भारतीय पुरुष ‘बाई’चं मांस कशा प्रकारे शिजवतात…
पडघम - देशकारण
मिताली सरन
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 06 October 2020
  • पडघम देशकारण बलात्कार राजस्थान उत्तर प्रदेश कठुआ उन्नाव भवरी देवी हाथरस

हल्ली प्रत्येकाकडे ‘कीचन-टीप्स’ असतात. हे एक जुनं भारतीय वैशिष्ट्य आहे. भारतीय पुरुषांसारखं बाईचं मांस कुणीही शिजवत नाही. बऱ्याच वर्षांपासून या पुरुषांनी जंगली चिमट्याचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे कुणालाही तो फॉर्म्युला वापरता येतो. पण तुमचा ‘पर्सनल टच’ असेल तर तुम्ही स्वत:ला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकता. ती एक हवीहवीशी भावना असते, काही भारतीय पुरुष त्याला ‘हुक्माचा पत्ता’ किंवा ‘इस्पिकचा एक्का’ म्हणतात. (उदा. ‘संध्याकाळची छेडछाड’ आणि ‘बाईच्या विनयशीलतेवर घातला जाणारा घाला’)

ही रेसिपी इतकी लोकप्रिय आहे की, तुम्ही ती एका दिवसात ९० वेळासुद्धा करू शकता. हे तर आपल्याला माहीतच आहे की, काही भारतीय पुरुष तर कुठेही बाईचं मांस शिजवू शकतात. त्यासाठीची कृती फारच सोपी आहे : एका बाईला जबरदस्तीनं उचला, तिच्यावर वर्चस्व गाजवा आणि जे तुमच्याकडे असेल ते तिच्या मांसात घुसवा. शिश्न हा सर्वांत सोयीचा, लोकप्रिय प्रकार आहे, पण त्याशिवाय तिला भीती वाटेल, वेदना होतील, हाल होतील, अपमान होईल, संताप येईल आणि दु:ख होईल असं इतर काहीही चालू शकतं. तुमच्या मानवतेचा थर्मामीटर तपासा. तो जेव्हा शुन्यावर येतो, तेव्हा तिचा निकाल लागतो. पण सगळा मामला झाकून ठेवा किंवा मग त्याची धग कमी होऊ द्या. दरम्यान मित्रांबरोबर तुमचा पराक्रम शेअर करा किंवा सोशल मीडियावर त्याचं प्रदर्शन करा.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

ही रेसिपी उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रामुख्यानं पाहायला मिळत असली तरी संपूर्ण भारतातही तितकीच लोकप्रिय आहे. त्यासाठीचं साहित्य तसं सहज उपलब्ध आणि विकासाच्या कुठल्याही टप्प्यावर सहज वापरण्यायोग्य असतं. वयात आलेली बाई चालतेच, पण जवळपास एक तृतीयांश पुरुषांना अल्पवयीन मुली (किशोरवयीन मुलींपासून ते जन्मून केवळ काही आठवडे झालेल्या मुलींपर्यंत) आणि नव्वदीतल्या बायाही (दिल्ली, सप्टेंबर २०२०) चालतात. जवळपास ९० टक्के पुरुषांना त्यासाठी लागणारं साहित्य माहीत असतं – बाबू, तुझे काका आहेत. अनेकदा खरंच असतातही.

प्रत्येक प्रसंगासाठी त्याची तयारी करता येते. बाईचं मांस जातीय खुनखराब्याला पूरक म्हणून शिजवलं जातं. उदा. १९४६ सालची नौखाली किंवा २००२चा गुजरात. शत्रूपक्षाच्या लष्कराचाही हा आवडता विषय आहे. ते १९९१मध्ये कुनान पोशपोरा (काश्मीर) इथे होऊ शकतं. तो मध्यरात्रीचा अल्पोहार असू शकतो किंवा मद्यपानानंतरची मस्ती. उदा. २०१२मधली दिल्लीतली घटना. बाईचं मांस सूड घेण्यासाठाही शिजवलं जातं. जसं १९९२मध्ये राजस्थानातल्या भंवरीदेवीने बालविवाहाला विरोध केल्यावर किंवा आठ वर्षांची कठुआ (काश्मीर)ची मुलगी. ते नकार मिळालेल्या प्रेमासाठीही शिजवलं जातं. अ‍ॅसिड हा त्यासाठी एक लोकप्रिय पर्याय आहे. तुम्ही एखाद्या पुरुषासाठी वेड्या आहात म्हणून किंवा वेळ मारून नेण्यासाठीही शिजवलं जातं. पुरुष बाईचं मांस शिजवू शकतात हे दाखवून देण्यासाठी आणि बाईनं ते विसरू नये याची आठवण करून देण्यासाठीही बाईचं मांस शिजवलं जातं.

.................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

शिस्न हा एक लोकप्रिय प्रकार आहे, ज्याचं मित्रपरिवार आणि कुटुंबांमध्येही स्वागत केलं जातं. पण पुरुष मुलीला जखडून ठेवण्यासाठी कुत्र्याची साखळी (अरुणा शानबागवर त्यामुळे ४२ वर्ष जवळपास मृतावस्थेत राहिली) किंवा लोखंडी सळईचाही (निर्भया प्रकरणात याचा उपयोग केला गेला) वापर करतात. पुरुष त्यांचं काम वेगवेगळ्या प्रकारे प्रदर्शित करतात. २०१४मध्ये बदायूंमधल्या दोन किशोरवयीन बलात्काराच्या बळी ठरलेल्या तरुणींना झाडाखाली फाशी दिली गेली, २०१९मध्ये गोरखपूरमधल्या १९ वर्षीय तरुणीचे दोन तुकडे करण्यात आले, बलात्कारी वडलांना विरोध केल्यामुळे त्यांनी तिच्या चारित्र्यावर शंका घेतली, २००४मध्ये मणिपूरमध्ये बलात्कार आणि अत्याचारानंतर त्या तरुणीच्या ओटीपोटात गोळी घालून ठार मारण्यात आलं, २०१९मध्ये उन्नावमध्ये चाकूनं भोसकलं आणि जिवंत जाळण्यात आलं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

बहुतेक पुरुष बाईचं जे मांस शिजवतात, ते त्यांच्या आयुष्यासोबतच जातं. पण ज्या बाया तक्रार करतात, त्यांना सहसा इतर पुरुषांकडेच जावं लागतं. त्यापैकी बरेज जण नेमकी काय गडबड आहे, ते पाहत नाहीत. पण अलीकडच्या काळात बायांचा आवाज जरा मोठा झालाय. त्यामुळे आता पोलीस लगेच कुटुबीयांना धमकी देऊन आणि घरात डांबून मध्यरात्रीचा मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून देतात. पत्रकारांचे फोन टॅप केले जातात. विरोधी पक्षाच्या नेत्यांना धक्काबुक्की आणि अटक केली जाते. त्यानंतर बलात्काराच झालाच नाही असे एका जनसंपर्क कंपनीच्या माध्यमातून सांगितलं जातं. उच्चजातीच्या मुलांनी दलित जातीतल्या मुलीचं मांस शिजवलं, त्यामुळे सगळे सांभाळून घेतलं जातं. (हाथरस, २०२०)

जे याला रानटी, किळसवाणं आणि निंद्य म्हणतील, त्यांना परंपरेची ताकद किंवा ताकदीची परंपरा समजू शकणार नाही. त्यांनी फक्त पास्ता खावा.

अनुवाद - टीम अक्षरनामा

..................................................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख दै. ‘डेक्कन हेराल्ड’मध्ये ४ ऑक्टोबर २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Makarand Bharambe

Fri , 15 January 2021

अत्यंत धारदार रुपक, पारंपारिक अभिनिवेशाऐवजी थंड, आटीव परंतु ग्लानी आणणारा भाषेचेच रोमांच उभे करणारा उपरोध .। विलक्षण हातोटी...भीषण लज्जास्पद वास्तव !!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा