळातील साहित्यापासून तर सध्याच्या साहित्यापर्यंत प्रत्येक लिखाणात लोकांविषयीची भेदक दृष्टी लेखकाची राहिलेली आहे हे दिसते. असे लेखक त्यांच्या काळातले विचारवंतही असतात. तरीही लेखक हे तत्त्ववेत्त्यांपेक्षा वेगळेच असतात, कारण लेखक त्यांचे विचार त्यांच्या साहित्यकृतीतील पात्रांच्या विचारातून व्यक्त करतात आणि ते विशिष्ट परिस्थितीतील त्या पात्राचे अनुभव असतात. अॅरिस्तोफॅनने (Aristophanes) सॉक्रेटिसची (Socrates) केलेली थट्टा अजिबात कालबाह्य झालेली नाही. कोणत्याही तत्त्ववेत्त्यांच्या तत्त्वज्ञानापेक्षा मानवी स्वभावाविषयीची शेक्सपिअरची प्रगल्भता अजूनही अतुलनीयच आहे.      

साहित्य हे भव्य नदीसारखे असते, जिचा स्रोत हा अमर्याद असतो आणि लेखक एकाकी मुसाफिर असतात, जे सतत मानवजातीच्या खऱ्या भौतिक आणि मानसिक चित्रणाच्या शोधात असतात. आणि ते साहित्याच्या माध्यमातून मानवजातीला व जगाला समजावणे, हेच व्यक्त करण्याची पराकाष्ठा करत असतात. आणि हे सुद्धा न संपणाऱ्या रस्त्यागतच आहे. 

विसाव्या शतकाची साहित्यिक क्रांती आणि क्रांतिकारी साहित्य हे सतत जुन्या जगाचा अनुक्रम (order) व त्याच्या साहित्याच्या मरणाची घोषणा करत आलेय. साहित्याला ‘क्लास लेबल्स’ (class lebels) लावलेले दिसतात अन् पुरोगामी किंवा प्रतिक्रियावादी म्हणूनही त्याला वर्गीकृत केलेले दिसते. पुरोगामी आणि प्रतिक्रियावादी ही दोन नावे इतिहासात ऐतिहासिक भौतिकवादी विचारधारेने जबरदस्तीने लादलेली आहेत. परंतु इतिहासाच्या अनंत भव्य नदीला ‘पुरोगामी किंवा प्रतिगामी’ अशा शिक्क्यांचा संसर्ग झाला नाही. शिवाय आजच्या साहित्याची तुलना जर प्राचीन ग्रीसच्या साहित्याशी केली तर आजच्या साहित्यात किती प्रगती झालेली आहे, हे सांगणे कठीण आहे. किंवा मानवजातीचा जन्मजात स्वभाव किती बदलला हेही सांगणं सोपं नाही. जेव्हापासून मानवी समाजाचे अस्तित्व आहे, तेव्हापासून साहित्य सतत माणुसकीला समजत आलेय आणि साहित्याला मानवी समाज समजून घेत आलाय.

साहित्य मेलेय असे कुणीही उद्दामपणे सांगू शकत नाही. शिवाय उत्तरआधुनिकवादी विरचनेने साहित्याच्या शब्दार्थाचीच मीमांसा केली आणि असे करण्याला त्या काळात फॅशनेबल समजले गेले. परंतु उपहास हा होता की, ही सामाजिक सत्यता नव्हती. आणि हे बौद्धिक पवित्राशिवाय दुसरे काहीही नव्हते. ही मीमांसा चिरकाल वाचनीय म्हणून टिकण्यासाठीही अपयशी ठरली.

.................................................................................................................................................................

या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौंदर्याचं प्रतिबिंब! आरसाच जणू. तुम्ही वाचकांनी त्यात डोकवावं. स्वतःस न्याहाळावं

सृजन-संवाद (भाग १) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३८४, मूल्य - ४२५ रुपये.  

सृजन-संवाद (भाग २) - गोपाळ अवटी, भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर, पाने - ३६२, मूल्य - ४२५ रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5255/Srujan-Sanwad-bhag-1-ani-bhag-2

..................................................................................................................................................................

मानवी समाज तो आधुनिक असो की, उत्तरआधुनिक असो तो कसा बदलत जातो, या गोष्टीचा काही फरक पडत नाही, फरक पडतो तर मानव जातीचे दुर्दैव समाजातून नष्ट होणार नाही, याचा आणि मानव जातीला स्वत:ला समजण्याची गरज कायम राहील ती बदलणार नाही, या गोष्टीचा.

लेखक जो एकाकी मुसाफिर आहे आणि तो चालत राहतो, तो प्रगतशील आहे का, हे सांगणे कठीण असले तरीही तो रस्त्याच्या कडेने चालणारच आणि त्याचे हे चालणे नि:संदेह पिढ्यानपिढ्या असेच चालणार आहे. काळाच्या या निरंतर नदीत साहित्यकृती तिचे मूल्य काळानुरूप प्रकट करतेच. साहित्यकृती तिच्या काळाची साक्ष देते असे समजले जाते, परंतु ती याहीपुढे मानवी जीवनाची साक्ष देते, जे काळाच्याही पलीकडे असते.

लेखक फक्त तो ज्या काळात असतो त्या काळाचा साक्षीच नसतो, तर त्याच वेळेस तो निर्माणकर्ताही असतो आणि तो जे लिहितो, ते त्याच्या नजरेतून सौंदर्यशास्त्रीयदृष्ट्या सुंदर असते. आणि या गोष्टी त्याच्या साक्षीतून जात असतात. साहित्य हे सौंदर्यानुभवाच्या न्यायावर (aesthetic judgement) अवलंबून असते. आणि ते लेखकाच्या साहित्यकृतीच्या रूपाने योग्य की अयोग्य किंवा चांगले की वाईट सिद्ध होण्याकरिता नैतिक व राजकीय मूल्याची (ethical or political value judgement) जागा घेते. शिवाय हा सौंदर्यानुभव व्यावहारिक फायद्याच्या पलीकडे असतो. 

लेखक मनचक्षुचा (third eye) वापर करतो, जो ‘स्व’ला अधिलिखित करतो आणि यालाच ज्ञानचक्षु (intelligent eye) म्हणता येऊ शकते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर ही जागरूकता आहे, सुबोध अनुभूतीचे एक रूप आहे. हे निश्चितच व्यक्तिनिष्ठ असते, परंतु हे सौंदर्यानुभवाच्या गाळणीतून गेल्याशिवाय येत नाही. अशा या दृष्टिकोनातून जे जन्माला येते ते सुंदर किंवा कुरूप, उदात्त किंवा काव्यात्मक, शोकांतिक किंवा विनोदी, हास्यास्पद किंवा असमंजस, उच्च किंवा नीच, हास्यजनक किंवा तिरस्करणीय असते आणि यातून दया किंवा सहानुभूती, दु:ख किंवा सुख आणि तुच्छता/तिरस्कार किंवा विनोदबुद्धी किंवा विनोद या भावनांचा उदय होतो. लेखकपरत्वे मानवी अस्तित्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो, म्हणून मानवी अस्तित्वाचे असंख्य चित्रण शक्य आहेत.

अगदी बाल्झाकच्या ह्युमन कॉमेडीज’ (Balzac's Human Comidies) पासून  तर काफ्काच्या मॉडर्न अॅलेगरीज’ (Kafka's Modern Allegories), बेकेटची अब्सर्ड नाटकं (Beckett's absurdist plays) प्रूस्तचे ‘पॅराडाईज लॉस्ट (Proust's Paradise Lost) तर इलियटचे वेस्टलँड’पर्यंत (Eliot's waste land) हे दिसतं. हा व्यक्तिनिष्ठ सौंदर्यानुभव कलात्मक रूपही घेतो आणि ही पूर्णपणे लेखकाची निर्मिती असते. ही कला लेखकाच्या व्यक्तिनिष्ठ गाळणीतून जाऊनच नावारूपाला येते.

साहित्यनिर्मिती खरे तर सौंदर्यानुभवाच्या प्रक्रियेदरम्यान होत असते. सौंदर्यानुभव, त्याच्या भावना या व्यक्तिपरत्वे वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येक लेखक त्याच्या अनुभवानुसार, कौटुंबिक पार्श्वभूमीनुसार, त्याच्या जडण-घडणानुसार, त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार, त्याच्या प्रवृत्तीनुसार आणि त्याच्या मानसिक अवस्थेनुसार (जी साहित्यनिर्मिती दरम्यान असते) साहित्यात वेगळी आणि विलक्षण रंगछटा घेऊन येतो. या सगळ्या गोष्टींचा सार म्हणजे लेखकाची साहित्यकृती असते.

लेखक एखाद्या व्यक्तिनिष्ठाच्या अनुभवांचे रूपांतर साहित्यकृतीत करतो. तरी नंतरच्या पिढीचे समीक्षक त्या साहित्यकृतीला त्या लेखकाच्या काळाचा आरसा म्हणून किंवा लेखकाला त्या काळाच्या राष्ट्रीय संस्कृतीचा प्रवक्ता म्हणून संदर्भ घेतात. शिवाय त्या काळात लेखकाचे त्याच्या लिखाणाचे काय वैशिष्ट्ये होती, त्याच्या साहित्यकृतीने त्या काळात लोकांवर किती छाप पाडली होती, हा विषयच नसतो. कोणत्याही काळातल्या साहित्यकृती या व्यक्तिनिष्ठ म्हणून विलक्षणच असतात.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

शिवाय साहित्यकृतीची नक्कल करता येत नाही, कारण अशा साहित्यकृतींची निर्मिती हा प्रचंड मोठा योगायोग असतो. अशा प्रकारच्या साहित्यकृतीचा सर्रासपणे ही साहित्यकृती म्हणजे या विशिष्ट काळाचा किंवा विशिष्ट वंशाचा परिपाक आहे, असा संदर्भ घेतला जातो. असे करणे मुळातच चुकीचे आहे.

असा संदर्भ फक्त एखाद्या विशेष बाबसाठी, एखाद्या विशिष्ट वंशासाठी, एखाद्या विशिष्ट काळात योगायोगाने घडून येऊ शकतो. अशा प्रकारच्या लेखकांचा आणि त्यांच्या साहित्यकृतीचा एका विशिष्ट काळात, विशिष्ट राष्ट्रासाठी असा संदर्भ येणे हे आकस्मित असतं. आणि जर तरी असं होत असेल तर एक साहित्याचा मुसाफिर हा एका विशिष्ट वंशासाठी, विशिष्ट काळात कलंकित छाप सोडत आला आहे असेच म्हणावे लागेल.

राजकीय हुकमतचे सलग नैतिक अधःपतन झालेले दिसते आणि इतिहासाच्या या लांबलचक नदीत अशी कितीतरी युगे हळूहळू दिसेनासे होत आहेत. तरीही असे लेखक आणि त्यांची साहित्यकृती असतात, जे मानवजातीच्या सद्सदविवेकबुद्धीला प्रज्वलित करायला कायम उभे असतातच.     

राष्ट्रीय राजकीय हुकमतच्या भोवती बदलणारा इतिहास व सांस्कृतिक विचारांचा इतिहास असा मानवी संस्कृतीचा दुहेरी इतिहास आहे. राष्ट्रीय राजकीय हुकूमतच्या भोवती बदलणारा इतिहास हा अखंड चाललेल्या युद्धाचा, त्यांच्या विजयाचा, लष्करी विजयाचा आणि त्यांचे शासन म्हणजे त्यांचे वैभव असे सांगणारा इतिहास आहे. किन शीनवॉन्गवचे (Qin Shihuang) थडगे व नेपोलियनच्या (Napoleon) विजयाचे अभिलेख, हे त्या त्या संस्कृतीचे अवशेष आहेत. शिवाय व्यक्तीविशिष्टांनी सांस्कृतिक विचारांचा इतिहास लिहलेला आहे. लेखकांना आणि बुद्धिजीवींना विशिष्ट काळात इतिहास लिहिण्याचे स्वातंत्र्य नव्हते. जर कुणी या शक्तिशाली व उच्चकुलीन लोकांचा विरोध केला तर अशांना एकांतवासात पाठवले जायचे किंवा निष्कासित केले जायचे किंवा त्यांना मारले जायचे. प्राचीन काळापासून तर आतापर्यंत लेखकांचे भाग्य काही फारसे  बदललेले नाही. लेखकांच्या जन्मभूमीतसुद्धा त्यांच्या लिखाणाला परवानगी मिळालेली दिसत नाही किंवा त्यांच्या लिखाणाला स्वीकारलेले नाही असे दिसते. यासाठी आशियातील ची गॅन (Qu Yuan), युरोपमधील दांते (Dante) आणि आधुनिक काळातील जॉयस आणि बेकेट (Joyce and Beckett) ही नावे घेता येतील.   

लेखकाला वंश किंवा राष्ट्र या गोष्टींसोबत आपली ओळख जुळवून घेण्यासाठी कष्ट घ्यायची अजिबात गरज नाही. राजकीय गरजेपोटी प्रादेशिक व सांस्कृतिक ओळख  येत असते. आणि ही ओळख सगळ्या प्रकारच्या ओळखींसारखी असते, ज्या ओळखी राजकीय पक्ष बनवण्याकरता असंख्य लोकांना सामाईक विचारांअंतर्गत एकत्र आणण्यासाठी बनवल्या जातात. मानवतेची  प्रादेशिक आणि सांस्कृतिक ओळख व्यक्तींसोबत जुळलेली असते. आणि सध्याच्या काळात या गोष्टींसाठी ताण द्यायची आवश्यकता नाही, खासकरून तेव्हा, जेव्हा संवाद आणि सांस्कृतिक प्रचार हा सहज शक्य आहे आणि एकेरी विचार करणारा असा एकही व्यक्ती मिळणार नाही, जो कोणत्याच अंगी बहुसांस्कृतिक प्रभावाला (multicultural influence) स्वीकारणार नाही. लेखकाला राष्ट्रासाठी किंवा वंशासाठी प्रवक्ताच्या भूमिकेला गृहित धरण्याची गरज नाही. जर ही भूमिका घेऊन तो जागतिक नागरिक व व्यक्तिनिष्ठ म्हणून आवाज उठवत असेल, तर हा सर्वोत्तम आवाज असेल आणि त्याची ही भूमिका खूप अस्सल आणि खरी असेल.

लेखकांच्या साहित्यकृतींमध्ये एका विशिष्ट राष्ट्रीय संस्कृतीचे माग पाहावयास मिळतात. परंतु त्या साहित्यकृतीची चित्तवेधक गोष्ट अशी की तिच्यात अद्वितीयपणा व नावीन्य असते. आधी स्पष्ट केलेले नसेल ते स्पष्ट करण्यासाठी जर लेखक अपयशी ठरतो किंवा नव्या भावना किंवा नवे विचार व्यक्त करण्यास लेखक अपयशी ठरतो आणि तो जर फक्त एखाद्या सांस्कृतिक परंपरेचा असतो, तर त्याची साहित्यकृती पर्यटनाच्या जाहिरातीसारखी असते व खूप कंटाळवाणी वाटते.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

वेगवेगळ्या काळातील कवी आणि लेखक साहित्यात वेगवेगळे अनुभव मांडतात आणि हे वेगवेगळे अनुभव मानवतेची गहनता व समृद्धी सांगण्यासाठीचे साधन ठरतात. साहित्याचा सौंदर्यानुभवाचा अनुभव हा कोणत्याच साहित्यकृतीची नकल करत नाही किंवा एकदुसऱ्यासारखी प्रतिकृती तयार करत नाही. यासाठी अगदी प्राचीन ग्रीक शोकांतिकेचा पासून तर चीनच्या तांग कवितेपर्यंत (Tang Poetry), सर्वेंटीसच्या डॉ कीहोत्ते’ (Cervante's Don Quixote)पासून तर  गटेच्या फाउस्ट’पर्यंत (Goethe's Faust) आणि  त्सॉ शुअचीनच्या ड्रीम ऑफ रेड मॅन्शन’ पर्यंत (Cao Xueqin's Dream of Red Mansion) आपण ही गोष्ट पाहू शकतो.

हे अनुभव लेखकाने व्यक्तिनिष्ठाकडून साधित केलेले असतात आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये मांडलेले असतात. हे अनुभव कोणत्याही राष्ट्राच्या सीमेच्या आणि काळाच्या पलीकडचे असतात. आणि ही गोष्ट मानवजातीच्या आध्यात्मिक विपुलतेचा एक वाटा बनते. ही मानव स्वभावाला परस्परसंबंधित असलेली गोष्ट आहे आणि जोपर्यंत ही गोष्ट लोकांच्या प्राथमिक शिक्षणात आहे, तोपर्यंत त्यांच्याजवळ अन्योन्य (mutual) संवादासाठी, भावनांच्या आदान-प्रदानासाठी आणि एकमेकांना समजण्यासाठीची नैसर्गिक प्रवृत्ती असेल. लेखक हा त्याच्या सौंदर्यानुभवाची त्याच्या साहित्यकृतीत अदला-बदली करून टाकतो. नंतरच्या काळात जेव्हा त्याची साहित्यकृती वाचली जाते, तेव्हा वाचकांना सहानुभूतीशील प्रतिक्रिया देण्यास ती साहित्यकृती भाग पाडते. पुढे वाचकाच्या अनुभवांनी लेखकाचे सौंदर्यानुभव एकत्र येतात व त्याचे प्रतिबिंबही उमटते. अशा प्रकारे साहित्यकृती जी एकाकी व्यक्तिनिष्ठेची असते, ती सलग पुढच्या काळात प्रसारित होत जाते आणि हे राष्ट्रांच्या सीमेपल्याड, राष्ट्रांच्या संस्कृतीच्या आणि भाषेच्याही पलीकडचे असते आणि हीच लेखकाची चिरकाल टिकणारी कामगिरी असते व हे त्याचे मोठे यश असते.

जेव्हा लेखक वस्तुनिष्ठतेचे दुर्दैव आणि स्वत:च्या मर्यादा समाजात बघतो, तेव्हा तो त्याच्या क्षमतेनुसार पर्याय निवडतो आणि निर्भयपणे स्वतंत्र राहतो. साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात जे त्याच्या हातात असते, त्याच्यात त्याला साहित्यनिर्मितीसाठी भरपूर स्वातंत्र्य असते. विसाव्या शतकाच्या दूषित वातावरणातील जे उदयोन्मुख लेखक आहेत, त्यांना स्वत:ला राजकारणाशी संलग्न करण्याची मुळीच गरज नाही, कारण साहित्य हे लेखकाच्या मानवतेविषयी जागृतेची आणि त्याच्या स्वत:च्या अस्तित्वाची पुष्टी करते आणि हे प्रामुख्याने व्यावसायिक फायद्याच्या पलीकडे असते आणि हे कायम असेच राहणार.

..................................................................................................................................................................

विजय अशोक इंदुशोकाई
vijayindushokai@gmail.com 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा