विद्वेषाच्या राजकारणाच्या विरोधात आणि समताधिष्ठित, बहुविध भारतासाठी मतदान करा
पडघम - साहित्यिक
देशभरातल्या २३३ लेखकांचे आवाहन
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 05 April 2019
  • पडघम साहित्यिक

यंदाच्या निवडणूकीत आपला देश एका वळणावर उभा आहे. देशाचे संविधान सर्व नागरिकांना समान हक्क देते. खाण्याचे, प्रार्थना करण्याचे आणि प्रत्येकाला हवे तसे जगण्याचे स्वातंत्र्य देते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असहमतीचा अधिकार देते. परंतु गेल्या काही वर्षांत आपण पाहिले आहे की, लोकांना जात, धर्म, लिंग किंवा प्रदेशाच्या नावावर ठार मारले जात आहे, त्यांच्यावर हल्ले होत आहेत, त्यांच्याशी भेदभावाचा व्यवहार होत आहे. देशाचे विभाजन करण्यासाठी, भीती उत्पन्न करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना पूर्ण नागरिक म्हणून जगण्यापासून वंचित करण्यासाठी विद्वेषाच्या राजकारणाचा वापर केला जात आहे. लेखक, कलाकार, चित्रपट निर्माते, संगीतकार व इतर सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सातत्याने छळ होतो आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यांच्यावर सेन्सॉरशिप लादली जात आहे. सत्ताधाऱ्यांना जो कुणी प्रश्न विचारेल, त्याचा छळ केला जात आहे किंवा खोट्या व हास्यास्पद आरोपांखाली अटक केली जात आहे.

आपणा सर्वांनाच हे बदलायचे आहे. विवेकवादी, लेखक आणि कार्यकर्त्यांचा छळ किंवा हत्या आपल्याला नको आहेत. स्त्रिया, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक जमातींच्या विरुद्ध लिखित वा कृतीद्वारे केल्या जाणाऱ्या हिंसेविरुद्ध कठोर उपाययोजना झाल्या पाहिजेत. आपल्याला नोकऱ्या, शिक्षण, संशोधन, आरोग्य सेवा आणि सर्वांना समान संधी यासाठी संसाधने व उपाय हवे आहेत.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आपल्या सर्वांनाच आपल्या देशाच्या बहुविधतेचे रक्षण करायचे आहे, लोकशाही विकसित होऊ द्यायची आहे. हे कसे करायचे? आपल्याला हवा तो बदल इतक्या तातडीने कसा घडवून आणायचा? अनेक गोष्टी करणे आवश्यक आहे, आपण करूही शकतो. परंतु एक गंभीर पहिले पाऊल शक्य आहे.

पहिले पाऊल आपण लवकरच उचलू शकतो. ते म्हणजे विद्वेषाच्या राजकारणाला मतदान करायचे नाही. लोकांच्यातील विभाजनाला मत देण्याचे नाकारायचे. हिंसा, धमक्या आणि सेन्सॉरशिपच्या विरोधात मत द्यायचे. हाच एक मार्ग आहे. आपण अशा भारतासाठी मत देऊ शकतो, जो संविधानाने दिलेली अभिवचने आपल्याला पुन्हा देऊ शकतो. म्हणूनच आम्ही सर्व नागरिकांना बहुविध व समताधिष्ठित भारतासाठी मतदान करण्याचे आवाहन करत आहोत.

- ए. जे. थॉमस, हुचागी प्रसाद, रेखा अवस्थी, ए. आर. वेंकटचलापथी, इशरत सय्यद, रितू मेनन, अभय मौर्य, जे. देविका, रॉबिन न्गंगोम, अदिल जुसावाला, जे. एम. प्रकाश, रोमिला थापर, अजय सिंग, जयदेव तनेजा, रुचिरा गुप्ता, अकिल बिलग्रामी, जयश्री मिश्रा, रुक्मिणी भाया नायर, अली जावेद, जीत थाईल, एस. जोसेफ, अलोक राय, जेरी पिंटो, सचिन केतकर, अमित चौधरी, ज. वि. पवार, सलीम युसुफजी, अमिताव घोष, के. जी. शंकर पिल्लई, सलमा आनंद, के. एन. पण्णीकर, समिक बंदोपाध्याय, आनंद तेलतुंबडे, के. सच्चिदानंदन, संजीव कौशल, चंद्रदासान, नमिता सिंग, विष्णू नागर, चंद्रकांत पाटील, नॅन्सी अदाजानिया, विश्वनाथ त्रिपाठी, सिव्हिक चंद्रन, नयनतारा सहगल, विवान सुंदरम, दिलीप कौर टिवाना, नीरज सिंग, विवेक शानभाग, दामोदर मावजो, नित्यानंद तिवारी, व्होल्गा, दत्ता दामोदर नाईक, नूर जहीर, झोया हसन, दीपन शिवरामन, ओरिजित सेन, अथिल कट्याल, देवदन चौधरी, पी. शिवाकामी, मेनका शिवदासानी, देवेंद्र चौबे, पी. एन. गोपालकृष्णन, चंदन गौडा, देवी प्रसाद मिश्र, पी. पी. रामचंद्रन, अर्जून राजेंद्रन, दिनेश कुमार शुक्ला, पंकज बिश्त, शीला रोहेकर, ई. संतोषकुमार, पॉल झचारिया, आशा नंबिसन, ई. व्ही. रामकृष्णन, प्रभा वर्मा, वैदेही, गणेश देवी, प्रबोध पारीख, प्रेमानंद गज्वी, गगन गिल, प्रज्ञा दया पवार, रवींद्र वर्मा, गौहर रझा, प्रेम तिवारी, मृणालिनी हरचंद्राई, गीता कपूर, प्रिया सारुक्काई छाब्रिया, सुचरिता दत्ता-आसने, गीतांजली श्री, पुरुषोत्तम अगरवाल, अॅनी चंडी, गिरधर राठी, आर. उन्नी, कीर्ती रामचंद्र, गिरीश कार्नाड, रामनाथ तारीकेरे, गीता सुब्रमण्यन, गीता हरिहरन, रहमान अब्बास, पौली सेनगुप्ता, गोविंद प्रसाद, राजेंद्र चेन्नी, सोनजा चंद्रचूड, गुलाम मोहमद शेख, राजेंद्र राजन, के. आर. उषा, एच. व्ही. शिवप्रकाश, राजेश जोशी, उशा रामास्वामी, हंसदा सौवेंद्र शेखर, राजीव रंजन सिंग, व्हॅली राव, हरीयश राज, रामप्रकाश त्रिपाठी, शोमा चॅटर्जी, हर्ष मंडेर, रणजित होस्कोटे, मुथुकृष्णन, हेमंत दिवटे, रावसाहेब कसबे, पद्मिनी मोंगिया, हेमलता माहेश्वर, राकेश तिवारी, अंजना अप्पाचना, हिरालाल राजस्थानी, रविशंकर, अनन्या वाजपेयी, कल्पना स्वामीनारायण, संजीव खांडेकर, अनिया लुम्बा, कल्पना स्वामीनाथन, संजीव कुमार, अनिल जोशी, कावेरी नंबिसन, सरबजीत गरर्चा, अनिता नायर, केकी दारुवाला, सतीश आळेकर, अनिता रत्नम, किरण नगरकर, सावित्री, राजीवन, अंजली थंम्पी, के. एम. श्रीमाली, सेथू, अंजली पुरोहित, के. पी. रामानुन्नी, शफी शौक, अनुपमा ए. एस., कुणाल बसू, शैलेश सिंग, अनुराधा कपूर, कुट्टी रेवथी, शांता आचार्य, अनुराधा मारवाडी, एम. मुकुंदन, शांता गोखले, अन्वर अली, एम.एम. पी. सिंग, शरणकुमार लिंबाळे, अपूर्वानंद, मधु भादुरी, शर्मिला सामंत, अर्जुमंद आर्य, मकरंद साठे, शशी देशपांडे, अर्जुन डांगळे, मालविका कपूर, शेखर जोशी, अरुण कमल, मामंग दाई, शोभा सिंग, अरुनवा सिन्हा, ममता सागर, सुभा, अरुंधती रॉय, मानसी भट्टाचार्य, स्मिता सहाय, अरविंद कृष्ण मेहरोत्रा, मानसी, श्रीलता के., असद झैदी, मनगड रत्नाकरण, सुबोध सरकार, असगर वजाहत, मंगलेश डबराल, सुदीप चक्रवर्ती, अशोक वाजपेयी, मनीषी जानी, सुदेशा बॅनर्जी, अशोकन चारुवील, मनमोहन, सुधन्वा देशपांडे, अश्विनी कुमार, मनोज कुलकर्णी, सुधीर चंद्र, आत्माजित सिंग, मनोज कुरूर, सुरेश छाब्रिया, बी. राजीवन, मारिया क्योटो, टी.एम. कृष्णा, बद्री रैना, मीना कांदासामी, टेकचंद, बजरंग बिहारी तिवारी, मेघा पानसरे, उदयन वाजपेयी, बाली सिंग, मोगल्ली गणेश, उर्वशी बुटालिया, बामा, मृणाल पांडे, वासंथी, बशरत पीर, मुकुल केशवन, वनमाला विश्वनाथा, बेन्यामिन, एन. एस. माधवन, विजय प्रसाद, भाषा सिंग, एन. पी. हफिझ मोहमद, वेनिता कोएलो, बिना सरकार एलियास, नबनीता देव सेन, विजयालक्ष्मी, सी. ए. चंद्रिका, नलिन रंजन सिंग, विनिता अगरवाल, चमन लाल, नमिता गोखले, विनिताभ.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 06 April 2019

जो पक्ष ( म्हणजे मोदी) घटनादत्त मार्गाने राजकारण करतोय त्याच्या विरुद्ध विनाकारण बोंबा ठोकायच्या. आणि त्याच वेळी जे नक्षलवादी भारतीय घटना उघडपणे नाकारून हिंसक मार्ग चोखाळतात त्यांना मात्र पाठींबा द्यायचा. याचा अर्थ असा की उपरोक्त लेखकांना भारतीय संविधान कोलमडायला पाहिजे. कोण घटनाद्रोही आहे ते कळलं ना? -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा